नीलिमा विजय खडतकर
साहित्य
- सोया ग्रॅन्युअल्स (सोया चंक्स) – एक कप
- भाजलेले बेसन किंवा फुटाण्याचे पीठ – पाव कप
- बारीक चिरलेली कोथिंबीर – अर्धा कप
- हिरवी मिरची-आलं पेस्ट – एक टेबलस्पून
- बडीशोप – एक टीस्पून
- चाट मसाला – एक टीस्पून
- आमचूर पावडर – एक टीस्पून
- साखर – एक टीस्पून
- ओवा – एक टीस्पून
- धणे जिरे पावडर – एक टेबलस्पून
- मीठ – चवीनुसार
- गव्हाचे पीठ – अर्धा कप
- मैदा – अर्धा कप
- बेसन – एक टेबलस्पून
- तेल – तळणासाठी
हेही वाचा – Recipe : कलिंगडाच्या सालीचे मऊ लुसलुशीत डोसे अन् रताळाच्या घाऱ्या
कृती
- प्रथम गव्हाचे पीठ, बेसन आणि मैदा एकत्र करून, एक टेबल स्पून तेलाचे कडकडीत मोहन, ओवा आणी मीठ घालून मळून घ्यावे आणि 10 मिनिटं बाजूला ठेवावे.
- सोया ग्रॅन्युअल्स (सोया चंक्स) कोमट पाण्यात भिजत घालावे आणि पाच मिनिटांनी ग्रान्युल्स पाण्यातून काढून पिळून घ्यावेत आणि मिक्सरमध्ये पाणी न घालता थोडे जाडसर वाटून घ्यावेत. (एकदम पेस्ट करू नये.)
- कढईत फोडणीसाठी एक टेबल स्पून तेल घालावे. तेल गरम झाल्यावर त्यात हिरवी मिरची -आलं पेस्ट घालून छान परतून घ्यावे.
- नंतर वाटलेले सोया ग्रॅन्युअल्स, बडीशोप, चाट मसाला, आमचूर पावडर, धणे-जिरे पावडर, मीठ, साखर, चिरलेली कोथिंबीर आणि भाजलेले बेसन किंवा फुटाण्याचे पीठ घालावे आणि मिक्स करुन झाकण ठेवून मंद आचेवर दोन मिनिटं छान वाफ येऊ द्यावी.
- दोन मिनिटांनी झाकण काढून सारण छान परतून घ्यावे. मग गॅस बंद करावा आणि सारण थंड होऊ द्यावे.
- भिजवलेल्या पिठाच्या जाडसर पुऱ्या लाटून त्याचे आयात कृती तुकडे कापून घ्यावेत. प्रत्येक तुकड्याच्या एका बाजूवर एक टेबल स्पून सारण भरून त्यावर दुसरी बाजू दुमडून, टोक मैद्याच्या पेस्टने व्यवस्थित चिकटवून घ्यावे.
- तयार पॅकेट्स गरम तेलात मध्यम आचेवर लालसर खरपूस तळून घ्यावे.
- तयार गरम गरम सोया पॅकेट्स सॉसबरोबर सर्व्ह करावे.
हेही वाचा – Recipe : वरी तांदूळ – आमरस खीर अन् लाल भोपळ्याच्या कुरकुरीत वड्या
पुरवठा संख्या – 3-4 व्यक्तींसाठी
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


