मेष
- या आठवड्यात नोकरीच्या संधी मिळतील. नोकरदारांच्या दृष्टीने सध्याच्या नोकरीत अनुकूल वातावरण असेल. वरिष्ठ खूश राहतील. पगार वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गाने कोणताही निर्णय घेताना घाई करू नये. भागीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. भागीदाराच्या मताला प्राधान्य देणे हिताचे होईल. घरातील विवाहयोग्य मुला-मुलींचे लग्न जुळण्याची शक्यता आहे, त्यामुळे महिलांसाठी हा आठवडा गडबडीचा असेल. विद्यार्थी, कलाकार आणि खेळाडूंना चांगल्या संधी उपलब्ध होतील.
वृषभ
- या आठवड्यात शुभ ग्रह साथ देतील. नोकरदारांनी गटबाजी आणि राजकारणापासून दूर राहावे. कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या दबावामुळे आक्रमक होऊ नका. शांतपणे काम करत राहा. व्यावसायिक वर्गाची उलाढाल वाढून उत्पन्न वाढेल. जी कामे पैशाअभावी थांबली होती, ती पूर्ण होतील. प्रतिस्पर्धी गटात शांतता राहील. महिलांनी मैत्रिणींशी वादविवाद करू नये. खासकरून, बोलण्यावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल.
मिथुन
- या आठवड्यात विशिष्ट महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याचा योग आहे. नोकरदारांच्या बाबतीत नवीन सकारात्मक बदल घडेल. कामे पूर्ण करू शकाल. कामाचे श्रेय मिळेल. कामाच्या ठिकाणी राजकारण होऊन त्याचा लाभ मिळेल. व्यावसायिक वर्गाला अनुकूल काळ आहे. जागा घेण्याचे बऱ्याच दिवसांपासूनचे स्वप्न पूर्ण होईल. नवीन करार करू शकाल. महिलांनी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी. घरात जास्त पैसे खर्च होतील. विद्यार्थ्यांना गुरू आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. तुम्ही बुद्धीचातुर्याने कामे पूर्ण कराल.
कर्क
- या आठवड्यात नवीन संधी मिळतील. आत्मविश्वासाच्या जोरावर नोकरदार कामातील आव्हाने सहज स्वीकारतील. व्यवहार कौशल्यामुळे नवीन कामे मिळतील. कंपनीला फायदा करून द्याल. व्यावसायिक वर्ग स्पर्धकांवर मात करू शकतील. तथापि, लहान-मोठ्या आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. महिलांच्या बाबतीत कुटुंबात लहान गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे. पण आवडीची कामेही करता येतील. विद्यार्थ्यांना अनपेक्षित यश मिळेल. उच्च शिक्षणाच्या संधी मिळतील.
सिंह
- या आठवड्यात मित्रमंडळी आणि हितचिंतकांकडून लाभ मिळू शकेल. नोकरदारांच्या कामात अनपेक्षित बदल संभवतात. ज्येष्ठ अधिकाऱ्यांची कृपादृष्टी राहील. तुम्ही आत्मविश्वासाने सगळी कामे पूर्ण करू शकाल. व्यावसायिक वर्गाला मित्रमंडळींकडून नवीन कामे मिळतील. मित्रांच्या मध्यस्थीने अडकलेली कामे मार्गी लागतील. महिलांना कुटुंबातील सर्वांचे सहकार्य मिळेल. व्यावसायिक असाल तर चांगला काळ आहे. विद्यार्थ्यांना नवीन वाहन मिळण्याचा योग आहे.
हेही वाचा – मंजिरी
कन्या
- या आठवड्यात शुभ ग्रहांची साथ मिळेल. नोकरदारांची कामे जास्त त्रास न घेता सहजतेने पूर्ण होताना दिसतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबातील मुला-मुलींची लग्न ठरतील. व्यावसायिक वर्गाचा खर्च अचानक वाढेल. कामाचा दबाव वाढेल. जास्त काम करावे लागेल. महिलांना कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या मागण्या पूर्ण करता येतील. विद्यार्थ्यांनी कुसंगती टाळावी. अभ्यासात दुर्लक्ष करू नये.
तुळ
- या आठवड्यात उत्सव, प्रदर्शन यामधून लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांच्या अपेक्षा पूर्ण होतील. प्रयत्नांची जोड देऊन अवघड कामे पूर्ण करू शकाल. भाग्य तुमच्या सोबत असल्याचा अनुभव येईल. व्यावसायिक वर्गाला प्रदर्शनात सहभागी होऊन जास्त फायदा होईल. नवीन ओळखी होतील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. महिलांच्या बाबतीत वडिलोपार्जित संपत्तीची व्यावहारिक कामे गतिमान होऊन पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना अनपेक्षित यश मिळेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल.
वृश्चिक
- या आठवड्यात मुलांबाबत असलेल्या चिंता दूर होतील. नोकरदारांवर वरिष्ठांची मर्जी राहील. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. सामाजिक, धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल. व्यावसायिक वर्ग वडिलांच्या किंवा मोठ्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण करू शकतील. कामात वर्चस्व राहील. नवीन ओळखी होतील. कार्यक्षेत्र रुंदावल्यामुळे महिलांना जास्त काम करावे लागेल. विद्यार्थ्यांची प्रगती बघून घरात आनंदी वातावरण राहील.
धनु
- या आठवड्यात वडिलधाऱ्या व्यक्तींचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळेल. नोकरदारांची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. इतरांना मदत करू शकाल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळेल. मात्र, नवीन गुंतवणूक करताना काळजी घ्या. व्यावसायिक वर्गाचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. कोणताही आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. इतरांच्या बोलण्यावर पटकन विश्वास ठेवू नका. महिलांना संततीच्या प्रगतीच्या बातम्या मिळतील. त्यामुळे घरात आनंदी वातावरण असेल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल.
हेही वाचा – जुईलीचा चकवा… फिरून पुन्हा त्याच जागेवर!
मकर
- या आठवड्यात कायदेशीर प्रश्नातून सुटका होईल. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल, परंतु कामाला गती मिळेल. मित्रमंडळीत वाद घालू नका. कुटुंबातील मुलांचे प्रश्न सुटतील. व्यावसायिक वर्गाची वादग्रस्त येणी वसूल होतील. कायदेशीर मदत मिळेल. उत्साही वातावरण राहील. महिलांनी कोणाच्याही कामात मध्यस्थी करू नये, मन:स्ताप होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत परीक्षेचा अंदाज चुकण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ
- या आठवड्यात राहत्या घराचा प्रश्न सुटेल. नवीन नोकरी शोधणाऱ्या नोकरदारांना पूर्वी दिलेल्या मुलाखतीचे सकारात्मक उत्तर मिळेल. व्यावसायिक वर्गाला व्यवसायात स्थिरता लाभेल. मान-सन्मान मिळेल. पण दुसरीकडे दगदग वाढेल, कामाचा ताण वाढेल. महिलांना सुख-सुविधा मिळतील. कुटुंब किंवा मैत्रिणींसोबत फिरायला जाऊ शकाल. विद्यार्थ्यांना नवीन वाहन खरेदीचा योग आहे. मात्र, संबंधित कागदपत्रे तपासून बघा.
मीन
- या आठवड्यात भाग्य संकेत मिळतील. नोकरदारांना आतापर्यंत केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. सकारात्मक बदल घडतील. अधिकाराच्या कक्षा रुंदावतील. व्यावसायिक वर्गाच्या बाबतीत स्पर्धक बलवान होतील. हितशत्रूंच्या कारवाया सुरू होतील, सावध रहा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. महिलांनी प्रलोभनांपासून दूर राहावे, फसवणूक होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी वाहन जपून चालवावे. पायाला दुखापत होण्याची शक्यता आहे.


