Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    माधवच्या कटात आणखी एका व्यक्तीची एन्ट्री!

    October 16, 2026

    वंदूला झाली दुसरी मुलगीच अन्…

    October 16, 2026

    कढईतील थालिपीठ… खमंग आणि समृद्ध परंपरा

    October 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, October 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » माधवच्या कटात आणखी एका व्यक्तीची एन्ट्री!
    ललित

    माधवच्या कटात आणखी एका व्यक्तीची एन्ट्री!

    प्रणाली वैद्यBy प्रणाली वैद्यOctober 16, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठीकथा, प्रेमकथा, लव्हस्टोरी, भेटशी नव्याने, आराध्या आणि शर्वाय जहागीरदार, माधवचे कटकारस्थान, माधवला निशाची साथ, शर्वाय आराध्या विवाह, शर्वायला आराध्याची साथ, आनंदीला माधवची फूस, तन्वीची दुहेरी खेळी, दिवाकर यांचे नुकसान
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 47

    आनंदी  उसनं हसून म्हणाली… “काय गंमत आहे शर्वाय, इतका लगेच होकार दिलास? आधी असं काही म्हटलं असतं, तर तू थेट दरवाज्याबाहेर गेला असतास.”

    शर्वाय थोडं हसत, थंडपणे म्हणाला… “कधी कधी काही गोष्टींना वेळ देता येत नाही आई. काही निर्णय घेतले जातात… लोकांसाठी, घरासाठी…”

    ती त्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होती. त्याच्या डोळ्यांत काहीतरी लपलेलं जाणवतं तिला, पण ती बोलत नाही, फक्त विचारते… “तू काही मुक्काम करणार नाहीस वाटतं?”

    त्या हळूच आराध्याकडे पाहून मनातल्या मनात म्हणाल्या, ‘ही सोबत आहे म्हणजे हा नक्कीच उद्या निघणार  ऑफिससाठी अस दिसतंय…’

    “बघू अजून काही ठरवलं नाही…” शर्वायने उत्तर दिले.

    “का गं का विचारलंस?” आई आनंदी आराध्याकडे पाहत असल्याचे लक्षात आल्यावर त्याने विचारले.

    “नाही… निशा ताई आणि अन्वीला बोलवायचं होतं… घरी आल्या असत्या घरही पाहून झालं असतं…” आनंदी बोलत होत्या, पण शर्वायचं लक्ष आराध्याकडे होतं. ती मात्र शांत होती.

    ‘लग्न लपवलं असल्याने आपल्या आईने आपल्याच बायकोसमोर  लग्नाचा विषय काढणं… आणि तेही तिच्याच चुलत बहिणीबाबत… काय वाटलं असेल तिला?’ एक क्षण विचार चमकून गेला.

    आधीच माधवच्या बोलण्यात आलेल्या आनंदीला ही वेळ हातून सुटू द्यायची नव्हती… शिवाय, शर्वाय वाड्यावर पुन्हा कधी येईल काही खात्री नव्हती…. आणि म्हणूनच ती हे सगळं जमवून आणण्याच्या प्रयत्नात होती…

    हेही वाचा – माधवच्या मनात शंकेची पाल चुकचुकली…

    0000

    जहागीरदार वाड्यात आनंदी हसतमुख चेहऱ्याने फोनवर बोलत होती, पण तिच्या डोळ्यांतून काहीशी अस्वस्थता झळकत होती. जे ठरवलं होतं ते सहज घडेल की, नाही याबाबत शाश्वती नव्हती…

    पलीकडे फोनवर निशा होती — अन्वीच्या आई.

    आनंदी  मृदू आवाजात म्हणाली… “ताई, उद्या तुम्ही आणि अन्वी आमच्या वाड्यात या… माधव सांगत होता, तुम्हाला घर बघायचंय म्हणे… आणि आज शर्वायही आलाय… तुम्ही आलात तर बर होईल. तुमचं स्वागतच होईल आमच्या घरी.”

    ती बोलत असते, पण बाजूला उभा असलेला शर्वाय तिच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता ताडतो. त्याचं मिश्कील हसू त्याच्या डोक्यात एक वेगळीच योजना तयार होत असल्याचे दर्शवून जाते.

    निशाने आनंदीचं निमंत्रण स्वीकारलं. खरंतर, ती याचीच वाट पाहत होती…

    “उद्या आम्ही दोघी येतो. अन्वीला तर शर्वायला भेटायचंच आहे. तिला खूप अपेक्षा आहेत… हो येऊ आम्ही उद्या…”

    0000

    स्वयंपाकघरात आज एक वेगळाच गोडवा दरवळत होता. बरेच दिवसांनी शर्वाय घरी आला होता, आणि त्याच्या लाडक्या गोष्टी करायला आनंदी एकदम उत्साहात होती. ती ओल्या नारळाची चटणी वाटत होती, पातेल्यातल्या सांबारातून उडणारी वाफ शर्वायच्या लाडक्या आठवणी घेऊन दरवळत होती.

    आराध्या स्वयंपाकघरात आली…

    “काकू, मी मदत करू का?”

    आनंदी थोडी चकित झाली, पण लगेच हसून म्हणाली, “अगं ये… तुला काय काय येतं बघूया आता!”

    आराध्याने कोशिंबीर करायला घेतली. तिची हालचाल अगदी शांत, संयत होती. आनंदी तिच्याकडे पाहात म्हणाली,

    “शर्वायला गरम गरम पुरणपोळ्या किती आवडतात माहितीय? आणि त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहिलं की मला वाटतं – आपली मेहनत फळाला आली.”

    आराध्या लाजून म्हणाली, “हो, त्यांच्या चेहऱ्यावर ते हसू यावं म्हणूनच तर आम्ही एम्प्लॉयी काहीही करतो.”

    दोघींच्या हातातून जेवण तयार होत असताना, एक नवं नातंही फुलत होतं – जे नावाने “सासू-सून” असलं तरी, त्याच्या मुळाशी एकमेकांना समजून घेण्याची इच्छा होती, विश्वास होता.

    आनंदी आराध्याला काही न सांगता निरखत होती… तिच्या डोळ्यांत एक हळवंस समाधान होतं — “ही मुलगी, शर्वायसाठी खरी साथ ठरू शकेल अस वाटतं. पण…”

    घरात शर्वायच्या आवडत्या पदार्थाचा गोड वास दरवळत होता. आनंदी एकीकडे पुरणपोळी लाटत होती, तर दुसरीकडे आराध्या कांद्याची  भजी करत  होती, घरभर नुसता पदार्थांचा सुवास दरवळत होता…

    “तुला माहीत आहे का आराध्या,” आनंदी म्हणाली, “शर्वायला पुरणपोळी म्हणजे अगदी लहानपणापासून आवडते. तो कितीही मोठा झाला ना, तरी पण पुरणपोळीच्या वासाने त्याचा चेहरा लहान मुलासारखा खुलतो.”

    आराध्या हसत म्हणाली, “मग आज त्यांचा दिवस खासच होणार आहे. मी एक पोळी स्वतः लाटू… जरा वाकडी-तिकडी होईल…”

    आनंदी तिच्या बोलण्यावर हसली… ” वाकडं-तिकडं झाल्याशिवाय ती नीट बनतही नाही…”

    थोड्यावेळाने, एकमेकींच्या मदतीने गरम गरम पुरणपोळ्या तयार झाल्या. आराध्याने पोळीवर साजूक तूप घातलं आणि ती ताटात मांडली.

    शर्वाय डोळे विस्फारून बघत होता — घरातली शांतता, मनपसंत अन्न… आणि त्याच्या आयुष्यात आलेलं नवं सुख…

    त्याने पहिला घास घेतला आणि डोळे मिटून चव घेतली… त्या एका क्षणात ती ताटातली पुरणपोळी फक्त अन्न नव्हती — ती प्रेम, आठवण आणि नव्याने जुळणाऱ्या नात्यांची एक चव होती.

    शर्वाय शांतपणे जेवणाच्या ताटाकडे पाहत होता… गरमागरम पुरणपोळीचा सुवास दरवळत होता. एकीकडे आई आनंदी आणि आराध्या हसत-हसत स्वयंपाकघरात बोलत होत्या. त्या दोघींनी तयार केलेलं जेवण हे केवळ अन्न नव्हतं – त्यात घरपण, प्रेम आणि जिव्हाळा मिसळलेला होता.

    दिवाकर समाधानानं बसले होते. आराध्याचं घरात सहज मिसळणं, तिचं आनंदीबरोबरचे छोटेसे संवाद… आणि शर्वायच्या चेहऱ्यावर उमटलेला शांत भाव… हे सगळं पाहून त्यांनाही समाधान वाटत होतं.

    जेवण झाल्यावर शर्वाय थोडावेळ शांत बसला आणि मग हळूच म्हणाला, “आई, खरं सांगू का? खूप दिवसांनी असं मन भरून जेवलो.”

    त्याच्या आवाजात नुसतं अन्नाचं कौतुक नव्हतं… एक वेगळी आंतरिक तृप्ती होती.

    आनंदीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि हसून म्हणाली, “माझ्या हातचं तुझ्या पोटात गेलं आणि तुझ्या चेहऱ्यावर समाधान दिसलं, याहून मोठा आनंद दुसरा नाही.”

    आराध्या गालातल्या गालात हसली. ती काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यांत अभिमान होता. शर्वाय तिच्याकडे पाहत मनात म्हणाला, “हे जेवण केवळ पुरणपोळीचं नव्हतं, हे एका नवीन आयुष्यातलं पहिलं घरचं अन्न होतं.”

    त्या क्षणी सगळ्यांचंच मन एकाच गोष्टीनं भरून आलं होतं – कुटुंब, प्रेम, आणि एकतेचा गोडवा.

    जेवणं झालं, तसं घरात शांततेची हलकी सावली पसरली होती. आनंदी स्वयंपाकघर आवरत होती, आणि आराध्याशी गप्पा मारत होती. तेवढ्यात दिवाकर  यांनी  शर्वाय आणि आराध्याला आवाज दिला. त्यांचा स्वर गंभीर होता…

    “शर्वाय… आराध्या… जेवण झालंय तर एकदा स्टडी रूममध्ये याल का? एक महत्त्वाचं बोलायचं आहे.”

    शर्वाय आणि आराध्याने एकमेकांकडे पाहिलं… आराध्याने हळूच मान डोलावली.

    स्टडी रूममध्ये खोलगट खिडकीजवळ  एक लांब टेबल, भरपूर फाइल्स, एक जुनं घड्याळ आणि… शांतता! दिवाकर त्यांच्या खुर्चीत बसले होते, शर्वाय आणि आराध्या समोर बसले…

    दिवाकर यांनी फाइल उघडली आणि म्हणाले, “माधवविषयी काही गोष्टी मला आधीच संशयास्पद वाटत होत्या… पण आता आराध्याने आणलेले काही पुरावे माझ्या शंकेला पुष्टी देतात.”

    शर्वाय एकटक पाहू लागतो, “काय पुरावे आहेत बाबा?”

    हेही वाचा – शर्वाय-आराध्याबाबत आनंदी अनभिज्ञच!

    दिवाकर थोडा वेळ शांत राहिले आणि मग म्हणाले —

    “माधव एका गुप्त खात्यामार्फत आर्थिक व्यवहार करत आहे. त्याने एका अनोळखी संस्थेशी काही कॉन्ट्रॅक्ट केले आहेत… आणि हे सर्व  प्रोजेक्ट क्षितिज 9शी जोडलेलं आहे… ज्या प्रोजेक्टबाबत आपल्याला अनेक प्रश्न आहेत.”

    “शर्वाय, माझ्या बिझनेसमध्ये लॉस होण्याकरिता हा माधवच कारणीभूत आहे… सगळं सत्य समजून पण शांत रहावं लागत आहे!”

    आराध्या हळूच पुढे येते, “त्याने अन्वीच्या माध्यमातून तुमच्या घरात परत पाय रोवायला सुरुवात केली आहे. मी त्याचे ईमेल्स, बँक स्टेटमेंट्स आणि एका जुन्या डायरीची स्कॅन प्रत मिळवली आहे.”

    शर्वायच्या चेहऱ्यावर राग स्पष्टपणे दिसतो… “म्हणजे या सगळ्याचा उद्देश आपल्यात फूट पाडणं, आणि अन्वीला मोहरा बनवणार…”

    आराध्या बोलता बोलता अचानक थोडीशी पुढे सरकली… तिचा आवाज संयत पण थोडासा धारदार झाला होता…

    “अन्वी मोहरा बनण्याइतकीही मूर्ख नाही. ती नक्कीच काही ना काही फायदा उठवणार आहे…”

    शर्वाय आणि दिवाकर तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले.

    “म्हणजे?” शर्वाय विचारतो.

    आराध्या शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाली, “ती खूप काळजीपूर्वक वागते. सगळ्यांसमोर सौम्य, आज्ञाधारक वागत असली तरी तिच्या डोळ्यांत एक वेगळी चमक आहे – हिशोब ठेवणारी, सतत निरीक्षण करणारी. मला खात्री आहे, ती फक्त माधवचा मोहरा नाही. तिलाही काहीतरी हवंय.”

    दिवाकर गंभीर झाले…

    “हवंय म्हणजे?”

    “शर्वाय!” आराध्या त्यांच्याकडे बघत म्हणाली, “तुमचं स्थान… तुमचा प्रभाव… कदाचित तुमचं आयुष्य… माधवच्या सहाय्याने तिला हे सगळं मिळवता येईल, असं वाटत असेल तिला. पण त्यासाठी ती स्वतःचा स्वतंत्र डाव खेळते आहे.”

    शर्वायच्या मनात हलकीशी संशयाची पाल चुकचुकली… “म्हणजे तू म्हणतेस, माधव अन्वीला वापरतोय, आणि तीही त्याला?”

    आराध्या मान डोलावली…

    “हो. आणि याच कारणामुळे आपल्याला दोघांवर लक्ष ठेवावं लागेल. माधववरच नाही, तर अन्वीवरही. कारण एखादी व्यक्ती जास्त चतुर असते, तेव्हा ती दुहेरी डाव खेळते.”

    क्रमशः
    Avatar photo
    प्रणाली वैद्य

    प्रणाली वैद्य लेखनाची मुळातच आवड असल्याने शब्दांमधून भावना आणि कल्पना व्यक्त करण्यात आनंद मिळतो. आपल्या लिखाणातून इतरांना प्रेरणा मिळावी आणि नातं जोडण्याची ताकद मिळावी, अस वाटतं. प्रतिलिपी मराठीवर कथा, मालिका आणि कविता प्रसिद्ध केल्या आहेत.

    Related Posts

    वंदूला झाली दुसरी मुलगीच अन्…

    October 16, 2026 ललित

    चौकटीपलीकडचा विचार!

    October 15, 2026 ललित

    चव्हाणांचे मृत्युपत्र

    October 14, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    वंदूला झाली दुसरी मुलगीच अन्…

    By हेमा पाटीलOctober 16, 2026

    भाग – 17 सकाळी उठल्यावर उमा शेताकडे निघाली. आईला न सांगताच ती बाहेर पडली. फर्लांगभर…

    चौकटीपलीकडचा विचार!

    October 15, 2026

    चव्हाणांचे मृत्युपत्र

    October 14, 2026

    बापाची माया..

    October 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    माधवच्या कटात आणखी एका व्यक्तीची एन्ट्री!

    October 16, 2026

    वंदूला झाली दुसरी मुलगीच अन्…

    October 16, 2026

    कढईतील थालिपीठ… खमंग आणि समृद्ध परंपरा

    October 16, 2026

    पत्रिकेतील ग्रह आणि वास्तू

    October 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : बुद्धि मेचवेना धोंडीं, हा ठायवरी मवाळें सांडी

    October 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 ऑक्टोबर 2026

    October 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 472
    • अवांतर 217
    • आरोग्य 159
    • पंचांग आणि भविष्य 632
    • फिल्मी 73
    • फूड काॅर्नर 260
    • मैत्रीण 32
    • ललित 996
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    माधवच्या कटात आणखी एका व्यक्तीची एन्ट्री!

    October 16, 2026

    वंदूला झाली दुसरी मुलगीच अन्…

    October 16, 2026

    कढईतील थालिपीठ… खमंग आणि समृद्ध परंपरा

    October 16, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.