Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सौरभचा बारावी परीक्षा निकाल अन्…

    July 14, 2026

    शेठजी अन् ‘चत्रभुज नानजी’कडचे पेढे

    July 14, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल चटपटीत आलू बोंडा रस्सा

    July 14, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, July 15
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सार्थ ज्ञानेश्वरी : नाना रोगीं अहाळलीं, लोळतीं भूतें देखिलीं 
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : नाना रोगीं अहाळलीं, लोळतीं भूतें देखिलीं 

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 14, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Thirteen, तेरावा अध्याय, अध्याय तेरावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय तेरावा

    तंव तिये इष्टीचां बुडीं । पशुहिंसा रोकडी । मग अहिंसेची थडी । कैंची दिसे ॥222॥ पेरिजे नुसधी हिंसा । तेथ उगवैल काय अहिंसा । परी नवल बापा धिंवसा । या याज्ञिकांचा ॥223॥ आणि आयुर्वेदुही आघवा । याचि मोहोरा पांडवा । जे जीवाकारणें करावा । जीवघातु ॥224॥ नाना रोगीं अहाळलीं । लोळतीं भूतें देखिलीं । ते हिंसा निवारावया केली । चिकित्सा कां ॥225॥ तंव ते चिकित्से पहिलें । एकाचे कंद खणविले । एका उपडविलें । समूळीं सपत्रीं ॥226॥ एकें आड मोडविली । अजंगमाची खाल काढविली । एकें गर्भी उकडविली । पुटामाजीं ॥227॥ अजातशत्रु तरुवरां । सर्वांगीं देवविलिया शिरा । ऐसे जीव घेऊनि धनुर्धरा । कोरडे केले ॥228॥ आणि जंगमाही हात । लाऊनि काढिलें पित्त । मग राखिले शिणत । आणिक जीव ॥229॥ अहो वसतीं धवळारें । मोडूनि केले देऊळ देव्हारें । नागौनि वेव्हारें । गवादी घातली ॥230॥ मस्तक पांघुरविलें । तंव तळवटीं उघडें पडलें । घर मोडोनि केले । मांडव पुढें ॥231॥ नाना पांघुरणें । जाळूनि जैसें तापणें । जालें आंगधुणें । कुंजराचें ॥232॥ बैल विकूनि गोठा । पुंसा लावोनि गांठा । इया करणी कीं चेष्टा । काइ हंसों ॥233॥

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : माझें असतेपण लोपो, नांवरूप हारपो

    अर्थ

    तर प्राण्याच्या बचावाकरिता करावयाच्या या यज्ञांमध्ये आरंभीच जनावरांचे प्रत्यक्षपणेच प्राण घेतले जातात; अशा स्थितीत अहिंसेचे पलीकडचे तीर कसे दिसणार ॥222॥ नुसती हिंसा पेरली असतां तेथे अहिंसा उगवेल काय? (तर नाही). परंतु याज्ञिकांचे धाडस आश्चर्यकारक आहे ॥223॥ आणि सर्व आयुर्वेदहि अर्जुना, याच धोरणाचा आहे. कारण की, एका जीवाचे रक्षण करण्याकरिता दुसर्‍या जीवाचा घात करावा, असे तो प्रतिपादन करतो ॥224॥ नाना प्रकारच्या रोगांनी पोळलेले व त्या दु:खाने लोळत पडलेले प्राणी पाहिले व मग आयुर्वेदाने ती हिंसा (दु:ख) निवारण करण्याकरिता औषधांची योजना केली ॥225॥ तो, औषधयोजनेत पहिल्या प्रथम कित्येक झाडांचे कंद खणविले व कित्येकांना मुळांसकट व पानांसकट उपटविले; ॥226॥ काही झाडांच्या मधल्या भागाचा औषधांत उपयोग केला; काही झाडांची साल काढविली व काही फळ देण्य़ाच्या बेतात आलेल्या वनस्पती, त्यावर क्षारांचे वगैरे कसले तरी थर देऊन उकडविल्या; ॥227॥ (ज्यांनी) कोणाचे केव्हांच वाकडे केले नाही, अशा अजातशत्रू झाडांना (त्यांचा चीक काढण्याकरिता) त्यांच्या सर्वांगावर भेगा पाडून, याप्रमाणे अर्जुना, त्या वृक्षांचे जीव घेऊन त्यांना कोरडे केले ॥228॥ आणि हालचाल करणार्‍या प्राण्यांसही हात घालून त्यांचे पित्त काढून मग त्या योगाने रोगांनी पीडित अशा दुसर्‍या जीवांचे रक्षण केले ॥229॥ अहो, राहती घरें मोडून त्या घराच्या सामानाने देवळें व देव्हारे केले व व्यवहारात लोकांस फसवून, लुटून जे द्रव्य मिळविले, त्या द्रव्याच्या योगाने अन्नसत्र घातले ॥230॥ डोक्यास गुंडाळण्याकरता नेसलेले वस्त्र सोडून जर ते मस्तकास बांधले तर शरीराचा खालचा भाग उघडा पडतो; अथवा जसे घर मोडून त्या घरापुढे मांडव केले ॥231॥ अथवा पांघरुणे जाळून मग जसा शेक घ्यावा किंवा हत्तीचे जसे अंग धुणे असते (हत्ती हा स्नान केल्याबरोबर आपल्या ओल्या अंगावर सोंडेने माती घेऊन जास्त मलीन होतो) ॥232॥ बैल विकून जसा गोठा बांधावा, अथवा राघूस हाकून देऊन मग पिंजरा तयार करावा, असल्या कृतींना योग्य म्हणावे किंवा चेष्टा म्हणाव्यात? कां यांना हंसावे? ॥233॥

    क्रमश:

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : केळीचें दळवाडें, हळू पोकळ आवडे

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : केळीचें दळवाडें, हळू पोकळ आवडे

    July 13, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : माझें असतेपण लोपो, नांवरूप हारपो

    July 12, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : आथिलेचि गुण वानितां, मान्यपणें मानितां

    July 11, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : केळीचें दळवाडें, हळू पोकळ आवडे

    By Team AvaantarJuly 13, 2026

     अध्याय तेरावा केळींचें दळवाडें । हळू पोकळ आवडे । परि फळोनिया गाढें । रसाळ जैसें…

    सार्थ ज्ञानेश्वरी : माझें असतेपण लोपो, नांवरूप हारपो

    July 12, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : आथिलेचि गुण वानितां, मान्यपणें मानितां

    July 11, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : जयाचेनि उजाळें, उघडती बुद्धीचे डोळे

    July 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सौरभचा बारावी परीक्षा निकाल अन्…

    July 14, 2026

    शेठजी अन् ‘चत्रभुज नानजी’कडचे पेढे

    July 14, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल चटपटीत आलू बोंडा रस्सा

    July 14, 2026

    कालातीत कलाकृती…

    July 14, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नाना रोगीं अहाळलीं, लोळतीं भूतें देखिलीं 

    July 14, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 जुलै 2026

    July 14, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 359
    • अवांतर 196
    • आरोग्य 129
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 489
    • फिल्मी 57
    • फूड काॅर्नर 235
    • मैत्रीण 24
    • ललित 779
    • शैक्षणिक 82
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सौरभचा बारावी परीक्षा निकाल अन्…

    July 14, 2026

    शेठजी अन् ‘चत्रभुज नानजी’कडचे पेढे

    July 14, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल चटपटीत आलू बोंडा रस्सा

    July 14, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.