मेष
या आठवड्यात कामाची खूप गडबड होईल. यासाठी वेळेचे नियोजन गरजेचे आहे. नवीन जबाबदारीमुळे नोकरदारांचा काम समजून घेण्यात जास्त वेळ जाईल. आर्थिक बाजू मजबूत होईल. व्यावसायिक वर्गाने नवीन गुंतवणूक करताना तज्ज्ञ लोकांचा सल्ला घ्यावा; व्यवसायात जास्त गुंतवणूक करू शकाल. कुटुंबात मंगलकार्य ठरेल; त्याच्या तयारीत महिला उत्साहाने सहभागी होतील. विद्यार्थी मित्र–मैत्रिणींबरोबर सहलीचा बेत आखतील.
वृषभ
या आठवड्यात प्रलंबित काम पूर्ण झाल्याचे समाधान मिळेल. नोकरदारांची बदली झाली असेल तर, नवीन कामात रुळायला वेळ लागेल; दिशाभूल होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गासाठी भांडवलाची सोय होईल, त्यामुळे कामाला गती येईल. पैसे जपून वापरा; ज्या कामासाठी घेतले आहेत, त्यासाठीच खर्च करा. पाहुणे गेल्यामुळे महिलांना घर सुने वाटेल; मन दुसऱ्या कामात गुंतवा. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या यशात हुरळून जाऊ नये; अजून बराच पल्ला गाठायचा आहे.
मिथुन
या आठवड्यात तरुणांचे प्रश्न मार्गी लागतील. नोकरदारांना सहकाऱ्यांची साथ मिळेल; वेळेत कामे पूर्ण केल्याने कौतुक होईल. व्यावसायिक वर्गाला नवीन कामे घेतल्याने कामाचे प्रमाण वाढेल; वेळेचे नियोजन आवश्यक. परदेश प्रवास नवीन कामासाठी फायद्याचा ठरेल. महिलांनी सगळ्यांना खुश ठेवण्याच्या मागे लागू नये; कामावर लक्ष द्या. विद्यार्थ्यांनी मित्रांच्या वादात पडू नका; अलिप्त राहा.
कर्क
या आठवड्यात तरुणांचे प्रश्न सुटतील; त्यांना योग्य मार्ग सापडेल. नोकरदार जबाबदारीने कामे पूर्ण करतील, त्यामुळे वरिष्ठ खूश राहतील. प्रकृती उत्तम राहील. व्यावसायिक वर्गाने सतत स्वतःला सिद्ध करत राहावे; जाहिरातीसाठी सोशल मीडियाचा वापर फायदेशीर ठरेल. महिलांचा जवळच्या नातेवाईकांसोबत प्रवास होईल; आनंदी राहाल. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा दिल्यास यश मिळेल.
सिंह
या आठवड्यात अचानक प्रवासाचा योग आहे. नोकरदारांच्या कामाच्या पद्धतीमुळे वरिष्ठ खूश राहतील. तरुणांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गाला व्यवसाय विस्ताराची योजना पूर्ण करता येतील; जुने संबंध आणि संवादामुळे नवीन संधी मिळतील. महिलांना हुशारीने अडचणींवर मात करता येईल; नवीन संधी मिळतील. विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – आण्णा… जगण्याच्या इच्छेला फुटली पुनश्च पालवी!
कन्या
या आठवड्यात तब्येतीची काळजी घ्या; पथ्य पाळा; औषधे वेळेवर घ्या. नोकरदारांनी स्वतःचे काम स्वतःच करावे; इतरांवर अवलंबून राहू नये. निर्णय घेताना सर्व बाजूंनी विचार करा. व्यावसायिक वर्गाने सावध पावले उचलावीत; नवीन प्रस्ताव मांडताना गोपनीयता पाळा. महिलांसाठी प्रवासाचा योग आहे, नवीन ठिकाण पाहाल; खरेदी कराल. विद्यार्थी मित्र–मैत्रिणींबरोबर सहलीचा बेत आखतील.
तुळ
या आठवड्यात तुम्ही ठरवलेली कामे पूर्ण कराल. नोकरदार अतिशय मेहनतीने नवीन जबाबदारी पार पाडतील; तथापि, अधिकाराचा गैरवापर करू नका. व्यावसायिक वर्गाला व्यवसायात प्रगती करता येईल; सर्वांना सांभाळून घ्या. महिलांनी सगळी कामे वेळेत पूर्ण करावीत; गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. विद्यार्थ्यांना जुने मित्र भेटतील; गप्पा आणि आठवणींमध्ये वेळ जाईल.
वृश्चिक
नोकरदारांची आर्थिक स्थिती उत्तम राहील; नवीन खरेदी करू शकाल; वाहन खरेदीचा योग आहे. व्यावसायिक वर्गाला जोडधंदा सुरू करण्यासाठी योग्य काळ आहे; नीट अभ्यास करूनच व्यवसाय निवडा. महिलांना घरी राहूनच व्यवसाय सुरू करता येईल; गरजू महिलांना काम देऊ शकाल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल; ज्येष्ठांची मदत मिळेल.
धनु
या आठवड्यात शुभ बातमी मिळेल. नवीन वास्तूत प्रवेश करू शकाल. सहकाऱ्यांबरोबरच्या चांगल्या संबंधांमुळे नोकरदारांना कामे पूर्ण करता येतील. व्यावसायिक वर्गाने तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करावी; जुनी देणी फेडून टाका. महिलांच्या मतांवर घरात विचार केला जाईल; कुटुंबात मान मिळेल. विद्यार्थ्यांनी कुसंगत टाळावी; व्यसनी मित्रांपासून दूर राहा.
मकर
या आठवड्यात कामाचे नियोजन विचारपूर्वक करा. नोकरदारांना कामाचा कंटाळा येऊ शकतो; त्यामुळे रूटीनपेक्षा वेगळे काम केल्यास आनंद मिळेल. व्यावसायिक वर्गाला जोडधंद्यात जास्त फायदा होईल; मूळ व्यवसायात बदलाची गरज जाणवेल. महिला कामात स्वतःला इतक्या गुंतवतील की, घरगुती प्रश्नांकडे दुर्लक्ष होईल. उच्च शिक्षणासाठीच्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना चांगल्या मार्कांनी पास करता येतील.
कुंभ
हा आठवडा कंटाळवाणा जाऊ शकतो; ठरवलेली कामे अर्धवट राहतील. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी मान–सन्मान मिळेल; कामाचे कौतुक होईल; आर्थिक लाभ मिळेल. तथापि, गुंतवणूक करताना योग्य सल्ला घ्या. मेहनत केल्याशिवाय प्रगती नाही, हे व्यावसायिक वर्गाने लक्षात ठेवावे. जाहिरातीवर अवलंबून न राहता योग्य सेवा द्या. महिलांनी कामे वेळेवर पूर्ण करावीत; तब्येतीची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर इतर गोष्टींचाही अभ्यास करावा.
हेही वाचा – सर्वांनी हिणवल्यावर आराध्याने महत्त्वाचा निर्णय घेतला आणि….
मीन
या आठवड्यात तब्येतीची काळजी घ्या. नोकरदारांच्या बाबतीत कामाचा वेग वाढेल; योग्य वेळी निर्णय घेऊन फायदा मिळवाल; वरिष्ठ खूश राहतील. प्रदर्शनात मिळालेल्या प्रतिसादामुळे व्यावसायिक वर्गावरील कामाचा ताण वाढेल; नवीन लोकांची भरती करावी लागेल. महिलांना फिरायला जाण्याचा योग आहे, लांब फिरून आल्यामुळे फ्रेश वाटेल. विद्यार्थ्यांनी मेहनत करणे अपरिहार्य; प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण करावा.


