Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    भूमिकेत शिरणारे आम्ही अन् सीरियलमध्ये शिरणारे प्रेक्षक!

    May 26, 2026

    Recipe : चटपटीत रावण भात अन् स्वादिष्ट डाळिंबी भात

    May 26, 2026

    Dnyaneshwari : हरिहरादि समस्तां, देवा तूं परम देवता

    May 26, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, May 26
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » भूमिकेत शिरणारे आम्ही अन् सीरियलमध्ये शिरणारे प्रेक्षक!
    फिल्मी

    भूमिकेत शिरणारे आम्ही अन् सीरियलमध्ये शिरणारे प्रेक्षक!

    हर्षा गुप्तेBy हर्षा गुप्तेMay 26, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठी कथा, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, तुझ्या इश्काचा नाद खुळा, पिंगा ग पोरी पिंगा, सीरियलमधील आभासी जग, आभासी जग वास्तव समजणारे, भूमिका खरे मानणारे प्रेक्षक, सीरियलध्ये शिरणारे प्रेक्षक, भूमिका जगणारे कलाकार, प्रेक्षकांचा ससेमिरा, आभासी जग खरे मानणारे, प्रेक्षकांचे सीरियलमध्ये गुंतणे
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.

    काही काही प्रेक्षक कसे असतात माहिती आहे, ते कथेमध्ये विरघळून जातात. ते स्वतः सीन जगतात. त्यावर भाष्य करतात. खूप साऱ्या चर्चा करतात. ते लोक ती सीरियल, त्यातली पात्र जगायला सुरुवात करतात. मी एक सीरियल करत होते ‘तुझ्या इश्काचा नाद खुळा’. मी त्यात तसा वाईटच रोल करत होते. म्हणजे, हीरो माझा मुलगा नसतो तरी, माझी त्याच्यावर जबरदस्ती की, मी सांगेन त्याच मुलीशी लग्न करायचं आणि त्यासाठी मी त्याला छडीने बडवते. मला खरं तर निगेटीव्ह रोल करायला आवडतात. पण हे असं कोणाला माराबिरायला  नाही आवडत. सीन तर केला पण खूप वाईट वाटत होतं… जरी ते खरं नसलं तरी!

    मार्केटमध्ये एक बाई भेटली… मला पाहताच ती वैतागलीच…चेहऱ्यावर स्पष्टच दिसत होतं! म्हणे, “लाज वाटते काहो लोकांच्या मुलाला एवढ मारलंत! कशा बाई आहात? स्वतःच्या मुलांना माराल का असं?” मी कसनुसं हसले आणि सटकले.

    काही दिवसांनी ट्रॅक बदलला म्हणून माझे सीन कमी यायला लागले… आणि काही दिवसांसाठी थांबले. म्हणजे आम्ही हीरोला त्याच्या खऱ्या आईवडिलांकडे पाठवून देतो… बस्स!  मार्केटमध्ये पुन्हा ती बाई दिसली. मी जरा दुर्लक्ष करून सटकायचा प्रयत्न केला, पण तिने मला बघितलं आणि थांबवलंच! वर म्हणते कशी, “काय हो, काढलं ना तुम्हाला सीरियलमधून? हे असं होणारच होतं. लोकांच्या मुलाला मारलं की, त्याची शिक्षा मिळणारच…” मी पुन्हा फक्त हसून पुढे गेले.

    हेही वाचा – हिंदी सीरियलची ऑडिशन अन्…

    दरम्यान कोरोना आला. मुंबईत सुरू असलेल्या सगळ्या सीरियल गुजरातमध्ये स्थलांतरित झाल्या. कमीत कमी लोकांमध्ये काम करावं लागत होतं. त्या सीरियलमध्ये थोडा वेगळा ट्रॅक आला होता. हीरो वर बलात्काराचा खोटा आरोप होतो. त्याला खूप त्रास दिला जातो वगैरे… आणि ती बया माझ्या राशीला पुन्हा आली! जोरातच ओरडली मला… “कशी आई आहेस गं? मुलावर एवढं संकट कोसळलं आहे, अशा वेळी त्याला त्यातून बाहेर पडायला मदत करायची, त्याच्या पाठीशी उभ राहायचं तर मार्केटमध्ये फिरतेयस!”

    आता हसावं, रडावं की पळावं? ती बाई काय माझ्यावर लक्ष ठेऊन असते की काय? बरोब्बर मी मार्केटमध्ये गेले की, ती येऊन टपकते…

    त्यानंतर अलीकडची माझी सीरियल ‘पिंगा ग पोरी पिंगा’ आली. त्यामध्ये मी पारशी रोशन आंटी करत होते. अधून मधून येणारं जाणारं पात्र होतं ते. ती बया माझ्या काही राशीतून जायला तयार नाहीये. पण गेल्या चार-पाच वर्षांत ती बुद्धीने प्रगल्भ झाली असावी. माझ्याशी जरा हसूनच बोलली… “तुमची रोशन आंटी खूप छान आहे हो. पण मिठूवर हल्ला झालाय. कोर्टात केस सुरू आहे. त्या चार मुलींच्या पाठीशी तुम्ही उभं राहायला हवे. पोरी खचून जातील हो!” मी “बरं” म्हणून निघाले. जरा बरं वाटलं की, तिने रस्त्यात गोंधळ नाही घातला!

    हेही वाचा – …अन् व्हॉट्सॲप ग्रुपमधून ‘क्राइम’ने मुक्त केलं!

    नंतर परत भेटली… “प्रेरणाच्या लग्नाला आला नाहीत? काही झालंय का तुमच्यात? त्यानंतर प्रेरणाला किडनॅप केल्यानंतर त्या खवीसाला मारायला मी पण पाहिजे होती,” असेही त्यांचं म्हणणं होतं. त्यांना म्हटलं, “वेळ आहे का तुमच्याकडे?”

    त्यांनी “हो” म्हटल्यावर त्यांना जरा समजावलं… “अहो या सीरियल बघता ना, त्या तेवढ्यापुरत्या बघून सोडून द्यायच्या. आपल्या आयुष्यात त्यांना डोईजड नाही होऊ द्यायचं…”

    “हो” म्हणाल्या त्या.

    पण आता मी सुटले आहे. कारण मी जुनं घर बदललं आहे. त्यामुळे मार्केटमध्ये त्या बाई भेटणार नाहीत. पण हे ‘सीरियल वेडे’ कुठे न कुठे भेटतच राहणार! शेवटी अतिरेकी असलं तरी प्रेमच असतं ते प्रेक्षकांचं!

    Avatar photo
    हर्षा गुप्ते

    मालिका, सिने, नाट्य अभिनेत्री

    Related Posts

    ‘माई’मुळे जुळले मेरठच्या पायलशी स्नेहबंध

    May 4, 2026 फिल्मी

    वास्तव अन् आभासी जगामधली धूसर रेषा!

    April 27, 2026 फिल्मी

    स्वरचैतन्याचा अस्त…

    April 18, 2026 फिल्मी
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फिल्मी

    ‘माई’मुळे जुळले मेरठच्या पायलशी स्नेहबंध

    By हर्षा गुप्तेMay 4, 2026

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. कलर्स हिंदीवर माझी एक सीरियल सुरू…

    वास्तव अन् आभासी जगामधली धूसर रेषा!

    April 27, 2026

    स्वरचैतन्याचा अस्त…

    April 18, 2026

    शेवटची महाराणी!

    April 13, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    भूमिकेत शिरणारे आम्ही अन् सीरियलमध्ये शिरणारे प्रेक्षक!

    May 26, 2026

    Recipe : चटपटीत रावण भात अन् स्वादिष्ट डाळिंबी भात

    May 26, 2026

    Dnyaneshwari : हरिहरादि समस्तां, देवा तूं परम देवता

    May 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 मे 2026

    May 26, 2026

    स्नेहल रेल्वेपुलावरून गडगडत खाली आली…

    May 26, 2026

    …म्हणून मी मरणार नाही!

    May 25, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 309
    • अवांतर 187
    • आरोग्य 113
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 432
    • फिल्मी 49
    • फूड काॅर्नर 214
    • मैत्रीण 19
    • ललित 653
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    भूमिकेत शिरणारे आम्ही अन् सीरियलमध्ये शिरणारे प्रेक्षक!

    May 26, 2026

    Recipe : चटपटीत रावण भात अन् स्वादिष्ट डाळिंबी भात

    May 26, 2026

    Dnyaneshwari : हरिहरादि समस्तां, देवा तूं परम देवता

    May 26, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.