Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    वाणाचा ताण

    June 9, 2026

    …असाही विचार करता येतो!

    June 9, 2026

    Kitchen Tips : हे ठरू शकते बोर्नव्हिटाला पर्यायी पेय… स्वस्त आणि मस्त!

    June 9, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, June 10
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Kitchen Tips : हे ठरू शकते बोर्नव्हिटाला पर्यायी पेय… स्वस्त आणि मस्त!
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : हे ठरू शकते बोर्नव्हिटाला पर्यायी पेय… स्वस्त आणि मस्त!

    Team AvaantarBy Team AvaantarJune 9, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किचन टीप्स, मी मराठी, अभिजात मराठी, नाचणीची भाकरी, बोर्नव्हिटाला पर्याय, बोर्नव्हिटासारखे पौष्टिक पेय, भाताची पेज, भाताची पेजेचा भाकरीत वापर, भाज्या धुतलेले पाणी, डाळ तांदूळ धुतलेले पाणी, झाडांसाठी भाज्यांचे पाणी, झाडांसाठी डाळ तांदळाचे पाणी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. बोर्नव्हिटाला पर्यायी पौष्टिक पेय, भाताची पेज अन् नाचणीच्या भाकरीसाठी या टिप्स वापरून पाहा.

    • वालडाळ, मूगडाळ किंवा मुळ्याचा पाला धुतल्यावर स्वयंपाकघरातील बेसिनमध्ये विशिष्ट प्रकारचा वास येत राहतो. त्यासाठी वालडाळ, मूगडाळ किंवा मुळ्याचा पाला धुतलेले पाणी जर कुंडीतील झाडांना घातले, तर बेसिनमध्ये वासही येणार नाही व झाडांना वेगळे खत घालायला लागणार नाही. शिवाय, पाण्याची बचतही होईल. रोजचे डाळ, तांदूळ, भाज्या धुतलेले पाणी झाडांना घातल्याने झाडे छान वाढतात.
    • नाचणीचे महत्त्व आपल्या रोजच्या आहारात किती आहे, हे सांगायला नकोच. पण बऱ्याच जणांना नाचणीची भाकरी कडक किंवा वातड होते म्हणून आवडत नाही. त्यासाठी एक उपाय करता येईल. कोणतीही (ज्वारी, बाजरी) भाकरी करताना भाकरी थापण्यासाठी वरून नाचणीचे पीठ घ्यावे. नाचणीचे पीठ किंचित जाडसर असते. त्यामुळे भाकरी छान थापली जाते. प्रत्येक भाकरीमागे दोन-तीन चमचे नाचणीचे पीठ पोटात जाते. त्याचबरोबर मिश्र धान्यांची भाकरी अधिक आरोग्यपूर्ण होते. नाचणीचा वेगळा पदार्थ केल्याविना नाचणी विनासायास खाल्ली जाते.

    हेही वाचा – Kitchen Tips : दालफ्राय, व्हेज पुलाव, मेथीच्या दाण्याची आमटी करताना…

    • दोन वाट्या उत्तम प्रतीचे गहू आणून स्वच्छ धुवावे. नंतर दुसऱ्या पाण्यात भिजवून मोड आणावेत. हे गहू वाळवावेत. नंतर तेल-तूप न टाकता तांबूस रंगावर भाजावेत आणि त्याचे बारीक पीठ करावे. किंचित कच्च्या केळ्यांचे (एक वाटीभर) पातळ काप करून उन्हात चांगले वाळवावेत आणि त्यांचेही पीठ करावे. दोन्ही पिठे एकत्र करावीत. एक कप कोमट दुधात एक चमचा ही पावडर आणि गोडापुरता गूळ टाकावा (साखर नको). बोर्नव्हिटाऐवजी हे पीठ वापरावे. वाढीच्या वयातील मुलांसाठी उत्तम पौष्टिक पेय आहे आणि स्वस्तही पडते. भुकेच्या वेळी ब्रेड, बिस्किट, चिवड्यापेक्षा दिवसातून दोन-तीन वेळा हेच पेय द्यावे.

    हेही वाचा – Kitchen Tips : बिटाचे कटलेट आणि परोठे, भरली वांगी करताना…

    • काही लोकांना भाताची पेज काढून भात खायची आवड असते, त्यामुळे भातातील पौष्टिकपणा कमी होतो. पेज काढून फेकून न देता काढलेली पेज भाकरीचे किंवा चपातीचे पीठ मळताना त्याचा उपयोग करावा, म्हणजे भाकरी आणि चपाती हलक्या, खुसखुशीत, चवदार होतात.

    तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर,  avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : कढीगोळे… विदर्भातील एक आवडता पदार्थ!

    June 5, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : स्वादिष्ट पंचरस आमटी अन् खमंग दही बुत्ती!

    June 3, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गोळ्यांचे सांबार अन् गोळ्यांची आमटी करून पाहिले आहे का?

    May 29, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : कढीगोळे… विदर्भातील एक आवडता पदार्थ!

    By माधवी जोशी माहुलकरJune 5, 2026

    कढी हा प्रकार बहुतांश भारतीयांचा आवडता प्रकार आहे. ठिकठिकाणी कढी करण्याची पद्धतही वेगवेगळी आहे. काही…

    Recipe : स्वादिष्ट पंचरस आमटी अन् खमंग दही बुत्ती!

    June 3, 2026

    Recipe : गोळ्यांचे सांबार अन् गोळ्यांची आमटी करून पाहिले आहे का?

    May 29, 2026

    Kitchen Tips : नाचणीचे आंबील, आंबा डाळीचे वडे बनविताना…

    May 28, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    वाणाचा ताण

    June 9, 2026

    …असाही विचार करता येतो!

    June 9, 2026

    Kitchen Tips : हे ठरू शकते बोर्नव्हिटाला पर्यायी पेय… स्वस्त आणि मस्त!

    June 9, 2026

    Dnyaneshwari : इया किरीटीचिया बोला । तो जगद्बंधु संतोषला

    June 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 जून 2026

    June 9, 2026

    मुख्याध्यापिकेच्या रोलसाठी ऑडिशनला गेले आणि…

    June 8, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 323
    • अवांतर 190
    • आरोग्य 118
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 448
    • फिल्मी 52
    • फूड काॅर्नर 220
    • मैत्रीण 20
    • ललित 689
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    वाणाचा ताण

    June 9, 2026

    …असाही विचार करता येतो!

    June 9, 2026

    Kitchen Tips : हे ठरू शकते बोर्नव्हिटाला पर्यायी पेय… स्वस्त आणि मस्त!

    June 9, 2026
    Most Popular

    वाणाचा ताण

    June 9, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.