Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    माझी सरगुंड्यांची घसरगुंडी!

    June 19, 2026

    Dnyaneshwari : संताचेनि अंगलगें, पापातें जिणणें गंगे

    June 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 19 जून 2026

    June 19, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, June 19
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Kitchen Tips : वांग्याचे भरीत अन् कढी गोळे बनविण्यासाठी या टिप्स वापरून पाहा…
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : वांग्याचे भरीत अन् कढी गोळे बनविण्यासाठी या टिप्स वापरून पाहा…

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 7, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, गवारीची भाजी, कढी गोळे, साबुदाणा खिचडी, वांग्याचे भरीत, भाजीचा मसाला, सुगरणीचा सल्ला,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये गवारीची भाजी, कढी गोळे, साबुदाणा खिचडी, वांग्याचे भरीत बनविण्याच्या टिप्स पाहूयात.

    • गवारीची भाजी करताना मीठ-गूळ घालताना तीन-चार चमचे दूध घालावे. गवारीच्या भाजीचा उग्रपणा कमी होतो. चटकन शिजते, खमंगपणा वाढून रुचकर होते.
    • साबूदाणा भिजत घालताना त्यात तीन-चार चमचे दूध घातल्यास तो साबुदाणा मऊ आणि मोकळा होतो.
    • कढी नेहमी करतो तशीच करावी, आवडेल त्या चवीची आणि स्वादाची, पण पाहिजे असल्यास एक दिल्ली गाजराचा जाड किसणीने किसलेला किस, हिरव्या मिरच्यांचा ठेचा, मीठ, जिरे पावडर, कोथिंबीर घालून मिश्रण तयार करावे. त्यात जाडसर बेसन घालून छोटे छोटे गोळे करावेत आणि कढीला उकळी आली की, त्यात सोडावे. दोन मिनिटांनी कढी खाली उतरवावी. या पिवळ्या आणि सोनेरी रंगाच्या कढीत केशरी रंगाचे गोळे खूप छान दिसतात.आणखी एक प्रकार करता येऊ शकतो. हवे असल्यास गाजराचे गोल काप, काकडीचे काप, एखाद्या फणसाचे गरे, पिकलेल्या केळ्यांचे काप किंवा शेवग्याची फुले कढीला उकळी आल्यानंतर टाकावीत. अशी ही कढी वेगवेगळ्या स्वादाची आणि चवीची तयार होते.

    हेही वाचा – Kitchen Tips : कोबीचे रायते, कांद्याची कोशिंबीर अन् टोमॅटोचे सूप तयार करताना…

    • आपण भरताची वांगी भाजतो, त्यावेळी वांग्याला थोडा तेलाचा हात लावावा. वांग्याला चार-पाच छिद्रे पाडावीत. त्यातील दोन-तीन छिद्रांत सोललेल्या लसणीच्या पाकळ्या खुपसून घालाव्यात. तसेच हिरवी मिरचीही एखाद्या छिद्रात खुपसून ठेवावी आणि नंतर वांगे भाजावे. छिद्र केल्यामुळे वांगी आतून छान भाजून तर निघतातच, पण लसूण आणि मिरचीमुळे भरताला एक आगळीच चव येते. नंतर वांगी गार झाल्यावर सोलून नेहमीप्रमाणे भरीत करावे.

    हेही वाचा – Kitchen Tips : खमण ढोकळा, डोसा, ऑम्लेट बनवताना या टिप्स वापरून पाहा

    • नेहमी तयार मसाल्याच्या भाज्या खाऊन कंटाळा येतो. कधी कधी भाजीला दाण्याचे कूट घालावे लागते आणि कूट घातल्यावर भाजीचा रंग बदलतो. त्यासाठी किसलेले खोबरे एक वाटी, अर्धी वाटी धणे, एक वाटी दाणे, पाव वाटी जिरे हे सर्व जिन्नस भाजून कुटून ठेवावे. वाटल्यास त्यात लसूणसुद्धा घालावा. भाजी फोडणीस टाकण्याच्या अगोदर तेलात मोहरी, हिंग टाकून हा मसाला परतून घ्यावा आणि वाटल्यास जास्त दाण्याचे कूटही घालावे. लाल रंगावर परतून झाल्यावर थोडे पाणी टाकून नंतर भाजीच्या फोडी टाकून भाजी शिजवावी. असेच दाण्याचे कूट आणि खोबऱ्याचा किस तेलात परतून भेंडीची भाजी करता येते. यामुळे भाजी तेलकट लागत नाही, तसेच दाट रस्सा होण्यास मदत होते. वरील मसाल्यात लसूण असला, तरी आठवडाभर टिकून राहतो.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    माझी सरगुंड्यांची घसरगुंडी!

    June 19, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : काकडीचे स्वादिष्ट सांदण अन् खमंग घावन!

    June 17, 2026 फूड काॅर्नर

    शिळ्या पोळ्यांचा सिंधी जलवा — “सेयाल फुलका”

    June 14, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    माझी सरगुंड्यांची घसरगुंडी!

    By माधवी जोशी माहुलकरJune 19, 2026

    आज सरगुंडे हा विदर्भातील उन्हाळ्यात तयार करण्यात येणारा पदार्थ आठवण्याचे कारण म्हणजे लग्नानंतर दुसऱ्यांदा हा…

    Recipe : काकडीचे स्वादिष्ट सांदण अन् खमंग घावन!

    June 17, 2026

    शिळ्या पोळ्यांचा सिंधी जलवा — “सेयाल फुलका”

    June 14, 2026

    सुदाम्याकडून मित्रप्रेमाच्या पोह्याची ‘पुरचुंडी’ ते नागपूरचे तर्री पोहे!

    June 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    माझी सरगुंड्यांची घसरगुंडी!

    June 19, 2026

    Dnyaneshwari : संताचेनि अंगलगें, पापातें जिणणें गंगे

    June 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 19 जून 2026

    June 19, 2026

    ओम सोशल मीडियाय नमः

    June 18, 2026

    हेच पक्ष कार्यकर्त्याचं वास्तव!

    June 18, 2026

    अग्रवाल कपंनीच्या नवीन सीईओची घोषणा झाली अन्…

    June 18, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 333
    • अवांतर 190
    • आरोग्य 121
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 459
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 225
    • मैत्रीण 21
    • ललित 715
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    माझी सरगुंड्यांची घसरगुंडी!

    June 19, 2026

    Dnyaneshwari : संताचेनि अंगलगें, पापातें जिणणें गंगे

    June 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 19 जून 2026

    June 19, 2026
    Most Popular

    हेच पक्ष कार्यकर्त्याचं वास्तव!

    June 18, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.