Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    मुख्याध्यापिकेच्या रोलसाठी ऑडिशनला गेले आणि…

    June 8, 2026

    नव्या युगातल्या दोघींचा संघर्ष…

    June 8, 2026

    लेकीकडे आईचं माहेरपण…

    June 8, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, June 9
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » नात्यातील निरगाठी
    ललित

    नात्यातील निरगाठी

    सतीश बर्वेBy सतीश बर्वेJune 8, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, नात्यातील निरगाठी, शेवटची इच्छा, अजितदादा आणि अरुण, पिता पुत्राचे दुरावलेले संबंध, पिता पुत्राचे दुरावलेले नाते, निसर्ग शिक्षणाचे महत्त्व, दिप्ती काकूंचा मुलगा अरुण, माई आणि अरुण, माईंपासून दुरावलेला अरुण,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 1

    घड्याळाचा काटा जसजसा पुढे सरकत होता, तशी माझ्या मनात धाकधूक वाढत चालली होती. ते सगळं अचूक ओळखून दिप्ती काकूने म्हणजे अजितदादांच्या बायकोने मला शेवटी विचारले, “सुहास तुझा चेहरा का असा पडलाय?” हे ऐकून समोरच्या बेडवर शांतपणे आडवे झालेल्या दादांनी पण मला विचारले, “सुहास सगळं ठीक आहे ना?”

    “हो दादा सगळं ठीक आहे,” मी जेमतेम म्हणालो खरं, तसं पण माझ्या मनात काय सुरू होते, ते मला कोणालाच सांगता येणार नव्हते. सहा महिन्यांपूर्वी अचानकपणे झालेली अरुणची भेट आठवली. त्या छोट्या गावात निराधार गरीब मुलांना शिकवण्यासाठी अरुणने मोठ्या हिमतीने सुरू केलेला तो शैक्षणिक प्रकल्प आठवला… मला दिसताक्षणी त्याने कडकडून मारलेली मिठी आठवली… डबडबलेल्या डोळ्यांनी दादा आणि काकूंची केलेली चौकशी आठवली… त्यांच्या आठवणीने गेली काही वर्षे तो जे आयुष्य जगला त्याची त्याच्या तोंडून ऐकलेली कहाणी आठवली… कधीतरी दादा आणि काकूंना भेटायला येण्याचं त्यानं दिलेलं वचन आठवलं… दादांच्या आजारपणाची बातमी कळवण्यासाठी त्याला केलेला फोन आठवला… आणि तो ठरल्या दिवशी येईस्तोवर ही बातमी कोणाला न सांगण्याचं मी त्याला दिलेलं वचन आठवलं…

    माझ्या या अवस्थेतून सुटका केली, ती दारावरील बेलने. ती ऐकताच मी झटकन खुर्चीवरून उठलो. “कोण आलंय बाहेर ते बघून येतो…” असं म्हणून मी अधीरतेने मुख्य दरवाज्यापाशी आलो आणि तो उघडला.

    हेही वाचा – बेसनाचे लाडू… माँची आठवण

    दारात अरुण उभा होता… छोटी बॅग घेऊन!

    ” अरुण तू!” मी डोळ्यांवर विश्वास न बसल्यागत मोठ्याने म्हणालो.

    “कोण आलंय रे सुहास?” असं म्हणत काकू स्वयंपाकघरातून बाहेर डोकावल्या आणि अरुणला अचानक दारात उभा बघून त्या जागच्या जागी थबकल्या. त्यांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्यांचे डोळे पाणावले होते.

    सावकाश पावलं टाकत त्या अरुण जवळ गेल्या. त्याच्या अंगावरून हात फिरवला आणि त्याला घट्ट मिठी मारत त्या ओक्साबोक्शी रडायला लागल्या. “डोळे मिटायच्या आधी तू भेटशील, ही आशा मी सोडून दिली होती रे…”

    “माई मागचं सगळं विसरून मी, तुला आणि दादांना भेटायला आलो आहे. कसे आहेत दादा? तब्येत सुधारत आहे ना त्यांची? त्यांच्या आजारपणाचं कळलं आणि पायाखालची जमीन सरकली. जुनं सगळं विसरून भेटायला आलो आहे. अजूनही तुमचा राग गेला नसेल तर, लगेच निघून जाईन मी दादांना भेटल्यावर…” काकूंसमोर हात जोडून अरुण उभा होता.

    “ते तुझे दादाच ठरवतील. तू भेटशील तेव्हा त्यांनाच विचार,” काकू अजूनही त्या धक्क्यातून सावरल्या नव्हत्या. “पण अरुणला कळलं कसं यांच्या आजारपणाचे?” काकूंना खरा प्रश्न पडला होता.

    इतका वेळ शांतपणे सगळं ऐकून घेणारा मी अखेर बोलता झालो, “काकू मी सगळं सांगतो. आधी अरुणला आत येऊ दे. हातपाय धुवून दादांना भेटू दे. मग सगळ्यांच्या समोर मी सगळं सांगतो.”

    अरुण हातपाय धुवून आल्यावर मी बोलायला सुरुवात केली, “गेल्या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेतर्फे आरोग्यसेवेच्या वार्षिक पाहणी कार्यक्रमात सहभागी व्हायची संधी मला मिळाली होती. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या आजूबाजूला असलेल्या छोट्या छोट्या गावांतून आणि आदिवासी पाड्यातून आमचं पाहणी पथक जात होते. अशाच एका संध्याकाळी एका पाड्यावर वस्ती करण्यासाठी थांबलो असता तिथला ग्रामसेवक मी मुंबईचा आहे, हे ऐकून मला सहज बोलून गेला की, “दादा, तुमच्या मुंबईचे एक भाऊ इथे आडवाटेला एकटेच रहातात. आमच्या मुलांना पुस्तकाशिवाय अभ्यास शिकवतात. निसर्गाच्या सान्निध्यात मुलं रमतात आणि दादांनी शिकवलेलं लक्ष देऊन ऐकतात. सरकारी शाळा संपली की, भाकर तुकडा खाऊन सगळी मुलं भाऊंच्या ओसरीवर जाऊन बसतात, ते पार अंधार पडला की, घराकडे परततात.”

    “उद्या तुम्ही निघायच्या आधी मी निरोप धाडून भाऊंना बोलवून घेतो इथे. तुम्ही भेटा त्यांना. दोघांनाही बरं वाटेल.”

    दुसऱ्या दिवशी पक्षांच्या किलबिलाटात जाग आली. आमचा चहा आणि न्याहरी होत असतानाच आरोग्य सेवक सांगायला आले की, भाऊ सायकलवरून यायला निघाले आहेत. आमची सामानाची बांधाबांध सुरू असतानाच बाहेर सायकलची घंटी वाजली. आम्ही उत्सुकतेने बाहेर आलो आणि माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. सायकलसोबत उभ्या असलेल्या व्यक्तीला मी लगोलग ओळखले. काकू तो तुमचा मुलगा आणि माझा अरुण दादा होता!

    “अरुण तू?” मी जवळजवळ ओरडलोच आश्चर्याने.

    “हो, सुहास मीच आहे. दादा, आई कसे आहेत रे? सगळं ठीक आहे ना घरी?” अरुणचा प्रश्न ऐकून डोळे पाणावले.

    “सगळं ठीक आहे. पण तू इथे कसा पोहोचलास?” मी अजूनही त्या धक्क्यातून बाहेर पडलो नव्हतो.

    थोडक्यात सांगतो, असं म्हणून अरुणने घर सोडल्यापासून आजपर्यंतची सगळी कहाणी मला सांगितली. ऐकून अर्थात खूप वाईट वाटलं. दादांनी ज्या कारणासाठी अरुणला घराबाहेर काढले होते, ते शेवटपर्यंत पूर्ण झालेच नाही. अरुण त्याला आवडणाऱ्या मुलीसोबत तिच्या गावी गेला, पण तिथे त्या दोघांच्या लक्षात आलं की, त्यांच्या लग्नाला सगळ्यांचाच विरोध आहे. ते दोघे नंतर थेट अमरावतीला पोहोचले आणि मिळेल ती नोकरी करत रहायला लागले. एक-दोन वर्षे नोकरी करून पैसे साठवून दोघांनी लग्न जरूर केले; पण ते जेमतेम सहा महिने टिकले. कारण दुर्दैवाने एका अपघातात अरुणची बायको तडकाफडकी गेली आणि अरुण खचून गेला. घरची खूप आठवण येत होती. त्या नादात एकदा मुंबईला येऊन गेला. पण घरी यायची हिंमत झाली नाही आणि मग उलट पावली तसाच परत अमरावतीला परतला. शेयर ब्रोकरकडे काम करताना, त्याने शेयर बाजाराचा खोलवर जाऊन अभ्यास केला आणि त्याने त्या बाजाराच्या माध्यमातून पैसे मिळवायला सुरुवात केली. इथे बऱ्यापैकी जम बसला खरा पण त्याचं मन शहरात रमलं नाही. अखेर सध्या रहातो त्या गावात तो पाच वर्षांपूर्वी रहायला गेला आणि गावातील मुलांसाठी बिनापुस्तकांची आणि बिनाअभ्यासाची शाळा त्याने सुरू केली त्याच्या घराच्या ओसरीवर. मुलांना केवळ शाळेतील विषयांच्या पुस्तकी ज्ञानात न अडकवता निसर्गाच्या सान्निध्यात तिथे असणाऱ्या गोष्टींच्या माध्यमातून त्याने मुलांना आयुष्य कसं जगायला पाहिजे, त्याचं शिक्षण द्यायला सुरुवात केली… पशुपक्षांशी त्याने मैत्री करायला लावली सगळ्यांना…”

    हेही वाचा – दोन शब्द पुरे जगण्याला…

    “काकू त्याच्या या आगळ्यावेगळ्या शैक्षणिक पद्धतीचे वर्णन परदेशातील एका संस्थेला समजले. त्यांनी मग प्रत्यक्ष येऊन अरुणच्या उपक्रमाची माहिती करून घेतली आणि त्यानंतर आता दरवर्षी शाळेला परदेशी मदत मिळायला लागली. अरुण रहातो तिथे बाजूलाच नुसती एक मजली शाळा बांधली नाही, त्या परदेशी संस्थेने तर, नवनवीन शैक्षणिक साहित्य आणि संगणक देखील उपलब्ध करून दिले. सरकारी माध्यमातून शाळेत आणि अरुणच्या घरात 24 तास वीज आणि इंटरनेटसाठी नेटवर्क उपलब्ध झाले आहे आता. अरुणच्या या आगळ्यावेगळ्या शाळेची कीर्ती दूर दूरवर पसरत चालली आहे… अरूणदादाच्या तोंडून त्याचा हा थक्क करणारा प्रवास आणि गावातील छोट्या मुलांना त्याची शिकवण्याची तळमळ बघून त्याच्याबद्दल मनांत असलेला राग आणि किल्मीष क्षणांत दूर होऊन त्याची जागा अभिमानाने घेतली.”

    “माझी आणि दादा आईची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करशील का रे तू?  असं अरुण दादाने मला विचारलं. दादाला मी ‘हो’ म्हणालो खरं, पण मुंबईला आल्यावर खूप विचार करून देखील काकू तुला आणि दादांना हे सगळं सांगायची हिंमत नाही झाली माझी! अगदी दादा आजारी पडेस्तोवर… पण म्हणतात ना, काळाच्या ओघात विनाकारण नात्यात पडलेल्या निरगाठी सोडवण्यासाठी देवच बुद्धी देतो आणि तशी परिस्थिती निर्माण करतो. इथे देखील तसंच काहीसं झालं. दोन आठवड्यांपूर्वी मी दादांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. दादा खरंतर ग्लानीत होते, पण त्यांच्या तोंडून अरुण दादाचं नाव ऐकल्याचा भास झाला मला… एकदा नाही तर मोजून तीन वेळा! मी दादांच्या कपाळावर हात ठेवून त्यांना थोपटत असताना दादांनी अचानकपणे तो थक्क करणारा प्रश्न मला विचारला…

    क्रमशः
    Avatar photo
    सतीश बर्वे

    वय वर्षे 65. Adhesive क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा असणाऱ्या भारतीय कंपनीच्या कायदा विभागात प्रदीर्घ काळासाठी काम करून निवृत्त. लेखनाचा वारसा आईकडून आलेला आहे. फेसबुकवरील 7-8 वाचक समुहात विपुल लेखन करून अल्पावधीतच लोकप्रिय होऊन स्वतःचा वाचक वर्ग तयार केला आहे. प्रवासाची आवड. डोळे आणि कान उघडे सतत उघडे ठेवल्याने माझ्या कथेतील बरीच पात्रं आणि प्रसंग मला सापडत गेले. मनमोकळ्या स्वभावाने मी सतत माणसं जोडत गेलो आणि त्यांच्या आयुष्यात मिसळून गेलो.

    Related Posts

    नव्या युगातल्या दोघींचा संघर्ष…

    June 8, 2026 ललित

    लेकीकडे आईचं माहेरपण…

    June 8, 2026 ललित

    ‘देवळाबाहेरच्या देवां’ना ओळखण्याची गरज!

    June 8, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    नव्या युगातल्या दोघींचा संघर्ष…

    By Team AvaantarJune 8, 2026

    नुकताच महिनाभर झाला होता तिचं लग्न होऊन. मजेत चालले होते दिवस. ती, तिचा नवरा, मोठा…

    लेकीकडे आईचं माहेरपण…

    June 8, 2026

    ‘देवळाबाहेरच्या देवां’ना ओळखण्याची गरज!

    June 8, 2026

    आता पूर्वी अन् पवनची प्रेमकहाणी फुलू लागली…

    June 7, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    मुख्याध्यापिकेच्या रोलसाठी ऑडिशनला गेले आणि…

    June 8, 2026

    नव्या युगातल्या दोघींचा संघर्ष…

    June 8, 2026

    लेकीकडे आईचं माहेरपण…

    June 8, 2026

    नात्यातील निरगाठी

    June 8, 2026

    Dnyaneshwari : तरि व्यक्त आणि अव्यक्त, हें तूंचि एक निभ्रांत

    June 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 जून 2026

    June 8, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 322
    • अवांतर 190
    • आरोग्य 118
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 447
    • फिल्मी 52
    • फूड काॅर्नर 219
    • मैत्रीण 20
    • ललित 687
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    मुख्याध्यापिकेच्या रोलसाठी ऑडिशनला गेले आणि…

    June 8, 2026

    नव्या युगातल्या दोघींचा संघर्ष…

    June 8, 2026

    लेकीकडे आईचं माहेरपण…

    June 8, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.