Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 ऑगस्ट 2026

    August 8, 2026

    कॉफीशॉप

    August 7, 2026

    ‘क्षितिज 9’ प्रोजेक्ट हायजॅक करणारं नेमकं कोण?

    August 7, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, August 8
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 मे 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 मे 2026

    Team AvaantarBy Team AvaantarMay 30, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 30 मे 2026; वार : शनिवार
    • भारतीय सौर : 09 ज्येष्ठ शके 1948; तिथि : चतुर्दशी 11:57; नक्षत्र : विशाखा 13:19;
    • योग : शिव 29:24; करण : विष्टि 25:05;
    • सूर्य : वृषभ; चंद्र : तुळ 06:38; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:10;
    • पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    पौर्णिमा प्रारंभ सकाळी 11:57

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    सुप्रसिद्ध चित्रकार दीनानाथ दलाल

    टीम अवांतर

    सुप्रसिद्ध गोमंतकीय चित्रकार दीनानाथ दामोदर दलाल यांचा जन्म 30 मे 1916 रोजी मडगावजवळील कोंब (गोवा) येथे झाला. त्यांचे मूळ नाव नृसिंह दामोदर दलाल-नाईक असे होते; मात्र नंतर ते दीनानाथ दलाल या नावाने प्रसिद्धीस आले. गोव्यातील निसर्गरम्य परिसरात त्यांचे बालपण गेल्याने चित्रकलेसाठी लागणारी सौंदर्यदृष्टी बालपणीच त्यांच्यात विकसित झाली. गोव्यातील पोर्तुगीज सरकारची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर दलाल मडगावहून मुंबईत आले. मुंबईतील ‘केतकर आर्ट इन्स्टिट्यूटʼमध्ये त्यांचे चित्रकलेचे शिक्षण सुरू झाले. पुढे त्यांनी ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टʼमधून पदविका मिळविली. त्यानंतर त्यांनी तत्कालीन प्रसिद्ध ‘बी. पी. सामंत आणि कंपनीʼ या जाहिरात वितरण संस्थेत नोकरी केली. याच सुमारास त्यांनी प्रा. अनंत काणेकर आणि मो. ग. रांगणेकर या साहित्यिक-पत्रकार मित्रांच्या चित्रा साप्ताहिकासाठी व्यंग्यचित्रे काढली. ती व्यंग्यचित्रे तत्कालीन राजकीय परिस्थितीवर आणि ब्रिटिशांच्या धोरणांवर टीका करणारी होती. काणेकरांच्या कल्पना आणि त्या कल्पना नेमकेपणाने स्पष्ट करणारी दलालांची व्यंग्यचित्रे त्या काळात खूपच गाजली. काणेकरांबरोबर त्यांनी भारतभर भ्रमंती केली. त्यामधून ‘आमची माती आमचे आकाश’ या पुस्तकाची निर्मिती झाली.

    हेही वाचा – शर्वायने आराध्याला सांगितले, त्या गूढ बॉक्सचे महत्त्व!

    याच काळात अनेक मासिकांची आणि पुस्तकांची मुखपृष्ठे दलालांनी रेखाटली. ना. धों. ताम्हणकरांचा ‘गोट्याʼ, वि. वि. बोकिलांचा ‘वसंतʼ ही त्यांची व्यक्तिचित्रे विशेष गाजली. तसेच दलालांनी बा. द. सातोस्कर यांच्या सागर प्रकाशनासाठी काम सुरू केले. या प्रकाशनासाठी दलालांनी सुमारे 15 पुस्तकांची मुखपृष्ठे रेखाटली. त्यांतील काही व्यक्तिरेखा संस्मरणीय ठरल्या.

    1943 मध्ये दलालांनी मुंबईत स्वत:चा ‘दलाल आर्ट स्टुडिओ’ सुरू केला. त्यांनी छोट्या रेखाटनापासून मोठी कथाचित्रे, मासिके, पुस्तके यांची मुखपृष्ठे, दिनदर्शिका (कॅलेंडर्स), व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे इत्यादी अनेकविध चित्रे रेखाटली. त्यामुळे ते अल्पावधीतच रसिकप्रिय चित्रकार बनले. दलालांनी रॉय किणीकरांच्या साथीने दीपावली नावाचा वार्षिक दिवाळी अंक सुरू केला. मराठीतील अनेक प्रथितयश लेखकांचे उत्तमोत्तम दर्जाचे साहित्य दलालांच्या चित्रांनी सजले. दीपावलीच्या अंकात दलालांनी ‘बिंग चित्रमालाʼ, ‘अर्कचित्रेʼ, ‘हास्यचित्रेʼ, ‘व्यंग्यचित्रेʼ अशा चित्रमालिका सादर केल्या. तसेच बारामास, रागरागिण्या, ऋतू, नवरस, शृंगारनायिका यांसारख्या संस्कृत साहित्यावर आधारित त्यांच्या चित्रमालिकांमुळे दीपावली अंकाची लोकप्रियता वाढली.

    त्यांना बॉम्बे आर्ट सोसायटीची चार वर्षे पारितोषिके मिळाली. याशिवाय, वास्को-द-गामा, गोवा या संस्थेचे रौप्यपदक, हैदराबाद सोसायटीचे ब्राँझ पदक, राष्ट्रपती पारितोषिक, दि इंडियन ॲकॅडमी ऑफ फाइन आर्ट्स अँड क्राफ्ट्स, अमृतसर या संस्थेचे सुवर्णपदक इत्यादी अनेक पारितोषिके मिळाली. 15 जानेवारी 1971 रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.



    आजचे राशीभविष्य

    मेष – भूतकाळातील चुकांमधून शिकल्याने योग्य निर्णय घेण्यास मदत होईल. अनोळखी लोकांवर पैशांच्या बाबतीत विश्वास ठेवणे नुकसानकारक ठरू शकते. तुमचे पैसे कुठे अडकले असतील, तर ते परत मिळण्याची चिन्हे आहेत. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात तुमची वाढती लोकप्रियता काहींना त्रासदायक वाटू शकते. जोडीदारासोबत प्रवासाचे नियोजन कराल.

    वृषभ – नोकरदारांसाठी दिवस विशेष असेल, कारण वरिष्ठांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. तुमच्या पदोन्नतीचीही चर्चा होऊ शकते. नवीन प्रयत्न हळूहळू यशाचा मार्ग प्रशस्त करतील; फक्त कठोर परिश्रमावर विश्वास ठेवा. घरासाठी आणि इतर गरजेच्या वस्तूंवर मनसोक्त खर्च कराल. संतती अपेक्षा पूर्ण करतील, ज्यामुळे मनात अभिमानाची भावना निर्माण होईल.

    मिथुन – आज अचानक एक मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. तथापि, भूतकाळातील एखादी जुनी समस्या किंवा चूक अचानक समोर येऊ शकते, त्यामुळे सावध रहा. आज जर तुम्ही सर्व गोष्टींचे नियोजन केले, तर यश नक्कीच मिळेल.

    कर्क – बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे आज पूर्णत्वाकडे जाऊ शकतात, त्यामुळे दिलासा मिळेल. वैयक्तिक बाबी किंवा महत्त्वाची माहिती कोणाशीही शेअर करणे टाळा. एखाद्या सहकाऱ्याच्या बोलण्याने तुमच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, पण संयम ठेवा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवले, तर आर्थिक परिस्थिती मजबूत राहील.

    सिंह – उत्पन्नाच्या दृष्टीने दिवस खूप चांगला असेल. सरकारी नोकरी करणाऱ्यांना एखादी चांगली बातमी किंवा यश मिळू शकते. व्यावसायिकांचे नवे सौदे होतील. मात्र, त्याबाबत गुप्तता ठेवा. आईच्या आरोग्याबाबत सावध रहा, कारण एखादा जुना आजार पुन्हा उद्भवू शकतो. विद्यार्थी अभ्यासात पूर्णपणे मग्न राहतील, आपल्या भविष्याबद्दल गंभीर दिसतील.

    कन्या – कामांमध्ये घाई करणे हानिकारक ठरू शकते, म्हणून प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्या. नवीन नोकरी किंवा करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळेल. जोडीदाराकडून मिळणारे एक सुखद आश्चर्य तुमचा दिवस खास बनवेल. शेजारी किंवा जवळपासच्या लोकांशी वाद घालणे टाळा, कारण लहानसहान गोष्टींचे मोठ्या वादात रूपांतर होऊ शकते.

    तुळ –  सभोवतालचे वातावरण आनंद आणि उत्साहाने भरलेले असेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे लग्न निश्चित होऊ शकते, ज्यामुळे घरातील आनंदात भर पडेल. मात्र एखादे आर्थिक दायित्व पूर्ण करताना अडचण येऊ शकते. एक नवीन व्यावसायिक भागीदारी फायदेशीर ठरेल. मालमत्तेचा रखडलेला व्यवहार पुढे सरकण्याची शक्यता आहे.

    वृश्चिक – आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा अधिक सुखद आणि आरामदायी वाटेल. सभोवतालच्या लोकांचे खरे हेतू ओळखणे महत्त्वाचे आहे. संततीकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आपली जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणाने पार पाडाल. प्रलंबित असलेली शासकीय कामे पूर्ण होण्याची शक्यताही प्रबळ दिसत आहे. तब्येतीची काळजी घ्या.

    हेही वाचा – काळाच्या प्रवाहात टिकून राहिलेला मुंबईचा अस्सल कॅफे ‘बी मेरवान’!

    धनु – दिवस हास्य, मजा आणि नवीन अनुभवांनी भरलेला असेल. एखादा विरोधक त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतो, त्यामुळे सावध रहा. परिसरातील वादात गुंतणे हानिकारक ठरू शकते. राजकारण आणि सामाजिक वर्तुळात तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल आणि लोक तुमच्या विचारांचे कौतुक करतील. नोकरीसंबंधी एखादी चांगली बातमी मिळू शकते.

    मकर – कार्यालयात कामाबद्दल अत्यंत उत्साही असाल आणि व्यवसायातील चढ-उतार असूनही अथकपणे काम करत रहाल. जोडीदार प्रत्येक पावलावर तुम्हाला साथ देईल, ज्यामुळे अडचणी सोप्या वाटतील. दीर्घकाळापासूनच्या कौटुंबिक चिंतांपासून दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. नवीन मालमत्ता खरेदी करण्याच्या कल्पनेलाही चालना मिळू शकते.

    कुंभ – मित्रांचा पाठिंबा आणि सहकार्य तुम्हाला प्रेरणा देईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन संधी मिळू शकतात. संपत्ती आणि सुखसोयींमध्ये वाढ होईल. एखादे प्रलंबित काम आज पूर्णत्वाकडे जाऊ शकते. अनुभव हाच सर्वात मोठा शिक्षक आहे, हे आजचा दिवस तुम्हाला शिकवेल. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला असेल.

    मीन – कामाच्या दबावामुळे आज थकवा जाणवू शकतो. लहानसहान समस्यांमुळे मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबात एखाद्या जुन्या मुद्द्यावरून वाद निर्माण होऊ शकतो, त्यामुळे जुने मुद्दे पुन्हा उकरून काढणे टाळा. स्वभाव सौम्य आणि बोलण्याचा सूर गोड ठेवणे महत्त्वाचे ठरेल. वेगाने गाडी चालवताना विशेष सावधगिरी बाळगा.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 ऑगस्ट 2026

    August 8, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑगस्ट 2026

    August 7, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 ऑगस्ट 2026

    August 6, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 ऑगस्ट 2026

    By Team AvaantarAugust 8, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 08 ऑगस्ट 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 17…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑगस्ट 2026

    August 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 ऑगस्ट 2026

    August 6, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 05 ऑगस्ट 2026

    August 5, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 ऑगस्ट 2026

    August 8, 2026

    कॉफीशॉप

    August 7, 2026

    ‘क्षितिज 9’ प्रोजेक्ट हायजॅक करणारं नेमकं कोण?

    August 7, 2026

    उपवास

    August 7, 2026

    Recipe : स्प्राऊटेड मूग आणि स्वीट कॉर्न चीज बॉल्स!

    August 7, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : सचेतनीं वाणेपणें, देहासकट आटणें

    August 7, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 387
    • अवांतर 202
    • आरोग्य 136
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 523
    • फिल्मी 61
    • फूड काॅर्नर 246
    • मैत्रीण 24
    • ललित 835
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 ऑगस्ट 2026

    August 8, 2026

    कॉफीशॉप

    August 7, 2026

    ‘क्षितिज 9’ प्रोजेक्ट हायजॅक करणारं नेमकं कोण?

    August 7, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.