Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Ayurveda : वसंताचे ‘ब्रह्मास्त्र’ – वासंतिक वमन पंचकर्म

    April 17, 2026

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Kitchen Tips : साऊथ इंडियन डिशेस बनवताना या टिप्स वापरून पाहा
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : साऊथ इंडियन डिशेस बनवताना या टिप्स वापरून पाहा

    Team AvaantarBy Team AvaantarOctober 24, 2025No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, साऊथ इंडियन डिश, मेदूवडा, इडली पीठ, खमण, ढोकळा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये अशाच काही टीप्स पाहूयात –

    • मेदूवड्यासाठी उडदाची डाळ भिजत टाकताना त्यात थोडा भाजलेला पापडखार (डाळीएवढा) घालावा म्हणजे तळताना तेल जास्त लागत नाही. वडे हलके आणि खुसखुसशीत होतात.
    • इडलीचे पीठ पातळ झाले असल्याचे आयत्यावेळी लक्षात आल्यास काय करावे, हा प्रश्न पडतो. डाळ किंवा रवा मिसळणे अशक्य असते. तेव्हा जाड पोहे घेऊन मिक्सरमधून रवा काढावा आणि मिसळावा. इडल्या नेहमीप्रमाणेच छान आणि अधिक जाळीदार होतात.
    • इडलीचा रवा भिजविल्यावर आणि त्यात उडदाची भिजवलेली डाळ बारीक करून घातल्यानंतर, एका कांद्याच्या चार फोडी करून त्या भिजविलेल्या पिठात घालाव्यात. म्हणजे, थंडीच्या दिवसातसुद्धा पीठ लवकर फरमेंट होते आणि इडली सुंदर बनते.
    • मसाला डोसा करताना, डोशाच्या पिठात उडीद डाळ आणि तांदूळ दळतानाच त्याबरोबर एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा आणि एक कांदा (कच्चा) घालून हे पीठ दळावे. तसेच, याच पिठात एक टी-स्पून मेथ्या भिजवून घातल्यास वेगळीच चव येते. कच्चा कांदा आणि बटाटा घातल्याने डोसे कुरकुरीत (पेपर डोशाप्रमाणे) करता येतात. डोसे तव्यावर घालताना आधी तेल न घालता मिठाच्या पाण्याचा शिपका मारावा आणि स्वच्छ फडक्याने तवा पुसून मगच त्यावर पीठ पसरावे.

    हेही वाचा – Kitchen Tips : लाल भोपळा, खरबूज आणि कलिंगड यांच्या बियांचा वापर

    • भजी करतेवेळी पालक, बटाट्याचे काप, मिरची इत्यादी जिन्नस 15 ते 20 मिनिटे आधी तुरटीच्या पाण्यात भिजत घालाव्यात. भजी कुरकुरीत व स्वादिष्ट होतात.
    • ढोकळा करताना एखादे वेळी पीठ नीट फुलत नाही किंवा मधे गच्च राहते. बराच वेळ गॅसवर ठेवूनसुद्धा पीठ मनासारखे फुलत नाही. त्याची कारणे म्हणजे पीठ फार जुने होणे किंवा नीट न आंबणे असे असू शकते. अशा वेळी ते पीठ खाली काढून ताटात पसरावे, त्यात त्याच्या निम्म्याने तांदळाचे पीठ किंवा ब्रेड क्रम्स, बारीक कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर घालून थोडेसे गरम तेल घालावे. नंतर त्याचे छोटे छोटे कबाब करावेत. कोणत्याही चटणीबरोबर द्यावे.
    • काही वेळा बटाटे वडे करताना बटाटे वड्याचा मसाला संपतो आणि फक्त पातळ चण्याचे पीठ उरते. तेव्हा ते तसेच न ठेवता, झाऱ्यातून अथवा स्टीलच्या चाळणीतून त्याची बुंदी पाडावी आणि दह्यामध्ये टाकून रायता करावा. एक स्पेशल डिश तयार होते.

    हेही वाचा – Kitchen Tips :  कधीही करा फोडणीचा भात अन् सोबत झटपट दही

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : उन्हाळा स्पेशल चिवळीची भाजी!

    April 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : अशी बनवा खमंग कचोरी!

    April 11, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    By Team AvaantarApril 16, 2026

    रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही…

    Recipe : उन्हाळा स्पेशल चिवळीची भाजी!

    April 12, 2026

    Recipe : अशी बनवा खमंग कचोरी!

    April 11, 2026

    Kitchen Tips : शिळ्या भाताच्या चकल्या, मसालेभात, रस्साभाजी करताना…

    April 7, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Ayurveda : वसंताचे ‘ब्रह्मास्त्र’ – वासंतिक वमन पंचकर्म

    April 17, 2026

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 269
    • अवांतर 182
    • आरोग्य 102
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 386
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 195
    • मैत्रीण 18
    • ललित 558
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Ayurveda : वसंताचे ‘ब्रह्मास्त्र’ – वासंतिक वमन पंचकर्म

    April 17, 2026

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026
    Most Popular

    Ayurveda : वसंताचे ‘ब्रह्मास्त्र’ – वासंतिक वमन पंचकर्म

    April 17, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.