Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली

    April 21, 2026

    Dnyaneshwari : अर्जुना तुवां एक दावा म्हणितलें, आणि तेंचि दावूं तरी काय दाविलें

    April 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 एप्रिल 2026

    April 21, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, April 21
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : एऱ्हवीं येकल्या बापियाचिया तृषे, मेघ जगापुरतें काय न वर्षे
    अध्यात्म

    Dnyaneshwari : एऱ्हवीं येकल्या बापियाचिया तृषे, मेघ जगापुरतें काय न वर्षे

    Team AvaantarBy Team AvaantarApril 19, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Eleven, अकरावा अध्याय, अध्याय अकरावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय अकरावा

    आणि जी आर्तीचेनि पडिभरें । आर्तु आपुली ठाकी पैं विसरे । तान्हेला म्हणे न पुरे । समुद्र मज ॥91॥ ऐसी सचाडपणाचिये भुली । न सांभाळवे समस्या आपुली । यालागीं योग्यता जेवीं माउली । बाळकाची जाणे ॥92॥ तयापरी जनार्दना । विचारिजो माझी संभावना । मग विश्वरूपदर्शना । उपक्रम कीजे ॥93॥ तरी तैसी ते कृपा करा । एऱ्हवीं नव्हे हें म्हणां अवधारा । वायां पंचमालापें बधिरा । सुख केऊतें देणें ॥94॥ एऱ्हवीं येकल्या बापियाचिया तृषे । मेघ जगापुरतें काय न वर्षे । परि जहालीही वृष्टि उपखे । जऱ्ही खडकीं होय ॥95॥ चकोरा चंद्रामृत फावलें । येरा आण वाहुनि काय वारिलें । परि डोळ्यांवीण पाहलें । वाया जाय ॥96॥ म्हणोनि विश्वरूप तूं सहसा । दाविसी हा कीर भरवंसा । कां जे कडाडां आणि गहिंसा- । माजी नित्य नवा तूं कीं ॥97॥ तुझें औदार्य जाणों स्वतंत्र । देतां न म्हणसी पात्रापात्र । पैं कैवल्याऐसें पवित्र । कीं वैरियांही दिधलें ॥98॥ मोक्षु दुराराध्यु कीर होय । परी तोही आराधी तुझे पाय । म्हणोनि धाडिसी तेथ जाय । पाइकु जैसा ॥99॥ तुवां सनकादिकांचेनि मानें । सायुज्यीं सौरसु केला पूतने । जे विषाचेनि स्तनपानें । मारूं आली ॥100॥ हां गा राजसूयाचां सभासदीं । देखतां त्रिभुवनाची मांदी । कैसा शतधा दुर्वादीं । निस्तंजिलासी ॥101॥ ऐशिया अपराधिया शिशुपाळा । आपणपयां ठावो दिधला गोपाळा । आणि उत्तानचरणाचिया बाळा । काय ध्रुवपदीं चाड ॥102॥ तो वना आला याचिलागीं । जे बैसावें पितयाचां उत्संगीं । कीं तो चंद्रसूर्यादिकांपरिस जगीं । श्लाघ्यु केला ॥103॥ ऐसा वनवासिया सकळां । देतां एकचि तूं धसाळा । पुत्रा आळवितां अजामिळा । आपणपें देसी ॥104॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : जैसा केरु फिटलिया आभाळीं, दिठी रिगे सूर्यमंडळीं…

    अर्थ

    महाराज, आणि इच्छा वाढली म्हणजे उत्कंठित मनुष्य आपली योग्यता विसरतो. (ज्याप्रमाणे) फार तहान लागलेल्या मनुष्यास, ‘मला समुद्रही पुरणार नाही’ असे वाटते, ॥91॥ याप्रमाणे तीव्र इच्छेच्या वेडाने मला माझ्या शक्तीचा अंदाज कळत नाही. म्हणून ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाची योग्यता जाणते, ॥92॥ त्याप्रमाणे हे जनार्दना, माझी योग्यता किती आहे, याचा आपण विचार करा आणि मग विश्वरूप दाखविण्यास आरंभ करा. ॥93॥ तरी माझ्या योग्यतेनुरूप कृपा करा. (एरवी माझी विश्वरूप पाहाण्याची योग्यता नसेल तर) तुला विश्वरूप दाखविणे शक्य नाही, असे स्पष्ट सांगा. पाहा, बहिर्‍या मनुष्याला पंचम स्वरातील गायनाने सुख देण्याचा व्यर्थ प्रयत्न करणे, हे कोठचे? ॥94॥ सहज पाहिले तर, मेघ हा एकट्या चातकाची तहान भागवण्याकरिता पर्जन्यवृष्टी करतो, ती वृष्टी जगापुरती होत नाही काय? परंतु तीच पर्जन्यवृष्टी खडकावर झाली तर वृष्टी होऊनसुद्धा व्यर्थ ठरते. ॥95॥ चकोर पक्ष्याला चंद्रामृत प्राप्त झाले, तेच चंद्रामृत इतर प्राण्यांना घेऊ नका, म्हणून शपथ घालून चंद्राने त्यांचे निवारण केले आहे काय? परंतु जसे इतरांस (अमृतसेवनाची) दृष्टी (हातोटी) नसल्यामुळे चंद्रोदय होऊनही तो व्यर्थ जातो. ॥96॥ म्हणून तू विश्वरूप मला एकदम दाखवशील याबद्दलच मला खरोखर खात्री आहे. कारण की जाणत्यांत आणि नेणत्यांत तू नित्य नवा (उदार) आहेस. ॥97॥ तुझा उदारपणा स्वतंत्र आहे. (याचकाच्या इच्छेवर अवलंबून नाही). द्यावयास लागलास म्हणजे, हा योग्य आहे अथवा अयोग्य आहे, अशी निवड तू करीत नाहीस. मोक्षासारखी पवित्र वस्तू, ती तू आपल्या शत्रूंना देखील दिलीस. ॥98॥ खरोखर, मोक्ष हा मिळण्यास फार कठीण आहे; परंतु तो देखील तुझ्याच चरणांची सेवा जो करतो आणि म्हणूनच तू धाडशील तेथे तो चाकराप्रमाणे जातो. ॥99॥ जी पूतना राक्षसी विषाचे स्तनपान करवून तुला मारण्यासाठी तुझ्याकडे आली, त्या पूतनेला तू सनकादिकांच्या बरोबरीने मोक्षाविषयी योग्य केलेस. ॥100॥ अहो, राजसूय यज्ञाच्या सभासदांत त्रिभुवनातील हजारो मंडळी पाहात असताना, शेकडो प्रकारच्या वाईट शब्दांनी (शिशुपालाकडून) तुझा पाणउतारा झाला. ॥101॥ अशा अपराधी शिशुपालाला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी, श्रीकृष्णा तू जागा दिलीस आणि उत्तानपाद राजाच्या मुलाला (ध्रुवाला) अढळपदाची इच्छा होती काय? ॥102॥ तो एवढ्याकरिता रानात आला की, आपण बापाच्या मांडीवर बसावे, परंतु त्याला या लोकामध्ये चंद्रसूर्यादिकांपेक्षाही प्रशंसनीय केलेस. ॥103॥ याप्रमाणे दु:खाने व्यापलेल्या सर्वांना देण्यात सढळ असे, एक तुम्हीच आहात. मुलाला हाक मारीत असता अजामिळाला आपली तद्रूपता दिलीत. ॥104॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : तुझें विश्वरूपपण आघवें, माझिये दिठीसि गोचर होआवें…

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : अर्जुना तुवां एक दावा म्हणितलें, आणि तेंचि दावूं तरी काय दाविलें

    April 21, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : तुझें विश्वरूप आकळे, ऐसे जरी जाणसी माझे डोळे

    April 20, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : तुझें विश्वरूपपण आघवें, माझिये दिठीसि गोचर होआवें…

    April 18, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : अर्जुना तुवां एक दावा म्हणितलें, आणि तेंचि दावूं तरी काय दाविलें

    By Team AvaantarApril 21, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा अहो शेषाचेहि डोळे चोरिले । वेद जयालागीं झकविले । लक्ष्मीयेही परि…

    Dnyaneshwari : तुझें विश्वरूप आकळे, ऐसे जरी जाणसी माझे डोळे

    April 20, 2026

    Dnyaneshwari : तुझें विश्वरूपपण आघवें, माझिये दिठीसि गोचर होआवें…

    April 18, 2026

    Dnyaneshwari : जैसा केरु फिटलिया आभाळीं, दिठी रिगे सूर्यमंडळीं…

    April 17, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली

    April 21, 2026

    Dnyaneshwari : अर्जुना तुवां एक दावा म्हणितलें, आणि तेंचि दावूं तरी काय दाविलें

    April 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 एप्रिल 2026

    April 21, 2026

    …अन् संदीपने स्वतःचा स्वाभिमान वाचवला!

    April 20, 2026

    कर्तव्याने घडतो माणूस…

    April 20, 2026

    लव यू बाबा फॉर एव्हर…!

    April 20, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 274
    • अवांतर 182
    • आरोग्य 103
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 392
    • फिल्मी 45
    • फूड काॅर्नर 197
    • मैत्रीण 18
    • ललित 568
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली

    April 21, 2026

    Dnyaneshwari : अर्जुना तुवां एक दावा म्हणितलें, आणि तेंचि दावूं तरी काय दाविलें

    April 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 एप्रिल 2026

    April 21, 2026
    Most Popular

    काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली

    April 21, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.