नीलिमा कदम जांगडा
चपाती शेकताना जेव्हा कधी कधी वाफ हातावर येते, तेव्हाच्या पोळल्याच्य वेदना
कुकरचा, तव्याचा चटका लागल्यावरची भगभग
तुझ्या माझ्या स्त्रियांशिवाय कशा कोणाला कळणार?
हे सगळं नेमकं उजव्या हातालाच होतं!
अजून कामं उरकायची आहेत
मलम कसं लावणार?
हा प्रॉब्लेम तुझ्या माझ्याशिवाय इतरांना कसा समजावणार…?
बहिणाबाईंनी म्हणून ठेवलंय
‘आधी हाताला चटके तवा मिळते भाकर’
आजही हे घडतंच आहे…
चूल जाऊन गॅस, इंडक्शन आले
तरीही चटका अजूनही बसतोच आहे…
आता कुठे नदीवर जाऊन कपडे धुवायचेत
वॉशिंन मशीन दिमतीला आहे…
पण तिचं शर्टची कॉलर चोळणं,
सॉक्स चोळून मगच मशीनमध्ये टाकणं
हे रोजच सुरू आहे…
हेही वाचा – स्मृतीगंध… गाण्यांची वही
हल्लीची मुलं बारा – एकपर्यंत झोपत नाहीत
हट्टीपणा आणि मस्तीत कोणालाही ऐकत नाहीत
त्यांच्या शाळेसाठी, डब्यासाठी अलार्म लावून तिला उठावंच लागतं
शाळेतील डब्यात जंकफूड चालणार नाही
हे पथ्य तिला पाळावंच लागतं…
भरीस भर मुलांचे प्रोजेक्ट्स,
त्याच्या बॅगेसह इतर वस्तू
ऑफिसमधून आल्यावर तिलाच बघावं लागतं
चांगल्या स्कूलमध्ये ॲडमिशन घेतल्यावर
एवढं तर तिला करावंच लागतं….
नोकरी असो वा गृहिणी
दिवसभर गरगर फिरावंच लागतं
सगळं सांभाळूनही सोशल मीडियावर
हॅप्पी स्टेटस टाकावंच लागतं…
हेही वाचा – स्मृतीगंध… गाण्यांच्या भेंड्या!
हसतमुखाने रोजचं आयुष्य ती जगते
मिडी, जीन्स घातली तरीही
सणावाराला आवडीने नऊवारी साडी, नथ ती लेवते…
संसाराच्या व्यापात गुरफकटली असली तरी
मैत्रिणींबरोबर आऊटिंग, भिशी पार्टी, पार्लर…
तिचा Me time ती जपते…
अष्टावधानी, घरची स्वामिनी तिला घरच्यांकडून काय हवं?
कौतुकाचे दोन बोलं, सरप्राइज गिफ्ट घरच्यांनी द्यावं
एवढंच तिला ठावं…


