Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026

    Dnyaneshwari : जी लोचना भाग्य उदेलें, जीवा सुखाचें सुयाणें पाहलें

    May 8, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, May 8
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!
    फूड काॅर्नर

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरMay 8, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किचन टीप्स, मी मराठी, अभिजात मराठी, भरडधान्याची इडली, भरडधान्याचे डोसे, मूगडाळ तांदळचे डोसे, बाजरी मूगडाळ तांदळाचे डोसे, बाजरी मूगडाळ तांदळाची इडली, पौष्टिक इडली, पौष्टिक डोसे,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सन 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून भारताने जाहीर केलं, कारण आपल्या कैक पिढ्या याच भरडधान्यावर पोसल्या गेल्या आहेत. भारतात जवळपास सर्वचं राज्यात वेगवेगळ्या प्रकारची भरडधान्य ऋतुमानानुसार आहारात समाविष्ट होत असतात. महाराष्ट्रात तर आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये यांचा रोजच वापर केला जातो. माझ्या घरी मिलेट्स मी मागील पाच वर्षांपासून वापरते आहे. त्यामध्ये फॅाक्सटेल मिलेट्स, लिटील मिलेट्स, बार्नयार्ड मिलेट्स, कोदो मिलेट्स यांचा समावेश आहे. याशिवाय, बाजरी, ज्वारी, भगर, नाचणी, नागली यासारखे मिलेट्स तर आपण नेहमीच वापरत आलेले आहोत. त्यातीलच बाजरी (ज्याला पर्ल मिलेट्स असं म्हणतात) हिरवी मुगाची डाळ किंवा अख्खे मूग, आणि तांदुळ यांचे डोसे आणि इडल्यांची रेसिपी सांगणार आहे. कुठलेही मिलेटस शिजवून खाण्याआधी ते कमीत कमी नऊ तास तरी भिजवायला हवेत, असं मिलेट्स मॅन डॉ. खादरवल्ली सांगतात. मला या मिश्रणाचे डोसे आणि इडल्या करायच्या होत्या. त्याकरिता मी बाजरी नऊ तास आधी भिजत घातली होती.

    हेही वाचा – Recipe : तुपातील तुरीचे दाणे आणि वाणीचा हुरडा!

    साहित्य

    • बाजरी – एक पेला
    • मूगडाळ – पाऊण पेला
    • तांदूळ – एक वाटी
    • जाड पोहे – मुठभर
    • मेथीदाणे – एक टी-स्पून
    • मीठ – चवीनुसार

    (बाजरी वेगळी नऊ तास भिजत घालावी. तर, मूगडाळ, मेथीदाणे आणि तांदूळ एकत्र करून ते सहा ते सात तास भिजत घालावे.)

    कृती

    1. नऊ तासानंतर पाण्यात भिजवलेली बाजरी उपसून कोरड्या कपड्यावर पसरवून वाळवून घ्यावी. नंतर ती मिक्सरमध्ये रवाळ वाटुन घ्यावी.
    2. त्यानंतर मूग डाळ, मेथीदाणे आणि तांदूळही मिक्सरमधून रवाळ वाटावे. ते वाटतानाच त्यामध्ये मुठभर जाड पोहे मिक्स करावेत.
    3. आता बाजरी, मूगडाळ, तांदूळ आणि पोह्याचे मिश्रण एकत्र करावे आणि त्यात चवीनुसार मीठ टाकून ते हाताने चांगले फेटून एकजीव करावे आणि परत हे पीठ आंबवायला चार-पाच तास एखाद्या उबदार जागेवर ठेवून द्यावे.
    4. चार-पाच तासांनी हे मिश्रण छान फुलून येईल. त्यानंतर तुम्हाला वाटलं तर, तुम्ही यामध्ये थोडे इनो घालू शकता. परंतु खाण्याच्या सोड्याचा वापर काही पदार्थांमध्ये गरज असेल तरच करावा. नैसर्गिकरीत्या इडली बॅटरसारखा पदार्थ जितका आंबेल किंवा फुलेल तितकं चांगलं, असं मला वाटतं.
    5. बाजरी आणि मूगडाळीच्या मिश्रणाचे हे इडलीचे पीठ चार-पाच तास आंबवल्यावर ते परत एकदा छान फेटून घेऊन नेहमीप्रमाणे जशा इडल्या करतो, त्याप्रमाणे इडली कुकरमध्ये इडल्या करून घ्याव्यात.
    6. हेच मिश्रण थोडे पाणी घालून सरसरीत करावे आणि त्याचे जाळीदार डोसे करावेत.
    7. हे गरमागरम डोसे आणि मऊ लुसलुशीत इडली नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करावे.

    हेही वाचा – Recipe :  अंबाडीची फुले आणि पुदिन्याची चटणी

    चटणीची रेसिपी

    • अर्धी वाटी ओले खोबरे, तीन ते चार हिरव्या मिरच्या, मूठभर डाळवा, बारीक चिरलेली मुठभर कोथिंबीर, स्वादानुसार पुदिना, तीन ते चार लसूण पाकळ्या, एक टीस्पून जिरे, अर्धी वाटी दही, चवीनुसार मीठ आणि साखर हे एकत्र करून वाटून घ्यावे.
    • त्यानंतर वरून मोहरी, हिंग, लाल सुकी मिरची, कढीपत्ता आणि सात-आठ मेथीदाणे टाकून, अर्धा चमचा उडीद डाळ टाकून चुरचुरीत फोडणी या चटणीला द्यावी.

    टीप्स

    1. बाजरी आणि मूगडाळ तांदळाचे मिश्रण वाटताना खूप जाडसरही ठेवू नये, कारण आपल्याला त्याची इडली फुललेली तसेच स्पंजी हवी आहे. शिवाय, डोसाही जाळीदार हवा आहे.
    2. आपण बाजरी भिजवून, सुकवून आणि मग रवाळ (coarse) वाटतो, तेव्हा पिठात जो दाणेदारपणा येतो, तो इडलीला एक उत्तम ‘Texture’ (पोत) देतो.
    3. बाजरी वाळवून वाटल्यामुळे पिठातील पाण्याचे प्रमाण तुमच्या नियंत्रणात राहते. डाळ-तांदूळ वाटताना लागणारे पाणी आणि हा बाजरीचा रवा जेव्हा एकत्र होतात, तेव्हा पिठाची सुसंगतता (consistency) अगदी योग्य राहते.

    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर किंवा

    9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

    तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    मनात घर करू बसलेली ‘सुशीला’!

    May 4, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गप्पांचा फड, चहाचा कप अन् सोबतीला चटपटीत भडंग!

    May 1, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : प्रोटिनयुक्त मोदक, टेस्टी पिठले, झटपट कटाची आमटी…

    April 30, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    मनात घर करू बसलेली ‘सुशीला’!

    By पराग गोडबोलेMay 4, 2026

    एकदा न्याहारी करायला ऑफिसमधली मंडळी बसलेली असताना मी एकाला विचारलं, “काय आणलंय रे बाबा डब्यात?”…

    Recipe : गप्पांचा फड, चहाचा कप अन् सोबतीला चटपटीत भडंग!

    May 1, 2026

    Kitchen Tips : प्रोटिनयुक्त मोदक, टेस्टी पिठले, झटपट कटाची आमटी…

    April 30, 2026

    Recipe : टोकेर दाल ते आम पोरा… कैरीच्या चवीचे अनोखे बंगाली पैलू!

    April 26, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026

    Dnyaneshwari : जी लोचना भाग्य उदेलें, जीवा सुखाचें सुयाणें पाहलें

    May 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026

    May 8, 2026

    सरकता जिना… दोन भावांच्या प्रगतीचा

    May 7, 2026

    गावात पहिल्यांदाच इन्सुलिनच्या बाटल्या आल्या, पण…

    May 7, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 291
    • अवांतर 185
    • आरोग्य 108
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 411
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 204
    • मैत्रीण 18
    • ललित 609
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026

    Dnyaneshwari : जी लोचना भाग्य उदेलें, जीवा सुखाचें सुयाणें पाहलें

    May 8, 2026
    Most Popular

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.