Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आजचे पंचांग आणि दिनविशेष : 13 जून 2025
    वास्तू आणि वेध

    आजचे पंचांग आणि दिनविशेष : 13 जून 2025

    Team AvaantarBy Team AvaantarJune 13, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link
    1. दर्शन कुलकर्णी

     

    आज, भारतीय सौर : 23 ज्येष्ठ शके 1947

    अर्थात,

    दिनांक : 13 जून 2025

    वार : शुक्रवार

    तिथि : द्वितीया 15:18

    नक्षत्र : पूर्वाषाढा 23:20

    योग : शुक्ल 13:47

    करण : वणीज 27:35

    सूर्य : वृषभ

    चंद्र : धनु 29:37

    सूर्योदय : 06:00

    सूर्यास्त : 19:16

    पक्ष : कृष्ण

    मास : ज्येष्ठ

    ऋतू : ग्रीष्म

    सूर्य अयन : उत्तरायण

    संवत्सर : विश्वावसू

    शालिवाहन शक : 1947

    विक्रम संवत : 2081

    युगाब्द : 5127


    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. सहजपणे भांडवल उभे करू शकाल, राहिलेली देणी परत येतील किंवा नवीन प्रकल्पांसाठी लागणारा निधी जमा करू शकाल. आर्थिकदृष्ट्या अतिशय उत्तम दिवस. कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळीसमवेत भरपूर वेळ घालवता येईल.

    वृषभ – घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कार्यक्षमता वाढविण्यासाठी कौशल्य स्तर वाढवा. आवश्यक काम पूर्ण करून फावला वेळ नक्कीच काढाल, मात्र त्याचा हवा तसा उपयोग करू शकणार नाही. भावनिक आणि मानसिकदृष्ट्या काही समस्यांचा सामना करावा लागेल.

    मिथुन – मिळकत क्षमता वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. कार्यालयात कामाचा ताण येईल. त्यामुळे कुटुंबासाठी पुरेसा वेळ काढता येणार नाही. कुणी दूरचे नातेवाईक अचानक घरी येऊ शकतात. त्यामुळे कदाचित चिडचिड होण्याची शक्यता आहे. बोलण्यावरही नियंत्रण ठेवा.

    कर्क – व्यावसायिकांना मनाविरुद्ध प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास आनंदापेक्षा मानसिक ताण देणारा असेल. नोकरी करणाऱ्यांना ऑफिसमध्ये इतर गोष्टींमध्ये लक्ष घालण्यापेक्षा स्वतःच्या कामावर लक्ष देण्याची जास्त गरज आहे. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष द्या.

    सिंह – कार्यक्षेत्रात तुमच्यातील सळसळत्या ऊर्जेचा सहकाऱ्यांना अनुभव येईल. दिलेले काम वेळेआधी पूर्ण करू शकाल. त्यामुळे स्वतःसाठी काही वेळ मिळेल. त्याचा उपयोग आपले छंद पूर्ण करण्यासाठी करू शकता. थोडेसे वाचन आणि आपले आवडते संगीत यामुळे मनाला आनंद मिळेल.

    कन्या – विनयशील वागण्याचे कौतुक होईल. मात्र प्रियजनांशी असलेले नातेसंबंध बिघडू नयेत म्हणून त्यांना अस्वस्थ करणारे विषय बोलण्याचे टाळा. खर्चावर नियंत्रण ठेवा, चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार नाही, याची काळजी घ्या. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकेल.

    तुळ – उत्साहाने भारलेले आणि सकारात्मक असाल. काहीतरी निराळे, वेगळे काम  करण्याची उमेद जागी होईल आणि ते कराल. जवळच्या नातेवाईकाच्या मदतीने आपल्या व्यवसायात उत्तम प्रगती करू शकाल, ज्यामुळे आर्थिक लाभही होईल.

    वृश्चिक – रागाच्या भरात राईचा पर्वत करण्याचा तुमचा स्वभाव आहे. याचा परत एकदा प्रत्यय येईल. त्यामुळे कुटुंबातील सदस्य अस्वस्थ होतील. रागावर नियंत्रण मिळवले नाही तर, त़ोच राग नुकसान करेल. वैवाहिक आयुष्यात जोडीदाराकडून आवस्तव अपेक्षा ठेवल्या तर केवळ दु:खच पदरी येण्याची शक्यता अधिक.

    धनु – मौजमजा करण्याचा मूड बनेल. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. ताणतणाव, दडपणावर सहज मात करता येईल. यासाठी कुटुंबाचा मोठा पाठिंबा सहाय्यभूत ठरेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागणार नाही.

    मकर – बहुतांश घटना हव्या तशा घडल्यामुळे दिवस उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असेल. व्यवसायासाठी सहजपणे भांडवल उभे कराल. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामे पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस. क्रिएटिव्ह कामामध्ये स्वत:ला गुंतवून ठेवाल.

    कुंभ – स्वत:ची प्रगती होईल अशा प्रकल्पांमध्ये ऊर्जा खर्च करा त्यामुळे मनस्थिती सुधारायला मदत होईल. ऑफिसमधील एखादा सहकारी त्रासदायक ठरू शकतो. या राशीच्या काही महिला स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या उपयोगी वस्तूंच्या खरेदीमध्ये संध्याकाळी व्यग्र राहतील.

    मीन – उत्तम दिवसांपैकी एक म्हणजे आजचा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी सहकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. बॉसही तुमच्या कामावर खूश असेल. व्यावसायिकांच्या दृष्टीने नफा कमविण्यासाठी उत्तम दिवस आहे.


    दिनविशेष

    अष्टपैलू साहित्यिक प्र. के. अत्रे स्मृतिदिन

    मराठीतील अष्टपैलू साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, चित्रपट निर्माता – दिग्दर्शक, वृत्तपत्रकार, वक्ता आणि नेता अशी ओळख असणाऱ्या प्रल्हाद केशव अत्रे यांनी सुरूवातीला पुण्यातील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत शिक्षक आणि नंतर मुख्याध्यापक म्हणून काम केले. 1933 पासून नाट्यक्षेत्र आणि पुढे चित्रपटसृष्टीतही त्यांनी प्रवेश केला. 1939 नंतर ते पुण्याहून मुंबईला आले. 1940 मध्ये त्यांनी साप्ताहिक नवयुगची सुरुवात केली आणि अखेरपर्यंत ते वृत्तपत्रक्षेत्रातही कार्यरत राहिले. याशिवाय, ‘अत्रे थिएटर्स’ ही नाट्यसंस्थाही त्यांनी सुरू केली. आपली वाणी आणि लेखणी याद्वारे त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सक्रिय भूमिका साकारली. साहित्य क्षेत्रात आधी ‘मकरंद’ आणि नंतर ‘केशवकुमार’ या टोपणनावांनी त्यांनी काव्यलेखन केले. ‘झेंडूची फुले’ हा त्यांच्या विनोदी आणि विडंबन-कवितांचा संग्रह लोकप्रिय झाला. आधुनिक मराठीतील विडंबनकाव्याची परंपरा याच काव्यसंग्रहापासून सुरू झाली, असे मानण्यात येते. नाट्यलेखन क्षेत्रातही  मोरुची मावशी, साष्टांग नमस्कार, भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी ही त्यांची नाटके आजही लोकप्रिय आहेत. घराबाहेर, उद्याचा संसार, तो मी नव्हेच आणि डॉक्टर ही नाटके समाजातील खऱ्या घटनांवर आधारलेली होती. तंत्रदृष्ट्या प्रगत मराठी रंगभूमीचे दर्शनही त्यात घडते. याशिवाय, लहानमोठी चरित्रे, व्यक्तिदर्शने, मृत्यूलेख, प्रवासवर्णने, वृत्तपत्रीय लेख, साहित्यविषयक लेख आणि भाषणे, शालेय पाठ्यपुस्तके इत्यादी क्षेत्रातही त्यांनी मुशाफिरी केली. मराठी चित्रपटसृष्टीत पटकथालेखक म्हणून आणि पुढे स्वतंत्र निर्माते म्हणून अत्र्यांनी महत्त्वाचे कार्य केले. धर्मवीर, प्रेमवीर, ब्रह्मचारी, ब्रँडीची बाटली हे त्यांचे काही लोकप्रिय चित्रपट होत. त्यांच्या “श्यामची आई” या चित्रपटास 1954 साली राष्ट्रपतींचे सुवर्णपदक तर महात्मा फुले या चित्रपटास 1955 सालचे रौप्यपदक मिळाले होते. अशा या महान साहित्यिकाचे 13 जून 1969 रोजी निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 24, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 मार्च 2026; वार : मंगळवार भारतीय सौर :  03…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 मार्च 2026

    March 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn