Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आजचे पंचांग आणि दिनविशेष : 18 जून 2025
    वास्तू आणि वेध

    आजचे पंचांग आणि दिनविशेष : 18 जून 2025

    Team AvaantarBy Team AvaantarJune 18, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

     

    आज, भारतीय सौर : 28 ज्येष्ठ शके 1947

    अर्थात,

    दिनांक : 18 जून 2025, वार : बुधवार

    तिथि : सप्तमी 13:34, नक्षत्र : पूर्वा भाद्रपदा 24:22, योग : प्रीति 07:39, करण : बालव 24:48

    सूर्य : मिथुन, चंद्र : कुंभ 18:34

    सूर्योदय : 06:01, सूर्यास्त : 19:17

    पक्ष : कृष्ण, मास : ज्येष्ठ, ऋतू : ग्रीष्म

    सूर्य अयन : उत्तरायण

    संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127


    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – व्यावसायिक जीवनात सकारात्मक बदल होतील. नोकरदारांसाठी आजचा दिवस खास असेल. कार्यालयातील आव्हानात्मक कामे हाताळण्यासाठी वरिष्ठांची मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका. उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील.

    वृषभ – आधी केलेल्या मेहनतीचे फळ आज मिळणार आहे. व्यवसायात यश मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न फायदेशीर ठरतील. आर्थिक बाबींमध्ये अजिबात जोखीम घेऊ नका. खर्चाच्या सवयींवर लक्ष ठेवा. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.

    मिथुन – आर्थिक बाबींवर थोडे लक्ष द्या. खर्चावर थोडे नियंत्रण ठेवा. सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. नात्यांमध्ये चढ-उतार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयम बाळगा. आरोग्याची विशेष काळजी घ्या.

    कर्क – व्यावसायिक जीवनात वातावरण अनुकूल असेल. उत्पन्न वाढवण्याच्या नव्या संधी मिळतील. नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्यासाठी दिवस चांगला आहे. कामाचा जास्त ताण घेऊ नका. प्रत्येक क्षेत्रात नशीब साथ देईल त्यामुळे यशही मिळेल.

    सिंह – उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन पर्याय उपलब्ध होतील. कठोर परिश्रम आणि समर्पणाने केलेले काम उत्कृष्ट परिणाम देईल. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी असाल. व्यवसायाशी संबंधित प्रवासाच्या संधी मिळतील. सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल.

    कन्या – आर्थिक स्थिती सुधारेल. आरोग्यावर लक्ष केंद्रित करा. व्यावसायिक जीवनात कौशल्य दाखवण्यासाठी तयार रहा. यामुळे करिअर प्रगतीची शक्यता निर्माण होईल. मालमत्तेत हुशारीने गुंतवणूक करा. घरात एखादे शुभ कार्य ठरण्याची शक्यता आहे.

    तुळ – जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. पैशांचा ओघ वाढेल दुसरीकडे व्यावसायिक जीवनात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कामात विलंब होईल. मालमत्तेशी संबंधित वाद मिटवण्यासाठी उत्तम दिवस आहे.

    वृश्चिक – आर्थिक बाबींमध्ये नशीब साथ देईल. व्यावसायिक जीवनातील वातावरण अनुकूल असेल. नवीन जबाबदाऱ्या सोपविण्यात येतील. यामुळे करिअरच्या दृष्टीने अनेक सुवर्ण संधी उपलब्ध होतील. नाविन्यपूर्ण कल्पना आणि सर्जनशीलतेने केलेले काम यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त चांगले परिणाम दिसतील.

    धनु – आर्थिक बाबींवर लक्ष देण्याची गरज आहे. दैनंदिन कामातून थोडासा मोकळा वेळ कुटुंब आणि मुलांसोबत घालवा. नवीन मालमत्ता खरेदी करण्याची योजना काही जातक आखू शकतात. समाजात आदर वाढेल. आरोग्यात सुधारणा होईल.

    मकर – नशीबाची जोरदार साथ मिळेल. व्यावसायिकांसाठी खूप व्यग्र वेळापत्रक असेल. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील. आर्थिक स्थिती सुधारेल. मात्र, घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. सामाजिक कार्यात काही जातक सहभागी होतील.

    कुंभ – दिवस अतिशय शुभ ठरणार आहे. गुंतवणुकीचे अनेक चांगले पर्याय उपलब्ध होतील. कार्यालयात उत्तम कामगिरी दाखवाल. जे कुटुंबापासून दूर राहतात, त्यांचे पालक आज भेटायला येतील. त्यामुळे कुटुंबासमवेत एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल.

    मीन – कामात अजिबात निष्काळजीपणा करू नका. व्यावसायिक जीवनात मोठे बदल होतील. पैशांशी संबंधित समस्या दूर होतील. मात्र आर्थिक बाबींमध्ये कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. व्यावसायिक करारावर स्वाक्षरी करताना सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.


    दिनविशेष

    आहारतज्ज्ञ डॉ. कमला सोहोनी

    केंब्रिज विद्यापीठातून पीएचडी पदवी मिळविणार्‍या पहिल्या भारतीय विदुषी, पहिल्या भारतीय महिला जीवरसायनशास्त्रज्ञ आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या आहारतज्ज्ञ डॉ. कमला सोहोनी यांचा जन्म 18 जून 1911 रोजी पंढरपूर येथे झाला. इंदूर येथे त्यांचे सुरुवातीचे शिक्षण झाले.‌‌ पुढे 1933 साली मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विषयाची पदवी त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. ही पदवी मिळवणाऱ्या देखील त्या देशातील पहिल्या महिला होत्या. कडधान्य तसेच विविध प्राण्यांचे‌ दूध यात असणाऱ्या प्रथिनांवर श्रीनिवासय्या या तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केलेले संशोधन मुंबई विद्यापीठाला सादर केले आणि 1936 साली एम.‌एस्सी. पदवी मिळवली. 1937 साली मुंबई विद्यापीठाच्या ‘स्प्रिंगर रिसर्च स्कॉलरशिप’ तसेच ‘सर मंगळदास नथूभाई फॉरिन एज्युकेशन स्कॉलरशिप’ अशा दोन शिष्यवृत्त्या त्यांना मिळाल्या. त्यामुळे पुढील उच्च शिक्षणाकरिता त्या  इंग्लंडला रवाना झाल्या. वनस्पती कोषिकांवर संशोधन सुरू असतानाच त्यांना ‘सायटोक्रोम-सी’चा शोध लागला. याच संशोधनामुळे त्यांना 1939 साली केंब्रिज विद्यापीठातून पीएच. डी. प्रदान करण्यात आली. भारतात परत आल्यावर सरकारच्या ‘न्यूट्रिशन रिसर्च लॅबोरेटरी’ या आहारशास्त्रात संशोधन करणार्‍या संस्थेत सहायक संचालिका म्हणून त्यांची नेमणूक झाली. इथेच त्यांनी पोषणशास्त्रावर आपले लक्ष केंद्रित केले. हरभऱ्यात कोणती जीवनसत्त्वे असतात आणि त्यांचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो हे त्यांनी शोधून काढले. हरभरा आणि लिंबूरस यांतील जीवनसत्त्वे जर एकत्र करून आहारात घेतली तर त्याचे वैद्यकीय परिणामही त्यांनी दाखवून दिले. थोर लेखिका आणि विदुषी दुर्गा भागवत यांच्या त्या भगिनी होत्या. 28 जून 1998 रोजी डॉ. कमला सोहोनी यांचे निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 24, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 मार्च 2026; वार : मंगळवार भारतीय सौर :  03…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 मार्च 2026

    March 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn