Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    पोई भाजी (मलबार स्पिनॅच, मायाळू) एक पौष्टिक प्रकार!

    July 17, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : मुंगिये मेरु नोलांडवे, मशका सिंधु न तरवे

    July 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 जुलै 2026

    July 17, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, July 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : ऐशिया आपुलियाची सहजस्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : ऐशिया आपुलियाची सहजस्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती…

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 11, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Thirteen, तेरावा अध्याय, अध्याय तेरावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय आठवा

    श्रीभगवानुवाच – अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते । भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञित: ॥3॥

    मग म्हणितले सर्वेश्वरें । जें आकारी इये खोंकरें । कोंदलें असत न खिरे । कवणे काळीं ॥15॥ एऱ्हवीं सपूरपण तयाचें पहावें । तरि शून्यचि नव्हे स्वभावें । परि गगनाचेनि पालवें । गाळूनि घेतलें ॥16॥ जें ऐसेंही परि विरूळें । इये विज्ञानाचिये खोळे । हालवलेंही न गळे । ते परब्रह्म ॥17॥ आणि आकाराचेनि जालेपणें । जन्मधर्मातें नेणे । आकारलोपीं निमणें । नाहीं कहीं ॥18॥ ऐशिया आपुलियाची सहजस्थिती । जया ब्रह्माची नित्यता असती । तया नाम सुभद्रापति । अध्यात्म गा ॥19॥ मग गगनी जेविं निर्मळे । नेणों कैंची एक वेळे । उठती घनपटळें । नानावर्णे ॥20॥ तैसें अमूर्तीं तिये विशुद्धे । महदादि भूतभेदें । ब्रह्मांडाचे बांधे । होंचि लागती ॥21॥ पैं निर्विकल्पाचिये बरडी । कीं आदिसंकल्पाची फुटे विरूढी । आणि ते सवेंचि मोडोनि ये ढोंढी । ब्रह्मगोळकांची ॥22॥ तया एकैकाचे भीतरीं पाहिजे । तंव बीजाचाचि भरिला देखिजे । माजीं होतियां जातियां नेणिजे । लेख जीवां ॥23॥ मग तया गोळकांचे अंशांश । प्रसवती आदिसंकल्प असमसहास । हें असो ऐसी बहुवस । सृष्टि वाढे ॥24॥ परि दुजेनविण एकला । परब्रह्मचि संचला । अनेकत्वाचा आला । पूर जैसा ॥25॥ तैसें समविषमत्व नेणों कैचें । वायांचि चराचर रचे । पाहतां प्रसवतिया योनींचे । लक्ष दिसती ॥26॥

    हेही वाचा – Dnyaneshwari :  कैसी पुसती पाहें पां जाणिव, भिडेचि तरी लंघों नेदी शिंव…

    अर्थ

    श्रीकृष्ण म्हणाले –  जे परम अविनाशी आहे, ते ब्रह्म. ब्रह्माची (आकाराच्या उत्पत्तिनाशांबरोबर उत्पन्न आणि नष्ट न होणे ही) जी सहज स्वरूपस्थिती तिला अध्यात्म असे म्हणतात. (अक्षर ब्रह्मापासून) भूतमात्रादी (चराचर) पदार्थांची उत्पत्ती करणारा जो सृष्टिव्यापार, त्याचे नाव कर्म. ॥3॥

    मग सर्वेश्वर श्रीकृष्ण म्हणाले, जे या सर्व फुटक्या (नाशिवंत) आकारामात्रात गच्च भरले असताही कोणत्याही वेळी गळत नाही ॥15॥ एरवी त्याचा सूक्ष्मपणा पाहू गेले तर, ते शून्यच वाटेल; पण ते स्वभावाने शून्य नाही. (कारण, ते मूळचे सत् आहे). शिवाय ते इतके सूक्ष्म आहे की, सूक्ष्मात सूक्ष्म जे आकाश त्याच्या पदरातून ते गाळून घेतले आहे ॥16॥ जे इतकेही सूक्ष्म असून झिरझिरीत असलेल्या या प्रपंचरूप वस्त्राच्या गाळणीतून हलवले तरी गळत नाही, ते परब्रह्म होय. ॥17॥ आणि आकाराला आलेल्या पदार्थांच्या उत्पत्तीबरोबर जे जन्मरूपी विकाराला जाणत नाही आणि आकारवान पदार्थ नाहीसे झाले तरी, जे केव्हाही नाश पावत नाही ॥18॥ अर्जुना याप्रमाणे आपल्या स्थितीने असणार्‍या ब्रह्माचे जे अखंडत्व, त्या अखंडत्वास अध्यात्म हे नाव आहे. ॥19॥ मग ज्याप्रमाणे निर्मळ आकाशात एकदम निरनिराळ्या रंगाच्या मेघांच्या फळ्या कशा येतात, हे कळत नाही ॥20॥ त्याप्रमाणे त्या विशेष शुद्ध आणि निराकार अशा ब्रह्माचे ठिकाणी महत्-तत्व वगैरे भूतभेदाने ब्रह्मांडाचे आकार उत्पन्न व्हावयासच लागतात. ॥21॥ निर्विकल्प परब्रह्मरूपी माळ जमिनीवर मूळ संकल्प – (एकोऽहं बहु: स्याम्) रूपी अंकुर फुटतो आणि त्याबरोबर ब्रह्मगोळकांचे आकार दाट येतात. ॥22॥ त्या एकेक ब्रह्मांडामध्ये पाहावे, तो ते ब्रह्मांड बीजांनीच (मूळ संकल्पांनीच) भरलेले दिसते आणि एकेका ब्रह्मांडामध्ये होणार्‍या जाणार्‍या जीवांची (तर) गणतीही नाही. ॥23॥ मग त्या गोळकांमधील अंशरूपी एकेक जीव असंख्य आदिसंकल्प करावयास लागले. हे असो. याप्रमाणे सृष्टि फार वाढावयास लागली. ॥24॥ पण दुसर्‍याशिवाय एक परब्रह्मच सर्वत्र भरलेले आहे आणि त्याच्या ठिकाणी अनेकत्वाचा जसा पूर आला आहे ॥25॥ याप्रमाणे त्या ब्रह्माच्या ठिकाणी समविषमत्व कोठून आले, हे कळत नाही. तेथे उगीचच स्थावर जंगम पदार्थ उत्पन्न होतात. ते पाहिले असता प्रसवणार्‍या योनींचे लक्षावधी प्रकार दिसतात. ॥26॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari :  देवा आधियज्ञ तो काई, कवण पां इये देहीं…

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : मुंगिये मेरु नोलांडवे, मशका सिंधु न तरवे

    July 17, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : नाना कमळदळें, डोलविजती ढाळें

    July 16, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : पहिलें अहिंसेचें नांव, आम्हीं केलें जंव 

    July 15, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : मुंगिये मेरु नोलांडवे, मशका सिंधु न तरवे

    By Team AvaantarJuly 17, 2026

    अध्याय तेरावा जीवाचेनि नावें । तृणातेंही नोलांडवे । मग न लेखितां जावें । हे कें…

    सार्थ ज्ञानेश्वरी : नाना कमळदळें, डोलविजती ढाळें

    July 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पहिलें अहिंसेचें नांव, आम्हीं केलें जंव 

    July 15, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नाना रोगीं अहाळलीं, लोळतीं भूतें देखिलीं 

    July 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    पोई भाजी (मलबार स्पिनॅच, मायाळू) एक पौष्टिक प्रकार!

    July 17, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : मुंगिये मेरु नोलांडवे, मशका सिंधु न तरवे

    July 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 जुलै 2026

    July 17, 2026

    अग्रवाल इंडस्ट्रीमध्ये प्रेमाचा त्रिकोण!

    July 16, 2026

    अखेर उमा सासुबाईंशी खोटं बोललीच…

    July 16, 2026

    Recipe : चटपटीत सोया पॅकेट्स

    July 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 362
    • अवांतर 197
    • आरोग्य 130
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 492
    • फिल्मी 57
    • फूड काॅर्नर 238
    • मैत्रीण 24
    • ललित 783
    • शैक्षणिक 82
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    पोई भाजी (मलबार स्पिनॅच, मायाळू) एक पौष्टिक प्रकार!

    July 17, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : मुंगिये मेरु नोलांडवे, मशका सिंधु न तरवे

    July 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 जुलै 2026

    July 17, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.