Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: डॉ. श्रीकांत राजे
आम्ही होमिओपॅथी अभ्यासक्रमाला असताना ॲनॉटॉमी… शरीर रचनाशास्त्र शिकताना, विशेषत: बोन सेटवर मसल अटॅचमेंट अभ्यासताना ओरिजीन… इन्सर्शन… नर्व्ह… सप्लाय… ॲक्शनचा अभ्यास करत असू. त्यातूनच फ्लेक्शन… दोन पृष्ठ भागांनी जवळ येणे… एक्सेटेंशन… दूर जाणे… असा अभ्यास असायचा… सोप्या भाषेत गुडघा फोल्ड करणे फ्लेक्शन आणि सरळ करणे एक्स्टेंशन… असं प्रत्येक सांध्याचं….तर असो. आपल्या पोटरीखाली घोडशीर म्हणतात, ते टेंन्डो एकियालीस… (ग्रीक योद्धा एकियालीसची (Achilles) घोडशीर कापली आणि तो युद्धात मेला म्हणून हे बारसं!) तसेच गुडघ्याला समोरून दोन स्नायू बंधनं असतात, त्यांना ए.सी. एल. (anterior crucial ligament) म्हणतात. माझा भाऊ पपू डॉक्टर आहे. एकदा बॅडमिंटन खेळतांना अचानक कट् असा आवाज आला आणि त्याला पायावर उभेच…
आपल्या जेवणाचे ‘ताट’ आरोग्याला पूरक असले पाहिजे. सकस आहाराबरोबरच त्याचे संतुलनही महत्त्वाचे आहे. त्यानुसार ताट वाढण्याची पद्धतही असल्याचे आपण गेल्या लेखात पाहिले. आता पानातील घटकांबाबत जाणून घेऊया. घराघरांमध्ये कडधान्याचे प्रकारही असतात आणि त्याचे वेगवेगळे पदार्थ केले जातात. कोणतेही कडधान्य असो त्यामध्ये तीन घटक असतात… टॅनिन… हे लोहाच्या शोषणाला विरोध करते… फायटीक आम्ल… हा घटक क्षाराशी त्वरित बांधला जातो आणि न विरघळणारे क्षाराचे खडे तयार करतो… गाऊट / पित्त खडे/ मुतखडे हे त्याचे उदाहरण ट्रिप्सिन इन्हिबीटर… ट्रिप्सिन या प्रथिनाची पचनात महत्त्वाची भूमिका असते. त्यालाच कमी तयार होऊ द्यायचं. यामुळे प्रथिने पचत नाहीच, पोट फुगवतात आणि अन्नाला “नको” म्हणतात. आठवून बघा.. शेतातच…
आपल्या जेवणाचे ‘ताट’ आरोग्याला पूरक आहे का? सकस आहाराबरोबरच त्याचे संतुलनही महत्त्वाचे आहे. त्यानुसार ताट वाढण्याची पद्धतही आहे. डाव्या बाजूचे प्रमाण 15 टक्के गृहीत धरले तर उजव्या बाजूचे प्रमाण 85 टक्के आहे. जे पदार्थ आपल्या आरोग्याला अधिक हवे आहेत, ते जेवणाऱ्याच्या उजव्या बाजूला क्रमाने म्हणजे पातळ भाजी, फोडीची भाजी, वरण /आमटीची वाटी, आपल्या समोर -ताटाच्या परिघावर मध्यभागी मीठ ( अगोदरच न वाढता वाटल्यास कमीत कमी वापर करावा.) असावे. आता जेवणाऱ्याच्या डाव्या हाताकडून पातळ कोशिंबीर, नंतर चटणी (वाटल्यास लोणचे) असावी. उजव्या बाजूला पोळी, मध्यात मूदभर भात, त्यावर वरण, साजूक तूप आणि शेवटी दही-भात… आपल्या उजव्या बाजूचे पदार्थ आपण अधिक खातो. ते…

