मेष
- या आठवड्यात वास्तूची स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. नोकरदारांच्या दृष्टीने कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. मात्र, जास्त काम करावे लागू शकते, त्यामुळे वेळ द्यावा लागेल. वरिष्ठ खूश राहतील. व्यावसायिक वर्गाची उलाढाल वाढून चांगला नफा कमावता येईल. त्याचबरोबर खर्च जास्त होऊ शकतो. सामाजिक आणि धार्मिक कार्यात सक्रिय योगदान देऊ शकाल. घराच्या सुशोभीकरणासाठी महिलांचा जास्त खर्च होईल. विद्यार्थ्यांना नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल. त्यासाठी भावंड मदत करतील.
वृषभ
- या आठवड्यात शुभ ग्रहांच्या भ्रमणामुळे वातावरण अनुकूल राहील. तथापि, नोकरदारांचे वरिष्ठांशी असलेले संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे, ते संबंध सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. व्यावसायिक वर्गाची जुनी वादग्रस्त येणी वसूल होतील. नवीन संकल्पनांचा वापर यशस्वी होईल. उत्तम आर्थिक नियोजन करू शकाल. महिलांचे वडिलोपार्जित संपत्तीचे वादविवाद संपुष्टात येऊन सुवर्ण मार्ग निघेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची इच्छा असेल, तर त्याच्याशी संबंधित कामे पूर्ण होतील.
मिथुन
- या आठवड्यात अपेक्षित घटना घडतील. आजपर्यंत केलेल्या कष्टाचे उत्कृष्ट फळ नोकरदारांना मिळेल. प्रमोशन आणि पगारवाढ मिळू शकेल, पण कायमस्वरूपी बदलीची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गाची अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होतील. वाहन चालवताना दक्ष राहा आणि वाहतुकीचे नियम पाळा. महिलांचा आत्मविश्वास वाढेल आणि अडकलेली कामे पूर्ण करू शकाल. विद्यार्थ्यांनी कुसंगती टाळावी. इंटरव्ह्यूमध्ये यश मिळेल.
कर्क
- प्रयत्नपूर्वक यश खेचून आणू शकाल. नोकरदारांना सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी सुसंवाद साधून कामे पूर्ण करता येतील. मानसिकदृष्ट्या कणखर राहा. व्यावसायिक वर्गाला कामात सातत्याने बदल करावा लागेल. त्यामुळे उत्साह राहील आणि सर्व बाबतीत यश मिळवू शकाल. महिलांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी; नियमित व्यायाम करा आणि पथ्य पाळा. विद्यार्थ्यांचा कुटुंबातील समस्या सोडवण्यात वेळ जाईल, त्यामुळे घराला प्राधान्य द्यावे लागेल.
सिंह
- हा आठवडा आर्थिकदृष्ट्या उत्तम आहे. नोकरदारांचा कामासाठी परदेश प्रवास होण्याची शक्यता आहे. जमिनीच्या व्यवहारात फायदा होऊ शकतो. खर्च विचारपूर्वक करा. व्यावसायिक वर्ग नवीन एखादा जोडधंदा सुरू करू शकेल. स्वतःच्या जागेत नवीन व्यवसाय सुरू करू शकाल आणि नवीन संकल्पना राबवू शकाल. महिला चैनीच्या वस्तू खरेदी करतील; भौतिक सुख-सुविधांवर पैसे खर्च होतील. विद्यार्थ्यांनी प्रेमप्रकरणात सांभाळून पुढील पाऊल टाकावे.
हेही वाचा – शनीचा कर्मयोग
कन्या
- या आठवड्यात जीवनशैली बदलू शकेल. नोकरदार हातातील कामे उत्साहात आणि गतीने पूर्ण करू शकतील. अपेक्षित घटना घडतील आणि छोटे प्रवास होतील. व्यावसायिक वर्गाला व्यवसायात विशिष्ट उंची गाठता येईल आणि आत्मविश्वास वाढेल. अतिउत्साहात बेकायदेशीर कामे करू नका; शॉर्टकटचा वापर टाळा. महिलांना मानसिक शांतता लाभेल, दानधर्म करू शकाल. विद्यार्थ्यांना मेहनत करावी लागेल. मोबाइलच्या व्यसनापासून तसेच सोशल मीडियापासून सावध रहा.
तुळ
- या आठवड्यात वातावरण प्रसन्न राहील. नोकरदारांसाठी परिस्थिती अनुकूल असेल आणि अपेक्षित घटना घडतील. संततीच्या प्रगतीच्या बातम्या समजतील, ज्यामुळे घरात आनंदी वातावरण राहील. व्यावसायिक वर्गाची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. सततच्या प्रयत्नांमुळे सकारात्मक बदल घडतील. बांधकाम क्षेत्रातील व्यापाऱ्यांचे अडकलेले प्रकल्प मार्गी लागतील. कुटुंबातील तरुणांचे विवाह ठरल्यामुळे महिलांच्या दृष्टीने आनंदाचे वातावरण असेल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश प्राप्त होईल. कलाकार आणि खेळाडूंना प्रसिद्धी मिळू शकेल.
वृश्चिक
- या आठवड्यात महत्त्वाचे बदल घडतील. नोकरदारांच्या दृष्टीने नवीन वाहनखरेदीचा योग आहे. कुटुंबासाठी खर्च कराल. राहत्या घरातील प्रश्न सुटतील आणि राहणीमानात बदल घडेल. व्यावसायिक वर्गाच्या उत्पन्नात वाढ होईल; नवीन जोडधंदा सुरू करू शकाल. उधारी वसूल होईल. हितशत्रूंवर मात करता येईल. महिलांची भौतिक सुविधांसह आर्थिक परिस्थिती उंचावेल आणि जोडीदाराचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. उच्च शिक्षणाच्या संधी मिळतील, कुटुंबीय मदत करतील.
धनु
- या आठवड्यात अडचणी संपतील. नोकरदारांच्या बाबतीत अपेक्षित घटना घडतील. महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल आणि आर्थिक स्थिती सुधारेल. काम करताना आनंदी आणि उत्साही रहाल. व्यावासयिक वर्ग प्रगती करू शकेल आणि आत्मविश्वास वाढेल. मात्र अतिआत्मविश्वासामुळे नुकसान होऊ शकते, त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या. कामगारविषयक प्रश्न कायद्याच्या चौकटीत राहून सोडवा. महिलांचे जोडीदाराबरोबर वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शांत रहा. विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे, अभ्यासात लक्ष केंद्रित करा.
मकर
- या आठवड्यात आर्थिक व्यवहारामध्ये सावधगिरी बाळगा. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. कामात उत्साह वाटणार नाही. कामाविषयीचे ज्ञान अद्ययावत असणे, गरजेचे आहे. व्यावसायिक वर्गाने कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नये. आर्थिक निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. अडकलेले पैसे मिळतील आणि नवीन कामाचे नियोजन करू शकाल. महिलांनी अनावश्यक खर्चाला कात्री लावावी. कामात मन लागणार नाही, उदास वाटू शकते. विद्यार्थ्यांना कामात यश मिळण्यासाठी काही काळ वाट बघावी लागू शकते; सकारात्मक रहा.
कुंभ
- ठरविलेल्या गोष्टी घडतीलच असे नाही, त्यामुळे काही बदल करावा लागू शकतो. नोकरदारांच्या बाबतीत काही नकारात्मक गोष्टी घडण्याची शक्यता असल्याने कामाच्या ठिकाणी जागरूक रहा. वादविवाद टाळा आणि इतरांच्या वादात पडू नका; ताणतणावात अडकणार नाही, याची काळजी घ्या. व्यावसायिक वर्गाला काही समस्या अचानक उद्भवल्यामुळे नियोजनात बदल करावा लागेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याची काळजी राहील. महिलांनी कोणतेही निर्णय घेताना सावध राहावे, फसवणुकीची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे मार्ग सापडतील आणि गुरूंचे मार्गदर्शन मिळेल.
हेही वाचा – वास्तुशास्त्र आणि नवीन घर निवडण्याचे महत्त्वाचे नियम
मीन
- या आठवड्यात प्रवासाचे योग आहेत. नोकरदारांनी कामाच्या ठिकाणी राजकारण आणि गटबाजीपासून लांब राहणे हिताचे राहील; वरिष्ठांच्या मताला प्राधान्य द्या. व्यावसायिक वर्गाला कुटुंबाच्या बाबतीत आणि व्यापाराबाबत एखादी चिंता लागून राहील. सतत ताण जाणवेल, ज्यामुळे कामात चुका होण्याची शक्यता आहे. सावध राहा आणि सकारात्मक विचार करा. महिलांनी घरकाम करताना सावध राहावे; जखम होणे, भाजणे किंवा कापणे अशा गोष्टी होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी इतरांवर अवलंबून राहू नये आणि प्रवासात वेंधळेपणा करू नये.


