Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026

    हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!

    April 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, April 11
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » भार्गवने रुंजीला लग्नासाठी प्रोपज केलं, पण…
    ललित

    भार्गवने रुंजीला लग्नासाठी प्रोपज केलं, पण…

    मधुर सुनील कुलकर्णीBy मधुर सुनील कुलकर्णीMarch 21, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठी साहित्य, मराठी लेख, मी मराठी, अभिजात मराठी, रुंजीची कहाणी, कहाणी रुंजीची, अभ्यासात हुशार रुंजी, रुंजीचा देखणेपणा, रुंजीचे सौंदर्य, रुंजी आणि भार्गव, रुंजी भार्गव प्रेम, रुंजी भार्गव प्रेमकथा, रुंजीची प्रेमकथा, भार्गव रुंजीची प्रेमकथा,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 2

    रुंजीला उचलून घेतच भार्गवने दवाखान्याच्या आत आणलं. रिसेप्शनिस्टजवळ फॉर्मलिटिज पूर्ण करून त्याने उमाला फोन लावला. “उमामावशी, भार्गव बोलतोय. रुंजीच्या पायावर स्कूटर पडल्यामुळे मी तिला दवाखान्यात घेऊन आलो आहे. घाबरण्याचे काहीच कारण नाही. डॉक्टर सांगतीलच फ्रॅक्चर असेल तर! तू शांतपणे दवाखान्यात ये. मी आहे इथे!”

    उमा दवाखान्यात पोहोचेपर्यंत अर्धा तास गेला. रुंजीला जवळ घेत उमा म्हणाली, “कशी पडलीस गं? किती वेळा सांगून झालं आहे की, स्कूटर हळू चालवत जा!”

    “मावशी, ती जरा रागात होती ना, म्हणून पडली…” भार्गव रुंजीला चिडवत म्हणाला.

    “आता कसला राग? पेपर वाईट गेला का?”

    “पेपर उत्तम गेलाय गं! पण कुणाचा तरी राग तिने स्कूटरवर काढला आणि ती स्कूटर बिचारी पडली…” भार्गवने रुंजीकडे मिश्किल नजरेने बघितलं. ती त्याच्याकडे रागाने बघत होती.

    “अरे, पण तू तिथे कसा काय पोहोचलास?”

    “मी रस्त्यावरून जात होतो गं, तेवढ्यात गर्दी दिसली म्हणून बघितलं, तर रुंजी पडलेली दिसली…”

    “बरं झालं बाबा! देवासारखा धावलास.”

    रुंजी आता डोळे वटारून भार्गवकडे बघत होती आणि भार्गव गालात हसत होता.

    सोमेश तातडीने अर्धी रजा काढून दवाखान्यात आला. डॉक्टरांनी एक्स रे बघून सांगितलं की, रुजींच्या पायाच्या घोट्याला फ्रॅक्चर झालं आहे. पायाला प्लास्टर घातल्यावर रुंजीला आधार देत उमा, सोमेश घरी जायला निघाले.

    रुंजी गाडीत बसली आणि भार्गवने तिच्याकडे बघितलं. त्याच्या अंगावर रोमांचं आलं. तिच्याकडे बघत त्याच्या मनात विचार आला, ही एवढी गोड कधीपासून झाली? शाळेत आवडायची पण फक्त मैत्रीण म्हणून! रुंजीला भेटायची अनेकदा भार्गवला इच्छा व्हायची, प्रयत्न केला होता, पण तिच्या मनात कुठली शंका नको म्हणून टाळत आला. उमा आणि अनिता अजूनही संपर्कात असल्यामुळे त्याला रुंजीबद्दल सगळं कळत होतं. तिच्या कॉलेजमध्ये जाऊन कित्येकदा तो तिला लांबूनच बघायचा. तिच्याविषयी मनात नाजूक भावना निर्माण व्हायला लागल्या होत्या. पण रुंजीला कसं सांगायचं, हे त्याला कळत नव्हतं. अचानक सिग्नलपाशी दिसली आणि तिच्याशी बोलावसं वाटलं.

    हेही वाचा – जाडेपणाबद्दल ओळखणारी रुंजी कॉलेजमध्ये गेली अन्…

    रुंजीला भेटायला तिच्या घरी आठवड्यातून एक दिवस भार्गव जात होता. तिची औषध संपली तर आणून देणे, रुंजीशी पत्ते, कॅरम खेळणं हे सगळं मनापासून करत होता. रुंजीला देखील भार्गवची सवय व्हायला लागली. शाळेत तिच्याशी तुटक वागणारा भार्गव आणि हा भार्गव, किती फरक होता, असं मनात नकळत यायला लागलं. प्लास्टर लावून महिना होऊन गेला होता. एक दिवस भार्गव एकटा रुंजीच्या खोलीत असताना, तो न राहवून बोलला, “रुंजी,आय लव्ह यू! मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. नो अफेअर, डायरेक्ट शादी. लग्न होईपर्यंत अफेअर चालेल.”

    “शुद्धीवर आहेस का भार्गव? काय वाटेल ते बोलतो आहेस… आणि तुला असं सरळ सरळ बोलायला काहीच कसं वाटलं नाही! माझ्या लठ्ठपणावरून मला सतत चिडवणारा भार्गव, अचानक माझ्या प्रेमात कसा काय पडला? माझ्या सौंदर्याचा तुला मोह पडलाय. पण वरच्या सौंदर्याला भाळणाऱ्या मुलाशी मला लग्न करायचं नाही. प्लीज, गो अवे…”

    “मला सरळच बोलायला आवडतं. तू मनात ठाण मांडून बसली आहेस. जा म्हटलं तरी जात नाहीस, म्हणून आज तुला प्रपोज करायचं ठरवलंच होतं.”

     इतक्यात उमा रुममध्ये आली.

     “भार्गव, आता तू जेवूनच जा. मी अनिताला फोन करते…”

    “नको मावशी, मला आज जरा कामं आहेत. मी एमएस करण्यासाठी जर्मनीला चाललोय. त्याची जरा कामं आहेत. निघतो मी! बाय रुंजी, टेक केअर, गेट वेल सून!” भार्गवने रुंजीला बाय केलं आणि तो खोलीबाहेर पडला.

    “किती गुणी मुलगा आहे भार्गव! शाळेतली ही वांड मुलं, मोठी झाल्यावर किती जबाबदार होतात.”

    रुंजीने उमाकडे बघितलं. तिच्या चेहऱ्यावर भार्गवचं कौतुक ओसंडून वाहत होतं. भार्गव गेल्यावर रुंजीच्या मनाला रुखरुख लागली.

    रुंजीचं प्लास्टर काढलं होतं. घरात हळूहळू चालायला तिने सुरवात केली. दर आठवड्यात येणारा भार्गव, पंधरा दिवस आलाच नव्हता, तेव्हा रुंजीला चुकल्यासारखं वाटत होतं. तिच्या मनात यायला लागलं, मी त्याच्याशी फार कठोर बोलले का? म्हणून तर तो येत नसेल? विचारांनी ती अस्वस्थ झाली. तिने उमाला विचारलं, “आई, भार्गव आला नाही गं खूप दिवसांत!”

    “अग, तो बिझी असेल. त्याला आता जर्मनीला जायचं आहे न! तो जायच्या आधी त्याला एकदा जेवणाचं आमंत्रण देते.”

    रुंजीचा सीएचा निकाल लागला. पहिल्याच प्रयत्नात ती उत्तम मार्क्स मिळवून उत्तीर्ण झाली. सगळ्यांचे सतत अभिनंदनपर फोन येत होते,पण भार्गवचा फोन नव्हता. रुंजीला आतल्या आत रडायला येत होतं. असं का होतंय, ते कळत नव्हतं. एक दिवस उमाने तिला सांगितलं, “रुंजी, माझ्या एका मैत्रिणीने तिच्या मुलासाठी तुला मागणी घातली आहे. ती आणि तिचा मुलगा, उद्या संध्याकाळी आपल्या घरी येत आहेत.”

    रुंजीला धस्स झालं, ती चिडलीच! “आई, कुठली मैत्रीण?”

    “आहे शाळेतली एक! तिला मी सतत तुझ्याबद्दल सांगत असते न!”

    “तू मला न विचारता हे का ठरवलं? माझ्याशी बोलावं, असं वाटलं नाही का तुला?”

    “अग, लगेच लग्न कर म्हणतेय का? एकदा बघून तर घे. कदाचित आवडेल सुद्धा तुला तो!”

    रुंजी अस्वस्थ झाली. तिने खोलीत जाऊन भार्गवला फोन लावला.

    “भार्गव, तू किती दिवसांत आला नाहीस घरी!”

    “ओह रुंजी! व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज… मी जरा बिझी आहे गं! मारतो एक चक्कर कधीतरी. तू ठीक आहेस न? पाय कसा आहे? जॉबचं बघते आहेस न?”

    “हो बघते आहे. एक दोन ठिकाणी अर्ज केला आहे.”

    “गुड, बोलतो नंतर…” भार्गवने अचानक फोन बंद केला आणि रुंजीला रडूच आलं. डोळ्यात पाणी यायला लागलं. भार्गवशी खूप बोलावंसं वाटत होतं, पण तो आता टाळत होता.

    संध्याकाळी आईची मैत्रीण आणि तिचा मुलगा येणार म्हणून रुंजी नाईलाजाने तयार झाली. त्या मुलाला सरळ नकार द्यायचा, हे तिने ठरवलंच होतं. दारावरची बेल वाजली आणि रुंजीला धडधडायला लागलं… नको तो प्रसंग आज आईने आणला, असं वाटलं. आईचा संतापच आला. ती खोलीच्या बाहेर आलीच नाही. पण हे काय? भार्गव आणि अनितामावशीचा आवाज येतोय. बरंच झालं, हे दोघे आले. आता मावशीला थांबवून घेते. रुंजी खोलीच्या बाहेर आली. भार्गवला बघून घशात आवंढा आला… असं का होतंय ते कळत नव्हतं. अनिता रुंजीला जवळ घेत म्हणाली, “असा चेहरा का पडलाय गं तुझा? तब्येत ठीक आहे नं?”

    रुंजी अचानक अनिताच्या गळ्यात पडून रडायला लागली. “मावशी, या आईने कोणालातरी घरी बोलावून ठेवलंय. मला मागणी घातलीय म्हणे! पण मला नाही करायचं गं लग्न त्याच्याशी!”

    “का गं? तुझं मन कुठे गुंतलंय का? मला सांग, मी उमाला समजावते.” अनिता रुंजीचे डोळे पुसत म्हणाली.

    “एकदा बघायला काय हरकत आहे रुंजी? तुझा विचार बदलू शकतो.”

    रुंजीने भार्गवकडे बघितलं तर, तो अगदी शांतपणे पेपर चाळत होता. तिला त्याचा अगदी राग राग आला. त्या दिवशी अगदी लग्नाची मागणी घातली आणि आता मला हवा आहेस तर, माझ्याकडे दुर्लक्ष करतोय. तिला हुंदका आला. इतक्यात आजी आली आणि रुंजीचे डोळे पुसत म्हणाली, “अगं, हाच आहे तो मुलगा! तुला मागणी घालणारा… पसंत आहे का लगेच सांग!”

    रुंजी आलटून पालटून उमा, अनिता, भार्गवकडे बघत होते. तिघेही हसत होते.

    “भार्गव!” रुंजी भार्गवकडे बघत ओरडली.

    “आता सरळ सरळ तुला मागणी घातली तर, तुला ते आवडलं नाही, मग मला हा प्लॅन करावा लागला.”

    अनिता, उमा, आजी आणि भार्गवच्या हसण्यात रुंजी सामील झाली.

    इतक्यात सोमेश ऑफिसमधून आला. “ओहो, लग्न ठरलेलं दिसतंय. चला, आता हॉल बुक करावा लागेल!”

    रुंजीने आश्चर्याने सोमेशकडे बघितलं, “बाबा, तुम्ही सुद्धा यात सामील होता?”

    “म्हणजे काय? असा झकास जावई मला हातचा जाऊ द्यायचा नव्हता.” सोमेश भार्गवच्या पाठीवर थाप मारत म्हणाला.

    “काका, लग्न अजून दोन वर्षं तरी नाही. माझं एमएस झाल्यावर!”

    “ठाऊक आहे रे! सहज गम्मत केली. छान शिक, यशस्वी हो आणि माझ्या लेकीला सुखात ठेव… आणि तुझ्या बाबांना पण आत्ता लगेच इकडे बोलावून घे. आज जोरदार सेलिब्रेशन करू.”

    हेही वाचा – पुरस्कार… एक नवा हुरूप देणारा!

    “हो काका!” भार्गवने आजी, सोमेश आणि उमाला वाकून नमस्कार केला. रुंजी पण अनिताच्या पाया पडली.

    भार्गवला जर्मनीला जायला दोन दिवस उरले होते. आता भार्गवचा एक क्षणही विरह रुंजीला नकोसा झाला. एका भावूक क्षणी तिचे डोळे भरून यायला लागले.

    “ए रुंजी, करंजी…”

    “भार्गव…” रुंजीने डोळे मोठे केले.

    “अगं म्हणजे, नाजूक कंगोरे असलेल्या करंजीसारखी माझी रुंजी!”

    “भार्गव, आता असं वाटतंय की, तू सतत माझ्या नजरेसमोर हवा.”

    “दोन वर्षं थांब! मग बघ, तुला कसा घट्ट धरून ठेवतो.”

    “कशी जातील रे ही दोन वर्षं? किती मोठा विरह!”

    “रुंजी, विरहाने प्रेम जास्त वाढतं, फुलतं असं म्हणतात. मला तुला दोन वर्षांनी अशीच फुललेली बघायची आहे. पण फुलासारखी हं! करंजीसारखी फुललेली नाही.”

    “भार्गव!” रुंजी हसत त्याला बिलगली. भार्गवने दोन्ही हातांनी तिला घट्ट मिठीत घेतले… दोन वर्षांच्या विरहाचं प्रेम, उत्कट प्रीती… रुंजी तिच्या रोमारोमात भरून घेत होती…

    समाप्त


     

    Avatar photo
    मधुर सुनील कुलकर्णी

    M A (इंग्लिश) असून पुण्याला वास्तव्य आहे. पाच वर्षांपूर्वी कथालेखनास प्रारंभ केला. त्याआधी अनेक कविता केल्या आहेत. आत्तापर्यंत 60 कथांचे लेखन! 'सिद्धी' हा पहिला कथासंग्रह एप्रिल 2023 मध्ये प्रकाशित झाला. दुसरा कथासंग्रह 'भक्ती!' नोव्हेंबर 2025मध्ये प्रकाशित झाला आहे. 'सिद्धी' या कथासंग्रहास जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत एक आंतराष्ट्रीय द्वितीय पारितोषिक आणि तीन राज्यस्तरीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. 'भक्ती' या कथासंग्रहास चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. काही कथांना प्रथम, द्वितीय आणि उत्तेजनार्थ पुरस्कार लाभले आहेत. याबरोबरच गाण्याची आवड असून पुण्यात स्टेज शो करते. हौशी चित्रकार असून अनेक स्केचेस काढले आहेत.

    Related Posts

    आराध्या तन्वीसह मोठ्या कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी गेली खरी…

    April 10, 2026 ललित

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026 ललित

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    आराध्या तन्वीसह मोठ्या कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी गेली खरी…

    By प्रणाली वैद्यApril 10, 2026

    भाग – 20 “आई, मला बोलावणं आलंय एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यूला जायला!” ती उत्साहाने ओरडली.…

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    समाजात मिसळलो तरच… रवीला मिळाला धडा!

    April 9, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026

    हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!

    April 10, 2026

    आराध्या तन्वीसह मोठ्या कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी गेली खरी…

    April 10, 2026

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 264
    • अवांतर 180
    • आरोग्य 99
    • थर्ड अंपायर 2
    • पंचांग आणि भविष्य 380
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 192
    • मैत्रीण 18
    • ललित 547
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेक... आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    - मनोज शरद जोशी
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026

    हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!

    April 10, 2026
    Most Popular

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.