Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    हिरव्या बांगड्या

    June 17, 2026

    स्मोकर्स कफ… शरीराने दिलेली वॉर्निंग बेल!

    June 17, 2026

    Recipe : काकडीचे स्वादिष्ट सांदण अन् खमंग घावन!

    June 17, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, June 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » स्मोकर्स कफ… शरीराने दिलेली वॉर्निंग बेल!
    आरोग्य

    स्मोकर्स कफ… शरीराने दिलेली वॉर्निंग बेल!

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकरBy डॉ. प्रज्ञावंत देवळेकरJune 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, धुम्रपानाचा धोका, धुम्रपानामुळे फुफ्फुसाची हानी, धुम्रपानामुळे सिलिया नष्ट, फुफ्फुस स्वच्छ ठेवणाऱ्या सिलिया, धुम्रपानामुळे सकाळी कफ पडतो, धुम्रपानामुळे COPDचा धोका, धुम्रपानामुळे सीओपीडीचा धोका
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    ‘खोकला’ ही किरकोळ तक्रार घेऊन आलेल्या अन् एव्हाना मिसरूडही न फुटलेल्या मुलाच्या छातीला स्टेथो लावला आणि माझ्याच छातीत धस्सऽऽ झालं! त्याला किंवा त्याच्या आईला वाटत असलेला हा ‘खोकला’ म्हणजे थंडी किंवा प्रदूषणामुळं निश्चितच नव्हता; अन् हा खोकला साधाही नव्हता… एखाद्या जुन्या डिझेल इंजिनसारखा श्वासाचा आवाज सोबत पाचेक मिनिटं जोरजोरानं खाकरल्यानंतर आणि खोकल्यानंतरच थोडा ‘कफ’ पडून घसा साफ होण्याची तक्रार!

    पठ्ठ्याकडून तिनेक डॅाक्टर आधीच गाठून झाले होते… कफ सिरपच्या चारेक बाटल्याही रिचवल्या होत्या… सरतेशेवटी तो आज माझ्याकडं आला होता. मला 99% गुपित उलगडलं होतं, पण थेट विचारणं थोडं शिष्टसंमत वाटत नव्हतं म्हणून थोडं आडून विचारलं,

    “बेटा, दिवसभर बरा असतोस, पण हा खोकला सकाळीच छळतो ना?”

    “हो…” त्यानं एक सेकंदाचाही विलंब न लावता उत्तर दिलं.

    “दॅट्स इट… (चोर सापडला) बाळा आपल्या फुफ्फुसात ‘सिलिया’ नावाच्या सूक्ष्म झाडूसारख्या पेशी असतात. जसं आपण सकाळी उठून घरात झाडू मारतो, तसंच या पेशींचं काम असतं फुफ्फुसातील कचरा आणि धूळ बाहेर फेकणं… घरातील झाडूला अडथळा आणल्यास घर साफ न होता कचरा साठून रहातो, तसंच कधीकधी आपल्या या फुफ्फुसातल्या झाडूवाल्या सिलियांना अडथळा आणल्यास काही काळासाठी त्या ‘कोमा’त जातात किंवा अर्धांगवायू झाल्यासारखं स्तब्ध होतात…

    हेही वाचा – त्यानं विचारलं, ‘डॉक्टर, काही सीरियस आजार तर नाही ना?’

    रात्रभर जेव्हा कुठलाच अडथळा नसतो, तेव्हा सिलिया पुन्हा शुद्धीवर येत कामाला लागतात आणि रात्रभर जमा झालेला सगळा कचरा, धूळ आणि टॉक्सिन्स ते गळ्याकडं ढकलायला लागतात अन् सकाळी उठल्यावर तो सगळा साठा बाहेर काढण्यासाठी तुमची फुफ्फुसं जोरात ‘बंड’ करतात, त्यालाच आपण म्हणतो ‘स्मोकर्स कफ!’”

    मी सविस्तर उत्तर दिल्यानंतर मात्र माय-लेक दोघंही चमकले.

    हो ना करत “कधी कधी मित्रांसोबत होतं स्मोकिंग” तो कबूल झाला… न होऊन करतो काय?

    त्याला जे सांगितलं, तेच तुम्हालाही सांगतो… हा खोकला म्हणजे शरीरानं दिलेली ‘वॉर्निंग बेल’ आहे! जर हा कचरा रोज साफ झाला नाही तर, फुफ्फुसातल्या पिशव्या खराब होतात आणि पुढं जाऊन COPD (Chronic Obstructive Pulmonary Disease) सारखा गंभीर आजार होऊ शकतो…

    हेही वाचा – डॉक्टरनं सांगितल्यावर सर्वांनीच वाढविली दाढी अन्….

    खोकला सकाळचाच का? कारण रात्री सिलिया पुन्हा ‘रिपेअर’ होतात आणि कचरा बाहेर काढण्याची मोहीम राबवतात…

    जर कफ पांढरा असेल तर ठीक पण तो पिवळा किंवा हिरवा असेल तर फुफ्फुसात संसर्ग झाल्याचं ते लक्षण आहे! दीर्घकाळ धुम्रपान केल्यास हे ‘सिलिया’ कायमचे नष्ट होतात, मग फुफ्फुसं स्वतःची साफसफाई कधीच करू शकत नाही…

    आता हे सगळं ऐकून तुमच्यापैकी धु्म्रपान करणारं असेल त्यांनी सिगारेट पूर्णपणे बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतला तर, पहिल्या काही दिवसांत त्यांचा खोकला उलट वाढेल… पण अजिब्बात घाबरू नका, याचा अर्थ सिलिया पूर्ण जोमानं कामाला लागले आहेत म्हणून ते सगळा जुना कचरा साफ करत आहेत.

    Avatar photo
    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

    पेशानं वैद्यकीय व्यावसायिक. आरोग्यशिक्षक. माणसं जाणून घेण्याची जिज्ञासा आणि त्यांच्या दुःखावर चिंतन करत निराकरण करण्याची आवड असल्यानं पुण्यातील ‘होप मेडिकेअर फाऊंडेशन’ इथं गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत. मानवी जीवन हे शरीर विज्ञानाच्या सोबत भौतिक-रासायनिक-खगोल आदी साऱ्याच उपयोजित विज्ञानाशी जोडलं गेलंय, त्यातले शोध-शोधकर्त्यांची धडपड, त्यामागच्या रम्य कथा हे सारं समजावून घेणं आणि देणं हे मनापासून आवडत असल्यानं आपल्या आत आणि आजूबाजूला असलेलं ‘विज्ञान’ सर्वांमध्ये रुजावं यासाठी सदैव प्रयत्नरत!

    Related Posts

    आम्लपित्तासाठी योगाभ्यास मार्गदर्शन

    June 13, 2026 आरोग्य

    फक्त साखर बंद करून उपयोग होतो का?

    June 10, 2026 आरोग्य

    …अखेर त्या शापित खुर्चीचं रहस्य उलगडलं!

    June 6, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    आम्लपित्तासाठी योगाभ्यास मार्गदर्शन

    By रविंद्र परांजपेJune 13, 2026

    मागील लेखात आपण आरोग्य बिघडण्याची मूलभूत कारणे थोडक्यात जाणून घेतली. त्या लेखात नमूद केल्यानुसार आपण…

    फक्त साखर बंद करून उपयोग होतो का?

    June 10, 2026

    …अखेर त्या शापित खुर्चीचं रहस्य उलगडलं!

    June 6, 2026

    शारीरिक व्याधी-विकार नियंत्रणासाठी मार्गदर्शन – प्रस्तावना

    June 6, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    हिरव्या बांगड्या

    June 17, 2026

    स्मोकर्स कफ… शरीराने दिलेली वॉर्निंग बेल!

    June 17, 2026

    Recipe : काकडीचे स्वादिष्ट सांदण अन् खमंग घावन!

    June 17, 2026

    Dnyaneshwari : खडकीं जैसें वर्षलें, कां आगीमाजीं पेरिलें 

    June 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 जून 2026

    June 17, 2026

    विहिरीतला आवाज…

    June 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 331
    • अवांतर 190
    • आरोग्य 121
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 457
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 224
    • मैत्रीण 21
    • ललित 710
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    हिरव्या बांगड्या

    June 17, 2026

    स्मोकर्स कफ… शरीराने दिलेली वॉर्निंग बेल!

    June 17, 2026

    Recipe : काकडीचे स्वादिष्ट सांदण अन् खमंग घावन!

    June 17, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.