Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सार्थ ज्ञानेश्वरी : मोक्षासकट गती, जेथें येती विश्रांती

    September 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 सप्टेंबर 2026

    September 18, 2026

    लग्न – आकड्यांमध्ये अडकलेली भावना!

    September 17, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, September 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली
    ललित

    काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली

    जितेंद्र अभ्यंकरBy जितेंद्र अभ्यंकरApril 21, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, नक्षत्रांचे देणे, नक्षत्रांचे सौंदर्य, तारे-तारकांचे सौंदर्य, तिचे उज्ज्वल भवितव्य, तिच्या मनातलं चांदणं, नजरेसमोर उल्कावर्षाव, पत्रिकेत उत्तम प्रगतीचा योग, तारेतारकांची भाषा,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    त्याकाळी मी जन्मपत्रिकेतील नक्षत्रांच्या स्थितीवरून भविष्याचा अंदाज बांधणाऱ्या ‘नक्षत्र फलज्योतिष’ पद्धतीचा अभ्यास करत होतो. कंपनीत दिवसभर काम करून थकूनभागून बाहेर पडलो की, दूर क्षितिजावर मनोहारी रंगांचा पंखा उघडून संध्याकाळ माझी वाटच पहात असे. मग आपोआपच माझी पावले सरोश कॅन्टीनकडे वळत असत. तिथे प्रशस्त आवारात मांडलेल्या खुर्चीवर रेलून बसल्यावर माझी नजर अथांग, अमर्याद पसरलेल्या आकाशाचा वेध घेत असे. चांदण्यांनी खचाखच भरलेल्या आकाशात आपल्या अंगभूत तेजाने चमकणाऱ्या नक्षत्रांकडे बघताना माझं देहभान हरपून जात असे. बऱ्याच वेळाने मानेला रग लागल्यावरच मी भानावर येत असे…

    माझा जन्मपत्रिकेचा सखोल अभ्यास असल्याची बातमी हळूहळू कंपनीत सर्वत्र पसरली. मग एकेक करून माझे सहकारी, स्टाफ, कामगारवर्ग मला जन्मपत्रिका दाखवू लागले. त्यामुळे माझा फार मोठा मित्रपरिवार तयार झाला. पण माझी अगदी घट्ट मैत्री एकाशीच होती. कंपनी सुटली की, आम्ही सरोश कॅन्टीनमध्ये बसत असू. एमआयडीसीची शान असलेलं सरोश कॅन्टीन म्हणजे गप्पांची मैफल जमवण्याचं हक्काचं ठिकाण आहे. नावात कॅन्टीन असलं तरी, अत्यंत प्रशस्त अशा मोकळ्या जागेत 25 – 30 टेबलं आणि प्रत्येक टेबलाभोवती चार खुर्च्यांचा जामानिमा असतो. काऊंटरवर बसलेला गुबगुबीत इराणी मालक प्रत्येकाचं तोंड भरून हसत स्वागत करत असतो. सरोशची खासियत म्हणजे तिथले शुद्ध शाकाहारी रेशमी कबाब आणि कूर्ग कॉफी. हा कबाब नुसता जिभेवर ठेवला तरी विरघळून जातो. कबाब खाऊन कूर्ग कॉफीचा एक घोट घेतला की, समोर जणू स्वर्गच अवतरल्याचा भास होतो.

    कंपनी सुटली की, माझे पाऊल सरोशकडे आपोआप वळायचे. मित्रासोबत तासनतास गप्पा व्हायच्या. काही अंतरावर आमच्याच कंपनीची ॲडमिन ऑफिसर आणि तिची मैत्रीण बसायच्या. काळ पुढे सरकत होता. एक दिवस मित्राला कलकत्त्याच्या फिलिप्स कंपनीचे अपॉइंटमेंट लेटर आले. तो तिथे जॉईन झाला. मग मी एकटाच बसायला लागलो. निरभ्र आकाश निरखणे, हा माझा आवडता छंद जोपासायला लागलो. असाच एक दिवस आकाशात बघताना मी गुंग झालो होतो. तेवढ्यात मधुर स्वरात एक विचारणा झाली, “मे आय सीट हिअर?” मी दचकून बघितले तर, आमची ॲडमिन ऑफिसर उभी होती. मी लगेच सावरुन तिचे स्वागत केले, “शुअरली, प्लीज हॅव अ सीट.”

    हेही वाचा – झाले मोकळे आकाश…

    ती बसत म्हणाली, ” मैत्रीण रजेवर आहे. मग विचार केला की, तुमच्यासोबत आकाशनिरीक्षण करुयात.” मग हसून पुढे बोलली, “एवढं काय बघता आकाशात?”

    मी एक दीर्घ श्वास घेऊन बोलू लागलो, “निसर्गाच्या प्रत्येक रूपाला आपण स्पर्श करू शकतो, पण आकाश मात्र आपल्याला ‘फील’ करावे लागते. निरभ्र आकाशात पसरलेले टिपूर चांदणे हे या सृष्टीसौंदर्याचा परमोच्च बिंदू आहे. वरवर पाहता चांदणे एकसारखेच दिसते. पण जेव्हा तुम्ही त्याला अंतःकरणापासून साद घालता, तेव्हा ते तुमच्याशी गुजगोष्टी करू लागते. मग तुम्हाला लाजऱ्याबुजऱ्या चांदण्यांची ओळख पटत जाते. त्यांच्यावर अनुरक्त असलेले तेजस्वी तारे तुम्ही ओळखायला लागता. त्यांनाही सुख-दुःखे असतात. म्हणूनच विरहाचे दुःख असह्य होऊन एखादा तारा तुटत असतो. आपण मानव मात्र त्याला धीर देण्याऐवजी त्याच्याकडेच मागणी करतो.”

    माझे बोलणे लक्षपूर्वक ऐकत असताना तिच्या बोलक्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या भावछटा उमटत होत्या… त्या दिवसानंतर रोजच आमच्या गप्पा रंगू लागल्या. तिची मैत्रीण आता दुसऱ्या मुलीसोबत बसू लागली. दिवसांना जणू फुलपाखराचे पंख लागले होते. ती अतिशय बुद्धिमान आणि तितकीच महत्वाकांक्षी देखील होती. तिला जग पाहायचे होते. ती करिअरसाठी कितीही कष्ट करायला तयार होती.

    एके दिवशी ती तिची जन्मपत्रिका मला दाखवायला घेऊन आली. तिची पत्रिका मी हातात घेतली तेव्हा सरोश कॅन्टीनच्या प्रांगणात काळोख दाटायला सुरुवात झाली होती. तिची पत्रिका उघडताच मला असं वाटलं की, जणू काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेलीच बहरल्या आहेत. विधात्याने तिच्या जन्मपत्रिकेला विविध शुभनक्षत्रांचा साज चढवलेला होता. काही काळातच तिला जास्त पगाराची दुसरी नोकरी लागायची शक्यता होती. तिथंही ती फार काळ थांबण्याची शक्यता नव्हती. तिच्या यशाची चढती कमान कायम राहात, ती अतिशय उच्च पदावर पोहोचायची शक्यता होती. काही दिवसांतच माझा अंदाज खरा ठरला…

    त्या दिवशी ती गंभीर चेहऱ्याने येऊन बसली. एक लिफाफा माझ्या हातात दिला आणि म्हणाली, “वाच.”

    मी लिफाफा उघडला. वाचल्यावर लक्षात आलं की, तिची नाशिकच्या गॅब्रिएल स्टील कंपनीत अपॉइंटमेंट झाली आहे. पगार सध्याच्या दुप्पट होता. मी विचारलं, “कधी निघणार आहेस?” ती उदासपणे बोलली, “उद्याच.”

    हेही वाचा – ही वाट एकटीची…

    मी म्हणालो, “लेट अस सेलिब्रेट यार.” मी वेटरला खूण करण्यासाठी हात उंचावला. ती आवेगाने माझा हात धरुन म्हणाली, “बी सीरियस.”

    मी आश्चर्याने विचारलं, “काय झालं?”

    ती माझ्याकडे व्याकुळ नजरेने बघत बोलली, “तिथे मला चांदण्यांच्या गोष्टी कोण सांगणार आहे?” तिचा आवाज कापत होता. ओठ थरथरत होते, डोळ्यांत पाणी तरारलं होतं. मी सुन्न झालो. पण मला या क्षणी स्वतःला सावरणं अत्यावश्यक होतं. तिचं उज्जवल करिअर मला स्पष्ट दिसत होतं. मी तिला म्हणालो, “तू जगाच्या पाठीवर कुठेही गेलीस तरी, हे चांदणं सदैव तुझ्यासोबतच असेल. फक्त तुला तुझ्या मनाची कवाडं उघडी ठेवावी लागतील. तसंही चांदण्यांच्या गोष्टी त्यांच्या तोंडून ऐकण्यातच खरी मजा आहे. तुला यशाचं इतकं उत्तुंग शिखर गाठायचं आहे की, तुला नुसतं हात पुढे करून हे चांदणं कवेत घेता येईल…”

    ती काही क्षण माझ्याकडे बघत राहिली. तिच्या मनातलं चांदणं तिच्या नजरेत मावत नव्हतं. मग सावकाश उठली आणि माझा निरोप घेऊन निघाली.

    मी दूरवर क्षितिजाकडे नजर टाकली आणि स्तिमित झालो. आकाश उजळवून टाकत उल्कावर्षाव सुरू होता. तिला थांबवण्याची माझ्याकडे मागणी करत एक-एक तारा तुटत होता.

    Avatar photo
    जितेंद्र अभ्यंकर

    नाव - जितेंद्र अभ्यंकर गाव - सोलापूर. व्यवसाय - Astrologer मोबाईल नंबर - 8605396156 व्हाॅटसअप नंबर - 8605396156 शिक्षण - इंजिनियर. वैशिष्ट्ये - संपूर्ण स्वतंत्र विचारसरणी , समस्येकडं बघण्याचा समतोल दृष्टिकोन. छंद - समाजमाध्यमांवर व्यक्त होणे व लेखन करणे.

    Related Posts

    लग्न – आकड्यांमध्ये अडकलेली भावना!

    September 17, 2026 ललित

    नातं भाऊ बहिणीचं…

    September 17, 2026 ललित

    उमा महेशरावांवर होती नाराज

    September 17, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    लग्न – आकड्यांमध्ये अडकलेली भावना!

    By तृप्ती देवSeptember 17, 2026

    मुलाच्या लग्नासाठी स्थळं बघायला सुरुवात केली आणि एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश झाला. एकीकडे काही मुलींच्या…

    नातं भाऊ बहिणीचं…

    September 17, 2026

    उमा महेशरावांवर होती नाराज

    September 17, 2026

    आनंदाचे फुगे

    September 17, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सार्थ ज्ञानेश्वरी : मोक्षासकट गती, जेथें येती विश्रांती

    September 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 सप्टेंबर 2026

    September 18, 2026

    लग्न – आकड्यांमध्ये अडकलेली भावना!

    September 17, 2026

    नातं भाऊ बहिणीचं…

    September 17, 2026

    उमा महेशरावांवर होती नाराज

    September 17, 2026

    आनंदाचे फुगे

    September 17, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 439
    • अवांतर 208
    • आरोग्य 147
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 586
    • फिल्मी 68
    • फूड काॅर्नर 255
    • मैत्रीण 29
    • ललित 927
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सार्थ ज्ञानेश्वरी : मोक्षासकट गती, जेथें येती विश्रांती

    September 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 सप्टेंबर 2026

    September 18, 2026

    लग्न – आकड्यांमध्ये अडकलेली भावना!

    September 17, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.