Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    तिचा फोन ‘व्यस्त’ आला अन् त्याला संशयपिशाच्चाने ग्रासलं…

    May 20, 2026

    Dnyaneshwari : ना अर्जुना मी काळु आणि ग्रासिजे तो माझा खेळु

    May 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मे 2026

    May 20, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, May 20
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » या डोळ्यांची दोन पाखरे…1
    ललित

    या डोळ्यांची दोन पाखरे…1

    मधुर सुनील कुलकर्णीBy मधुर सुनील कुलकर्णीMarch 28, 2026Updated:May 10, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठीलेख, मराठी साहित्य, मराठी लेख, मी मराठी, अभिजात मराठी, शिक्षकाची कहाणी, मल्हार आभा प्रेमकहाणी, मल्हार इशा स्नेहबंध, मल्हार नेत्रा मैत्री, शिवाजीनगर ते पुणे प्रवास, इशाचे मातृछत्र,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 1

    मी शिवाजीनगरच्या प्लॅटफॉर्मवर आलो आणि 9.55ची लोणावळा लोकल प्लॅटफॉर्मवर आली. मी घाई गडबडीत लोकलमध्ये चढलो. आज घरून निघायला जरा उशीरच झाला. इराला आज शाळेत जायचं नव्हतं. एकतर सकाळी उठल्या उठल्या तिचं रडणं सुरू झालं होतं. इराला मी एका उत्तम शाळेत नर्सरीत प्रवेश घेतला, पण इरा तिथे रमतच नव्हती. रोज शाळेत निघताना कुरकुर असायचीच. आज तर उठायलाच तयार नव्हती. कशीबशी तिची समजूत घालून तिला उठवलं. आईने तिला तयार केलं आणि टिफिन दिला. शाळेच्या बसमध्ये तिला चढवताना, तिचा रडवेला चेहरा बघून माझ्या घशात आवंढा आला. त्या क्षणी वाटलं, नको ही नोकरी, नको ती इराची शाळा! माझं पिल्लू आणि मी दूर कुठेतरी जावं, जिथे फक्त आम्ही दोघेच असू!

    मी लोकलमध्ये चढलो आणि मला एकदम जाणवलं, मला खूप धाप लागलीय. इराची काळजी, रोज लोकलचा प्रवास, नोकरीचा ताण, यामुळे मी सध्या खूप डिप्रेस झालो होतो. नैराश्याच्या गर्तेत खोल खोल जाताना स्वतःला सावरत होतो, इरासाठी, आईसाठी! कारण त्यांना माझा आधार हवा होता. मी सीटवर बसलो आणि खिशातला रुमाल काढून कपाळावरचा घाम पुसायला लागलो. इतक्यात माझ्यासमोर कोणीतरी पाण्याचा ग्लास धरला… “दोन घोट पाणी प्या, बरं वाटेल.” मी वर बघितलं तर एक तरुणी तिच्या वॉटरबॅगमधलं पाणी मला देत होती. मला खरंच त्या क्षणी पाण्याची नितांत गरज होती, घसा कोरडा पडला होता. मी पाणी पिऊन तिच्या हातात ग्लास दिला. तिने वॉटरबॅग तिच्या मोठ्या पर्समध्ये टाकली आणि मला म्हणाली,

    “नाडी बघू का तुमची?”

    मी जरा संकोचून म्हणालो, “छे छे, आय एम ओके. जरा धावत ट्रेनमध्ये चढलो म्हणून धाप लागली.”

    “ठीक आहे.” तिने तिच्या पर्समधून लिंबू सरबताची बाटली काढली आणि मला देत म्हणाली, “थोडं घ्या, घाम खूप आलाय तुम्हाला. याने जरा तरतरी येईल.”

    तिचं ते आर्जव बघून मी मुकाट्याने एक ग्लास सरबत घेतलं. अक्षरशः तहान लागल्यासारखं घटाघटा प्यायलो. खूप शांत वाटलं. तिच्याकडे ग्लास परत देत मी म्हणालो,

    “खूप धन्यवाद! याची गरज होती.”

    “डॉक्टरची नजर, दुसरं काय?” ती हसत म्हणाली.

    “म्हणजे तुम्ही?…”

    “हो, व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहे.”

    तिने लगेच माझं बीपी चेक केलं.

    “लोणावळ्यात असता?” मी तिला विचारलं.

    “नाही, मी पुण्यातच असते… वारजेला! माझं बीएएमएस होऊन वर्ष झालं आहे. लोणावळ्यात डॉक्टर हरकरे आहेत, ते माझ्या वडिलांचे खूप जवळचे मित्र! त्यांच्याकडे काही दिवस अनुभव घेण्यासाठी मी त्यांची असिस्टंट म्हणून मी अप-डाऊन करणार आहे. त्यांचं क्लीनिक 11 ते 2 या वेळेत असतं. आज पहिलाच दिवस आहे.”

    “ओके, मी पब्लिक स्कूलमध्ये गेली सात वर्षे इंग्रजी विषय शिकवतो. रोज अप-डाऊन करतो!”

    मी जरा रिलॅक्स झालो आणि मागे मान टेकून डोळे मिटून घेतले. डोळ्यासमोर सतत इरा येत होती. इवल्याश्या जीवाला हे सगळं भोगावं लागतंय, याचा मला खूप त्रास होत होता. आयुष्याची इतकी स्वप्न रंगवली होती, पण आयुष्याची सुरुवातच उदास करून गेली. जिचा हात हातात घेऊन स्वप्न रंगवली होती, तीच आभा मला अर्ध्यावर सोडून गेली होती. इराला माझ्याकडे सोपवून! आभाला या जगातून जाऊन दीड महिना होत आला होता, पण मला तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही असह्य होत होती. आभाला मी माझ्याशी लग्न करशील का असं, जेव्हा विचारलं तेव्हा ती म्हणाली होती, “तुझ्या जीवनात लख्ख प्रकाश घेऊन येईन. माझं नावच मुळी आभा आहे.”

    पण तिचं वचन तिने पूर्ण केलं नव्हतं. मला आणि इराला अंधारात ठेऊन निघून गेली होती,कधीही परत न येण्यासाठी!…

    हेही वाचा – जाडेपणाबद्दल ओळखणारी रुंजी कॉलेजमध्ये गेली अन्…

    ०००

    आभाला माझ्या मामे बहिणीच्या लग्नात बघितलं आणि बघतच राहिलो. अवखळ सौंदर्य होतं! मोठे तपकिरी डोळे, अपरं नाक आणि दात अगदी शुभ्र मोत्यासारखे! हसली की, टपोऱ्या गारा धरणीवर पडताहेत, असं हसणं! बहिणीकडून आभाची सगळी माहिती काढली. मला तिच्याबरोबर प्रेमप्रकरण करण्यात अजिबात स्वारस्य नव्हतं. खूप आवडली होती, हीच आपली सहचारिणी व्हावी, असं वाटलं. आभात आणि माझ्यात फक्त सहा महिन्यांचं अंतर होतं. मी सहा महिन्यांनी मोठा होतो. मी नुकताच लोणावळ्यात पब्लिक स्कूलमध्ये टीचर म्हणून रुजू झालो होतो. परिस्थितीने आम्ही मध्यमवर्गीय होतो. आभाला मी मागणीच घातली, पण तिच्या आईवडिलांनी लगेच होकार द्यावा, असं माझ्यात काहीच नव्हतं. फक्त दिसायला जरा बरा इतकंच! पण हल्लीच्या मुलींना देखील उच्चशिक्षित, सधन मुलं लाइफ पार्टनर म्हणून हवे असतात. तिच्या आईवडिलांनी नकारच दिला. मी तिथेच विषय संपवला. एक दिवस अचानक आभा दारात उभी!

    “मल्हार, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. आई, पपांना मी माझा निर्णय सांगितला आहे. आता माघार नाही. तू आता पुढचं सगळं ठरव. माझा हात तुझ्या हातात आहे.”

    घरी आईला मी आभाबद्दल सांगितलंच होतं. “तुला आवडली आहे ना! संसार तुला करायचा आहे. पण संसारात दोष पण स्वीकारावे लागतात, हे लक्षात असू द्या.” आई मला पाठिंबा देत म्हणाली. आभाच्या आई-पप्पांना लेकीच्या हट्टापायी माघार घ्यावी लागली.

    मी आणि आभा एकमेकांचे झालो.

    इरा आमच्या आयुष्यात आली आणि सुखाची बरसात झाली. तिचं संगोपन, तिचे लाड यात सुखात न्हाऊन निघत होतो. इराला नुकताच नर्सरीत प्रवेश घेतला होता. पण दैवाला माझं सुख कदाचित मंजूर नव्हतं. आभाला एक दिवस ताप आला आणि टेम्परेचर वाढून तिच्या मस्तकात गेलं. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण अपयश आलं. आभा माझा हात सोडून गेली…

    ०००

    “हॅलो, लोणावळा आलं आहे. ती डॉक्टर मुलगी मला जागे करत म्हणाली. मी माझी बॅग घेतली आणि खाली उतरलो. शाळा स्टेशनच्या जवळच होती म्हणून पायीच जायचो. दिवसभर शाळेत मुलांना शिकवताना मन रमलं. आईचाही फोन येऊन गेला की, इराचा मूड आता छान आहे, त्यामुळे रिलॅक्स झालो…

    परतीच्या प्रवासात त्या डॉक्टर मुलीची अचानक आठवण आली. मी तिचं नाव देखील विचारायचं विसरलो. त्या मुलीने मला खरंतर, मदत केली होती. ती परत भेटेल, अशी वेडी आशा वाटली.

    घरी परतल्यावर दारातच इरा धावत येऊन कडेवर बसली. तिचा स्पर्श झाला की, मला सावरायला जड जात होतं. आभासाठी मन आक्रोश करायचं…

    “इरा, आज शाळेत काय केलंस?”

    तिच्या अर्धवट बोबड्या बोलण्यात मी रंगून गेलो. आई खूप दूर गावाला गेली आहे आणि ती खूप दिवसांनी परत येणार आहे, अशी त्या लहान जीवाची मी समजूत काढली होती. हे सांगून मी सत्य पुढे ढकलत होतो पण ती थोडी मोठी झाल्यावर मला तिला हे सांगणं भाग होतं.

    “मल्हार, आज तुझा चेहरा असा का दिसतो आहे? बरा आहेस ना?”

    “आज लोकलमध्ये चढल्यावर जरा धाप लागली. आमच्या बोगीत एक डॉक्टर मुलगी होती. तिने लगेच बीपी चेक केलं. मला सरबत दिलं. पण तिचं नावच विचारायचं विसरलो बघ.”

    “तुझ्या आणि इराच्या काळजीने मला दिवसभर चैन पडत नाही.”

    आईची अवस्था मी समजू शकत होतो. दहा वर्षांपूर्वी बाबा गेले तेव्हापासून तिचं विश्व मीच होतो आणि आता हे आभाचं दुःख!

    “आई, थोडा वेळ लागेल मला सावरायला.” तिच्या खांद्यावर थोपटत मी म्हणालो.

    रात्री इराला थोपटत असताना अचानक परत ती डॉक्टर मुलगी डोळ्यासमोर आली. मध्यम उंची, मानेवर मोकळे सोडलेले केस, सावळीच होती, पण चेहऱ्यावर प्रचंड गोडवा होता. तिचं नाव विचारायला हवं होतं. मला का चुटपूट लागली होती, कळत नव्हतं.

    हेही वाचा – भार्गवने रुंजीला लग्नासाठी प्रोपज केलं, पण…

    आज इराचा मूड छान होता. आनंदाने शाळेत गेली. आज लवकरच शिवाजीनगरला पोहोचलो. मोबाइल बघत होतो, इतक्यात ती डॉक्टर मुलगी दुरून येताना दिसली. का कुणास ठाऊक पण तिला बघून मला आनंद झाला. मी तिला हात केला, तशी ती चालत माझ्याजवळ आली.

    “हाय! काल तुमचं नाव विचारायचे विसरलो. खूप धन्यवाद कालच्यासाठी!” मी हात जोडत म्हणालो.

    “धन्यवाद कसले? ते माझं कर्तव्यच आहे. कसे आहात? परत काही त्रास झाला का?”

    “नाही, अजिबात नाही. आय एम सॉरी, तुमचं नाव काल विचारलं नाही.”

    “नेत्रा फडणीस.”

    “मी मल्हार देवस्थळी!”

    नेत्रा आणि माझ्यातला परकेपणा काही क्षणातच संपला. खूप दिवसांचे मित्र आहोत, अशा आम्ही गप्पा मारल्या. नेत्रा पण आईवडिलांची एकुलती होती. वडील एका कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होते. आई शिक्षिका होती. तिच्या बोलण्यातून, वागण्यातून तिचे संस्कार कळत होते.

    रोज सकाळी एकाच लोकलमध्ये जात असल्यामुळे माझी आणि नेत्राची घट्ट मैत्री झाली. मी तिला माझ्या घरी यायचं आमंत्रण दिलं. अनपेक्षितपणे तिने पटकन होकार दिला. माझं लग्न झालंय, मला मुलगी आहे, याची मी तिला पूर्ण कल्पना दिली होती. आमच्या घरी आल्यावर तिने आईशी आणि इराशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

    क्रमश:

    Avatar photo
    मधुर सुनील कुलकर्णी

    M A (इंग्लिश) असून पुण्याला वास्तव्य आहे. पाच वर्षांपूर्वी कथालेखनास प्रारंभ केला. त्याआधी अनेक कविता केल्या आहेत. आत्तापर्यंत 60 कथांचे लेखन! 'सिद्धी' हा पहिला कथासंग्रह एप्रिल 2023 मध्ये प्रकाशित झाला. दुसरा कथासंग्रह 'भक्ती!' नोव्हेंबर 2025मध्ये प्रकाशित झाला आहे. 'सिद्धी' या कथासंग्रहास जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत एक आंतराष्ट्रीय द्वितीय पारितोषिक आणि तीन राज्यस्तरीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. 'भक्ती' या कथासंग्रहास चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. काही कथांना प्रथम, द्वितीय आणि उत्तेजनार्थ पुरस्कार लाभले आहेत. याबरोबरच गाण्याची आवड असून पुण्यात स्टेज शो करते. हौशी चित्रकार असून अनेक स्केचेस काढले आहेत.

    Related Posts

    Bookshelf : निशाणी डावा अंगठा… आपली फक्त हतबलता!

    May 19, 2026 ललित

    हा खेळ कागदांचा…

    May 19, 2026 ललित

    मयासुराची मयसभा

    May 19, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    Bookshelf : निशाणी डावा अंगठा… आपली फक्त हतबलता!

    By डॉ. अस्मिता हवालदारMay 19, 2026

    लेखक रमेश इंगळे उत्रादकर यांची ‘निशाणी डावा अंगठा’ ही कादंबरी 2005 साली प्रसिद्ध झाली आणि…

    हा खेळ कागदांचा…

    May 19, 2026

    मयासुराची मयसभा

    May 19, 2026

    ऊन म्हणतयं ‘मी’ अन् पुणेकरांचा ‘श्रेयस्कर’ उतारा!

    May 18, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    तिचा फोन ‘व्यस्त’ आला अन् त्याला संशयपिशाच्चाने ग्रासलं…

    May 20, 2026

    Dnyaneshwari : ना अर्जुना मी काळु आणि ग्रासिजे तो माझा खेळु

    May 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मे 2026

    May 20, 2026

    Bookshelf : निशाणी डावा अंगठा… आपली फक्त हतबलता!

    May 19, 2026

    हा खेळ कागदांचा…

    May 19, 2026

    Recipe : खमंग सुरळीच्या वड्या अन् स्वादिष्ट गव्हाचे वडे

    May 19, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 303
    • अवांतर 186
    • आरोग्य 112
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 425
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 211
    • मैत्रीण 19
    • ललित 637
    • शैक्षणिक 80
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    तिचा फोन ‘व्यस्त’ आला अन् त्याला संशयपिशाच्चाने ग्रासलं…

    May 20, 2026

    Dnyaneshwari : ना अर्जुना मी काळु आणि ग्रासिजे तो माझा खेळु

    May 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मे 2026

    May 20, 2026
    Most Popular

    तिचा फोन ‘व्यस्त’ आला अन् त्याला संशयपिशाच्चाने ग्रासलं…

    May 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.