Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    विहिरीतला आवाज…

    June 16, 2026

    संकर्षण… आशेची पहिली परीक्षा

    June 16, 2026

    संशय

    June 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, June 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » संशय
    ललित

    संशय

    दिलीप कजगांवकरBy दिलीप कजगांवकरJune 16, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखन, एम्प्लॉयी फीमेल कोऑर्डिनेटर, एचआर मॅनेजर राज, राज आणि नेहा, नेहाचा संशय, नेहाचा राजवर संशय, नेहाचे राजशी सलोख्याने वर्तन, नेहाचे सिलेक्शन, नेहा एम्प्लॉयी कोऑर्डिनेटर, नेहाचा स्मार्टपणा, स्मार्ट नेहा
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पाहिजे ‘एम्प्लॉयी कोऑर्डिनेटर (फीमेल)’ अशा एका कंपनीने दिलेल्या जाहिरातीला खूप छान प्रतिसाद मिळाला. बऱ्याच मुलींनी ॲप्लिकेशन केले. कंपनीने शॉर्टलिस्ट करून दहा मुलींना इंटरव्ह्यूला बोलावले.

    शनिवार म्हणजे तसा सुट्टीचा दिवस. कंपनीने शहराच्या मध्यवर्ती भागातून एका वातानुकूलित मिनीबसची व्यवस्था केली. “ही बस खास तुमच्यासाठी,” म्हणत गणवेशधारी ड्रायव्हरने सर्व मुलींचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत केले आणि प्रत्येकीला तिच्या नावाचे कार्ड देऊन कोणत्या सीट नंबरवर बसायचे ते सांगितले.

    बस निघाली आणि लगेचच ड्रायव्हरने बस थांबवून एका अतिशय साधे कपडे घातलेल्या तरुणाला बसमध्ये घेतले. “हा कोण? कशासाठी येतोय? या इंटरव्ह्यू स्पेशल मुलींच्या बसमध्ये याला का घेतले?” असे प्रश्न अनेक जणींनी विचारले. “यांना मी ओळखतो, खूप चांगले आहेत आणि हे आपल्या कंपनीजवळच राहतात,” ड्रायव्हरने सांगितले.

    “माझा मेकअप खराब होईल, माझा ड्रेस खराब होईल, डर्टी फेलो,” अशी कारणे देत पुढील सीटवरील तरुणींनी त्या तरुणाला बसण्यास जागा दिली नाही. तेवढ्यात मागून गोड आवाज आला, “अहो, इथे बसा.” थोडासा संकोचून आणि अंग चोरूनच तो तरुण बसला. “मी नेहा,” अतिशय आकर्षक पंजाबी ड्रेस परिधान केलेल्या त्या सुंदर तरुणीने सांगितले. “तुमचे नाव काय?”

    “राज,” तो तरुण म्हणाला.

    हेही वाचा – इंटरव्ह्यूसाठी नेहा ऑफिसमध्ये पोहोचली खरी…

    ड्रायव्हरने अचानक ब्रेक दाबून गाडी थांबवली. “बाजूच्या गल्लीत आमच्या मोठ्या साहेबांची गाडी बंद पडलीय. मी जाऊन पाहतो,” म्हणत तो पटकन बसमधून बाहेर पडला. गाडी थांबवून एसी बंद केल्यामुळे आतील वातावरण असह्य झाले होते. तेवढ्यात राज पुढे गेला, त्याने गाडी चालू केली आणि एसीही चालू केला. सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. हँड ब्रेक ऑन करून राज परत नेहाच्या बाजूला येऊन बसला. पंधरा मिनिटे झाली तरीही ड्रायव्हर परत आला नाही. कंपनीत पोहोचायला उशीर होईल, मुलींची चिवचिव सुरू झाली.

    “राज, तुम्हाला गाडी चालवता येते का?” नेहाने विचारले.

    “हो, येते, परंतु माझ्याकडे लायसन्स नाही. पोलिसांनी पकडले तर हजार रुपये फाइन होईल,” राज म्हणाला.

    “फाइन झाला तर आपल्या प्रत्येकीला शंभर रुपये द्यावे लागतील, आहे का तयारी?” नेहाने विचारले. अनेक जणींनी नकारार्थी मान हलवली.

    “राज, तुम्ही गाडी चालवा. फाइन झाल्यास सर्व पैसे मी देईन,” नेहा म्हणाली.

    निघण्यापूर्वी नेहाने इंटरव्ह्यूच्या मेलमध्ये दिलेल्या ड्रायव्हरच्या नंबरवर फोन करून त्याला विचारले की, “उशीर होऊ नये म्हणून आम्ही राजबरोबर गेलो तर चालेल का?”

    “हरकत नाही, तुम्ही जा,” ड्रायव्हर म्हणाला.

    नेहाने राजला सांगितले, “मी ड्रायव्हर दादांशी बोलले. त्यांनी आपल्याला जायला परवानगी दिली आहे.”

    थोडे पुढे गेल्यावर राजने अचानक गाडी थांबवली.

    “पुढे पोलीस आहेत. आपण या छोट्या रस्त्याने जायचे का?” राजने विचारले.

    “हो, चालेल,” एक सुरात सर्वांनी सांगितले. पुढे गेल्यावर रस्ता खूपच अरुंद होता. गाडी पुढे जाऊ शकत नव्हती, मागे फिरणे तर अशक्यच होते. नेहाने दोघींना बरोबर घेतले आणि रस्त्यावरील दोन-तीन दुचाक्या बाजूला करून राजला गाडी पुढे नेण्यास मार्ग करून दिला. कुठलाही फाइन न लागता गाडी कंपनीच्या गेटपाशी येऊन थांबली. नेहाने पटकन पुढे होऊन राजला 100 रुपये बक्षीस दिले.

    “कुणीतरी गाडीतून उतरून सिक्युरिटी रजिस्टरमध्ये एन्ट्री करा म्हणजे ते गाडीला आत नेऊ देतील,” राज म्हणाला.

    पुढच्या सीटवरील तरुणी खाली उतरली; परंतु सिक्युरिटी गार्ड गाडीला आत नेण्यास परवानगी देत नव्हता.

    “मी जाऊन बोलतो,” म्हणत राज गाडीतून खाली उतरला. नेहाने दिलेल्या बक्षिसाने किमया केली होती. परवानगी मिळवून राजने सावकाश गाडी आत नेली. सर्व तरुणींना बसमधून उतरवून गाडी व्यवस्थित पार्क केली. राजचे आभार मानत, त्याच्याकडून बसची चावी घेऊन नेहाने ती सिक्युरिटी गार्डला दिली. एचआर ऑफिसरने मुलींचे स्वागत करून त्यांना कंपनीच्या कॅन्टीनमध्ये नेले.

    “येथील चहा, कॉफी, ज्यूस, पोहे, उपमा सर्व फ्री आहे. हवे ते आणि हवे तितके घ्या. बाजूला एक बॉक्स ठेवला आहे. तुमची इच्छा असल्यास अंध मुलांना डोनेशन म्हणून तुम्ही बॉक्समध्ये पैसे टाकू शकता; परंतु हे बंधनकारक नाही. फीडबॅक फॉर्म भरून नाश्त्याचा फीडबॅक, नाव न टाकता, फीडबॅक बॉक्समध्ये टाका. मी पाऊण तासाने येईन,” म्हणत एचआर ऑफिसर निघून गेला.

    कॅन्टीन अतिशय स्वच्छ, सुंदर आणि प्रशस्त होते. सर्वांनी मनसोक्त नाश्ता केला. फक्त दोघींनी डोनेशन टाकले. केवळ तिघींनी रिकाम्या प्लेट्स योग्य जागी ठेवल्या आणि चौघींनी फीडबॅक दिला; बाकीच्यांनी फीडबॅक फॉर्म डस्टबिनमध्ये टाकला.

    बरोबर पाऊण तासाने परत आलेल्या एचआर ऑफिसरने सर्वांना कॉन्फरन्स रूममध्ये नेले आणि त्यांचा ताबा सीनियर एचआर ऑफिसर ज्युलीकडे सोपविला. ज्युलीने प्रत्येकीला नाव आणि थोडक्यात स्वतःची माहिती देण्यास सांगितले. नेहाने बोलताना राजचा आणि त्याने कंपनीत वेळेत पोहोचण्यासाठी केलेल्या बहुमूल्य मदतीचा आवर्जून उल्लेख केला.

    “मी इंटरव्ह्यूचा रिझल्ट सांगण्यासाठी आमच्या एचआर मॅनेजर साहेबांना व्हिडीओ कॉलवर कनेक्ट करते. आणि हो, तुम्हा सर्वांना कंपनीची बस सकाळच्या पिकअप पॉइंटला सोडेल,” ज्युली म्हणाली.

    “मॅम, पण आमचा इंटरव्ह्यू अजून व्हायचा आहे,” सर्व तरुणींनी एकसुरात सांगितले.

    “ठीक आहे, आपण आमच्या एचआर मॅनेजर साहेबांशी बोलू या. मी त्यांना व्हिडीओ कॉल करते. आपण ऐकूया ते काय म्हणतात ते.”

    “मला माफ करा, माझ्या कॅमेऱ्याला काही प्रॉब्लेम असल्याने तुम्ही मला बघू शकत नाही, पण मी मात्र तुम्हाला बघू शकतो. आमचे हार्डवेअर इंजिनीअर कॅमेरा चेक करताहेत. कदाचित, तुमच्याशी बोलता बोलता कॅमेरा सुरू होईल,” असे म्हणत मॅनेजर साहेबांनी सर्वांचे स्वागत केले.

    “तुम्ही सकाळी बसमध्ये चढलात त्यावेळी प्रत्येकीला तिच्या नावाचे कार्ड देण्यात आले होते. बसमधील आणि कॅन्टीनमधील तुमचे वागणे आणि बोलणे कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले गेले आणि त्याच्या आधारावर आम्ही तुमच्यातील एकीचे सिलेक्शन केले आहे. त्या सिलेक्ट केलेल्या मुलीचे नाव घोषित करताना मला खूप आनंद होत आहे,” हे म्हणताना साहेबांचा कॅमेरा सुरू झाला.

    सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. ज्याला बसमध्ये घ्यायला अनेकींनी विरोध केला, ज्याला बसायला जागा द्यायला काहींनी नकार दिला, ज्याने ड्रायव्हर बनून सर्वांना कंपनीत सुखरूप पोहोचविले, तोच होता कंपनीचा एचआर मॅनेजर, राज.

    “नेहा, तू मला बक्षीस दिलेले 100 रुपये आणि तुझे ऑफर लेटर घ्यायला माझ्या केबिनमध्ये ये,” राजने सांगितले.

    ऑफर लेटर घेताना खुललेला नेहाचा चेहरा पडला होता, 100 रुपये परत घेताना. “सर, सॉरी, मी चुकले. मला माहीत नव्हते तुम्ही कोण आहात ते.”

    “नेहा, मी तुला घरी सोडतो; पण ड्रायव्हर म्हणून नाही!” दोघेही मनापासून हसले. “चल, निघू या,” राज म्हणाला.

    हेही वाचा – नेहाला पाहिजे असलेले पद राजने नाकारले, पण…

    गप्पा मारता मारता नेहाला किंचित डुलकी लागली. सर म्हणत होते, “हल्ली मुलांना मुक्त जीवन हवे असते.”

    नेहा एकदम दचकली. तिला जाणवले, सरांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला होता.

    “हे मला पटत नाही, सर,” नेहा जोरात म्हणाली.

    “हल्लीच्या जमान्यात हे चालतं, नेहा. आपण मोकळेपणाने जगावं आणि इतरांनाही मोकळीक द्यावी,” सरांचे “बोलणे” नि “वागणे” नेहाला अजिबात रुचले नाही.

    कसे रिअॅक्ट व्हावे या विचारात नेहा अडकली असताना, आता तर दोन्ही खांद्यांना स्पर्श. नेहा जोरात ओरडणार तेवढ्यात तिच्या लक्षात आले की सरांचे दोन्ही हात तर स्टिअरिंग व्हीलवर होते. परत उजव्या खांद्याला हलकासा स्पर्श आणि आता दोन्ही खांद्यांना स्पर्श. निश्चितच भास नव्हता; पण यात सरांचा हातही नव्हता.

    “सर, गाडीत कोणीतरी आहे आणि तो माझ्या खांद्यांना स्पर्श करतोय.”

    सरांनी मागे वळून पाहिले आणि ते मोठमोठ्याने हसले. “नेहा, मागे एक नाही तर दोघे आहेत.”

    “काय? कोण? आणि तुम्हाला हे माहिती आहे?” नेहाचे प्रश्नामागून प्रश्न.

    “हो, हो आणि हो, नेहा. ते आहेत तुझ्या सीटला लटकवलेले माझे रबरी हँड ग्लोव्हज्.” दोघेही खळखळून हसले.

    नेहाच्या अपार्टमेंटपाशी सरांनी गाडी थांबवली. “बाय, सर,” म्हणत नेहा गाडीतून उतरत असताना कुणीतरी चक्क नेहाची ओढणी ओढली. संशयाची सुई अर्थातच सरांवर. नेहा परत चुकली होती. हे धाडस केले होते सीट बेल्टने.

    सरांची गाडी सावकाश पुढे गेली. गाडीच्या मागच्या बाजूवर लिहिले होते – “संशय नसावा, विश्वास असावा.”

    सकाळी कंपनीत जाताना अनोळखी तरुणावर विश्वास ठेवणाऱ्या नेहाने, कंपनीतून परतताना ओळखीच्या सरांवर संशय घेतला होता. नेहा मनातल्या मनात ओशाळली.

    घरात शिरताना नोकरी मिळाल्याचा आनंद नक्कीच होता; पण सरांवर घेतलेल्या संशयामुळे डोळेही पाणावले होते.

    “राज सर” की “नुसतं राज”?

    “अहो राज” की “अरे राज”?

    नेहा मनातल्या मनात लाजली.

    Avatar photo
    दिलीप कजगांवकर

    तंत्रज्ञान क्षेत्रातील चार दशकांचा अनुभव आणि साहित्यविश्वातील संवेदनशील लेखन यांचा सुरेख संगम. शिक्षणाने बी.ई., एम.बी.ए. आणि कॉस्ट अकाऊंटंट असलेले दिलीप कजगांवकर हे सर्टिफाइड प्रोजेक्ट मॅनेजर, सर्टिफाइड क्वालिटी मॅनेजर आणि सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्ट आहेत. इंजिनिअरिंग व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात त्यांना सुमारे 40 वर्षांचा समृद्ध व्यावसायिक अनुभव आहे. ग्रीव्ह्ज, महाराष्ट्र स्कूटर्स, पथेजा ग्रुप, झेन्सार, हेक्सावेअर, कॅपजेमिनी, इन्फ्रासॉफ्ट व टेस्टिंगएक्स्पर्ट यासारख्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. लेखन, कथाकथन आणि कवितेची त्यांना विशेष आवड आहे. 2012 साली प्रकाशित झालेला “वाचावेसे” हा त्यांचा काव्यसंग्रह रसिक वाचकांच्या विशेष पसंतीस उतरला. त्यांच्या कथा आणि कविता विविध वृत्तपत्रे आणि मासिकांत नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. त्यांच्या लेखनात माणूस, नातेसंबंध आणि जीवनातील सूक्ष्म भावविश्व यांचे प्रामाणिक दर्शन घडते. गेली अनेक वर्षे विविध दिवाळी अंकांत त्यांच्या कथा प्रकाशित होत आहेत. तसेच, गेली दोन वर्षे दर मंगळवारी व शुक्रवारी “विश्वास रेडिओ” (नाशिक) तसेच आकाशवाणी पुणे आणि जळगाव येथून त्यांच्या कथा प्रसारित होत आहेत. विविध संस्थांकडून त्यांना “महाराष्ट्र भूषण”, “साहित्य रत्न” यासारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते विविध कार्यक्रमांत 30 मिनिटांपासून 2 तासांपर्यंत आपल्या कथांचे प्रभावी कथाकथन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. त्यांनी स्वतः कथन केलेल्या तसेच दत्ता सरदेशमुख, सचिन दातार, मुकुंद जोशी, डॉ. सुचिता पाटील, डॉ. जयश्री अय्यंगार, विनया देशपांडे आणि अर्चना कापरे यांसारख्या दिग्गजांनी सादर केलेल्या त्यांच्या अनेक कथा युट्यूबवर उपलब्ध आहेत. आपल्या साहित्यिक प्रवासात दादर येथील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूशनचे माजी संचालक, डोंबिवली स्थित आदरणीय व्ही. एस. वाणी सर यांच्या लाभलेल्या मौल्यवान मार्गदर्शनाचा ते आवर्जून उल्लेख करतात.

    Related Posts

    विहिरीतला आवाज…

    June 16, 2026 ललित

    संकर्षण… आशेची पहिली परीक्षा

    June 16, 2026 ललित

    ट्युबलाइट… एलसी

    June 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    विहिरीतला आवाज…

    By Team AvaantarJune 16, 2026

    सत्य घटनेवर आधारित भयकथा… सन 2018. महाराष्ट्रातील एका छोट्या गावात ही घटना घडली होती. गावाचं…

    संकर्षण… आशेची पहिली परीक्षा

    June 16, 2026

    ट्युबलाइट… एलसी

    June 16, 2026

    संकर्षण… राखेतून उरलेला श्वास

    June 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    विहिरीतला आवाज…

    June 16, 2026

    संकर्षण… आशेची पहिली परीक्षा

    June 16, 2026

    संशय

    June 16, 2026

    ट्युबलाइट… एलसी

    June 16, 2026

    Dnyaneshwari : म्हणोनि प्रवृत्ति आणि निवृत्ती, इयें वोझीं नेघे मती

    June 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 जून 2026

    June 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 330
    • अवांतर 190
    • आरोग्य 120
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 456
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 223
    • मैत्रीण 20
    • ललित 710
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    विहिरीतला आवाज…

    June 16, 2026

    संकर्षण… आशेची पहिली परीक्षा

    June 16, 2026

    संशय

    June 16, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.