Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : ‘कृष्णा’ म्हणोनि हाकारिजे, यादवपणें तूतें लेखिजे

    May 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 मे 2026

    May 25, 2026

    पार्किंगसाठी पुणेकरांच्या अशाही क्लृप्त्या!

    May 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, May 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : ‘कृष्णा’ म्हणोनि हाकारिजे, यादवपणें तूतें लेखिजे
    अध्यात्म

    Dnyaneshwari : ‘कृष्णा’ म्हणोनि हाकारिजे, यादवपणें तूतें लेखिजे

    Team AvaantarBy Team AvaantarMay 25, 2026Updated:May 25, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Eleven, अकरावा अध्याय, अध्याय अकरावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय अकरावा

    विपायें राउळा येवों । तरि तुझेंनि अंगें मानु पावों । मानिसी तरी जावों । रुसोनि सलगी ॥545॥ पायां लागोनि बुझावणी । तुझां ठायीं शार्ङ्गपाणी । पाहिजे ऐशी करणी । बहु केली आम्हीं ॥546॥ सजणपणाचिया वाटा । तुजपुढें बैसें उफराटा । हा पाडु काय वैकुंठा । परि चुकलों जी ॥547॥ देवेंसि कोलकाठी धरूं । आखाडां झोंबीलोंबी करूं । सारी खेळतां अस्करूं । निकरेंही भांडों ॥548॥ चांग तें उराउरीं मागों । देवासि कीं बुद्धि सांगों । तेवींचि म्हणों काय लागों । तुझें आम्ही ॥549॥ ऐसा अपराधु हा आहे । जो त्रिभुवनीं न समाये । जी नेणेंचि कां पाये । शिवतिले तुझे ॥550॥ देवो बोनयाचां अवसरीं । लोभें कीर आठवण करी । परि माझा निसुग गर्व अवधारीं । जे फुगूनचि बैसें ॥551॥ देवाचिया भोगायतनीं । खेळतां आशंकेना मनीं । जी रिगोनियां शयनीं । सरिसा पहुडें ॥552॥ ‘कृष्णा’ म्हणोनि हाकारिजे । यादवपणें तूतें लेखिजे । आपली आण घालिजे । जातां तुज ॥553॥ मज एकासनीं बैसणें । कां तुझा बोलु न मानणें । हें वोळखीचेनि दाटपणें । बहुत घडलें ॥554॥ म्हणोनि काय काय आतां । निवेदिजेल अनंता । मी राशि आहें समस्तां । अपराधांचि ॥555॥ यालागीं पुढां अथवा पाठीं । जियें राहाटलों बहुवें वोखटीं । तियें मायेचिया परी पोटीं । सामावीं प्रभो ॥556॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसीं रूपें तियें अद्भुतें, आश्चर्यें स्फुरती अनंतें

    अर्थ

    आम्ही केव्हा तुझ्या घरी येत होतो, तेव्हा तू स्वत:च (आमचे आदरातिथ्य करून) आम्हास मान देत होतास आणि जरी तू आम्हास मान देत होतास तरी (सुद्धा) तुझ्याशी अतिपरिचय असल्यामुळे आम्ही उलट तुझ्यावरच रुसून बसत होतो. ॥545॥ देवा, तू पाया पडून आमची समजूत केली पाहिजेस (असा आम्ही हट्ट करीत होतो) आणि या हट्टाप्रमाणे आम्ही तुझ्याशी अनेक गोष्टी केल्या. ॥546॥ मी तुझा जिवलग मित्र या नात्याने तुझ्यापुढे पाठ करून बसत होतो. श्रीकृष्णा, ही काय आमची योग्यता होती! पण महाराज, आम्ही चुकलो. ॥547॥ देवाशी दांडपट्टा खेळत होतो, आखाड्यात देवाशी कुस्ती करीत होतो आणि सोंगट्या खेळताना देवा, धिक्कारून बोलत होतो आणि हातघाईवर येऊन देवाशी भांडत होतो. ॥548॥ जी चांगली वस्तू असेल, ती झटपट मागत होतो. तू देव सर्वज्ञ, पण तुला देखील शहाणपणाच्या गोष्टी सांगत होतो, त्याचप्रमाणे ‘आम्ही तुझे काय लागतो?’ असे म्हणत होतो. ॥549॥ हा अपराध असा आहे की, जो त्रिभुवनातही मावणार नाही; परंतु देवा, मी तुझी शपथ घेऊन सांगतो की, हे अपराध आमच्या हातून नकळत (अज्ञानामुळे) झाले. ॥550॥ जेवणाच्या वेळी देव माझी खरोखर प्रेमाने आठवण करीत असे, पण माझा निर्लज्ज गर्व पाहा की, मी फुगूनच बसत होतो. ॥551॥ देवाच्या अंत:पुरात खेळताना मनात शंका धरीत नव्हतो; इतकेच काय, पण देवा, तुझ्या बिछान्यावर जाऊन तुझ्या शेजारी निजत होतो. ॥552॥ ‘कृष्णा’ म्हणून तुला हाका मारीत होतो. तू एक यादव आहेस, असे तुला समजत होतो आणि तू जाण्यास निघाला असताना तुला आम्ही आपली शपथ घालीत होतो. ॥553॥ मी तुझ्याबरोबर तुझ्याच आसनावर बसत होतो, अथवा तू सांगितलेली गोष्ट मानीत नव्हतो. असल्या गोष्टी अतिपरिचयामुळे पुष्कळ घडल्या. ॥554॥ म्हणून श्रीकृष्णा, आता काय एक म्हणून सांगावे? मी सर्व अपराधांची रास आहे. ॥555॥ म्हणून हे प्रभो, तुझ्या समक्ष अथवा तुझ्या पश्चात ज्या अनेक वाईट गोष्टी माझ्या हातून घडल्या असतील, त्या आई ज्याप्रमाणे मुलाचे सर्व अपराध पोटात घालते, त्याप्रमाणे तू पोटात घालाव्यास. ॥556॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : परि ऐसिया तूतें स्वामी, कहींच नेणों जी आम्ही

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : परि ऐसिया तूतें स्वामी, कहींच नेणों जी आम्ही

    May 24, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : ऐसीं रूपें तियें अद्भुतें, आश्चर्यें स्फुरती अनंतें

    May 23, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : सकळ विश्वजीवन, जीवांसि तूंचि निधान

    May 22, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : परि ऐसिया तूतें स्वामी, कहींच नेणों जी आम्ही

    By Team AvaantarMay 24, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा आघवां अवकाशीं जैसें । अवकाशचि होऊनि आकाश असे । तूं सर्वपणें…

    Dnyaneshwari : ऐसीं रूपें तियें अद्भुतें, आश्चर्यें स्फुरती अनंतें

    May 23, 2026

    Dnyaneshwari : सकळ विश्वजीवन, जीवांसि तूंचि निधान

    May 22, 2026

    Dnyaneshwari : कीर्ती आठवितां वेळोवेळां, भोगितसें महासुखाचा सोहळा

    May 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : ‘कृष्णा’ म्हणोनि हाकारिजे, यादवपणें तूतें लेखिजे

    May 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 मे 2026

    May 25, 2026

    पार्किंगसाठी पुणेकरांच्या अशाही क्लृप्त्या!

    May 24, 2026

    शिवचा हात दरवाजात सापडला अन्…

    May 24, 2026

    अगतिक मातृत्व

    May 24, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 24 ते 30 मे 2026

    May 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 308
    • अवांतर 187
    • आरोग्य 113
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 431
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 213
    • मैत्रीण 19
    • ललित 649
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Dnyaneshwari : ‘कृष्णा’ म्हणोनि हाकारिजे, यादवपणें तूतें लेखिजे

    May 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 मे 2026

    May 25, 2026

    पार्किंगसाठी पुणेकरांच्या अशाही क्लृप्त्या!

    May 24, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    Dnyaneshwari : ‘कृष्णा’ म्हणोनि हाकारिजे, यादवपणें तूतें लेखिजे

    May 25, 2026
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.