Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आरूच्या ‘त्या’ प्रश्नाने शिव गोंधळलाच!

    June 21, 2026

    Bookshelf : ‘मेधावी’… कथाविश्वाची झलक दाखवणारे पुस्तक

    June 21, 2026

    पितृदिन विशेष… ज्यांच्या आधारावर आपण उभे राहतो!

    June 21, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, June 22
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » साप्ताहिक राशीभविष्य : 21 ते 27 जून 2026
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 21 ते 27 जून 2026

    प्राजक्ता काथेBy प्राजक्ता काथेJune 21, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठी साहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, राशीभविष्य, बाराराशी, राशीफळ, राशीअंदाज, Weekly horoscope, horoscope, राशी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मेष

    • या आठवड्यात अपेक्षित घटना घडतील. राशीस्वामी मंगळ 21 तारखेला वृषभ राशीत जात आहे. नोकरदारांच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती राहील. पगारवाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गाने भागीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे. तथापि, कुठलाही निर्णय विचारपूर्वक घेणे इष्ट. महिलांच्या बाबतीत कुटुंबात वादविवाद होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता सांभाळून बोला आणि वागा. विद्यार्थ्यांना कॉलेज कॅम्पसमधील इंटरव्ह्यूमध्ये नोकरी लागण्याची शक्यता आहे. कलाकार आणि खेळाडू यांच्यासाठी प्रगतीचा काळ आहे.

    वृषभ

    • या आठवड्यात शुभ ग्रहांची साथ मिळेल. असे असले तरी, नोकरदारांनी गटबाजी आणि राजकारणापासून दूर राहावे. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. कामाचा ताण वाढेल, पण शांत राहून काम करत रहा. व्यावसायिक वर्गाची दीर्घकाळ अडकलेली कामे पूर्ण होतील. पैशाअभावी राहिलेली कामेही पूर्ण करू शकाल. व्यवसाय वाढून उत्पन्नात वाढ होईल. बुद्धीचातुर्य आणि संवादकौशल्याने महिलांना अडचणींवर मात करता येईल. विद्यार्थ्यांना आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकेल; सर्व बाजूंनी यश मिळेल.

    मिथुन

    • या आठवड्यात महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. राशीस्वामी बुध 23 तारखेला कर्क राशीत जात आहे. नोकरदारांची बरेच दिवसांपासूनची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. कामात सुलभता जाणवेल. कुटुंबात आनंदी बातम्या मिळतील. व्यावसायिक वर्गाला घर किंवा कामासाठी जागा घेणे शक्य होईल. व्यवसायात प्रतिष्ठा वाढेल. नवीन करारावर सही करू शकाल. महिलांना घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल. विद्यार्थ्यांना गुरूंचे सहकार्य मिळू शकेल. सर्व कामे बुद्धीचातुर्याने पूर्ण करू शकाल.

    कर्क

    • या आठवड्यात नवीन क्षेत्राची ओळख होईल. एखाद्याला उसने दिलेले पैसे नोकरदारांना परत मिळतील. अचानक येणाऱ्या समस्यांमधून व्यवहारकौशल्याने मार्ग काढू शकाल. व्यावसायिक वर्गाचा आत्मविश्वास वाढेल; काही धाडसी निर्णय घेऊ शकाल. आपल्या स्पर्धकांच्या एक पाऊल पुढे राहाल. महिलांच्या दृष्टीने वैवाहिक सुखासाठी हा कालावधी उत्तम आहे. मात्र, आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल, उच्च शिक्षणाच्या संधी मिळतील.

    सिंह

    • या आठवड्यात मित्रमंडळींकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांच्या कार्यक्षेत्रात अनपेक्षित बदल होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ कामावर खूश असतील. कामे उत्साहाने आणि आत्मविश्वासाने पूर्ण करू शकाल. मित्रांच्या माध्यमातून नवीन ओळखी होऊन व्यावसायिक वर्गाला व्यवसायात मदत मिळू शकेल. दीर्घकाळ अडकलेली कामे पूर्ण करू शकाल. नवीन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी महिलांना नवीन संधी मिळतील. कुटुंबातील मुलांसाठी जास्त खर्च करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांना नवीन वाहन प्राप्तीचा योग आहे.

    हेही वाचा – रंगभूमी… उत्सुकता नटराज ग्रुपच्या ‘मत्स्यगंधा’ची!

    कन्या

    • या आठवड्यात अडकलेली कामे गतिमान होतील. राशीस्वामी बुध 23 तारखेला कर्क राशीत प्रवेश करत आहे. नोकरदारांच्या बाबतीत कामात सुलभता असेल, आत्मविश्वास वाढेल. मुलांकडून त्यांच्या प्रगतीच्या बातम्या ऐकायला मिळतील. व्यावसायिक वर्गाची जमीन किंवा स्थायी संपत्तीबाबत अडकलेली कामे पूर्ण होतील. महत्त्वाचे निर्णय घ्याल. खर्च वाढेल, पण पुढे फायदा मिळेल. महिलांनी दुसऱ्यांच्या वादात किंवा भांडणात न पडलेले हिताचे ठरेल. पण आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांनी कुसंगतीपासून दूर राहावे. अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका.

    तुळ

    • या आठवड्यात उत्सव आणि ओळखीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांच्या अपेक्षा पूर्ण होतील. नवीन संकल्पना फलद्रूप होतील. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. परिस्थिती अनुकूल आहे, असे व्यावसायिक वर्गाला जाणवेल. प्रदर्शनातून चांगले लाभ होतील. नवीन कामे मिळतील. महिलांना भाग्य आपल्याबरोबर असल्याचा अनुभव येईल. त्याचबरोबर आरोग्याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल; काहींना शिष्यवृत्ती मिळण्याची शक्यता आहे.

    वृश्चिक

    • या आठवड्यात मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. राशीस्वामी मंगळ वृषभेत सप्तम स्थानी येत आहे. नोकरदारांचे राहत्या घराचे प्रश्न मिटतील. घरातील दुरुस्तीची कामे पूर्ण करू शकाल. समाजातील उच्चभ्रू वर्तुळात संपर्क वाढेल. व्यावसायिक वर्गाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळेल. त्याचबरोबर कामे करताना ताण जाणवेल. पण इतरांना मदत करू शकाल. महिलांचे जोडीदाराबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. घरात खर्च वाढेल. विद्यार्थ्यांना विशिष्ट स्पर्धात्मक यश मिळण्याची शक्यता आहे.

    धनु

    • या आठवड्यात मुलांविषयीची काळजी कमी होईल. नोकरदारांना सामाजिक तसेच धार्मिक कार्यात सहभागी होता येईल. थोरामोठ्यांच्या सहवासात राहण्याची संधी मिळेल. नवीन ओळखी होतील. व्यावसायिक वर्गाचे कार्यक्षेत्र रुंदावल्यामुळे कामाचा ताण जाणवेल. दुसरीकडे, मुलांची काळजी राहणार नाही, त्यामुळे उत्साहात असाल. कामाच्या ठिकाणी महिलांच्या हाती महत्त्वाची सूत्रे येण्याची शक्यता आहे. करमणुकीवर खर्च कराल. विद्यार्थ्यांना मित्रांकडून सहकार्य मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद मिळतील.

    मकर

    • या आठवड्याची सुरुवात उत्साहाने होईल. काही प्रश्नांमध्ये दिलासा मिळेल. नोकरदारांनी वादविवाद टाळावेत. आपल्या वागण्या-बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. कुटुंबातील तरुण मुला-मुलींचे प्रश्न सुटतील. शुभवार्ता समजतील. व्यावसायिक वर्गाचे कायदेशीर प्रश्न असतील तर, ते मार्गी लागतील. वादग्रस्त येणी वसूल होतील. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. महिलांनी आर्थिक व्यवहार जपून करावेत. याबाबतीत पूर्ण विचार करून शांतपणे निर्णय घ्यावेत, मध्यस्थी स्वीकारू नका. विद्यार्थ्यांचे करिअरविषयक प्रश्न सुटतील. पण आरोग्याची काळजी घ्यावी.

    कुंभ

    • या आठवड्यात नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी भाग्योदय आहे. नोकरदारांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. पगारवाढ आणि प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कामाच्या स्वरूपात बदल होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गाला व्यवसायात स्थिरता लाभेल, मानसन्मान मिळेल. गुरुतुल्य व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. महिलांचे जोडीदाराबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. पण कुटुंबात शांतता राहील, याकडे लक्ष द्या. शिवाय, वाहन खरेदीचा योग आहे. विद्यार्थ्यांना तसेच कलाकार आणि खेळाडूंना नवीन संधी मिळतील, सुविधा मिळतील.

    हेही वाचा – आबा आणि मित्रमंडळींची पार्टी

    मीन

    • या आठवड्यात नोकरीमध्ये भाग्यसंकेत मिळतील. नोकरदारांच्या अधिकारकक्षा रुंदावतील. पगारवाढ आणि प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. कामानिमित्त परदेशी जाण्याचीही शक्यता आहे. व्यावसायिक वर्गाचे हितशत्रू डोके वर काढतील. म्हणूनच स्पर्धकांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी सावध राहणे आवश्यक आहे. महिलांनी आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवावे. लहान प्रवास होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी वाहन जपून वापरा; पायाला दुखापत होण्याची शक्यता आहे.

    prajaktakathe3970@gmail.com

    प्राजक्ता काथे

    वाणिज्य शाखेत पदवी (1991), ज्योतिष शास्त्री (2003), हस्तसामुद्रिक प्रवीण (2004), कृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर (2008), होरा मार्तंड (2016) या पदव्या प्राप्त. 2005पासून पत्रिकेच्या आधारे अभ्यासकरून लोकांच्या अडचणीबाबत मार्गदर्शन करीत आहेत. हस्तसामुद्रिक शास्त्र, कृष्णमूर्ती पद्धती आणि होरा शास्त्र यांचा एकत्रित सखोल अभ्यास असून, जीवनातील प्रश्न आणि आव्हानांचे अचूक विश्लेषण करून, व्यवहार्य मार्गदर्शन देण्याचा दीर्घ अनुभव.

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 21 जून 2026

    June 21, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 जून 2026

    June 20, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 19 जून 2026

    June 19, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 21 जून 2026

    By Team AvaantarJune 21, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 21 जून 2026; वार : रविवार भारतीय सौर : 31…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 जून 2026

    June 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 19 जून 2026

    June 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 जून 2026

    June 18, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आरूच्या ‘त्या’ प्रश्नाने शिव गोंधळलाच!

    June 21, 2026

    Bookshelf : ‘मेधावी’… कथाविश्वाची झलक दाखवणारे पुस्तक

    June 21, 2026

    पितृदिन विशेष… ज्यांच्या आधारावर आपण उभे राहतो!

    June 21, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 21 ते 27 जून 2026

    June 21, 2026

    Dnyaneshwari : नातरी इक्षुदंडु, पाळितया गोडु 

    June 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 21 जून 2026

    June 21, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 335
    • अवांतर 191
    • आरोग्य 122
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 462
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 226
    • मैत्रीण 21
    • ललित 722
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आरूच्या ‘त्या’ प्रश्नाने शिव गोंधळलाच!

    June 21, 2026

    Bookshelf : ‘मेधावी’… कथाविश्वाची झलक दाखवणारे पुस्तक

    June 21, 2026

    पितृदिन विशेष… ज्यांच्या आधारावर आपण उभे राहतो!

    June 21, 2026
    Most Popular

    हेच पक्ष कार्यकर्त्याचं वास्तव!

    June 18, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.