Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    हिरव्या बांगड्या

    June 17, 2026

    स्मोकर्स कफ… शरीराने दिलेली वॉर्निंग बेल!

    June 17, 2026

    Recipe : काकडीचे स्वादिष्ट सांदण अन् खमंग घावन!

    June 17, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, June 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!
    फूड काॅर्नर

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 15, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किचन टीप्स, मी मराठी, अभिजात मराठी, फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस, फलाफल रेसिपी, हम्मस रेसिपी, ताहिनी सॉस रेसिपी, खमंग फलाफल हम्मस, फलाफल विथ हम्मस, हम्मस विथ फलाफल,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माधवी जोशी माहुलकर

    हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि बनवण्याची पद्धत पाहिली तर, आपल्याला आपल्या घरच्या पदार्थांची आठवण येईल. फलाफल आणि दक्षिण भारतात लोकप्रिय असलेल्या ‘मसाला वडा’मध्ये  (Chana Dal Vada) कमालीचे साम्य आहे. फलाफलमध्ये ‘छोले’ वापरतात, तर मसाला वड्यामध्ये ‘चणा डाळ’ वापरली जाते. दोन्ही कडधान्येच आहेत. वड्यांमध्ये डाळ न शिजवता फक्त भिजवून, जाडसर वाटून त्याचे गोळे तळले जातात. फलाफलमध्ये काबुली चणे भिजवून आणि थोड शिजवून मग ते वापरतात. फलाफलमध्ये कोथिंबीर आणि लसूण असते, तर आपल्या वड्यांमध्ये कढीपत्ता, कोथिंबीर, आले आणि हिरवी मिरची असते. उत्तर भारतात बनवले जाणारे राम लाडू (मूग डाळीचे वडे) किंवा साध्या डाळीच्या भज्यांशी फलाफलचे साधर्म्य आहे. दोन्ही पदार्थ प्रथिनांनी (Protein) समृद्ध असून संध्याकाळच्या नाश्त्यासाठी लोकप्रिय आहेत.

    हम्मस (Hummus) हे एक अतिशय आरोग्यदायी आणि चविष्ट ‘डिप’ आहे, जे काबुली चण्यांपासून बनवले जाते. हे फलाफल किंवा पिटा ब्रेडसोबत अप्रतिम लागते. हम्मसची तुलना आपण आपल्या काही पारंपरिक चटण्यांशी करू शकतो. जसे हमसमध्ये ‘ताहिनी’ (तिळाची पेस्ट) असते. आपल्याकडेही दाण्यांची किंवा तिळाची चटणी लसूण आणि लिंबू घालून केली जाते, जी चवीला हमससारखीच लागते. हम्मसचा मऊपणा आपल्या कडधान्यांच्या ‘हुलग्याचे माडगे’ किंवा ‘घट्ट पिठल्या’सारखा असतो. फक्त हम्मसमध्ये ऑलिव्ह ऑइल आणि लिंबाचा वापर जास्त असतो, तर पिठल्यात आपण बेसनाला फोडणी देतो.

    फलाफलसाठी साहित्य

    • छोले – 2 कप (रात्रभर भिजवून पाणी उपसलेले)
    • कांदा – 1 मध्यम (बारीक चिरलेला)
    • लसूण – 4-5 पाकळ्या
    • हिरव्या मिरच्या – 2
    • कोथिंबीर आणि पार्सले – प्रत्येकी अर्धा कप (बारीक चिरून)
    • मसाले – 1 चमचा जिरे पूड, 1 चमचा धणे पूड, अर्धा चमचा लाल तिखट.
    • पीठ – 2 मोठे चमचे चण्याचे पीठ किंवा मैदा (बाइंडिंगसाठी)
    • मीठ – चवीनुसार
    • तेल – तळणासाठी

    कृती

    1. भिजवलेले छोले, कांदा, लसूण, दोन हिरव्या मिरच्या, धणेपुड, जिरेपुड, लाल तिखट तसेच चवीनुसार मीठ, कोथिंबीर, पार्सले आणि सर्व मसाले एकत्र घ्या. ते मिक्सरमध्ये जाडसर (Coarse) वाटून घ्या. पेस्ट खूप मऊ करू नका.
    2. हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून त्यात चण्याचे पीठ आणि मीठ मिक्स करा. 15 ते 20 मिनिटे हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून गोळे व्यवस्थित वळता येतील.
    3. मिश्रणाचे लहान गोळे किंवा टिक्की बनवून गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्या. बाहेरून छान तांबूस रंगाचे आणि कुरकुरीत झाले की बाहेर काढा.

    टिप

    • फलाफलसाठी सात-आठ तास भिजवलेले ताजे छोले वापरा, आधीच शिजवलेले (कॅन केलेले) छोले वापरू नका, अन्यथा फलाफल तेलात फुटू शकतात.
    • गरम लादीपाव, पिटा ब्रेड किंवा गार्लिक ब्रेड मधून कापून त्यात थोडे हम्मस किंवा ताहिनी लावा, त्यात फलाफल ठेवा आणि सोबत टोमॅटो-कांद्याचे सॅलड घालून फलाफल रोल म्हणून खाऊ शकता.
    • हे फलाफल, काकडी/गाजराचे काप किंवा ब्रेडसोबत खाऊ शकता.

    हेही वाचा – Recipe : व्हेज ऑयस्टर मोमोज… सोबत टोमॅटोची चटणी!


    हम्मस बनवण्याचे साहित्य

    • काबुली चणे – 1 कप (रात्रभर भिजवून आणि मऊ शिजवून घेतलेले)
    • ताहिनी सॉस – 2 मोठे चमचे (पांढऱ्या तिळाची चटणी – रेसिपी खाली दिली आहे.)
    • लसूण – 2-3 पाकळ्या
    • लिंबाचा रस – 1 मोठा चमचा
    • ऑलिव्ह ऑइल – 2 मोठे चमचे
    • जिरे पूड – अर्धा चमचा
    • मीठ – चवीनुसार
    • थंड पाणी किंवा बर्फाचा खडा – गरजेनुसार (हम्मसला क्रीमी बनवण्यासाठी)
    • सजावटीसाठी – थोडे लाल तिखट (Paprika) आणि बारीक चिरलेली कोथिंबीर

    कृती

    1. रात्रभर भिजवलेले काबुली चणे कुकरमध्ये थोडे मीठ घालून एकदम मऊ (पेस्ट होईल इतके) शिजवून घ्या. शिजलेल्या चण्यांमधील पाणी काढून टाका.
    2. मिक्सरच्या भांड्यात किंवा फूड प्रोसेसरमध्ये शिजवलेले चणे, लसूण, ताहिनी पेस्ट, लिंबाचा रस, ऑलिव्ह ऑइल, जिरे पूड आणि मीठ एकत्र घेऊन सर्व साहित्य बारीक वाटून घ्या. मिश्रण खूप घट्ट वाटत असेल, तर त्यात एक-दोन चमचे थंड पाणी किंवा बर्फाचा खडा टाकून पुन्हा फिरवा. यामुळे हम्मसला हॉटेलसारखा पांढरट रंग आणि ‘क्रीमी’ पोत (Texture) येतो.
    3. तयार झालेले हम्मस एका बाऊलमध्ये काढून घ्या. चमच्याने मधोमध थोडा खड्डा करून त्यात थोडे ऑलिव्ह ऑईल ओता आणि वरून लाल तिखट आणि जिरे पूड भुरभुरून टाका.
    4. ताजे आणि पौष्टिक हम्मस तयार आहे!

    हेही वाचा – Recipe :  मिसळीचे वरण अर्थात मिश्र डाळींचे वरण


    ताहिनी सॉससाठी साहित्य

    (ताहिनी म्हणजे पांढऱ्या तिळाची चटणी. ही फलाफलची चव दुपटीने वाढवते.)

    • पांढरे तीळ – अर्धा कप
    • लसूण – 1-2 पाकळ्या
    • लिंबाचा रस – 2 चमचे
    • ऑलिव्ह ऑइल – 2 चमचे
    • थंड पाणी – आवश्यकतेनुसार
    • मीठ – चवीनुसार

    कृती

    1. तीळ मंद आचेवर हलके भाजून घ्या (रंग बदलू देऊ नका).
    2. मिक्सरमध्ये भाजलेले तीळ आणि तेल घालून पेस्ट तयार करा.
    3. आता त्यात लसूण, लिंबाचा रस आणि मीठ टाका. हळूहळू थोडे थंड पाणी घालून मिक्सर फिरवा, जोपर्यंत चटणी पांढरट आणि मऊ (Creamy) होत नाही, तोपर्यंत ती वाटून घ्यावी.

    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर किंवा

    9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

    तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : काकडीचे स्वादिष्ट सांदण अन् खमंग घावन!

    June 17, 2026 फूड काॅर्नर

    शिळ्या पोळ्यांचा सिंधी जलवा — “सेयाल फुलका”

    June 14, 2026 फूड काॅर्नर

    सुदाम्याकडून मित्रप्रेमाच्या पोह्याची ‘पुरचुंडी’ ते नागपूरचे तर्री पोहे!

    June 14, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : काकडीचे स्वादिष्ट सांदण अन् खमंग घावन!

    By Team AvaantarJune 17, 2026

    काकडीचे सांदण साहित्य तांदळाचा रवा – चार वाट्या चिरलेला गूळ – तीन वाट्या चांगली जून…

    शिळ्या पोळ्यांचा सिंधी जलवा — “सेयाल फुलका”

    June 14, 2026

    सुदाम्याकडून मित्रप्रेमाच्या पोह्याची ‘पुरचुंडी’ ते नागपूरचे तर्री पोहे!

    June 14, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल लबाड वांगी किंवा फसवी वांगी!

    June 12, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    हिरव्या बांगड्या

    June 17, 2026

    स्मोकर्स कफ… शरीराने दिलेली वॉर्निंग बेल!

    June 17, 2026

    Recipe : काकडीचे स्वादिष्ट सांदण अन् खमंग घावन!

    June 17, 2026

    Dnyaneshwari : खडकीं जैसें वर्षलें, कां आगीमाजीं पेरिलें 

    June 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 जून 2026

    June 17, 2026

    विहिरीतला आवाज…

    June 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 331
    • अवांतर 190
    • आरोग्य 121
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 457
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 224
    • मैत्रीण 21
    • ललित 710
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    हिरव्या बांगड्या

    June 17, 2026

    स्मोकर्स कफ… शरीराने दिलेली वॉर्निंग बेल!

    June 17, 2026

    Recipe : काकडीचे स्वादिष्ट सांदण अन् खमंग घावन!

    June 17, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.