Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आत्तू… एकमेकांच्या भावविश्वात समरस होणारं नातं

    May 28, 2026

    शंकरने उभारले ज्येष्ठांचे मंदिर… ‘स्नेहमंदिर’!

    May 28, 2026

    Kitchen Tips : नाचणीचे आंबील, आंबा डाळीचे वडे बनविताना…

    May 28, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, May 28
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : जी कल्पादीलागोनी, आजिची घडी धरुनी
    अध्यात्म

    Dnyaneshwari : जी कल्पादीलागोनी, आजिची घडी धरुनी

    Team AvaantarBy Team AvaantarMay 28, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Eleven, अकरावा अध्याय, अध्याय अकरावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय अकरावा

    जया अमृतलेशालागीं सायास । तयाचा पाऊस केला चारी मास । पृथ्वी वाहून चासेचास । चिंतामणि पेरिले ॥582॥ ऐसा कृतकृत्य केला स्वामी । बहुवे लळा पाळिला तुम्हीं । दाविलें जें हरब्रह्मीं । नायकिजे कानीं ॥583॥ मग देखावयाची केउती गोठी । जयाची उपनिषदां नाहीं भेटी । ते जिव्हारींची गांठी । मजलागीं सोडिली ॥584॥ जी कल्पादीलागोनी । आजिची घडी धरुनी ।  माझीं जेतुलीं होउनी । गेलीं जन्में ॥585॥ तयां आघवियांचि आंतु । घरडोळी घेऊनि असें पाहतु । परि ही देखिली ऐकिली मातु । आतुडेचिना ॥586॥ बुद्धीचें जाणणें । कहीं न वचेचि याचेनि आंगणें । हे सादही अंतःकरणें । करवेचिना ॥587॥ तेथ डोळ्यां देखी होआवी । ही गोठीचि कायसया करावी । किंबहुना पूर्वीं । दृष्ट ना श्रुत ॥588॥ तें हें विश्वरूप आपुलें । तुम्हीं मज डोळां दाविलें । तरि माझें मन झालें । हृष्ट देवा ॥589॥ परि आतां ऐसी चाड जीवीं । जे तुजसी गोठी करावी । जवळीक हे भोगावी । आलिंगावासी ॥590॥ ते येचि स्वरूपीं करूं म्हणिजे । तरि कोणे एके मुखेंसी चावळिजे । आणि कोणा खेंव देइजे । तुज लेख नाहीं ॥591॥ म्हणोनि वारियासवें धावणें । न ठके गगना खेंव देणें । जळकेली खेळणें । समुद्रीं केउतें ॥592॥ यालागीं जी देवा । एथिंचें भय उपजतसे जीवा । म्हणोनि येतुला लळा पाळावा । जे पुरे हें आतां ॥593॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : हरिहरादि समस्तां, देवा तूं परम देवता

    अर्थ

    ज्या अमृताच्या थेंबाकरिता कष्ट पडतात, त्या अमृताचा पाऊस आपण चार महिने पाडलात आणि सर्वच पृथ्वी पेरणीस लायक करून तीमध्ये पाभारीच्या प्रत्येक तासात (फणांच्या रेषात) चिंतामणी नावाची रत्ने पेरलीत ॥582॥ महाराज, याप्रमाणे मला आपण कृतकृत्य केलेत. तुम्ही माझे पुष्कळ लाड पुरवलेत आणि जे शंकर आणि ब्रह्मदेव यांनी कानांनी देखील ऐकले नाही, ते तुम्ही मला प्रत्यक्ष दाखविलेत. ॥583॥ मग ते त्यांना (प्रत्यक्ष) पाहावयाची गोष्ट कशाला पाहिजे? ज्यांचे उपनिषदांना दर्शन नाही, अशी आपल्या जीवातील गुह्य गोष्ट तुम्ही माझ्याकरिता उघड केली. ॥584॥ महाराज, कल्पाच्या आरंभापासून तो आजची घटका धरून (एवढ्या काळात) माझे जितके जन्म होऊन गेले, ॥585॥ त्या सर्व जन्मांचा झाडा घेऊन पाहात आहे, पण ही गोष्ट (विश्वरूपाचे दर्शन) ऐकलेली किंवा पाहिलेली आढळतच नाही. ॥586॥ बुद्धीची जाणण्याची शक्ती कधी याच्या (विश्वरूपाच्या) अंगणातसुद्धा येत नाही आणि अंत:करणाला कल्पनासुद्धा करता येत नाही. ॥587॥ अशा स्थितीत डोळ्यांना पाहावयास मिळावे, ही गोष्टच कशाला बोलावयास पाहिजे? फार काय सांगावे? हे पूर्वी कधीही पाहिले नाही अथवा ऐकले नाही, ॥588॥ ते हे आपले विश्वरूप तुम्ही माझ्या डोळ्यांना प्रत्यक्ष दाखवलेत, त्यामुळे देवा, माझे मन आनंदित झाले. ॥589॥ परंतु आता अशी जीवामध्ये इच्छा आहे की, तुझ्याशी गोष्टी कराव्यात आणि तुझे सान्निध्य भोगावे आणि तुला आलिंगन द्यावे. ॥590॥ या सर्व गोष्टी विश्वरूपाबरोबर करू म्हटले, तर अनंत मुखांपैकी कोणत्या एका मुखाबरोबर बोलावे? आणि तुझ्या विश्वरूपी शरीराला मर्यादा नसल्यामुळे कोणाला आलिंगन द्यावे? ॥591॥ एवढ्याकरिता वार्‍याबरोबर पळणे जमणार नाही आणि आकाशाला आलिंगन देणे घडणार नाही व समुद्रामध्ये जलक्रीडा कशी खेळावी? ॥592॥ याकरिता हे श्रीकृष्णा, माझ्या मनात या विश्वरूपाविषयी भय उत्पन्न झाले आहे आणि म्हणूनच एवढा हट्ट पुरवावा की, आपण प्रकट केलेले विश्वरूप आता परत आवरून घ्यावे. ॥593॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : पुत्राचे अपराध, जरी जाहले अगाध

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : पुत्राचे अपराध, जरी जाहले अगाध

    May 27, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : हरिहरादि समस्तां, देवा तूं परम देवता

    May 26, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : ‘कृष्णा’ म्हणोनि हाकारिजे, यादवपणें तूतें लेखिजे

    May 25, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : पुत्राचे अपराध, जरी जाहले अगाध

    By Team AvaantarMay 27, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा तुज विश्वसुहृदातें कहीं । सोयरेपणें न मनूंचि पाहीं । तुज ईश्वरेश्वराचां…

    Dnyaneshwari : हरिहरादि समस्तां, देवा तूं परम देवता

    May 26, 2026

    Dnyaneshwari : ‘कृष्णा’ म्हणोनि हाकारिजे, यादवपणें तूतें लेखिजे

    May 25, 2026

    Dnyaneshwari : परि ऐसिया तूतें स्वामी, कहींच नेणों जी आम्ही

    May 24, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आत्तू… एकमेकांच्या भावविश्वात समरस होणारं नातं

    May 28, 2026

    शंकरने उभारले ज्येष्ठांचे मंदिर… ‘स्नेहमंदिर’!

    May 28, 2026

    Kitchen Tips : नाचणीचे आंबील, आंबा डाळीचे वडे बनविताना…

    May 28, 2026

    Dnyaneshwari : जी कल्पादीलागोनी, आजिची घडी धरुनी

    May 28, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 मे 2026

    May 28, 2026

    दिनूचा वाढदिवस अन् लोढा शेठचा निश्चय

    May 27, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 311
    • अवांतर 187
    • आरोग्य 114
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 434
    • फिल्मी 49
    • फूड काॅर्नर 216
    • मैत्रीण 19
    • ललित 659
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आत्तू… एकमेकांच्या भावविश्वात समरस होणारं नातं

    May 28, 2026

    शंकरने उभारले ज्येष्ठांचे मंदिर… ‘स्नेहमंदिर’!

    May 28, 2026

    Kitchen Tips : नाचणीचे आंबील, आंबा डाळीचे वडे बनविताना…

    May 28, 2026
    Most Popular

    आत्तू… एकमेकांच्या भावविश्वात समरस होणारं नातं

    May 28, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.