मागील लेखात आम्लपित्ताविषयी थोडक्यात माहिती घेताना आपण आम्लपित्ताची लक्षणे आणि कारणे जाणून घेतली. तद्नंतर आपण आम्लपित्त निवारणार्थ योगाभ्यास मार्गदर्शन घेतले.
या लेखाचा विषय आम्लपित्तासाठी आहार मार्गदर्शन असा असला तरी विषयाची व्याप्ती वाढवून आपण पचनसंस्था सशक्त, निरोगी करण्यासाठी देखील योग्य आहार तसेच घरगुती उपाय याबाबत उपयुक्त मार्गदर्शन घेणार आहोत.
आहार मार्गदर्शन
- आहार सेवनाची वेळ यथायोग्य तसेच नियमित असावी. त्यात वारंवार बदल करू नयेत.
- आहार सात्त्विक असावा आणि त्यात पुढील पदार्थांचा समावेश असावा.
- गाईचे दूध, दही, लोणी, ताक आणि तूप
- मुगाची खिचडी
- फळभाज्या
- तंतूमय पदार्थ
- कोशिंबिरी
- ऋतूमानानुसार उपलब्ध फळे
- अपथ्याहार – जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन करू नये.
- अपथ्याहार – रात्रीच्या जेवणात वातुळ पदार्थ टाळावेत.
हेही वाचा – आम्लपित्तासाठी योगाभ्यास मार्गदर्शन
घरगुती उपाय
- बद्धकोष्ठता होऊ नये म्हणून द्रव पदार्थांचे आवर्जून सेवन करावे.
- आम्लपित्तासाठी गार दूध, लिंबू सरबत इत्यादी अवश्य घ्यावे.
- पोट साफ होण्यासाठी :
- रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात त्रिफळा चूर्ण घालून घ्यावे.
- रात्री झोपण्यापूर्वी दुधात तूप घालून प्यावे.
- सकाळी उपाशीपोटी भिजवलेल्या मनुकांचे पाणी प्यावे.
- जागरण टाळावे आणि पुरेशी शांत झोप घ्यावी.
अशा रितीने आपण आम्लपित्त निवारणार्थ तसेच पचनसंस्था कार्यक्षम करण्यासाठी आहार आणि घरगुती उपाय याबद्दल थोडक्यात मार्गदर्शन घेतले. माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ या पुस्तकात सदर विषयावर सविस्तररीत्या मार्गदर्शन केले आहे.
पोटाच्या विविध विकारांच्या निवारणासाठी नियमित योगाभ्यासाबरोबर नियमित सात्त्विक आहार सेवन देखील अत्यंत गरजेचे आहे.
हेही वाचा – शारीरिक व्याधी-विकार नियंत्रणासाठी मार्गदर्शन – प्रस्तावना
पुढील लेखात आपण अशाच एका शारीरिक व्याधी-विकार निवारणार्थ उपयुक्त मार्गदर्शन घेणार आहोत.
या संदर्भात इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते की, निरामय आरोग्य संकल्पनेतील माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’ या पुस्तकांत संबंधित विषयांवर उपयुक्त सर्वसमावेशक सविस्तर मार्गदर्शनपर वस्तुपाठ सादर केले असून त्यांचा एकत्रित अभ्यास म्हणजे निरामय आरोग्याचा परिपाक होय.
नम्र निवेदन
गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9850856774 यावर 🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हॉट्सॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.


