Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    दु:ख विसरायला लावणारे कॅडबरी चॉकलेट

    May 11, 2026

    अजब न्याय… फिर्यादीच ठरला दोषी!

    May 11, 2026

    Dnyaneshwari : पैं अखंड डोळ्यांपुढें, फुटलें जैसें महाभयाचें भांडें

    May 11, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, May 11
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » अजब न्याय… फिर्यादीच ठरला दोषी!
    ललित

    अजब न्याय… फिर्यादीच ठरला दोषी!

    सुधीर करंदीकरBy सुधीर करंदीकरMay 11, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, कथाकहाणी, मी मराठी, अभिजात मराठी, लघुकथा, अजब न्याय, फिर्यादीच ठरला दोषी, महिलेकडून गाडीचा अपघात, महिलेच्या गाडीची शेतकऱ्याला धडक, विडी पिणारा शेतकरी, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान, सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग, शपथेवर खोटी कहाणी रचली, शेतकरी दोषी
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    ही गोष्ट आहे परदेशातली… गावाबाहेरचा मोकळा रस्ता आहे. एक आलिशान कार एक मॅडम चालवत आहेत. गाडी सुसाट वेगाने पळते आहे… गाणी ऐकणे सुरू आहे आणि मोबाइलवर मॅडमचे बोलणे – हसणे पण सुरू आहे. बोलण्याच्या नादात मॅडमकडून अचानक जोरदार करकचून ब्रेक लागतो आणि गाडी रस्त्याच्या एका साइडला जाऊन थांबते. रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या खेड्यामधल्या एकाला हलकीशी धडक बसते. नशिबाने त्या माणसाला अगदीच किरकोळ दुखापत होते आणि एवढ्यावरच अपघात थांबलेला असतो.

    कुठलाही अपघात झाल्यानंतर संबंधिताला नेहमीच आपली चूक कळलेली असते. पण चूक कबूल करणे, माफी मागणे, हे त्या देशामधल्यांच्या रक्तामध्येच नाही. लगेचच मारामारी सुरू होणे, शिवीगाळ करणे, गर्दी जमा होणे,  पोलीस येणे… हेच दृश्य पाहायला मिळते. या अपघातानंतर पण हेच झाले. खेड्यामधले लोक जमा झाले, गाडी चालवणारी स्त्री असल्यामुळे हाणामारी सोडून सगळे सुरू झाले. पोलीस आले. यथावकाश कोर्टामध्ये केस उभी राहिली…

    हेही वाचा – जजने ठोठावली 10 डॉलर्स दंडाची शिक्षा, पण…

    कार चालवणाऱ्या स्त्रीने शहरातल्या मोठ्यात मोठ्या वकिलाला पाचारण केले होते. तिने आणि खेडुतानी धर्मग्रंथावर हात ठेऊन, “फक्त खरे बोलेन, खोटे बोलणार नाही” अशी शपथ घेतली. त्या देशामध्ये त्यावेळेस वकिलांनी आणि जजने पण शपथ घेण्याची पद्धत होती.

    दोन्ही वकिलांनी शपथ घेतली, “कोर्टापुढे खरे काय आहे, ते आणण्याचा आमचा प्रयत्न असेल. केस जिंकणे अथवा हरणे, हे आमच्या करता दुय्यम असणार आहे. न्यायदेवतेची मनापासून सेवा करणे आणि त्याकरिता आपल्या ज्ञानाचा उपयोग करणे, हेच आमचे ब्रीद आहे”.

    नंतर जजनी शपथ घेतली, “या खुर्चीत बसल्यानंतर मी माझ्यामधला ‘मी’ बाजूला काढून ठेवत आहे, माझा निर्णय नि:पक्षपाती असेल आणि सत्याच्या बाजूने राहील.”

    कोर्टाचे कामकाज सुरू झाले…

    स्त्री चालक :  जज साहेब, मी रस्त्यावर व्यवस्थित समोर बघत गाडी चालवत होते. माझा मोबाइल बंद होता. गाडीतली म्युझिक सिस्टीम पण ऑफ होती. मी सीट-बेल्ट पण लावलेला होता. हाच मनुष्य अचानक मधे आल्यामुळे हा अपघात झाला.

    अपघातग्रस्त :  महाराज, मी रस्यावर गेलो नव्हतोच. मी शेतामधले काम संपवून रस्त्याच्या कडेला विडी पित उभा होतो, आणि या बाईंची गाडी माझ्या अंगावर आली.

    अपघातग्रस्ताचे वकील :  युवर ऑनर, पॉइंट टू बी नोटेड. माझा अशील रस्त्याच्या कडेला उभा राहून विडी पित होता आणि त्याच्या अंगावर गाडी आली. कलम नंबर XXX प्रमाणे मॅडमना त्यांच्या चुकीबद्दल दंड झालाच पाहिजे आणि ती रक्कम या गरीब माणसाला औषधपाण्याकरिता मिळायला पाहिजे.

    हेही वाचा – असाही ड्राय-डे! तुम्ही सहमत आहात?

    जज (बाईंच्या वकिलांना उद्देशून) : तुमचे यावर काय म्हणणे आहे?

    स्त्री चालकाचे वकील :  युवर ऑनर, पॉइंट टू बी नोटेड. माझ्या वकील मित्रानेच कोर्टाला दिशा दाखवली आहे.

    जज :  वकीलसाहेब, तुम्ही काय बोलताय हे जरा विस्तार करून सांगा म्हणजे मला पण समजेल आणि सगळ्यांना समजू शकेल.

    स्त्री चालकाचे वकील :  आपल्या देशामध्ये रस्त्यावर किंवा रस्त्याच्या बाजूला उभे राहून, म्हणजे पब्लिक प्लेसमध्ये उभे राहून स्मोकिंग करणे हा गुन्हा आहे आणि कडक शिक्षेला पात्र आहे. रस्त्याच्या बाजूला उभा असलेला माणूस स्मोकिंग करताना बघून, माझ्या अशिलाने चांगल्या बुद्धीने त्याला परावृत्त करण्याकरिता गाडी स्लो करून साईडला घेतली. ‘आता या मॅडम आपल्यावर  रस्त्यावर बिडी पितो आहे, म्हणून ओरडणार’ हे जाणून हा माणूस गडबडला आणि पळणार, एवढ्यात त्याला गाडीचा किरकोळ धक्का लागला. मॅडमची काहीही चूक नव्हती म्हणून मॅडम वरची केस कोर्टानी रद्दबादल करावी आणि या माणसाविरुद्ध पब्लिक प्लेसवर स्मोकिंग केल्याबद्दल वेगळा गुन्हा दाखल करावा, अशी मी कोर्टाला विनंती करतो.

    जज :  वकील साहेब तुमच्या बुद्धीला आम्ही दाद देतो.  प्रथमदर्शनी केस वेगळीच दिसत होती, आणि तुम्ही तिची फोड करून केसचे खरे स्वरूप बाहेर आणले.

    जज :  कोर्टामध्ये उभी केलेली केस बंद करावी, असा कोर्ट निर्णय देत आहे आणि पब्लिक प्लेसमध्ये स्मोकिंग केल्याबद्द्ल या गृहस्थांवर वेगळी केस दाखल करावी, असा कोर्ट निर्णय देत आहे. आजचे कोर्टाचे कामकाज संपले.

    सगळे जण उभे राहतात. तिथल्या रितीरिवाजाप्रमाणे सगळेजण ठराविक प्रार्थना म्हणतात, न्यायदेवतेला नमस्कार करतात आणि एकमेकांशी कुजबुजत बाहेर पडायला लागतात.

    Avatar photo
    सुधीर करंदीकर

    मी पुण्याच्या टाटा मोटर्स मधून 2009मध्ये रिटायर झालो. लिखाणाचा आणि माझा, किंवा वाचनाचा आणि माझा, नोकरीमधून निवृत्त होण्याच्या शेवटच्या काही वर्षांपर्यंत ‘नाही’च्या आसपासच संबंध होता. नोकरीच्या शेवटच्या काळात मात्र ISO 9000 या स्टॅंडर्डच्या निमित्ताने, माहिती नसणाऱ्या आणि जुजबी माहिती असणाऱ्या विषयांवर भरपूर म्हणजे प्रचंड लिखाण करण्याचा योग आला. बहुदा लिखाणाची हीच ‘री’, निवृत्तीनंतर अवांतर लिखाणात सुरू राहिली. लोकसत्ता / सकाळ / महाराष्ट्र टाइम्स / बित्तंमबातमी अशी वर्तमानपत्रे, अभियंता मित्र / प्रज्ज्योत / कजरी / मायभूमी / पुरुष उवाच / मैत्री / अक्षरसिद्धी / सांज / मिळून साऱ्याजणी / विश्वभ्रमंती अशी मासिके यातही लेखन आहेच. माझी मजेशीर लेख आणि अनुभव यांची तीन पुस्तके अमेझॉन वर उपलब्ध आहेत. 1) म्हैस, 2) काही आहे का? काही आहे का? 3) हसती खेळती बायको. वाचकवर्ग वाढतो आहे आणि माझी लिखाणातून आनंदयात्रा मस्त मजेत सुरू आहे. मोबाइल - 9225631100

    Related Posts

    दु:ख विसरायला लावणारे कॅडबरी चॉकलेट

    May 11, 2026 ललित

    लीला आजीचं बोलणं ऐकून आरू आणि शिव दोघेही चिडले

    May 10, 2026 ललित

    प्रसादची हीच ती ‘सखी’!

    May 10, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    दु:ख विसरायला लावणारे कॅडबरी चॉकलेट

    By सतीश बर्वेMay 11, 2026

    आज खूप दिवसांनी आजोबा मैदानावर दिसले. माझं रोजचं चालणं संपवून मी ते बसलेल्या बाकापाशी जाऊन…

    लीला आजीचं बोलणं ऐकून आरू आणि शिव दोघेही चिडले

    May 10, 2026

    प्रसादची हीच ती ‘सखी’!

    May 10, 2026

    वाढत चाललेला गुंता अन्…

    May 9, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    दु:ख विसरायला लावणारे कॅडबरी चॉकलेट

    May 11, 2026

    अजब न्याय… फिर्यादीच ठरला दोषी!

    May 11, 2026

    Dnyaneshwari : पैं अखंड डोळ्यांपुढें, फुटलें जैसें महाभयाचें भांडें

    May 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 मे 2026

    May 11, 2026

    लीला आजीचं बोलणं ऐकून आरू आणि शिव दोघेही चिडले

    May 10, 2026

    90च्या दशकातील अकोल्यातील खाद्यसंस्कृती

    May 10, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 294
    • अवांतर 185
    • आरोग्य 109
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 415
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 205
    • मैत्रीण 18
    • ललित 616
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    दु:ख विसरायला लावणारे कॅडबरी चॉकलेट

    May 11, 2026

    अजब न्याय… फिर्यादीच ठरला दोषी!

    May 11, 2026

    Dnyaneshwari : पैं अखंड डोळ्यांपुढें, फुटलें जैसें महाभयाचें भांडें

    May 11, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    दु:ख विसरायला लावणारे कॅडबरी चॉकलेट

    May 11, 2026
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.