Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 07 मे 2026

    May 7, 2026

    सहेला रे…

    May 6, 2026

    गणपत अन् 2000 रुपयांची उधारी…

    May 6, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, May 7
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 07 मे 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 07 मे 2026

    Team AvaantarBy Team AvaantarMay 7, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 07 मे 2026; वार : गुरुवार
    • भारतीय सौर : 17 वैशाख शके 1948; तिथि : पंचमी 10:13; नक्षत्र : पूर्वाषाढा 18:44;
    • योग : साध्य 25:58; करण : गरज 23:19;
    • सूर्य : मेष; चंद्र : धनु 25:25; सूर्योदय : 06:08; सूर्यास्त : 19:02;
    • पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक पांडुरंग वामन काणे

    टीम अवांतर

    विख्यात प्राच्यविद्यासंशोधक आणि धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक पांडुरंग वामन काणे यांचा जन्म 7 मे 1880 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात पेढे पर्शराम या गावी झाला. शैक्षणिक जीवनात `भाऊ दाजी पारितोषिक’, `दक्षिणा फेलोशिप’, `झाला वेदान्त पारितोषिक’, `मंडलिक सुवर्णपदक’ (दोनदा) यासारखी अनेक पारितोषिके आणि सन्मान त्यांनी मिळविले. काही काळ रत्नागिरीच्या आणि मुंबईच्या सरकारी विद्यालयांत, तसेच मुंबईच्या एल्फिन्स्टन आणि विल्सन महाविद्यालयांत त्यांनी अध्यापन केले. 1911 पासून मुंबईच्या वरिष्ठ न्यायालयात त्यांनी अनेक वर्षे वकिली केली. हिंदू आणि मुसलमान कायद्यांचा त्यांचा विशेष व्यासंग होता.

    महाराष्ट्राच्या प्राचीन भूगोलाच्या विशेष संशोधनासाठी त्यांना 1915 -1916 या दोन वर्षांसाठी स्प्रिंगर संशोधन शिष्यवृत्ती मिळाली. हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र (1930-1962) हा पंचखंडात्मक आणि साडेसहा हजारांहून अधिक पृष्ठांचा ग्रंथ हे काणे यांच्या प्रदीर्घ कार्याचे आणि व्यासंगाचे फलित होय. हिंदू धर्माच्या पुनर्रचनेच्या मार्गदर्शक तत्त्वांचा वेध घेणे, हा त्यांच्या धर्मशास्त्रसंशोधनाचा एक महत्वाचा हेतू होता. साहित्य अकादमीने या ग्रंथाच्या चौथ्या खंडास पुरस्कार दिला. या ग्रंथास आंतरराष्ट्रीय कीर्तीही लाभली.

    हेही वाचा – गणपत अन् 2000 रुपयांची उधारी…

    हिस्टरी ऑफ संस्कृत पोएटिक्स हा त्यांचा आणखी एक विशेष महत्त्वाचा ग्रंथ. शिवाय पूर्वमीमांसा, शंखलिखिताचे धर्मसूत्र, कात्यायनस्मृति, हिंदू कायद्याचा वैदिक मूलाधार, शंकराचार्यांपूर्वीचे वेदान्त भाष्यकार, विज्ञानेश्वरांचे पूर्वसूरी, कोहलाचे अवशेष, प्राचीन संस्कृत साहित्यातील पहलव आणि पारसिक, तंत्र वार्तिक व धर्मशास्त्रग्रंथ इ. विविध विषयावरील त्यांचे लेखन-संकलन प्रसिध्द झाले. साहित्यदर्पण, कादंबरी, उत्तररामचरित, हर्षचरित, व्यवहारमयूख सारख्या ग्रंथांचे त्यांनी संपादन केले. भारतरामायणकालीन समाजस्थिती आणि धर्मशास्त्रविचार हे त्यांच्या महत्वाच्या मराठी ग्रंथांपैकी होत. कालिदासाच्या धार्मिक आणि तत्वज्ञानविषयाक कल्पना, कालिदासीय ज्योतिष, विदर्भ आणि महाराष्ट्र, कवी भास आणि त्याची नाटके अशा विषयांवरही त्यांनी मराठीतून स्फुट लेखन केले.

    अस्पृश्यता, केशवपनादी अनिष्ट चालींचा त्यांनी निषेधच केला. सकेशा विधवेला पंढरपुरात विठ्ठलपूजेचा अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी वकीलपत्र घेतले होते. आंतरजातीय विवाह, विधवाविवाह, घटस्फोट यांचा त्यांनी सातत्याने पुरस्कार केला. 1946 साली नागपूर येथे भरलेल्या अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेचे ते अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या परिषदांनाही ते भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले (पॅरिस, इस्तंबूल, केब्रिज,). वॉल्टेअर येथे भरलेल्या भारतीय इतिहास परिषदेचे ते अध्यक्ष होते. 1947 ते 1949 या काळात  ते मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरु होते.

    काणे यांचे बरेचसे संशोधनकार्य मुंबईच्या `एशियाटिक सोसायटी’ त झाले. संशोधनकार्यातील विशेष कामगिरीसाठी या संस्थेने आता `काणे सुवर्णपदक’ ठेवले आहे. काणे त्यांना अनेक मानसनमान लाभले. बिटिश सरकारने त्यांना `महामहोपाध्याय’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला होता. अलाहाबाद आणि पुणे विद्यापीठांनी त्यांना डी.लिट्. ही सन्माननीय पदवी दिली. `लंडन स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज’ या संस्थेचे त्यांना सन्माननीय फेलो करण्यात आले. संस्कृत भाषेचे एक मान्यवर विद्वान म्हणून त्यांना राष्ट्रपतींचे प्रशस्तिपत्र देण्यात आले. याशिवाय `भारतरत्न’ हा भारतातील सर्वोच्च बहुमान त्यांना 1963 साली प्रदान करण्यात आला. 18 एप्रिल 1972 रोजी त्यांचे निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – अडकलेली कामे हळूहळू पुढे सरकतील. कार्यालयात तुमची मेहनत दिसून येईल. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे योग्य ठरेल. अनपेक्षित खर्च उद्भवू शकतो. राजकारणात असणाऱ्या जातकांना आदर आणि नवीन स्थान मिळेल. व्यवसायात भागीदारीत काम करणे टाळा; स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. शैक्षणिक क्षेत्रात विषय निवडताना विद्यार्थ्यांनी इतरांच्या प्रभावाखाली येणे टाळावे.

    वृषभ – मनाप्रमाणे आणि घाई न करता सगळ्या गोष्टी होतील. आर्थिक परिस्थिती चांगली असेल, मात्र मोठे खर्च टाळा. पैसे उधार घेऊ नका. आपल्या विरोधकांच्या डावपेचांपासून सावध रहा, त्यांच्या युक्त्यांना बळी पडू नका. संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवाल. एखाद्या जुन्या मित्राशी फोनवर संवाद साधाल. आज आरोग्य सामान्य राहील.

    मिथुन – काहीतरी नवीन शिकण्याची किंवा करण्याची इच्छा होईल. कामाच्या ठिकाणी तुमचे विचार मांडण्याची संधी मिळू शकते. त्यावेळी तुमची संवाद कौशल्ये प्रभावी ठरतील, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आर्थिक परिस्थितीत काहीशी सुधारणा दिसून येईल. मात्र खर्चात संतुलन राखणे आवश्यक आहे. महत्त्वाची माहिती कोणाशीही शेअर करू नका. आज मानसिक ताण घेणे योग्य ठरणार नाही.

    कर्क – आज तुमचे मन थोडे विचलित होईल. घरगुती बाबींचा नको इतका विचार कराल. नोकरीच्या ठिकाणी काम वेळेत पूर्ण होईल, पण तुम्हाला समाधान वाटणार नाही. प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा. मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. नातेसंबंधांमध्ये सरळमार्गी राहा. आज पोटाची आणि झोपेची काळजी घेणे आवश्यक आहे.

    सिंह – आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. तुमच्यावर नवीन जबाबदारी येऊ शकते. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. सामाजिक संपर्क वाढेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांना कठोर परिश्रम करावे लागतात. व्यवसायातील नियोजित दृष्टिकोन नफा मिळवून देईल. तुमचे कौटुंबिक जीवन चांगले राहील. आरोग्य सामान्य असेल.

    कन्या – आज कामाची गती संथ असेल. गोष्टी मार्गी लागतील. मात्र कार्यालयीन राजकारणापासून दूर रहा. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. त्यामुळे बोलण्यावर ताबा ठेवा, कोणी दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्या. आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे. संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवाल. त्यामुळे नात्यांमधील विश्वास वाढेल. पुरेशी विश्रांती घ्या.

    तुळ – आज कामाबाबत गंभीर राहाल. अगदी लहानसहान तपशिलांनाही प्राधान्य द्याल, ज्यामुळे कामाची प्रगती सुरळीत होईल. दिवस आव्हानांनी भरलेला असू शकतो, त्यामुळे कोणताही निर्णय घाईने घेण्याचे टाळा. आर्थिक स्थैर्य टिकून राहील. वैवाहिक समस्यांमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे. घरच्या आघाडीवर सर्व काही आलबेल असेल. जास्त विचार करणे टाळा. आरोग्य उत्तम असेल.

    वृश्चिक – नवीन कल्पना सुचतील. तुम्ही कामात बदल करण्याचा विचार करू शकता. थोडा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. नवीन घर खरेदी करण्याचा विचार प्रत्यक्षात येऊ शकतो. आरोग्य चांगले असेल. नातेसंबंधात स्पष्टपणे बोला. विद्यार्थ्यांनी वेळ वाया घालवण्याऐवजी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

    हेही वाचा – सहेला रे…

    धनु – काम आणि घर या दोन्हीत संतुलन राखणे आवश्यक ठरेल. ऑफिसमध्ये छोट्या गोष्टींचे मोठे स्वरूप घेऊ देऊ नका. कठोर परिश्रमातून तुम्ही स्वतःची वेगळी ओळख निर्माण कराल. सुखसोयी आणि सुविधांमध्ये वाढ होईल. मात्र आर्थिक बाबींकडे लक्ष द्या; खर्च वाढू शकतो. नातेसंबंधांसाठी वेळ द्यावा लागेल. अतिउन्हामुळे थकवा जाणवू शकतो.

    मकर – जे काही साध्य करायचे ठरवाल, ते पूर्ण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न कराल. कामाच्या ठिकाणी त्याचे परिणाम दिसतील. व्यवसायातील तुमच्या योजनांना गती मिळेल. भविष्यासाठी गुंतवणूक करण्यावर लक्ष केंद्रित कराल. उत्पन्नाचे नवीन स्रोत कसे तयार होतील, याकडेही लक्ष द्याल. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होईल. नातेसंबंधांमध्ये मोकळेपणा ठेवा. आरोग्य उत्तम असेल.

    कुंभ – थोडा वेळ रूटीनपेक्षा काहीतरी वेगळे करावेसे वाटेल, कामातून थोडीशी विश्रांती घ्यावीशी वाटेल, पण तुम्हाला काही जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतील. नवीन ओळखींमुळे फायदा होईल. ऑफिसमधील तुमच्या मेहनतीला यश मिळेल. एखादा नवीन प्रकल्प किंवा स्टार्टअप सुरू करण्याच्या दृष्टीने मिटींग घ्याल. आर्थिक व्यवहारांमध्ये संतुलन राखा. नातेसंबंधांमध्ये खेळीमेळीचे वातावरण राहील.

    मीन – आज तुम्ही अधिक जबाबदारीने काम कराल. कामाचा ताण जास्त असेल, पण तुम्ही सर्व काही व्यवस्थित हाताळाल. कोणतीही घाई करू नका. तुम्हाला नवीन कामे हाती घेण्याची प्रेरणा मिळेल. आज तुमचे धैर्य वाढेल. नातलगांच्या पाठिंब्यामुळे मोठे फायदे होण्याची शक्यता आहे. स्वतःच्या आर्थिक बाबींची काळजी घ्या. घरातील वातावरण चांगले राहील. दिवसभराच्या धावपळीने थकवा जाणवू शकतो.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 मे 2026

    May 6, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 05 मे 2026

    May 5, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 मे 2026

    May 4, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 मे 2026

    By Team AvaantarMay 6, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 06 मे 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 16…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 05 मे 2026

    May 5, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 मे 2026

    May 4, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 03 ते 09 मे 2026

    May 3, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 07 मे 2026

    May 7, 2026

    सहेला रे…

    May 6, 2026

    गणपत अन् 2000 रुपयांची उधारी…

    May 6, 2026

    Bookshelf : माझा प्रवास… एखादा सिंह डरकाळी फोडतो, तेव्हा-

    May 6, 2026

    Dnyaneshwari : तूं आदिमध्यांतरहितु, स्वसामर्थ्यें तूं अनंतु

    May 6, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 मे 2026

    May 6, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 289
    • अवांतर 185
    • आरोग्य 107
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 410
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 203
    • मैत्रीण 18
    • ललित 607
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 07 मे 2026

    May 7, 2026

    सहेला रे…

    May 6, 2026

    गणपत अन् 2000 रुपयांची उधारी…

    May 6, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 07 मे 2026

    May 7, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.