मेष
या आठवड्यात सामाजिक आणि धार्मिक कार्यात रुची वाढण्याची शक्यता आहे. व्यक्तिगत इच्छा पूर्ण करण्यासाठी एखादी मदत मिळण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल. स्वतःच्या धाडसी निर्णयामुळे कठीण परिस्थितीतून मार्ग काढू शकाल. महिलांना अर्थार्जनाच्या नवीन संधी मिळतील, त्याचा उत्तम लाभ घ्या. कला आणि क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांची प्रगती होईल, शुभवार्ता समजतील.
वृषभ
या आठवड्यात नोकरीमध्ये परिस्थितिजन्य लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा व्यवसायात बदल करायचा असल्यास शांतपणे आणि सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घ्या. तुमची प्रतिमा उंचावेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाने इतरांना भारावून टाकू शकाल. महिलांना सगळी कामे धाडसाने आणि उत्साहात पूर्ण करता येतील. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा, सकारात्मक विचार करावा.
मिथुन
या आठवड्यात व्यापार व्यवसायात मोठा धोका पत्करू नये. शुभग्रहाची साथ असल्यामुळे अडचणीतून मार्ग निघेल. व्यापारात प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. संततीची प्रगती होईल. महिलांना सहकुटुंब धार्मिक तीर्थक्षेत्रांना भेट देता येईल, हातून दानधर्म होईल. विद्यार्थ्यांनी निर्णय घेताना तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे गरजेचे राहील.
कर्क
या आठवड्यात व्यावसायिकांना सरकारी धोरणाचा लाभ मिळेल. व्यवसायिक अंदाज खरे ठरतील. कोणत्याही व्यवहारात अतिआत्मविश्वास टाळा. शांतपणे क्षमतेचा विचार करून निर्णय घ्या. मध्यस्थीतून कामे होतील. व्यवसायिक प्रदर्शन असल्यास भाग घ्या, फायदा होण्याची शक्यता आहे. सर्व परिस्थितीत संयम ठेवा. संततीच्या प्रगतीने महिलांना आनंद होईल. तथापि, जुन्या व्याधी उद्भवू शकतात, काळजी घ्या. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नवीन संधी मिळतील, आवडीच्या क्षेत्रात काम करता येईल.
सिंह
या आठवड्यात वादविवादापासून दूर राहावे. व्यवसायात नवीन संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करा. जमीन-जुमल्यासंबंधी दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. नोकरदारांना वरिष्ठांचे तसेच सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील मुलाबाळांची आरोग्य व्यवस्थित राहील आणि त्यांची प्रगती पाहून महिलांची काळजी दूर होईल. विद्यार्थ्यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण होतील.
हेही वाचा – तू भेटशी नव्याने…
कन्या
या आठवड्यात राजकारण आणि गटबाजीपासून दूर राहा. महत्त्वाच्या गाठीभेटी यशस्वी ठरतील. घरात वाहन खरेदी होऊ शकते. नोकरीतील घडामोडीतून चांगला लाभ मिळेल. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या. महिलांना ओळखीतून लाभ होईल, मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना जास्त परिश्रम घेण्याची गरज आहे.
तूळ
या आठवड्यात व्यावसायिकांनी आर्थिक व्यवहार सावधानतेने करणे आवश्यक आहे. नवीन वास्तूत प्रवेश करू शकाल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल. सार्वजनिक जीवनात सांभाळून वागणे गरजेचे आहे. नोकरीत अधिकार क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. महिलांनी लहान प्रलोभनांपासून दूर राहावे. त्यांची जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी स्वभावात विनम्रता ठेवावी, अभ्यासात लक्ष द्यावे.
वृश्चिक
या आठवड्यात कामासाठी प्रवास करावा लागेल. प्रवासात विशेष काळजी घ्या. वाहन चालवताना नियंत्रण सुटणार नाही, याची काळजी घ्या. चोरीपासून जपावे लागेल. महत्त्वाची कागदपत्रे आणि किमती ऐवज सांभाळून ठेवा. व्यवसायात नवीन प्रस्ताव येतील. मोठ्या संधी मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत मान मिळेल. समाजातील मोठ्या व्यक्तींच्या भेटी होतील. बोलण्यातून गैरसमज होणार नाही, याकडे महिलांनी लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांनी गरजा नियंत्रणात ठेवाव्यात, वायफळ खर्च करू नका.
धनु
या आठवड्यात गैरसमजातून विसंवाद होऊ शकतो. व्यवसायात नोकरदारांचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. वेळेचे योग्य नियोजन आवश्यक आहे. नोकरीत कामाचा ताण जाणवेल. अधिक काम करावे लागेल. नोकरदारांबाबत स्थानबदल होऊ शकतो. कोर्ट-कचेरीतील बाबींमध्ये तडजोड करावी लागेल. महिलांकडून एखाद्याचे भले होईल, दानधर्म कराल. विद्यार्थ्यांनी शिस्त पाळावी, नियम आणि अटींचे पालन करावे, वाद घालू नये.
मकर
या आठवड्यात नोकरीत अनुकूल वातावरण राहील. कामासाठी जास्त वेळ द्यावा लागेल, त्यामुळे प्रकृती बिघडू शकते. वरिष्ठ आणि सहकाऱ्यांची मदत मिळेल. व्यवसायात नवीन संकल्पना राबवू शकाल. आरोग्याकडे लक्ष द्या, पथ्यपाणी सांभाळा. नियमित व्यायाम करा. महिलांना मैत्रिणींबरोबर मजेत वेळ घालवता येईल, एखादे प्रदर्शन पाहता येईल. विद्यार्थ्यांना छोटी नोकरी मिळू शकते, स्वावलंबी होण्याची संधी मिळेल.
कुंभ
या आठवड्यात सरकारी नियम पाळणे अनिवार्य ठरेल. स्वतःच्या आर्थिक क्षमतेचा विचार करा. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. कर्जफेड होईल. वादग्रस्त येणी वसूल होतील. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. नवीन संधी मिळतील. महिलांबाबत मनासारख्या घटना घडतील, छंद जोपासाल. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल.
हेही वाचा – ब्लँकेट अन् म्हातारा भिकारी!
मीन
या आठवड्यात सुरुवातीला उष्णतेचा त्रास संभवतो. काळजी घ्या. नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होईल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल. तुमची वैयक्तिक प्रगती होणार आहे. महिलांच्या दृष्टीने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. समारंभांना उपस्थित राहाल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन उत्तम राहील. पर्यटनाचा योग आहे.


