दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 17 मे 2026; वार : रविवार
- भारतीय सौर : 27 वैशाख शके 1948; तिथि : प्रतिपदा 21:41; नक्षत्र : कृत्तिका 14:32;
- योग : शोभन 06:15, अतिगंड 25:59; करण : किंस्तुघ्न 11:36;
- सूर्य : वृषभ; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 06:04; सूर्यास्त : 19:05;
- पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
करी दिन
पुरुषोत्तम / मल / अधिक ज्येष्ठ मासारंभ
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
रियासतकार गो. स. सरदेसाई
टीम अवांतर
महाराष्ट्रातील थोर व्यासंगी इतिहासकार आणि रियासतकार म्हणून ओळख असणाऱ्या गोविंद सखाराम सरदेसाई यांचा जन्म 17 मे 1865 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील गोविल या गावी झाला. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविदयालयातून ते बी. ए. झाले आणि बडोद्यास सयाजीराव महाराजांकडे दरबारी वाचक-अध्यापक म्हणून नोकरीस लागले. सयाजीरावांबरोबर त्यांना परदेशाचा, विशेषतः युरोपचा प्रवास करण्याची अनेकदा संधी मिळाली. महाराजांनी अध्यापकीय कामाबरोबर त्यांना काही वर्षे हिशोबनीस म्हणूनही काम दिले होते. सरदेसाई यांच्या इतिहासलेखनास बडोद्यात असतानाच प्रारंभ झाला होता.
हेही वाचा – झेंडूचं फुल अन् नीलची बालपणीची ‘स्मृती’
सयाजीरावांना वाचून दाखविणे आणि राजपुत्रांना शिकविणे हे त्यांचे संस्थानी सेवेतील मुख्य काम होते. त्यासाठी ते लेखी टिपणे काढीत. याच टिपणांनी पुढे रियासतींना जन्म दिला. त्यांची प्रथम मुसलमानी रियासत प्रसिद्ध झाली. याबरोबरच त्यांनी मॅकिआव्हेलीचा द प्रिन्स आणि प्राध्यापक सिली यांचा एक्सपान्शन ऑफ इंग्लंड या दोन ग्रंथांचे मराठीत अनुवाद केले. यानंतर इतिहास हेच त्यांचे जीवित कार्य ठरले. इ. स.1000 पासून 1857 पर्यंतचा इतिहास त्यांनी संकलित केला. त्याचे ब्रिटिश आणि मराठी रियासत असे शीर्षक निवडून कालक्रमानुसार विषयवार खंड प्रसिद्ध केले.
रियासती व्यतिरिक्त सरदेसाई यांनी मुलांसाठी इतिहासविषयक तसेच बालोपयोगी भारतवर्ष, महाराष्ट्राचा इतिहास, इतिहासाच्या सोप्या गोष्टी, हिंदुस्थानचा प्राथमिक इतिहास वगैरे पुस्तके लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्रिशतक सांवत्सरिक उत्सवाच्या निमित्ताने त्यांनी शिवाजी सुव्हेनिअर (Shivaji Souvenir) या ग्रंथाचे संपादन केले. त्यामुळे परप्रांतात त्यांची कीर्ती पसरली. गुजरातीत त्यांच्या काही ग्रंथांचे अनुवाद झाले. ब्रिटिश शासनाने 1929मध्ये त्यांच्याकडे पेशवे दप्तराच्या संपादनाचे काम सोपविले. त्यामुळे पेशवे दप्तरातील असंख्य कागदपत्रांतील काही निवडक कागदपत्रांचे 45 खंड प्रसिद्ध झाले.
हेही वाचा – लेखनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ
याशिवाय, सरदेसाई यांनी विविध ज्ञानविस्तार, रत्नाकर, मासिक मनोरंजन, चित्रमयजगत, सह्याद्री, लोकशिक्षण यासारख्या नियतकालिकांतून सुमारे 275 लेख लिहिले. त्यानंतरच्या काळात ‘न्यू हिस्टरी ऑफ द मराठाज्’चे तीन खंड, डॉ. जदुनाथ सरकार यांच्या संपादन-सहकार्याने मेन करंट्स ऑफ मराठा हिस्टरी आणि पूना रेसिडेन्सी कॉरस्पॉडन्सचे पाच खंडदेखील प्रसिद्ध केले.
सरदेसाई यांना अनेक मानसन्मान लाभले. ब्रिटिश शासनाने त्यांना प्रथम रावसाहेब आणि नंतर रावबहादूर हा किताब दिला. राजवाडे संशोधन मंदिराने ‘इतिहास मार्तंड’ ही पदवी आणि सुवर्णपदक देऊन त्यांचा सत्कार केला. पुणे विद्यापीठाने त्यांना सन्मान्य डॉक्टरेट दिली. त्याच वर्षी जयपूर येथील अखिल भारतीय इतिहास परिषदेचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान त्यांना मिळाला. अखेरच्या दिवसांत त्यांनी माझी संसारयात्रा हे आत्मचरित्र लिहिले. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार दिला. 29 नोव्हेंबर 1959 रोजी त्यांचे निधन झाले.
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


