Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 जुलै 2026

    July 14, 2026

    माझी छोटी मैत्रीण…

    July 13, 2026

    ग्रह आणि आपण… ज्योतिष, मनोविज्ञान आणि वेदांत

    July 13, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, July 14
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सार्थ ज्ञानेश्वरी : केळीचें दळवाडें, हळू पोकळ आवडे
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : केळीचें दळवाडें, हळू पोकळ आवडे

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 13, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Thirteen, तेरावा अध्याय, अध्याय तेरावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

     अध्याय तेरावा

    केळींचें दळवाडें । हळू पोकळ आवडे । परि फळोनिया गाढें । रसाळ जैसें ॥212॥ कां मेघाचें आंग झील । दिसे वारेनि जैसें जाईल । परि वर्षती नवल । घनवट तें ॥213॥ तैसा जो पूर्णपणीं । पाहतां धाती आयणी । एऱ्हवीं तरी वाणी । तोचि ठावो ॥214॥ हें असो या चिन्हांचा । नटनाचु ठायीं जयाचां । जाण ज्ञान तयाचिया । हाता चढलें ॥215॥ पैं गा अदंभपण । म्हणितलें तें हें जाण । आतां आईक खूण । अहिंसेची ॥216॥ तरी अहिंसा बहुतीं परीं । बोलिली असे अवधारीं । आपुलालां मतांतरीं । निरूपितां ॥217॥ परि ते ऐसी देखा । जैसा खांडूनियां शाखा । मग तयांचिया बुडुखा । कुंप कीजे ॥218॥ कां बाहु तोडोनि विकिजे । मग भूकेची पीडा राखिजे । नाना देऊळ मोडूनि कीजे । पौळी देवा ॥219॥ तैसी हिंसाचि करूनि अहिंसा । निफजविजे हा ऐसा । पैं पूर्वमीमांसा । निर्णो केला ॥220॥ जे अवृष्टीचेनि उपद्रवें । गादलें विश्व आघवें । म्हणोनि पर्जन्येष्टी करावे । नाना याग ॥221॥

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : आथिलेचि गुण वानितां, मान्यपणें मानितां

    अर्थ

    केळीचे सर्व अंग हलके व पोकळ असे वाटते, पण त्या केळीला फळे आल्यावर ते केळीचे सर्व अंग रसाने दाट भरलेले असे वाटते ॥212॥ अथवा मेघांचे अंग पाहिले तर ते अगदी हलके व दिसण्यात वार्‍याने नाहीसे होईलसे दिसते; पण तेच मेघ एकदा का वर्षाव करावयाला लागले की दाट वर्षाव करतात (जिकडे तिकडे आश्चर्यकारक रीतीने एकसारखे जलमय करून टाकतात) ॥213॥ त्याप्रमाणे पूर्णतेच्या दृष्टीने तो पुरुष पाहिला तर इच्छा तृप्त होतात, एरव्ही पाहिले तर कमीपणाला तोच जागा आहे, (त्याच्या येथे सर्व गोष्टींचे दारिद्र्य आहे) ॥214॥ हे वर्णन पुरे! या वर सांगितलेल्या गुणांचा उत्कर्ष ज्याच्या ठिकाणी असेल, त्याच्या हाताला ज्ञान आले असे समज ॥215॥ अर्जुना, अदंभपण म्हटलें ते हे असे समज. आता अहिंसेचे लक्षण ऐक ॥216॥ आपापल्या निरनिराळ्या मतांचे निरूपण करतांना पुष्कळ प्रकारांनी अनेक लोकांनी अहिंसा सांगितली आहे; ऐक ॥217॥ परंतु त्यांनी सांगितलेली अहिंसा ही जशा वृक्षाच्या फांद्या तोडून मग त्या शाखांनी वृक्षाच्या बुडाशी (त्या वृक्षाच्या रक्षणार्थ) कुंपण करावे तशी आहे. ॥218॥ किंवा हात तोडून तो विकावा व जे पैसे मिळतील त्यांनी भुकेची पीडा शांत करावी; अथवा देऊळ मोडून देवाच्या रक्षणाकरिता देवळाच्या सामानाने आवाराची भिंत बांधावी; ॥219॥ त्याप्रमाणे हिंसाच करून अहिंसा उत्पन्न करावी, असा हा निर्णय पूर्वमीमांसेने (कर्मकांडाने) केला आहे ॥220॥ पाऊस न पडल्यामुळे अतिशय पीडा होऊन सर्व प्राणी जर्जर झाले म्हणजे त्यावर उपाय म्हणून, पाऊस पाडणारे नाना याग वगैरे अनेक यज्ञ करावेत ॥221॥

    क्रमश:

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : माझें असतेपण लोपो, नांवरूप हारपो

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : माझें असतेपण लोपो, नांवरूप हारपो

    July 12, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : आथिलेचि गुण वानितां, मान्यपणें मानितां

    July 11, 2026 अध्यात्म

     सार्थ ज्ञानेश्वरी : जयाचेनि उजाळें, उघडती बुद्धीचे डोळे

    July 10, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : माझें असतेपण लोपो, नांवरूप हारपो

    By Team AvaantarJuly 12, 2026

    अध्याय तेरावा हा जीतु ना नोहे । लोक कल्पी येणें भावें । तैसें जिणें होआवें…

    सार्थ ज्ञानेश्वरी : आथिलेचि गुण वानितां, मान्यपणें मानितां

    July 11, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : जयाचेनि उजाळें, उघडती बुद्धीचे डोळे

    July 10, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : जया ज्ञानालागीं, गगन गिळिताती योगी

    July 9, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 जुलै 2026

    July 14, 2026

    माझी छोटी मैत्रीण…

    July 13, 2026

    ग्रह आणि आपण… ज्योतिष, मनोविज्ञान आणि वेदांत

    July 13, 2026

    गुलकंद

    July 13, 2026

    घराच्या आकाशगंगेतील ग्रह…

    July 13, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : केळीचें दळवाडें, हळू पोकळ आवडे

    July 13, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 358
    • अवांतर 196
    • आरोग्य 129
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 489
    • फिल्मी 56
    • फूड काॅर्नर 234
    • मैत्रीण 24
    • ललित 777
    • शैक्षणिक 82
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 जुलै 2026

    July 14, 2026

    माझी छोटी मैत्रीण…

    July 13, 2026

    ग्रह आणि आपण… ज्योतिष, मनोविज्ञान आणि वेदांत

    July 13, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.