Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    ते दोघे…

    July 1, 2026

    …अन् प्रदीपला सर्वांची किंमत समजली!

    July 1, 2026

    बदल दिसतो, पण त्यासाठी…

    July 1, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, July 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आरोग्य… औषधं खाण्याचा आजार!
    आरोग्य

    आरोग्य… औषधं खाण्याचा आजार!

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकरBy डॉ. प्रज्ञावंत देवळेकरJuly 1, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, औषधं घेण्याचा आजार, औषधं खाण्याचा आजार, स्वत:च स्वत:चे डॉक्टर, औषधांसाठी डॉक्टरांचे मार्गदर्शन, डॉक्टरांचा सल्ला, वैद्यकीय सल्ला
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    हल्ली नियमित थकवा, सांधेदुखी, अशक्तपणा ही तक्रार घेऊन येणाऱ्या पेशंट्समध्ये पोस्टकोविड एलिमेंट तर आहेच, याउपर या कालावधीत चणेफुटाण्यासारखं औषधं खाण्याच्या सवयीचा वाटाही तितकाच मोठा आहे. ब्लड टेस्ट केली असता अनेकात फॉस्फेटची पातळी खूप कमी असल्याची दिसते, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं बॅलन्स बिघडलेलं आढळतं आणि हाडांची डेन्सिटी टेस्ट अर्थात डेक्झा स्कॅन या तपासणीत हाडांची प्रचंड झीज झालेली आढळते…

    पेशंट्सना प्रचंड आश्चर्य वाटतं, “हे कसं काय झालं? मी तर सगळं खातो, मला तर कुठला आजारही नाही… ब्ला… ब्ला…”

    त्यांना समजावून सांगावं लागतं, “काकाजी, तुम्हाला औषधं खाण्याचा आजार आहे, त्याचं काय?”

    “छ्याऽऽ कधी? अधूनमधून डोलो घेतो आणि आठवड्यातून दोनेकदा आणि विशेषत: ड्रिंक्स वगैरे झालं की, एखादं ॲन्टासिड घेतो त्यात काय?”

    या मंडळींना जे सांगतो तेच तुम्हालाही सांगतो, “सामान्यत: ॲन्टासिड्समध्ये अॅल्युमिनियम किंवा कॅल्शियम-मॅग्नेशियमचे कंपाऊंड्स असतात… ते जास्त आणि सतत घेतल्यानं शरीरात फॉस्फेट शोषलं जात नाही. फॉस्फेट हाडांसाठी आणि स्नायूंसाठी अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्याची कमतरता झाली की, हाडं कमकुवत होतात. थोड्या एक्झर्शननंही दुखतात, कधी कधी फ्रॅक्चर होण्याचीही शक्यता वाढते.

    ॲसिडिटी एकच एक नसते! मळमळणं वेगळं, करपट ढेकर येणं वेगळं, आंबट पाणी येणं वेगळं आणि जळजळणं वेगळं… तद्वतच अॅन्टासिड्सचेही प्रकार असतात! थेट तोंडातच विरघळणारे, पोटात जाऊन हळूहळू रिलिज होणारे, फेस निर्माण करणारी औषधं वेळकाळ निदानानुरूप द्यावी लागतात.

    हेही वाचा – बीपी आणि शुगरच्या गोळ्या सुरू आहेत…

    कधी गोळी द्यावी लागते तर, कधी कॅप्स्यूल, कधी पातळ औषध द्यावं लागतं तर कधी पावडर… पण पेशंट अनेकदा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सरसकट आणि वर्षानुवर्षे आपल्याच मर्जीनं काहीबाही घेत रहातात म्हणून हे होतं. काही जण तर किराणासोबत डायजिन, इनो, जेल्युलिसचा स्टॅाक आणून ठेवतात. “साधं ॲन्टासिडच तर आहे, काहीच होणार नाही. आराम तर मिळतो ना!” असा अनेकांचा दावा असतो.

    हेही वाचा – फक्त साखर बंद करून उपयोग होतो का?

    बाबाहो, आराम तर मिळतो, पण तो तात्पुरता असतो. आम्लपित्ताच्या मूळ कारणांचा शोध घेऊन – जसं की, आहार बदल, वजन कमी करणं, स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा गरज पडली तर PPI सारख्या योग्य औषधांचा डॉक्टरांच्या मार्गदर्शनात वापर असा – दीर्घकाळाचा उपचार करायला हवा.”

    मधल्या काळात मी अनेकांना फॉस्फेट आणि कॅल्शियमचे सप्लिमेंट्स दिले. ॲन्टासिड पूर्णपणे बंद केले आणि आहारात काही बदल सुचवले. काही महिन्यांतच त्यांची अंगदुखी बंद झाली! सतत जाणवणारा थकवाही कमी झाला.

    आता लागलीच “कॅल्शियम-फॅास्फेट घेऊ का?” हे विचारू नका किंवा घेऊही नका फक्त भारंभार! यथोचित कारणमीमांसा न करता कुठलंही औषध घेत असाल तर आधी ते बंद करा!

    Avatar photo
    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

    पेशानं वैद्यकीय व्यावसायिक. आरोग्यशिक्षक. माणसं जाणून घेण्याची जिज्ञासा आणि त्यांच्या दुःखावर चिंतन करत निराकरण करण्याची आवड असल्यानं पुण्यातील ‘होप मेडिकेअर फाऊंडेशन’ इथं गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत. मानवी जीवन हे शरीर विज्ञानाच्या सोबत भौतिक-रासायनिक-खगोल आदी साऱ्याच उपयोजित विज्ञानाशी जोडलं गेलंय, त्यातले शोध-शोधकर्त्यांची धडपड, त्यामागच्या रम्य कथा हे सारं समजावून घेणं आणि देणं हे मनापासून आवडत असल्यानं आपल्या आत आणि आजूबाजूला असलेलं ‘विज्ञान’ सर्वांमध्ये रुजावं यासाठी सदैव प्रयत्नरत!

    Related Posts

    वातविकारासाठी योगाभ्यास मार्गदर्शन

    June 27, 2026 आरोग्य

    माणसानं माणसाला वाचवावं, बाकी सर्व गौण!

    June 24, 2026 आरोग्य

    आम्लपित्तासाठी आहार मार्गदर्शन

    June 20, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    वातविकारासाठी योगाभ्यास मार्गदर्शन

    By रविंद्र परांजपेJune 27, 2026

    मागील दोन लेखांमधून आपण आम्लपित्तासाठी योगाभ्यास तसेच आहार मार्गदर्शन घेतले. आता या लेखात आपण वातविकार…

    माणसानं माणसाला वाचवावं, बाकी सर्व गौण!

    June 24, 2026

    आम्लपित्तासाठी आहार मार्गदर्शन

    June 20, 2026

    स्मोकर्स कफ… शरीराने दिलेली वॉर्निंग बेल!

    June 17, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    ते दोघे…

    July 1, 2026

    …अन् प्रदीपला सर्वांची किंमत समजली!

    July 1, 2026

    बदल दिसतो, पण त्यासाठी…

    July 1, 2026

    आरोग्य… औषधं खाण्याचा आजार!

    July 1, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : तरि महाभूतपंचकु, आणि अहंकारु एकु 

    July 1, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 जुलै 2026

    July 1, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 345
    • अवांतर 193
    • आरोग्य 125
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 473
    • फिल्मी 54
    • फूड काॅर्नर 229
    • मैत्रीण 23
    • ललित 750
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    ते दोघे…

    July 1, 2026

    …अन् प्रदीपला सर्वांची किंमत समजली!

    July 1, 2026

    बदल दिसतो, पण त्यासाठी…

    July 1, 2026
    Most Popular

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.