Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    दिनूचा वाढदिवस साजरा करायला सर्व सोसायटीच सरसावली!

    June 11, 2026

    गोष्ट आहे तुमच्या माझ्या आईची…

    June 10, 2026

    फक्त साखर बंद करून उपयोग होतो का?

    June 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, June 11
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Bookshelf : ‘सेपियन’… वेगवेगळ्या कोनांतून घडते आपलेच दर्शन
    ललित

    Bookshelf : ‘सेपियन’… वेगवेगळ्या कोनांतून घडते आपलेच दर्शन

    डॉ. अस्मिता हवालदारBy डॉ. अस्मिता हवालदारJune 10, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, पुस्तक वाचन, पुस्तकसंग्रह, मी मराठी, अभिजात मराठी, Bookshelf, युवल नोआ हरारी, वासंती फडके, सेपियन, मानवाचा संक्षिप्त इतिहास, माणसाचा आनंद, माणसाचे दु:ख, माणसाचा देव होण्याचा प्रयत्न, गप्पिष्ट माणूस, माणूस गप्पिष्ट प्राणी, ज्ञानक्रांती, कृषीक्रांती, मानवाचे एकत्रीकरण, वैज्ञानिक क्रांती
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    युवल नोआ हरारी लिखित आणि वासंती फडके अनुवादित ‘सेपियन – मानवाचा संक्षिप्त इतिहास’ हे पुस्तक हिब्रू भाषामध्ये 2011 साली प्रसिद्ध झाले आणि इंग्लिशमध्ये 2014 साली, तेव्हापासून जगभर गाजते आहे. आतापर्यंत 65 भाषांत अनुवादित झाले आहे. 498 पानांचे हे पुस्तक अक्षरशः आपल्याला खिळवून ठेवते. हे पुस्तक जसे मला मैत्रिणीने आग्रहाने वाचायला लावले, तसे कोणाच्या मित्राने, भावाने, भावाच्या मित्राने, बहिणीने, ट्रेनमधल्या मित्राने, ग्रंथपालाने, पुस्तकमैत्र समूहाने एकमेकांना सांगितले.

    समाजमाध्यमांतून यावर लिहिले गेले. असे म्हणतात, जेव्हा ‘गीता रहस्य’ प्रसिद्ध झाले होते, तेव्हा आपल्याकडे लोक ते हातात घेऊन रस्त्यातून मिरवत असत! असेच इम्प्रेशन मारण्यासाठी सुद्धा ‘सेपियन – मानवाचा संक्षिप्त इतिहास’ पुस्तक लोकांनी विकत घेतले आणि दिवाणखान्यात सजवून ठेवले. गेल्या दशकातले सगळ्यात जास्त गाजलेले हे पुस्तक आहे. लेखकाच्या अनेक मुलाखती समाजमाध्यमांवर आहेत.

    बव्हंशी लोकांना आवडले, अर्थात टीकाही झाली. पण पुस्तकाची दखल घ्यायला लागली. मी हे पुस्तक वाचल्यावर जो भेटेल त्याला सांगितले (नंतर लोक आधीच ‘हो, सेपियनबद्दल म्हणालीस तू’ असं सांगून टाकायला लागले!) इतके मला आवडले होते.

    लेखकाने या पुस्तकाचे वेगळेपण सांगताना म्हटले आहे, इतिहासाची पुस्तके महान व्यक्तींचे विचार, वीरांचे शौर्य, संतांची शिकवण, कलाकारांची सृजनात्मकता यावर प्रकाशझोत टाकतात. साम्राज्याचे उदयास्त, समाजाची गुंतागुंत तसेच शोध आणि तंत्रज्ञान याबद्दल सांगतात. पण या सर्वांमुळे माणसाचा आनंद कसा वाढला आणि दुख कसे कमी झाले हे सांगत नाहीत. आपल्या इतिहासाच्या अभ्यासात हीच मोठी पोकळी आहे. ती आता भरायला सुरवात केली पाहिजे.

    माणसाच्या इतिहासावरचे हे पुस्तक आहे. पृथ्वीवर माणसाचे पहिले पाउल पडले तेव्हापासून कृत्रिम बुद्धिमत्ता उंबरठ्यावर उभी राहिल्यापर्यंतचा इतिहास. करोडो वर्षांचा इतिहास सांगत माणसाची उत्क्रांती कशी झाली? हे वेगळ्या दृष्टीकोनातून लिहिले आहे. हरारी म्हणतात, त्यांनी अनेक पुस्तके वाचून माहिती एकत्र करून लिहिले आहे. म्हणजे हे त्यांचे मुलभूत संशोधन नाही. त्यांनी तीच माहिती रंजकतेने सोपी करून सांगितली आहे. ज्ञानक्रांती, कृषीक्रांती, मानवाचे एकत्रीकरण, वैज्ञानिक क्रांती अशा चार भागांत विभागून मोठा काळ या पुस्तकात मांडला आहे.

    होमो सेपियन म्हणजे आपण जन्माला येण्याआधी होमोच्या इतर प्रजाती (उदा. होमो निएंडरथाल) पृथ्वीवर नांदत होत्या. बदल घडत-घडत आजचा माणूस झाला, टिकला. चार पायांचा माणूस उभा राहिला. त्याला दोन हात मिळाले, त्यामुळे झालेला फायदा आणि तोटा, नंतर ज्ञानक्रांती झाली, नेणिवा समृद्ध होऊ लागल्या, संस्कृती निर्माण झाली… शेती सुरू झाली… नगरे, महानगरे, राष्ट्र वसली. असे अनेक टप्पे ते आपल्या खास शैलीत सांगताना काही न दिसलेल्या गोष्टी दाखवतात आणि आपण स्तिमित होतो.

    हेही वाचा – Bookshelf : अर्थपूर्ण जगण्याचा दृष्टीकोन देणारे Man’s search for meaning

    शेतीचा नक्की फायदाच झाला का? भटका असलेला माणूस एकाजागी का राहायला लागला? या प्रश्नाची उत्तरे देताना ते वैज्ञानिक क्रांतीकडे वळतात. ते शेतीला इतिहासातली सर्वात मोठी फसवणूक म्हणतात. युरोपियन लोकांनीच जग का जिंकले? हा प्रश्न सर्वांनाच पडतो. त्याचेही सयुक्तिक उत्तर ते देतात. राष्ट्र आणि पैसा या दोन संकल्पनांकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टीकोन चकित करणारा आहे.

    माणूस हा गप्पिष्ट प्राणी आहे. भाषा बोलता आल्यामुळे जे अस्तित्वात आहे आणि जे कल्पनेत आहे, असे दोन्ही इतरांना सांगता आले. माणसाचा कथांवर, कल्पनांवर विश्वास बसतो म्हणून तो एकमेकांना, अगदी अनोळखी माणसांना सहकार्य करतो. माणूस जगावर राज्य का करतो? या प्रश्नाचे उत्तर ते देतात. माणसाचा आनंदीपणा मोजता येईल का? असाही प्रश्न ते विचारतात. जसा मूर्खपणा मोजता येत नाही, तसा आनंदही. विज्ञानामुळे कल्पनातीत ताकद आणि ऊर्जा माणसाला मिळाली आहे. पण तरीही तो आनंदी नाही. निसर्गाला आपण आनंदी असण्याशी काही देणेघेणे नाही आणि परोपकाराशी सुद्धा! जीव वाचवणे आणि वंशसातत्य टिकवणे ही प्रत्येक प्राण्याची कर्तव्य आहेत. प्राण्याचा मेंदू आहार, निद्रा, भय आणि मैथुन या चार भावना ओळखतो.

    ज्ञानक्रांती झाल्यावर माणसाने स्वतःची दुःख कमी करायचा प्रयत्न केला, त्याचवेळी इतर प्राण्यांचे जगणे वेदनादायक केले. सृष्टीची हानी केली. एक दिवस पृथ्वीवरचा कच्चा माल संपेल तेव्हा काय होईल? हा लेखकाने विचारलेला प्रश्न अवाक करतो. कीर्तिमुख राक्षसाची कहाणी आपल्याला माहीत असते. त्याला इतकी वखवख सुटली की, त्याने स्वतःचेच शरीर खायला सुरुवात केली, शेवटी फक्त डोके उरले. एक दिवस आपलीही तीच गत होईल!

    जी. ए. कुलकर्णींचा ‘अश्वत्थामा’, दुःखाचे कारण शोधायला निघालेल्या गौतम बुद्धाला सांगतो की, ‘माणसाचे जीवन सुंदर आहे; कारण त्याच्या शेवटी मृत्यू आहे.’ अश्वत्थाम्याचे दुख अमरत्वाचा शाप हे आहे. वैज्ञानिक क्रांतीमुळे माणूस अमर झाला तर – ग्रीन माइल्स सिनेमात नायक म्हणतो, मी जीवन नावाच्या रोगाने पछाडलेला आहे (I am infected with life)… हरारी हाच प्रश्न विचारतात.

    हेही वाचा – जापनीज वाइफ… अजब प्रेम की गजब कहानी!

    माणूस देव होण्याच्या प्रयत्नात आहे. म्हणजे, निसर्गात इतकी ढवळाढवळ करून नवीन जीव जन्माला घालायचे किंवा नष्ट झालेल्या प्रजाती पुन्हा जन्माला घालायच्या. अमरत्व प्राप्त करायचे. थोडक्यात, जीवन आणि मृत्यूची दोरी आपल्या हातात घ्यायची. ‘ज्युरासिक पार्क’ सिनेमा आठवला असेलच! पण पूर्वीचा नीएंडरथाल सारखा बलिष्ठ मानव आपण जन्माला घातला आणि तो आपल्याच जीवावर उठला तर, आपण सेपियन म्हणजे बुद्धिमान हुशार माणूस तरी म्हणून घेऊ शकू का? की homo stultas  म्हणजे मूर्ख माणूस होऊ?

    माणसाच्या इतिहासाच्या या कथनातून आपण सैरसपाटा करून येतो. हजारो वर्षांचा सेपियन समजून घेताना आपण स्वतःलाच समजून घेत असतो. अनेक समजूती पुसून टाकतो, नवी माहिती घेतो. डोळ्यात झणझणीत अंजन घातले जाते आणि विचारांना खाद्य मिळालेले असते. कॅलिडोस्कोपमधून माणसाचा इतिहास पाहात असल्यामुळे अनेक न दिसलेले, दुर्लक्षित कानेकोपरे दिसतात, वेगवेगळ्या कोनांतून आपलेच दर्शन घडते.

    एवढे महत्त्वाचे, अचंबित करणारे पोटात टिकणे शक्यच नसते आणि मग ही ताजा खबर द्यायला गप्पिष्ट आपण फोन उचलतो!

    Avatar photo
    डॉ. अस्मिता हवालदार

    डॉ. अस्मिता हवालदार नायर दंत रुग्णालयातून BDS. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA Indology; Diploma in Archeology Mumbai University. 27 वर्षे इंदूरमध्ये प्रॅक्टिस करते. विविध मासिक, दिवाळी अंकातून कथा आणि लेख प्रसिद्ध होतात. ‘विजयनगर हृदयस्थ साम्राज्य’, ‘विजयनगरचे शिल्प काव्य’, ‘विजयनगरचे लेपाक्षी मंदिर’ ही पुस्तके आणि ‘आव्हानांचे लावून अत्तर’ हा कथासंग्रह प्रकाशित.

    Related Posts

    दिनूचा वाढदिवस साजरा करायला सर्व सोसायटीच सरसावली!

    June 11, 2026 ललित

    गोष्ट आहे तुमच्या माझ्या आईची…

    June 10, 2026 ललित

    वाणाचा ताण

    June 9, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    दिनूचा वाढदिवस साजरा करायला सर्व सोसायटीच सरसावली!

    By दीपक तांबोळीJune 11, 2026

    भाग – 3 लोढा शेठला सिक्युरिटी एकनाथचा मुलगा दिनूचा वाढदिवस जोरदार साजरा करायचा होता. सोसायटीत…

    गोष्ट आहे तुमच्या माझ्या आईची…

    June 10, 2026

    वाणाचा ताण

    June 9, 2026

    …असाही विचार करता येतो!

    June 9, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    दिनूचा वाढदिवस साजरा करायला सर्व सोसायटीच सरसावली!

    June 11, 2026

    गोष्ट आहे तुमच्या माझ्या आईची…

    June 10, 2026

    फक्त साखर बंद करून उपयोग होतो का?

    June 10, 2026

    Bookshelf : ‘सेपियन’… वेगवेगळ्या कोनांतून घडते आपलेच दर्शन

    June 10, 2026

    Dnyaneshwari : जें चळे ना ढळे, सरे ना मैळे

    June 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 जून 2026

    June 10, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 324
    • अवांतर 190
    • आरोग्य 119
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 449
    • फिल्मी 52
    • फूड काॅर्नर 220
    • मैत्रीण 20
    • ललित 692
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    दिनूचा वाढदिवस साजरा करायला सर्व सोसायटीच सरसावली!

    June 11, 2026

    गोष्ट आहे तुमच्या माझ्या आईची…

    June 10, 2026

    फक्त साखर बंद करून उपयोग होतो का?

    June 10, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.