दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 03 मे 2026; वार : रविवार
- भारतीय सौर : 13 वैशाख शके 1948; तिथि : द्वितीया 27:01; नक्षत्र : विशाखा 07:09;
- योग : वरियान 22:27; करण : तैतिल 13:53;
- सूर्य : मेष; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:10; सूर्यास्त : 19:00;
- पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128.
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर
टीम अवांतर
ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांचा जन्म 10 मे 1932 रोजी कोल्हापूर येथे झाला. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली आणि तेच त्यांचं कार्यक्षेत्र ठरून गेलं. 1956 साली त्यांचे पहिले गीत आकाशवाणीवर प्रसारित झालं, हे गीत ऐकून प्रसिद्ध संगीतकार वसंत पवार यांनी खेबुडकर यांना पहिले चित्रपटपट गीत लिहिण्याची संधी दिली, त्यामुळे 1960 मध्ये त्यांचं पहिलं चित्रपटगीत ‘मला म्हनतात लवंगी मिरची’ लावणी स्वरूपात प्रेक्षकांसमोर आलं. त्यानंतर अभंगापासून लावणीपर्यंत, प्रेमगीतांपासून बालगीतांपर्यंत आणि शाहिरीपासून लोकगीतांपर्यंत सर्व प्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले.
हेही वाचा – आदिची भेट झाली अन् गौरीला तिचं वळण सापडलं…
खेबुडकरंच्या अजरामर कलाकृतींपैकी एक म्हणजे “पिंजरा” चित्रपटातील गाणी होय. व्ही. शांताराम यांच्या ’पिंजरा’ चित्रपटासाठी खेबूडकरांनी तब्बल 110 गाणी लिहिली… त्यातली 11 गाणी निवडण्यात आली. भालजींपासून यशवंत भालकरांपर्यंत 36 दिग्दर्शक आणि वसंत पवारांपासून शशांक पोवारांपर्यंत 48 संगीतकार आणि सुधीर फडकेंपासून अजित कडकडेंपर्यंत 36 गायकांसमवेत खेबुडकर यांनी काम केले. या अफाट कामांद्वारे अनेक कलाकृतींवर त्यांचा अस्सल गावरान ठसा उमटला.
अगदी बालगीत ते प्रेमगीत, नांदी, पोवाडा, भक्तिगीते, अंगाई गीते, कीर्तन, देशभक्तिपर गीते, गणगौळण, गौरीगीते, वासुदेव गीत, माकडवाला, कोळीगीते, सवाल-जवाब, एकतारी भजन, डोंबाऱ्याचे गीत, कुडबुडा जोशी गीत, वारकरी भजनापर्यंत असा एकही गीताचा प्रकार शिल्लक न ठेवता विपुल अशी रसिकमान्य गाणी त्यांनी लिहिली आहेत.
50-52 वर्षांच्या कारकीर्दीत साडेतीन हजार कविता, पावणेतीन हजार चित्रपट गीते, 25 चित्रपटांच्या पटकथा, संवाद, 50 लघुकथा, पाच नाटके, चार दूरदर्शन मालिका, चार टेलिफिल्म, पाच मालिका गीते इतकी प्रचंड साहित्य निर्मिती त्यांच्या नावावर जमा आहे.
हेही वाचा – घुसमट… मेसेजला श्रीकडून रिप्लायच नाही!
जगदीश खेबुडकर यांना 60 पेक्षा जास्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात राज्य शासनाच्या वतीने 11 वेळा त्यांना सन्मानित केले गेले. याशिवाय गदिमा पुरस्कार, कोल्हापूर भूषण पुरस्कार, साहित्य सम्राट पुरस्कार, रसरंग फाळके पुरस्कार, व्ही. शांताराम स्मृती जीवनगौरव पुरस्कार, शिवाजी सावंत पुरस्कार, बालगंधर्व स्मारक समितीचा बालगंधर्व पुरस्कार, शाहू पुरस्कार, करवीर भूषण पुरस्कार, दूरदर्शन जीवन गौरव पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे राम कदम गौरव पुरस्कार असे अनेक सन्मान त्यांना मिळाले. 3 मे 2011 रोजी कोल्हापूरमध्ये त्यांचे निधन झाले.
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


