Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : विदर्भ स्पेशल… तुरीच्या उसळीतील दिवसे!
    फूड काॅर्नर

    Recipe : विदर्भ स्पेशल… तुरीच्या उसळीतील दिवसे!

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 16, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, तुरीची उसळ, उसळीतील दिवसे, दिवसे, तुरीच्या उसळीतील दिवसे, विदर्भ स्पेशल, Turichi Usal, Usali divase, divase, Turichi Usal divase, Vidarbha Special, divse
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माधवी जोशी माहुलकर

    नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदीया, अकोला, अमरावती, बुलढाणा या विदर्भातील काही जिल्ह्यांमधील आपापल्या निरनिराळ्या खाद्यसंस्कृती आहेत. विदर्भाला लागून ज्या राज्यांच्या सीमारेषा आहेत तेथील लोक नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतरीत होऊन विदर्भातील मोठमोठ्या शहरांमध्ये रहायला आले आणि इथलेच होऊन गेलेत. याचमुळे इथे वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींची रेलचेल असावी, असे मला वाटतं. ‘तुरीच्या उसळीतील दिवसे’ हे मी नागपूरला रहायला आल्यानंतर प्रथमच ऐकले. यांचा आकार थोडा खोलगट दिव्यांसारखा आहे म्हणून कदाचित यांना ‘दिवसे’ म्हटलं जात असावं.

    उसळीसाठी साहित्य

    • अख्खे तुरीचे वाळवलेले दाणे – दोन वाट्या
    • मोठा कांदा – 1
    • लसूण – 5-6 पाकळ्या
    • आले – अर्धा इंच
    • टोमॅटो – 1 (आवडत असेल तर)
    • हिरव्या मिरच्या – 2
    • लाल तिखट – दोन ते अडीच चमचे
    • हळद – 1 चमचा
    • गरम किंवा गोडा मसाला – 1 चमचा
    • कढीपत्ता – 5-6 पाने
    • तेल – 1 पळीभर
    • हिंग – अर्धा लहान चमचा
    • मोहरी – 1 लहान चमचा
    • जिरे – 1 लहान चमचा
    • मीठ – चवीनुसार
    • गूळ – चवीनुसार

    दिवस्यांकरिता साहित्य

    • कणीक – 2 वाट्या
    • मीठ – चवीनुसार
    • जिरे – 1 लहान चमचा
    • ओवा – 1 लहान चमचा
    • तीळ – 1 चमचा
    • लाल तिखट – चवीनुसार (आवडत असेल तर)
    • हळद – 1 लहान चमचा

    पुरवठा संख्या – चार व्यक्तींसाठी

    एकूण लागणारा वेळ – सुमारे 45 मिनिटे

    हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… भातावरचे पिठले

    कृती

    1. प्रथम दोन वाट्या तुरीचे दाणे रात्रभर भिजत घालावे.
    2. दुसऱ्या दिवशी हे तुरीचे दाणे धुवून प्रेशर कुकरमध्या सहा ते सात शिट्ट्या घेऊन वाफवून घ्यावे. (कधी कधी तूर मऊसर शिजत नाही त्याकरिता प्रेशर कुकरच्या जास्त शिट्ट्या करुन घ्याव्या लागतात.)
      यादरम्यान दोन वाट्या कणकेमधे चवीनुसार मीठ, ओवा, तीळ आणि जिरे टाकून ते घट्टसर भिजवून वरून तेलाचा हात लावावा.
    3. नंतर पुन्हा एकदा ही कणीक चांगली मळून झाकून बाजूला ठेवावी.
    4. उसळीकरिता कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.
    5. आता कढईमधे पळीभर तेल टाकून त्यामधे जिरे, मोहरी तडतडल्यावर अर्धा चमचा हिंग टाकून लगेच कढीपत्ता, दोन हिरव्या मिर्च्यांचे तुकडे टाकावे.
    6. लगेच कांदा टाकावा आणि तो छान गुलाबीसर परतून झाला की, टोमॅटो टाकून तोही मऊसर होईपर्यंत तेलात परतून घ्यावा.
    7. नंतर आले, लसणाची पेस्ट करून त्यात टाकावी.
    8. थोडे परतल्यावर एक चमचा हळद, दोन ते अडीच चमचे लाल तिखट, एक चमचा गोडा मसाला किंवा गरम मसाला टाकून वरून थोडे पाणी टाकावे.
    9. आता शिजलेल्या तुरीचे दाणे या मिश्रणात टाकून चांगले ढवळून घ्यावे.
    10. उसळीचा रस्सा जरा सरबरीतच ठेवावा, त्यानुसारच उसळीत पाणी घालावे.
    11. रस्सा उकळेपर्यंत कणकेचे दिव्यासारखे खोलगट, परंतु पातळसर आकार करून ते तुरीच्या उसळीत सोडावेत आणि रश्श्यासोबत वाफवून घ्यावेत.
    12. तुरीच्या उसळीच्या रश्श्यात हे गरमागरम दिवसे कुस्करुन खाताना चवीला अतिशय सुंदर लागतात.

    हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… गोळाभात

    टीप

    • तुरीच्या उसळीतील दिवसे केले की, जेवणात दुसरा काही प्रकार करायची गरज नसते.
    • तोंडी लावायला ग्रीन सलाद, कांदा, लिंबू, लोणचे, दही घेता येते.

    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह त्या या वेबसाइटवर प्रसिद्ध केल्या जातील.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    March 22, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    By माधवी जोशी माहुलकरMarch 22, 2026

    मध्यंतरी माझ्या वाचनात असे आले की, सुप्रसिद्ध चरित्रअभिनेत्री दिवंगत लीला मिश्रा या जेवताना पक्की रसोईतील…

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 245
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn