Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    असाही ड्राय-डे! तुम्ही सहमत आहात?

    April 20, 2026

    Dnyaneshwari : तुझें विश्वरूप आकळे, ऐसे जरी जाणसी माझे डोळे

    April 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 एप्रिल 2026

    April 20, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, April 20
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : तुझें विश्वरूप आकळे, ऐसे जरी जाणसी माझे डोळे
    अध्यात्म

    Dnyaneshwari : तुझें विश्वरूप आकळे, ऐसे जरी जाणसी माझे डोळे

    Team AvaantarBy Team AvaantarApril 20, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Eleven, अकरावा अध्याय, अध्याय अकरावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय अकरावा

    जेणें उरीं हाणितलासि पांपरा । तयाचा चरणु वाहासी दातारा । अझुनि वैरियांचिया कलेवरा । विसंबसीना ॥105॥ ऐसा अपकारियां तुझा उपकारु । तूं अपात्रींही परि उदारु । दान मागोनि दारवंटेकरु । जाहलासी बळीचा ॥106॥ तूंतें आराधी ना आयके । होती पुंसा बोलावित कौतुकें । तिये वैकुंठीं तुवां गणिके । सुरवाडु केला ॥107॥ ऐसीं पाहूनि वायाणीं मिषें । लागलासी आपणपें देवों वानिवसें । तो तूं कां अनारिसें । मजलागीं करिसी ॥108॥ हां गां दुभतयाचेनि पवाडें । जे जगाचें फेडी सांकडें । तिये कामधेनूचे पाडे । काय भूकेले ठाती ॥109॥ म्हणोनि मियां जें विनविलें कांहीं । तें देव न दाखविती हें कीर नाहीं । परि देखावयालागीं देईं । पात्रता मज ॥110॥ तुझें विश्वरूप आकळे । ऐसे जरी जाणसी माझे डोळे । तरि आर्तीचे डोहळे । पुरवीं देवा ॥111॥ ऐसी ठायेंठावो विनंती । जंव करूं सरैला सुभद्रापती । तंव तया षड्गुणचक्रवर्ती । साहवेचिना ॥112॥ तो कृपापीयूषसजळु । आणि येरु जवळां आला वर्षाकाळु । नाना कृष्ण कोकिळु । अर्जुन वसंतु ॥113॥ नातरी चंद्रबिंब वाटोळें । देखोनि क्षीरसागर उचंबळे । तैसा दुणेंही वरी प्रेमबळें । उल्लसितु जाहला ॥114॥ मग तिये प्रसन्नतेचेनि आटोपें । गाजोनि म्हणितलें सकृपें । पार्था देख देख उमपें । स्वरूपें माझीं ॥115॥ एकचि विश्वरूप देखावें । ऐसा मनोरथु केला पांडवें । कीं विश्वरूपमय आघवें । करूनि घातलें ॥116॥ बाप उदार देवो अपरिमितु । याचक स्वेच्छा सदोदितु । असे सहस्रवरी देतु । सर्वस्व आपुलें ॥117॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : तुझें विश्वरूपपण आघवें, माझिये दिठीसि गोचर होआवें…

    अर्थ

    हे उदार श्रीकृष्णा, ज्या भृगूने तुझ्या छातीवर लाथ हाणली, त्याच्या पावलांची खूण (भूषण) तू आपल्या छातीवर धारण करतोस. (शंखासूर) शत्रू असूनही तू अजून त्याच्या शरीरास (शंखास) विसंबत नाहीस. ॥105॥ याप्रमाणे तुझ्यावर अपकार करणार्‍या लोकांवर तू उपकार केले आहेस. तू वास्तविक योग्यता नसलेल्यांच्या ठिकाणीही आपले औदार्य दाखवले आहेस. दान मागून घेऊन तू बळीचा द्वारपाल झालास. ॥106॥ ज्या गणिकेने तुला कधी पूजिले नाही, अथवा तुझे गुणवर्णन कधी ऐकले नाही आणि जी मरतेवेळी सहज आपल्या पाळलेल्या राघूस ‘राघोबा राघोबा’ म्हणून हाका मारत होती, त्या गणिकेस तू वैकुंठामध्ये सुख दिलेस. ॥107॥ अशा प्रकारची पोकळ निमिते पाहून अपात्र माणसासही फुकाफुकी निजपद देतोस, असा तो तू मला काही निराळे करशील काय? ॥108॥ जी कामधेनू आपल्या दुभत्याच्या विपुलतेने सगळ्या जनाचे संकट दूर करते, त्या कामधेनूची वासरे भुकेली रहातील काय? ॥109॥ म्हणून मी जी काही विनंती केली, त्याप्रमाणे देव आपले विश्वरूप दाखविणार नाहीत, असे खरोखर नाही, परंतु ते पाहाण्याला लागणारी योग्यता मला द्यावी, ॥110॥ तुझ्या विश्वरूपाचे आकलन होईल, असे माझे डोळे समर्थ आहेत, असे जर तुला वाटत असेल तर हे श्रीकृष्णा, विश्वरूप पाहण्याच्या उत्कंठेचे हे डोहाळे पूर्ण करावेत. ॥111॥ याप्रमाणे जशी पाहिजे तशी त्या वेळेला अर्जुन विनंती करील, तेव्हा ती ऐकून त्या ऐश्वर्यादि सहा गुणांच्या सार्वभौम राजाला धीर धरवला नाही ॥112॥ तो श्रीकृष्ण परमात्मा, कृपारूपी अमृत हेच कोणी जल, त्याने युक्त मेघ होता आणि अर्जुन हा जवळ आलेला पावसाळा होता, अथवा कृष्ण हा कोकिळ असून अर्जुन हा वसंतऋतू होता. ॥113॥ अथवा चंद्राचे पूर्ण बिंब पाहून क्षीरसमुद्राला जसे भरते येते, त्याचप्रमाणे प्रेमाला दुपटीपेक्षा अधिक जोर येऊन श्रीकृष्ण आनंदित झाले. ॥114॥ मग त्या प्रसन्नपणाच्या आवेशात गर्जना करून कृपावंत श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना पाहा, पाहा, ही माझी अनंत स्वरूपे. ॥115॥ एकच विश्वरूप पाहावे, असा मनोरथ अर्जुनाने केला, इतक्यात (देवाने) सर्वच विश्वरूप करून ठेवले. ॥116॥ धन्य श्रीकृष्ण परमात्मा! तो अमर्याद उदार आहे. तो नेहेमी याचकांच्या इच्छेच्या सहस्रपट आपले सर्वस्व देतो. ॥117॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : एऱ्हवीं येकल्या बापियाचिया तृषे, मेघ जगापुरतें काय न वर्षे

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : एऱ्हवीं येकल्या बापियाचिया तृषे, मेघ जगापुरतें काय न वर्षे

    April 19, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : तुझें विश्वरूपपण आघवें, माझिये दिठीसि गोचर होआवें…

    April 18, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : जैसा केरु फिटलिया आभाळीं, दिठी रिगे सूर्यमंडळीं…

    April 17, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : एऱ्हवीं येकल्या बापियाचिया तृषे, मेघ जगापुरतें काय न वर्षे

    By Team AvaantarApril 19, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा आणि जी आर्तीचेनि पडिभरें । आर्तु आपुली ठाकी पैं विसरे ।…

    Dnyaneshwari : तुझें विश्वरूपपण आघवें, माझिये दिठीसि गोचर होआवें…

    April 18, 2026

    Dnyaneshwari : जैसा केरु फिटलिया आभाळीं, दिठी रिगे सूर्यमंडळीं…

    April 17, 2026

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    असाही ड्राय-डे! तुम्ही सहमत आहात?

    April 20, 2026

    Dnyaneshwari : तुझें विश्वरूप आकळे, ऐसे जरी जाणसी माझे डोळे

    April 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 एप्रिल 2026

    April 20, 2026

    आरूने शिवला सियापासून दूर करताच सर्व अवाक् झाले…

    April 19, 2026

    Recipe : पोहे आणि बटाट्याचे टेस्टी पराठे!

    April 19, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 19 ते 25 एप्रिल 2026

    April 19, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 273
    • अवांतर 182
    • आरोग्य 103
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 391
    • फिल्मी 45
    • फूड काॅर्नर 197
    • मैत्रीण 18
    • ललित 564
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    असाही ड्राय-डे! तुम्ही सहमत आहात?

    April 20, 2026

    Dnyaneshwari : तुझें विश्वरूप आकळे, ऐसे जरी जाणसी माझे डोळे

    April 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 एप्रिल 2026

    April 20, 2026
    Most Popular

    असाही ड्राय-डे! तुम्ही सहमत आहात?

    April 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.