Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026

    हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!

    April 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, April 11
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आहारात इंडिया ऑलवेज बेस्ट…
    आरोग्य

    आहारात इंडिया ऑलवेज बेस्ट…

    डॉ. श्रीकांत राजेBy डॉ. श्रीकांत राजेMarch 28, 2026Updated:March 28, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी साहित्य, मराठी लेखक, मी मराठी, मराठी लेख, अभिजात मराठी, सकस आहार, संतुलित आहार, ऋतूमान आणि आहार, कडधान्य खाण्याची पद्धत, पोट फुगवणारे कडधान्य, ऋतू आणि आहार पद्धती, भारतीय आहार पद्धती उत्तम,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आपल्या जेवणाचे ‘ताट’ आरोग्याला पूरक असले पाहिजे. सकस आहाराबरोबरच त्याचे संतुलनही महत्त्वाचे आहे. त्यानुसार ताट वाढण्याची पद्धतही असल्याचे आपण गेल्या लेखात पाहिले. आता पानातील घटकांबाबत जाणून घेऊया. घराघरांमध्ये कडधान्याचे प्रकारही असतात आणि त्याचे वेगवेगळे पदार्थ केले जातात.

    कोणतेही कडधान्य असो त्यामध्ये तीन घटक असतात…

    1. टॅनिन… हे लोहाच्या शोषणाला विरोध करते…
    2. फायटीक आम्ल… हा घटक क्षाराशी त्वरित बांधला जातो आणि न विरघळणारे क्षाराचे खडे तयार करतो… गाऊट / पित्त खडे/ मुतखडे हे त्याचे उदाहरण
    3. ट्रिप्सिन इन्हिबीटर… ट्रिप्सिन या प्रथिनाची पचनात महत्त्वाची भूमिका असते. त्यालाच कमी तयार होऊ द्यायचं. यामुळे प्रथिने पचत नाहीच, पोट फुगवतात आणि अन्नाला “नको” म्हणतात. आठवून बघा.. शेतातच खाल्लेला हरभरा, मूग, तूर… पोट फुगते की! शिवाय, तुरीच्या वरणाने अॅसिडीटी वाढते, असा चुकीचा समज… (मानवाने कच्चेच खाऊन त्या वाणाचा वंशच संपवू नये म्हणून निसर्गाने केलेली ही व्यवस्था आहे.)

    हेही वाचा – सकस आहाराबरोबर संतुलनही महत्त्वाचे

    मग सर्वांधिक प्रथिने… प्रतिकारशक्ती असणारं कडधान्य कसं खावं? तर हे कडधान्य रात्रभर भिजत ठेवले की, त्यातील अपायकारक घटक 60 टक्के निष्क्रिय बनतात…. (कुस्ती खेळणारे शेंगदाणे, उडीद डाळ, चणे भिजवून का खातात हे लक्षात येईल.) शिजविलेले, भाजलेले, तळलेले हे कडधान्य तरी चांगले पचते. उदा. चणे, हरभरा आता भिजवून कोंब आणले की, त्यातील ब आणि क जीवनसत्व वाढते अन् अपचनाचा त्रास कमी होतोच…

    माझा अनुभव आणि निष्कर्ष असा आहे की कडधान्य भिजवून… पाणी बदलून… शिजवून 5-6 तासांनी खाल्ले तर पचन सुलभ बनते. पुन्हा परंपरा आठवूया…. ताज्या पुरणपोळीऐवजी शिळी पुरणपोळी सहज पचते…. सकाळी शिजवलेलं तुरीचं वरण रात्री फोडणी देउन वापरलं तर सहज पचते… रात्रीची खिचडी सकाळी फोडणी देऊन नाश्त्याला मस्तच लागते. म्हणून काही पदार्थ उशीर करून खाणंयोग्य….

    आता ऋतुमानानुसार एक तत्त्व बघावं….

    • पावसाळ्यात जंतु प्रादुर्भाव असल्याने अन्न वाफावून शिजवूनच खावे. पुन्हा परंपराही असतात. नागपंचमीला दिंड वाफावूनच खातात. उकडीचे मोदक ईडली. (हं हं हं वडा सांबार नाही! वडा तळतात. फक्त ईडली) शिवाय सर्व उपवासासाठी फक्त पावसाळाच!
    • हिवाळा हा तेलाचा वापर करून तळलेलं खाण्याचा ऋतू. दिवाळीचा फराळ जास्त होऊनही पोट खराब होत नाही. हिवाळ्यात परंपरेने उपवास नाहीतच.
    • उन्हाळा ऋतू वाळवलेलं आणि भाजलेलं खाण्यासाठी उदा. खारोड्या, पापड्या, सातूचं पीठ…
    • ऋतू आणि पदार्थ सहज कल्पनेने बदलून बघा, त्रास होईल की बरं वाटेल? सहज विचार करता येईल.

    हेही वाचा – वाढते वजन… टेन्शन लेने का!

    म्हणून कडधान्याचाही असा विचार व्हावा, असे मला वाटते. परंपरेनुसार आमचं आहारशास्र  हे पुस्तकातील रटाळ व्हॅल्यू आणि माहितीपेक्षा अधिक रोचक आणि रसपूर्ण आहे. आपल्या आहार परंपरेचा श्रद्धेने अभिमान बाळगूया! ईस्ट या वेस्ट… इंडिया आहारात ऑलवेज बेस्ट…

    डॉ. श्रीकांत राजे

    होमिओपॅथी चिकित्सक मोबाइल - 9921 548 851

    Related Posts

    Ayurveda : वसंतातील सामान्य आजार आणि प्रभावी घरगुती उपाय

    April 9, 2026 आरोग्य

    ….अन् मृत्यूची ‘निळी सावली’ मागे हटली!

    April 8, 2026 आरोग्य

    सूर्यनमस्कार अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 4, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    Ayurveda : वसंतातील सामान्य आजार आणि प्रभावी घरगुती उपाय

    By वैद्य विष्णू देविदास सावंतApril 9, 2026

    नमस्कार! वसंत ऋतूत आपण आहार आणि विहाराची कितीही काळजी घेतली, तरी कधीकधी बदलत्या वातावरणामुळे (ऋतुसंधी)…

    ….अन् मृत्यूची ‘निळी सावली’ मागे हटली!

    April 8, 2026

    सूर्यनमस्कार अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 4, 2026

    टेंन्डो एकियालीस आणि ए. सी. एल.

    April 3, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026

    हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!

    April 10, 2026

    आराध्या तन्वीसह मोठ्या कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी गेली खरी…

    April 10, 2026

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 264
    • अवांतर 180
    • आरोग्य 99
    • थर्ड अंपायर 2
    • पंचांग आणि भविष्य 380
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 192
    • मैत्रीण 18
    • ललित 547
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेक... आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    - मनोज शरद जोशी
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026

    हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!

    April 10, 2026
    Most Popular

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.