नमस्कार!
आज आपल्या ‘वासंतिक ऋतुचर्या’ सीरिजचा सातवा आणि शेवटचा भाग. या संपूर्ण आठवड्यात आपण वसंत ऋतूत निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेले अत्यंत महत्त्वाचे नियम पाहिले. चला तर मग, या संपूर्ण सीरिजचा थोडक्यात सारांश (Recap) पाहूया :
- कफाचा प्रकोप : शिशिर ऋतूत (थंडीत) शरीरात साठलेला ‘कफ’ वसंतातील सूर्याच्या उष्णतेने वितळू लागतो. ज्याप्रमाणे हिमालयातील बर्फ वितळून नद्यांना पूर येतो, तसेच शरीरातील कफ वितळल्याने अग्निमांद्य, सर्दी, खोकला, आळस आणि पचनाचे विकार उद्भवू शकतात.
- योग्य आहार : पचायला हलका आहार घ्यावा. एक वर्ष जुने धान्य, मुगाची डाळ, कोमट पाणी, पाचक मसाले आणि मधाचा (Honey) वापर वाढवावा.
- आहारातील चुका : फ्रीजचे थंड पाणी, आइस्क्रीम, गोड, पचायला जड (मैदा / तळलेले), शिळे अन्न आणि दही खाणे पूर्णपणे टाळावे.
- दिनचर्या : कफ आणि चरबी वाढू नये म्हणून ‘दिवसा झोपणे’ (दिवास्वाप) पूर्णपणे टाळावे. घाम येईपर्यंत नियमित व्यायाम आणि ‘उद्वर्तन’ (उटणे / पावडर मसाज) नक्की करावे.
- ब्रह्मास्त्र (वमन) : दम्याचा (Asthma), ॲलर्जीचा आणि वारंवार सर्दी-खोकल्याचा त्रास मुळापासून घालवण्यासाठी या दिवसांत ‘वासंतिक वमन पंचकर्म’ करून शरीराची शास्त्रोक्त स्वच्छता (Detox) करून घ्यावी.
हेही वाचा – Ayurveda : वसंतातील सामान्य आजार आणि प्रभावी घरगुती उपाय
आरोग्याचा कानमंत्र
ऋतुबदलाच्या काळात वारंवार आजारी पडणे ही सामान्य गोष्ट नाही; ती तुमची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) कमी झाल्याची खूण आहे. या सीरिजमध्ये सांगितलेले छोटे बदल तुमच्या जीवनशैलीत करून पाहा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल.
जर तुम्हाला तुमच्या प्रकृतीनुसार सविस्तर मार्गदर्शन हवे असेल, किंवा ‘वमन पंचकर्मा’विषयी अधिक माहिती हवी असेल, तर क्लिनिकला नक्की भेट द्या.
हा वसंत ऋतू आणि आगामी काळ तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत आरोग्यदायी ठरो, हीच सदिच्छा!
हेही वाचा – Ayurveda : वसंताचे ‘ब्रह्मास्त्र’ – वासंतिक वमन पंचकर्म
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


