Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : ना अर्जुना मी काळु आणि ग्रासिजे तो माझा खेळु

    May 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मे 2026

    May 20, 2026

    Bookshelf : निशाणी डावा अंगठा… आपली फक्त हतबलता!

    May 19, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, May 20
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : ना अर्जुना मी काळु आणि ग्रासिजे तो माझा खेळु
    अध्यात्म

    Dnyaneshwari : ना अर्जुना मी काळु आणि ग्रासिजे तो माझा खेळु

    Team AvaantarBy Team AvaantarMay 20, 2026Updated:May 20, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Eleven, अकरावा अध्याय, अध्याय अकरावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय अकरावा

    मग सत्यलोकौनि गंगाजळ । सुटलिया वाजत खळाळ । तैशी वाचा विशाळ । बोलतां तया ॥483॥ नातरी महामेघांचे उमाळे । घडघडीत एके वेळे । घुमघुमिला मंदराचळें । क्षीराब्धी जैसा ॥484॥ तैसें गंभीरें महानादें । हें वाक्य विश्वकंदें । बोलिलें अगाधें । अनंतरूपें ॥485॥ तें अर्जुनें मोटकें ऐकिलें । आणि सुख कीं भय दुणावलें । हें नेणों परि कापिन्नलें । सर्वांग तयाचें ॥486॥ सखोलपणें वळली मोट । आणि तैसेचि जोडले करसंपुट । वेळोवेळां ललाट । चरणीं ठेवी ॥487॥ तेवींचि कांहीं बोलों जाये । तंव गळा बुजालाचि ठाये । हें सुख कीं भय होये । हें विचारा तुम्ही ॥488॥ परि तेव्हां देवाचेनि बोलें । अर्जुना हें ऐसें जाहलें । मियां पदांवरि देखिलें । श्लोकींचिया ॥489॥ मग तैसाचि भेणभेण । पुढती जोहारूनि चरण । मग म्हणे जी आपण । ऐसें बोलिलेती ॥490॥

    अर्जुन उवाच :- स्थाने हृषीकेश तव प्रकीर्त्या जगत् प्रहृष्यत्यनुरज्यते च ॥
    रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंघाः ॥36॥

    ना अर्जुना मी काळु । आणि ग्रासिजे तो माझा खेळु । हा बोलु कीर अढळु । मानूं आम्ही ॥491॥ परि तुवां जी काळें । आजि स्थितीचिये वेळे । ग्रासिजे हें न मिळे । विचारासी ॥492॥ ऐसेनि आंगींचें तारुण्य मोडावें । कैचें नव्हे तें वार्धक्य काढावें । म्हणोनि करूं म्हणसी ती नव्हे । बहुतकरुनी ॥493॥ हां जी चौपाहारी न भरतां । कोणेही वेळे श्रीअनंता । काय माध्यान्हीं सविता । मावळतु आहे ॥494॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : पृथ्वी सगळीचि गिळूं, आकाश वरिच्यावरि जाळूं

    अर्थ

    मग ज्याप्रमाणे गंगेचे पाणी सत्यलोकापासून सुटले असता सारखे खळखळ वाजत जाते, त्याप्रमाणे तो श्रीकृष्ण बोलत असता गंभीर वाणीचा ओघ खळखळाटाने चालला होता ॥483॥ अथवा मोठमोठ्या मेघांचे लोट एकाच वेळेला उठले असता जसा गडगडाट व्हावा किंवा मंदर नावाच्या पर्वताने क्षीरसमुद्रामध्ये ज्याप्रमाणे मंथनाचा आवाज एकसारखा घुमावा ॥484॥ त्याप्रमाणे अगाध आणि अनंतरूपधारी, विश्वाचे कारण असलेल्या श्रीकृष्णाने गंभीर अशा मोठ्या शब्दाने भाषण केले. ॥485॥ ते अर्जुनाने थोडेसे ऐकले, तोच सुखाचा म्हणा की भीतीचा म्हणा, दुप्पट जोर झाला, कशाचा हे आम्हास माहीत नाही, परंतु एवढे खरे की, त्यामुळे त्याचे सर्व शरीर थरथरा कापावयास लागले. ॥486॥ त्यास झालेले सुख अथवा भय थेट हृदयापर्यंत जाऊन भिडल्यामुळे तो आपल्या पायापर्यंत लवला आणि त्याच झपाट्यात कसे तरी करून त्याने हात जोडले आणि तो आपले मस्तक पुन्हा पुन्हा प्रभूच्या पायावर ठेऊ लागला. ॥487॥ याचप्रमाणे काही बोलण्याचा प्रयत्न करावा, तो त्याचा कंठ भरून राही; हे सुख झाल्याचे लक्षण आहे की भीतीचे आहे, याचा तुम्ही आपल्या मनातच विचार करून निर्णय करा. (असे ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना सांगतात). ॥488॥ परंतु त्यावेळी देवाने केलेले भाषण ऐकून अर्जुनाची अशी ही स्थिती झाली, हे मी श्लोकाच्या वरील ‘भीतभीत: प्रणम्य’ या पदावरून जाणले. ॥489॥ मग तसाच भीत भीत तो पुन्हा श्रीकृष्णाच्या चरणाला नमस्कार करून म्हणाला, महाराज, आपण असे बोललात. ॥490॥

    अर्जुन म्हणाला, हे हृषीकेशा, तुझ्या माहात्म्याने जग हर्ष आणि प्रेम पावते हे योग्यच आहे. भयभीत राक्षस दशदिशांना पळत आहेत. सर्व सिद्धांचे समुदाय तुला वंदन करत आहेत (तेही योग्यच आहे). ॥36॥

    की, ‘अर्जुना, मी सर्वभक्षक काळ आहे आणि सर्वांचा नाश करणे, ही तर माझी लीलाच आहे’, हे जे तुझे बोलणे, ते आम्ही खरोखरच खरे मानू. ॥491॥ परंतु हे परमेश्वरा, आपण जे काळ, त्यांनी आज (स्थितिकाली) पालन करण्याच्या वेळेसच जगाचा संहार करावा, हे माझ्या विचाराला पटत नाही. ॥492॥ शरीरात असलेले तारुण्य कसे नाहीसे करावे आणि नसलेले म्हातारपण कोठून आणावे? (या गोष्टी जर करू म्हटले तर, जशा व्हावयाच्या नाहीत त्याप्रमाणे) जरी तू या स्थितिकाली संहार करू म्हणतोस, तरी ते बहुतकरून होणार नाही. ॥493॥ अहो देवा, चार प्रहर दिवस भरला नसताच कोणत्या तरी वेळी सूर्य मध्यान्ही मावळला आहे काय? ॥494॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : बापा विरुद्ध जें जाहलें, तें उपजतांचि वाघें नेलें

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : बापा विरुद्ध जें जाहलें, तें उपजतांचि वाघें नेलें

    May 19, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : पृथ्वी सगळीचि गिळूं, आकाश वरिच्यावरि जाळूं

    May 18, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : या बोला म्हणे अनंतु, मी कोण हें आहासी पुसतु

    May 17, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : बापा विरुद्ध जें जाहलें, तें उपजतांचि वाघें नेलें

    By Team AvaantarMay 19, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यानपि योधवीरान् । मया…

    Dnyaneshwari : पृथ्वी सगळीचि गिळूं, आकाश वरिच्यावरि जाळूं

    May 18, 2026

    Dnyaneshwari : या बोला म्हणे अनंतु, मी कोण हें आहासी पुसतु

    May 17, 2026

    Dnyaneshwari : अगा आत्मा तूं एकु, सकळविश्वव्यापकु…

    May 16, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : ना अर्जुना मी काळु आणि ग्रासिजे तो माझा खेळु

    May 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मे 2026

    May 20, 2026

    Bookshelf : निशाणी डावा अंगठा… आपली फक्त हतबलता!

    May 19, 2026

    हा खेळ कागदांचा…

    May 19, 2026

    Recipe : खमंग सुरळीच्या वड्या अन् स्वादिष्ट गव्हाचे वडे

    May 19, 2026

    मयासुराची मयसभा

    May 19, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 303
    • अवांतर 186
    • आरोग्य 111
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 425
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 211
    • मैत्रीण 19
    • ललित 637
    • शैक्षणिक 80
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Dnyaneshwari : ना अर्जुना मी काळु आणि ग्रासिजे तो माझा खेळु

    May 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मे 2026

    May 20, 2026

    Bookshelf : निशाणी डावा अंगठा… आपली फक्त हतबलता!

    May 19, 2026
    Most Popular

    Dnyaneshwari : ना अर्जुना मी काळु आणि ग्रासिजे तो माझा खेळु

    May 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.