Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Recipe : पोहे आणि बटाट्याचे टेस्टी पराठे!

    April 19, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 19 ते 25 एप्रिल 2026

    April 19, 2026

    Dnyaneshwari : एऱ्हवीं येकल्या बापियाचिया तृषे, मेघ जगापुरतें काय न वर्षे

    April 19, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, April 19
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : पोहे आणि बटाट्याचे टेस्टी पराठे!
    फूड काॅर्नर

    Recipe : पोहे आणि बटाट्याचे टेस्टी पराठे!

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरApril 19, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किचन टीप्स, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेख, बटाटे पोह्याचे पराठे, बटाट्याचे पराठे, पोह्याचे पराठे, स्वादिष्ट बटाटे पोह्याचे पराठे, टेस्टी बटाटे पोह्याचे पराठे, पोहे बटाट्याचे पराठे,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पोहे हा प्रकार जवळपास सर्वांच्याच आवडीचा आहे! पोह्यांचे विविध प्रकार महाराष्ट्रात प्रचलित आहेत. अगदी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम तर कांदे पोह्यांशिवाय अपूर्णच आहे! हे समीकरण ठरलेलेच… बटाटे पोहे, मटकीची उसळ पोहे, चण्याचा रस्सा पोहे, दडपे पोहे, नारळाच्या दुधातील पोहे, कोळाते पोहे, चहा पोहे, दूध पोहे, तिखट-मिठाचे पोहे… याशिवाय गोपाळकाला, दिवाळीतील पोह्यांचा चिवडा असे सर्व पदार्थ जाड किंवा पातळ पोह्यांशिवाय अधुरेच नाही का? अशा या पोह्यांचा आज एक नवीन आणि टेस्टी प्रकार म्हणजेचं पोह्यांचे पराठे कसे करतात ते आपण पाहुयात.

    साहित्य

    • पोहे – दीड वाटी
    • बटाटे – 3
    • हिरवी मिरची – 2
    • कोथिंबीर – चिरलेली मूठभर
    • आलं – एक इंच तुकडा
    • धणे पावडर – एक ते दीड टीस्पून
    • जिरे पावडर – एक ते दीड टीस्पून
    • तीळ – 2 टीस्पून
    • ओवा – 2 टीस्पून
    • लाल चिली फ्लेक्स – 2 चमचे
    • हळद – अर्धा चमचा
    • हिंग – चिमूटभर
    • मीठ – चवीनुसार

    हेही वाचा – Recipe : स्वादिष्ट लिटिल मिलेट्स कटलेट्स!

    कृती

    1. प्रथम पोहे चाळणीने चाळून घ्यावे म्हणजे त्यातील कचरा निघून जाईल.
    2. चाळलेल्या पोह्यांचे मिक्सरमध्ये बारीक पीठ करून घ्यावे.
    3. बटाटे सोलून त्याच्या बारीक फोडी कराव्यात आणि त्यामध्ये दोन मिरच्या आणि एक इंच आलं घालून त्याची पेस्ट करून घ्यावी.
    4. नंतर या बटाट्याच्या पेस्टमध्ये पोह्याचे पीठ मिक्स करावे.
    5. पोह्याचे पीठ मिक्स करण्याआधी त्यात धणे- जिरे पावडर, तीळ, लाल चिली फ्लेक्स, हळद, हिंग आणि चवीनुसार मीठ तसेच मूठभर कोथिंबीर घालावी.
    6. बटाट्याची पेस्ट आणि पोह्याचे पीठ हे सर्व मिश्रण तेलाचा हात लावून छान मऊसर मळून घ्यावे आणि दहा मिनिटे मुरू द्यावे.
    7. दहा मिनिटांनंतर या पीठाला परत एकदा छान मळून मऊ करावे आणि तवा तापवून चवदार असे बटाटे-पोह्याचे पराठे करावेत.
    8. हिरव्या मिरचीच्या दह्यातील चटणीसोबत किंवा दही बुंदी रायत्यासोबत हे पराठी सर्व्ह करावेत.

    हेही वाचा – Recipe : तुपातील तुरीचे दाणे आणि वाणीचा हुरडा!

    टीप्स

    • पोह्याचे पराठे करताना वेळोवेळी लागेल तसा पाण्याचा हात लावून हे पीठ मळून घेतले तर हे पराठे छान मऊ होतात व पोळीसारखे टम्म फुगतात देखील.

    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर किंवा

    9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

    तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : उन्हाळा स्पेशल चिवळीची भाजी!

    April 12, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    By माधवी जोशी माहुलकरApril 17, 2026

    भारतीय मसाल्यांचा प्रवास ही एक विस्मयकारक गाथा आहे. या मसाल्यांचा उल्लेख 3000 ते 5000 वर्षांपूर्वीच्या…

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    Recipe : उन्हाळा स्पेशल चिवळीची भाजी!

    April 12, 2026

    Recipe : अशी बनवा खमंग कचोरी!

    April 11, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Recipe : पोहे आणि बटाट्याचे टेस्टी पराठे!

    April 19, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 19 ते 25 एप्रिल 2026

    April 19, 2026

    Dnyaneshwari : एऱ्हवीं येकल्या बापियाचिया तृषे, मेघ जगापुरतें काय न वर्षे

    April 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 एप्रिल 2026

    April 19, 2026

    कसबा पेठेतील वाडा अन् पगडी…

    April 19, 2026

    आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 18, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 272
    • अवांतर 182
    • आरोग्य 103
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 390
    • फिल्मी 45
    • फूड काॅर्नर 197
    • मैत्रीण 18
    • ललित 562
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Recipe : पोहे आणि बटाट्याचे टेस्टी पराठे!

    April 19, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 19 ते 25 एप्रिल 2026

    April 19, 2026

    Dnyaneshwari : एऱ्हवीं येकल्या बापियाचिया तृषे, मेघ जगापुरतें काय न वर्षे

    April 19, 2026
    Most Popular

    Recipe : पोहे आणि बटाट्याचे टेस्टी पराठे!

    April 19, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.