Thursday, February 19, 2026

banner 468x60

Homeफूड काॅर्नरKitchen Tips : दह्याची कोशिंबीर, वांग्याचे भरीत आणि टोमॅटो प्युरी करताना…

Kitchen Tips : दह्याची कोशिंबीर, वांग्याचे भरीत आणि टोमॅटो प्युरी करताना…

रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी आहे त्याच सामुग्रीद्वारे काही नवनवीन प्रयोग केले जातात… याच टिप्स इतर महिलांनाही उपयोगी पडतात. ‘फूड कॉर्नर’मध्ये दह्याची कोशिंबीर, वांग्याचे भरीत आणि टोमॅटो प्युरी करताना या टिप्स वापरून पाहा.

  • दही घालून केलेली काकडी, टोमॅटो, गाजर यांची कोशिंबीर थोड्या वेळाने पाणी सुटल्याने अगदीच पातळ होते. डब्यात देण्यासही त्यामुळे कंटाळा केला जातो. त्यासाठी कोशिंबिरीचे साहित्य चिरल्यानंतर त्यात साखर, मीठ घालून बाजूला ठेवा. सुटलेले पाणी दाबून दाबून घ्या आणि ते पाणी बाजूला ठेवा. त्याच वेळी चाळणीवर पातळ फडके घालून दही त्यावर घाला. त्यातून निथळलेले पाणी बाजूला ठेवा. नंतर दोन्ही घट्टपदार्थ एकत्र करून कालवून कोशिंबीर करा. अशी घट्ट कोशिंबीर डब्यातही सहज देता येते. घट्टसर राहिल्याने चवही छान लागते. वेगळे ठेवलेले दोन्ही पदार्थांचे पाणी एकत्र पिता येते किंवा कोणत्याही आमटीत अथवा पातळ भाजीत घालता येते. त्याने पौष्टिकताही वाढते, ते वाया जात नाही.

हेही वाचा – Kitchen Tips : लाल भोपळ्याचे रायते, कोफ्ता करी, आलू-मटर करताना…

  • भरताची वांगी भाजताना दोन-तीन वांगी तेल लावून तव्यावर ठवून त्यावर पातेले झाकावे आणि गॅस चालू करावा. तीन-चार मिनिटांनी वांगी उलट-सुलट करावीत. त्यामुळे दोन-तीन फायदे होतात. वांग्याचे जळलेले साल बर्नरमध्ये जात नाही, घाईच्या वेळी सतत गॅससमोर उभे राहावे लागत नाही तसेच गॅस आणि वेळ वाचतो.
  • वांग्याच्या भाजीसाठी वांगे नेहमी पुढून आडवा छेद आणि देठाकडून उभा छेद दिल्यास वांगी लवकर मऊ होतात.
  • टोमॅटो प्युरी करताना नेहमी टोमॅटो पाण्यात शिजवून त्याचे साल काढून नंतर मिक्सरमधून रस काढतो. त्याऐवजी टोमॅटोचे वरचे टोक जरासे कापावे आणि देठाकडील भाग हातात धरून टोमॅटो किसावा. साल व बिया वर राहतात आणि गर केवळ खाली पडतो. तो भाजीत (पनीर मटर, राजमा किंवा मटण, चिकन) घालू शकतो. त्यामुळे वेळ तर खूपच वाचतो आणि गॅसही वाचतो.
  • तांबडा भोपळा, दुधी भोपळा, देठी या दह्यातील भरताकरिता मोहरी-मिरची वाटण्यापेक्षा घरात असलेल्या खारातील मिरच्यांचे दोन-चार तुकडे कुस्करावेत. चव छान येत अन् काम पटकन होते.

हेही वाचा – Kitchen Tips : मटार पुलाव, शाही पनीर, चाकवताची भाजी बनवताना वापरा या टिप्स

  • फ्रीजमध्ये न ठेवता कोथिंबीर आणि कढीपत्ता ताजा ठेवता येतो. कोथिंबीर, कढीपत्त्यासारख्या वस्तू फुलदाणीत ठेवून त्या पाण्यात एक्सपायरी डेट उलटून गेलेली एखादीच औषधी गोळी टाकावी. पाने अगदी ताजी राहतात. हवी तेव्हा खुडून घेता येतात.
  • शेवग्याच्या शेंगा आमटीत घालताना आधी त्या तेलात परताव्यात. नंतर मिठाच्या पाण्यात उकडून घेऊन आमटीत घालाव्यात. लवकर शिजतात आणि अधिक चवदार लागतात.

तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.

(‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!