Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    …अखेर त्या शापित खुर्चीचं रहस्य उलगडलं!

    June 6, 2026

    शारीरिक व्याधी-विकार नियंत्रणासाठी मार्गदर्शन – प्रस्तावना

    June 6, 2026

    तीन तिगाडा काम बिगाडा…

    June 6, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, June 7
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » तीन तिगाडा काम बिगाडा…
    ललित

    तीन तिगाडा काम बिगाडा…

    सुधीर करंदीकरBy सुधीर करंदीकरJune 6, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, कथाकहाणी, मी मराठी, अभिजात मराठी, लघुकथा, तीन आकडा, तीन निगाडा काम बिघाडा, तीन आकड्याचे महत्त्व, 3 आकडा, पॅनकार्ड नंबरची बेरीज, मेघना मनवा, मैत्रीण मेघना, मैत्रीण मनवा, नावातील अक्षरांची बेरीज, संख्या शास्त्र, अशुभ आकडा, शुभ आकडा तीन.
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    तीन (3) हा अंक बऱ्याच जणांना अशुभ वाटतो. “तीन तिगाडा काम बिगाडा” अशी आपल्याकडे म्हण पण प्रचलित आहे. पण आता जमाना बदलतो आहे आणि आता 3 हा अंक शुभ मानणाऱ्यांची संख्या जोमाने वाढते आहे. कुणाची जन्म तारीख 3 असते, कुणाचा जन्म महिना 3 असतो, काहींच्या जन्म तारखेच्या सगळ्या अंकांची बेरीज 3 होते, म्हणून ते स्वतःला नशीबवान समजतात! बरेचजण येन-केन प्रकारे 3 अंकाशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतात… जसे गाडीच्या रजिस्ट्रेशन नंबरची बेरीज 3 झाली पाहिजे, मोबाइल नंबरच्या अंकांची बेरीज 3 झाली पाहिजे….

    यावरून मला एक जुनी घटना आठवली –

    नेहेमीप्रमाणे सकाळी फिरायला बाहेर पडलो.  बायको सकाळी योगा क्लासला जाते, त्यामुळे मी नेहमी एकटाच असतो. फिरत फिरत मारुती मंदिराजवळ आलो आणि नेहमीच्या ठिकाणी, म्हणजे चहाच्या टपरी जवळ आज चक्क केव्हा तरी भेटणाऱ्या मॉर्निंग वॉक मैत्रिणी मेघना आणि मनवा यांची भेट झाली. तारीख होती  25/03/2018.

    मनवा : काका आज तारखेमधल्या सगळ्या अंकांची बेरीज सिंगल डिजिटमध्ये किती होते?

    (मी आधी तोंडी बेरीज करायचा प्रयत्न केला, पण ते जमले नाही. मग आपल्या जुन्या सवयी प्रमाणे हातावरची कांडी मोजून 3 हे उत्तर काढले.)

    मी : तीन.

    मनवा : काका, उत्तर एकदम बरोबर आहे. इस बात पे, एक एक चाय हो जाये…

    मी : मला तोंडी बेरीज करता आली नाही, म्हणून, पेनल्टी म्हणून, आजचा चहा माझ्याकडून!

    चहा आला आणि चहा घेता घेता…

    मनवा : काका, काही जणांचा डावा मेंदू तल्लख असतो, ते लोक आकडेमोडीत हुशार असतात. तुमचा उजवा मेंदू तल्लख आहे, त्यामुळे तुम्हाला प्रेमाचे गणित चांगले जमते. Nothing wrong in that.

    मेघना : काका, 3 या आकड्यावरून तुमच्या डोक्यात लगेच काय विचार येतो?

    मी : तीन तिगाडा काम बिगाडा!

    मनवा : काका, इथेच आपण नेहमी चूक करतो. Think only positive.

    मी : आपण 3 हा नेहमीच अशुभ मानत आलो आहोत. कुठलेही शुभ कार्य आणि 3 यांचे कधीच जमत नसते, अशी आपली परंपराच आहे. एखाद्याला ओवाळायचे असेल आणि तीनच बायका असतील, तर ते अशुभ होते, म्हणून एक स्त्री पुन्हा एकदा ओवाळते. महत्त्वाच्या कामाकरिता कुठे जायचे असेल, आणि तीनजण असतील,  तर आपण एक सुपारी बरोबर नेतो.

    हेही वाचा – हसत रहा, हसत रहा… निरोगी रहा!

    मेघना : काका, आपल्याला यातूनच बाहेर पडायचे आहे. आपण नेहमी तिघे  भेटतो. मजा येते ना? कधी वादावादी झाली आहे का? आपल्या गप्पांमध्ये आपण कधी कुणाविषयी वाईट बोलतो का? मग 3 अंक अशुभ कसा काय?

    मनवा : काका, एखादे मोठे काम सुरू करायचे असेल…  काही छोटी कामे  करायची असतील… काही चांगल्या सवयी सुरू करायच्या असतील…. जसे – रोज फिरायला जायचे आहे, रोज व्यायाम करायचा आहे, रोज योग करायचा आहे, रोज घरच्यांबरोबर गप्पा मारायला वेळ काढायचा आहे, रोज या कालावधीत टीव्ही बंद ठेवायचा आहे, जंकफूड खाणे बंद करायचे आहे, वजन कमी करण्याकरता  दीक्षित पॅटर्न सुरू करायचा आहे किंवा दिवेकर पॅटर्न सुरू करायचा आहे, असे जे जे मनात असेल, त्यांचा श्री गणेशा करताना आपण ब्रह्मा, विष्णू, महेश, या त्रिमूर्तींना श्रद्धापूर्वक नमस्कार करतो आणि मग कामाला सुरुवात करतो. मनातलं वास्तवात उतरणार हे नक्की. कारण त्यामागे शक्ती असणार आहे, या तीन देवतांची!

    मेघना : काका, आपण कायम आनंदी असावं, याकरिता देवाने आपल्या चेहेऱ्यावर तीनच अवयव दिले आहेत, जे आपल्या मर्जीप्रमाणे आपण उघडू शकतो आणि नको तेव्हा बंद ठेऊ शकतो. कान, डोळे आणि तोंड. नाक हे सतत उघडेच ठेवावे लागते. आपल्या चेहऱ्यावरच्या या तीन अवयवांचा आपण योग्य वापर केला, तर आपण कायम आनंदी राहू शकतो. कशी घ्यायची या तिघांची मदत —

    तोंड –  आवश्यक तेवढेच बोलणे.

    डोळे – न पटणार्‍या घटनांकडे डोळेझाक करणे.

    कान – वादविवाद घडवणाऱ्या गोष्टींकडे कानाडोळा करणे.

    मी : तीनची ही बाजू आधी कधी माझ्या लक्षातच आली नाही! तुमच्या दोघींच्या नावांमध्ये ‘मेघना’ आणि ‘मनवा’ तीन-तीन अक्षरे आहेत, त्यामुळेच तुम्हाला असे सुंदर विचार सुचत असणार, हे नक्की.

    मनवा : काका, तुमच्या ‘सुधीर’ या नावात पण अक्षरे तीनच आहेत, हे विसरलात का?

    म्हणजे आपण तिघे आहोत आणि नावातली अक्षरं पण 3 – 3 – 3 आहेत. आपण नेहमी भेटतो मारुती मंदिराजवळ. त्या देवाच्या नावामध्ये अक्षरं पण तीनच आहेत.

    मेघना : काका, आमच्या दोघींच्या जन्म तारखेतल्या सगळ्या अंकांची बेरीज 3 होते, म्हणूनच आम्ही एकदम लकी आहोत. काका, तुम्ही पण कायमच लकी असता, तुमच्या जन्म तारखेतल्या अंकांची बेरीज करून सांगा जरा. हमखास तीनच असणार!

    मी  :  नशिबाने मला कायमच साथ दिली आहे, हे नक्की! तुमच्या दोघींशी ओळख झाली, हे लकी असल्यामुळेच. पण त्याचा तीनशी काही संबंध असेल, असा मी विचारच कधी केला नव्हता आणि जन्मतारखेच्या अंकांची बेरीज पण कधी केली नव्हती. बेरीज करून बघतो.

    मी अंकांची बेरीज केली, आणि अहो आश्चर्यम! म्हणजे बेरीज तीन आली. मी उडालोच!

    मी : नशीब कायम माझ्या पाठीशी का असते, याचे कोडे मला आज तुमच्यामुळे  उलगडले. माझी बेरीज पण तीन आहे. माझी जन्म तारीख आहे  20/5/1949.

    मनवा आणि मेघना :  वाह, क्या  बात है.  अंदाज एकदम परफेक्ट!

    आमच्या गप्पा सुरू असताना बाजूला बसलेले चहा पिणारे पण आपापल्या खुर्च्या आमचे भोवती सरकवून आमच्या ग्रुपमध्ये सहभागी झाले होते.

    एक जण : आज 3 या अंकाविषयी खूपच छान माहिती मिळाली. मी तीन या अंकाला अशुभच मानत होतो. यापुढे मात्र आता नाही.

    दुसरे एक जण : काका तुमच्या पॅन कार्डमधल्या अंकांची बेरीज पण नक्कीच 3 होत असणार.

    हेही वाचा – आनंदी जगायला काय लागतं?

    मनवा : काका, सांगा पॅन कार्डमधले आकडे. तेच आकडे, पण थोडे मागे पुढे करून सांगा प्रायव्हसी म्हणून

    मी : 1803

    मेघना : अंकांची बेरीज 3…

    काका 3 या शुभ अंकाशी तुमची खूपच दाट मैत्री दिसतेय

    मी : आता बेरीज करण्याकरfता कोणी मला आधार कार्डमधले आकडे विचारू नका. कारण तो नंबर मला पाठ नाही.

    एक जण : काका ती पण बेरीज तीनच असणार हे शंभर टक्के नक्की!

    दुसरे एक जण : (चहावाल्यांना उद्देशून) दादा, सगळ्यांकरिता अजून अर्धा अर्धा कप चहा येऊ द्या आणि चहाचं बिल माझ्या नावावर मांडा. मजा आली. माझ्या मुलीची जन्मतारीख 3 मार्च आहे.

    चहाचे दुकानदार : वा, वा, क्या बात है. मी पण तुमच्या गप्पा ऐकल्या, खूप नवीन विचार समजले. 3 अक्षरी नावे असणाऱ्या, जन्म तारखेच्या अंकांची बेरीज 3 असणाऱ्या, तुम्हा तिघांना आणि सगळ्यांना माझा नमस्कार! आजपासून मी रोज तीन गरीब लोकांना चहा फ्री देणार आहे.

    आम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला… आणि एकमेकांना बाय बाय करून आपापल्या मार्गाने निघालो.

    Avatar photo
    सुधीर करंदीकर

    मी पुण्याच्या टाटा मोटर्स मधून 2009मध्ये रिटायर झालो. लिखाणाचा आणि माझा, किंवा वाचनाचा आणि माझा, नोकरीमधून निवृत्त होण्याच्या शेवटच्या काही वर्षांपर्यंत ‘नाही’च्या आसपासच संबंध होता. नोकरीच्या शेवटच्या काळात मात्र ISO 9000 या स्टॅंडर्डच्या निमित्ताने, माहिती नसणाऱ्या आणि जुजबी माहिती असणाऱ्या विषयांवर भरपूर म्हणजे प्रचंड लिखाण करण्याचा योग आला. बहुदा लिखाणाची हीच ‘री’, निवृत्तीनंतर अवांतर लिखाणात सुरू राहिली. लोकसत्ता / सकाळ / महाराष्ट्र टाइम्स / बित्तंमबातमी अशी वर्तमानपत्रे, अभियंता मित्र / प्रज्ज्योत / कजरी / मायभूमी / पुरुष उवाच / मैत्री / अक्षरसिद्धी / सांज / मिळून साऱ्याजणी / विश्वभ्रमंती अशी मासिके यातही लेखन आहेच. माझी मजेशीर लेख आणि अनुभव यांची तीन पुस्तके अमेझॉन वर उपलब्ध आहेत. 1) म्हैस, 2) काही आहे का? काही आहे का? 3) हसती खेळती बायको. वाचकवर्ग वाढतो आहे आणि माझी लिखाणातून आनंदयात्रा मस्त मजेत सुरू आहे. मोबाइल - 9225631100

    Related Posts

    …होई का असे तुलाच स्मरताना?

    June 6, 2026 ललित

    आराध्याविरोधात माधवने कटकारस्थान पुन्हा सुरू केले…

    June 5, 2026 ललित

    ती म्हणाली, “काळाप्रमाणे update होत नाही तो…”

    June 5, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    …होई का असे तुलाच स्मरताना?

    By स्नेहा सुतारJune 6, 2026

    भाग – 17 रेवतीसोबत घरी आलेली जुईली बरीच खुलली होती. घरी आल्या आल्या चक्क हसली!…

    आराध्याविरोधात माधवने कटकारस्थान पुन्हा सुरू केले…

    June 5, 2026

    ती म्हणाली, “काळाप्रमाणे update होत नाही तो…”

    June 5, 2026

    सहावे इंद्रिय… मन

    June 5, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    …अखेर त्या शापित खुर्चीचं रहस्य उलगडलं!

    June 6, 2026

    शारीरिक व्याधी-विकार नियंत्रणासाठी मार्गदर्शन – प्रस्तावना

    June 6, 2026

    तीन तिगाडा काम बिगाडा…

    June 6, 2026

    …होई का असे तुलाच स्मरताना?

    June 6, 2026

    Dnyaneshwari : ऐसा जो भक्तु होये, तयाचें त्रिधातुक हें जैं जाये

    June 6, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 जून 2026

    June 6, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 320
    • अवांतर 189
    • आरोग्य 118
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 444
    • फिल्मी 51
    • फूड काॅर्नर 219
    • मैत्रीण 20
    • ललित 682
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    …अखेर त्या शापित खुर्चीचं रहस्य उलगडलं!

    June 6, 2026

    शारीरिक व्याधी-विकार नियंत्रणासाठी मार्गदर्शन – प्रस्तावना

    June 6, 2026

    तीन तिगाडा काम बिगाडा…

    June 6, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.