Sunday, March 1, 2026

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधPanchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 28 फेब्रुवारी 2026

Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 28 फेब्रुवारी 2026

दर्शन कुलकर्णी

  • आज, दिनांक : 28 फेब्रुवारी 2026; वार : शनिवार
  • भारतीय सौर : 09 फाल्गुन शके 1947; तिथि : द्वादशी 20:43; नक्षत्र : पुनर्वसु 09:34
  • योग : सौभाग्य 17:02; करण : बव 09:36
  • सूर्य : कुंभ; चंद्र : कर्क; सूर्योदय : 07:00; सूर्यास्त : 18:42
  • पक्ष : शुक्ल; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
  • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

वेद कन्सल्टन्सी / 9987433660


आजचे राशीभविष्य

मेष

मानसिकदृष्ट्या आज अस्वस्थ असाल. छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येऊ शकतो, म्हणून प्रतिक्रिया देण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणे उत्तम. कामाच्या ठिकाणी लक्ष विचलित होऊ देऊ नका, एखादे काम हाती घेतले तर ते पूर्ण कराल. आर्थिक स्थिती स्थिर राहील. घरी कोणी काही बोलले तर त्याबद्दल वाईट वाटू शकते, मात्र ते तुमच्या भल्यासाठी आहे, हे लक्षात घ्या. आज डोकेदुखी किंवा डोळ्यांची जळजळ होऊ शकते, काळजी घ्या.

वृषभ

आज वातावरण अनुकूल असेल. कामावर सकारात्मक वाटेल आणि इतरांकडून पाठिंबा मिळेल. व्यवसाय किंवा नोकरीतील प्रलंबित काम पुढे सरकू शकते. चर्चा केल्याने नात्यातील गैरसमज दूर होऊ शकतात. आर्थिक बाबींबाबत तणाव निर्माण होईल, परंतु दिवसअखेरीस गोष्टींवर सामोपचाराने तोडगा काढला जाईल. खाण्यापिण्याच्या सवयींबाबत निष्काळजीपणा दाखवू  नका, अन्यथा पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

मिथुन

व्यवसायाशी संबंधित नवीन कल्पना येतील आणि लोकांशी त्याबाबत बोलल्याने त्या आकार घेऊ शकतील. व्यवसायाच्या किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी मदत मिळू शकेल. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला  आहे. फोन कॉल, मेल किंवा मेसेजद्वारे एखादी चांगली बातमी मिळू शकते. विचारपूर्वक खर्च करणे चांगले. थोडा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे आराम करण्यासाठी वेळ काढा.

कर्क

आज भावना थोड्या जास्त तीव्र असतील. एखाद्या प्रिय व्यक्तीच्या वक्तव्यामुळे भावना दुखावू शकतात. अनावश्यक विचार टाळा आणि फक्त महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. आज काम करण्याची इच्छा कमी असेल, मात्र जबाबदाऱ्या पूर्ण कराव्याच लागतील. पैशांबाबत एखादा निर्णय घ्यावा लागू शकतो. आज वाताचा विकार किंवा पोटाची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.

सिंह

आज आत्मविश्वास उंचावेल. लोक तुमचे ऐकतील आणि तुमची प्रतिमा मजबूत होईल. कामात पुढाकार घेण्याची संधी मिळू शकते. मनात एखाद्याबद्दल अढी असेल तर, चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवा. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा; कर्ज घेणे किंवा अनावश्यक खरेदी करणे टाळा. दिवसाच्या पूर्वार्धात उत्साही रहाल, परंतु नंतर कामाच्या ताणाने लवकर थकवा देखील येईल.

कन्या

जे काही करायचे ठरवले आहे ते पूर्ण करण्यासाठी दृढनिश्चयी व्हावे लागेल. कठोर परिश्रमाने वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. घरातील काही महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर दिली जाईल. आज आर्थिक स्थिरता कायम असेल. कोणालाही  पैसे उधार देण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. गुडघेदुखी किंवा टाचदुखीचा त्रास होऊ शकतो. म्हणून जास्त धावपळ टाळा.

तुळ

कामाचा ताण जास्त असेल. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकल्याने दिवस वाया जाऊ शकतो, म्हणून व्यावहारिक राहा. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात जुन्या समस्या पुन्हा उद्भवू शकतात. वरिष्ठ / तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या. घरातील वडिलांच्या सल्ल्याचे पालन करणे चांगले. आर्थिक योजना बनवणे फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या बाबतीत विचार करता आज पाठीत किंवा पायात सौम्य वेदना जाणवू शकतात.

हेही वाचा – एक अकेला इस शहर में…

वृश्चिक

नवीन योजना आखल्या जातील, पण एकाच वेळी सर्व काही करण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा, कामात गोंधळ निर्माण होईल. एखाद्या विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या. आर्थिक परिस्थिती चांगली असेल. मित्रांशी बोलल्याने तुमचा मूड हलका होईल. कमी झोपेमुळे आज चिडचिड वाढेल. कौटुंबिक आघाडीवर शांतता असेल.

धनु

नातेसंबंधांमध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे. जोडीदाराशी वाद होऊ शकतो, मात्र समजूतदारपणामुळे परिस्थिती हाताळण्यास मदत होईल. कामाच्या ठिकाणी सहाकार्याची भूमिका फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिरता असेल, मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आज आरोग्य चांगले असेल, मात्र मोबाइल फोनचा दीर्घकाळ वापर केल्यास डोळ्यांना त्रास होऊ शकतो.

मकर

मानसिकदृष्ट्या अस्वस्थ वाटू शकते. जुन्या आठवणी मनात फेर धरतील किंवा एखाद्याची आठवण येत राहिल. काम करण्याची इच्छा कमी होईल, मात्र जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतील. अचानक मोठा खर्च उद्भवू शकतो. व्यवसायात भागीदारीचे प्रस्ताव येतील, विचारपूर्वक निर्णय घ्या. घरी कोणाशी तरी मोकळेपणाने बोलल्याने ताण हलका होईल.

कुंभ

आज तुमचा मूड सुधारेल. बाहेर जाण्याची किंवा काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करण्याची इच्छा होईल. कामावर नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात किंवा एखादी नवीन संधी येऊ शकते. मित्रांशी गप्पा मारल्याने एकदम फ्रेश वाटेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल, मात्र बचतीकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. थोडासा थकवा वगळता, आरोग्य चांगले राहील.

मीन

कामावर लक्ष केंद्रित कराल आणि कामाला हळूहळू योग्य दिशा मिळेल. कुटुंब आणि मित्रांकडून पाठिंबा मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. डोकं शांत ठेवून कामे वेगाने पूर्ण होतील, हे लक्षात ठेवा. आर्थिक स्थिरता असेल. आरोग्य चांगले राहील. मात्र कमी पाणी पित असाल तर अशक्तपणा जाणवू शकतो.


दिनविशेष

मराठी चित्रपटसृष्टीतील ‘विनोदाचा राजा’ राजा गोसावी

टीम अवांतर

प्रसिद्ध मराठी नाट्य आणि चित्रपट अभिनेते राजा गोसावी यांचा जन्म 28 मार्च 1925 रोजी सातारा जिल्ह्यातील सिद्धेश्वर कुरोली (ता.  खटाव) येथे झाला. मेळे, गाणी, नकला आणि नाटके यांची त्यांना लहानपणापासूनच आवड होती. सुरुवातीला ते गंगाधरपंत लोंढेंच्या राजाराम संगीत नाटक मंडळीत आणि दिग्दर्शक मास्टर विनायक यांच्या प्रफुल्ल पिक्चर्स या चित्रपटनिर्मिती संस्थेत लहानमोठी कामे करत होते. नंतर दामुअण्णा मालवणकरांच्या प्रभाकर नाट्य मंदिरात ते प्रॉम्प्टरचे काम करायला लागले. त्यांच्या भावबंधन या मराठी नाटकामध्ये त्यांना पहिल्यांदा रखवालदाराची भूमिका मिळाली. त्यानंतर या नाटकातील विविध व्यक्तिरेखा साकारण्याची संधी त्यांना मिळाली. पुण्यातील ‘भानुविलास’ या चित्रपटगृहामध्ये तिकिट विक्रेता म्हणून देखील ते काम करत होते. 1952 मध्ये दत्ता धर्माधिकारी यांच्या ‘अखेर जमलं’ या विनोदी चित्रपटाद्वारे राजा गोसावींनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले.

त्याचवर्षी आलेल्या राजा परांजपे दिग्दर्शित ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटामध्ये त्यांनी राजा परांजपे यांच्या मित्राची व्यक्तिरेखा साकारली. त्यानंतर अबोली, महात्मा, बोलविता धनी, सौभाग्य, शुभमंगल, बेबी, पुनवेची रात, गंगेत घोडं न्हालं, आंधळा मागतो एक डोळा, जगावेगळी गोष्ट, गाठ पडली ठकाठका, आलिया भोगासी, देवघर, झालं गेलं विसरून जा, दोन घडीचा डाव, अवघाची संसार, पैशांचा पाऊस, वरदक्षिणा, भाग्यलक्ष्मी, वाट चुकलेले नवरे, कामापुरता मामा, येथे शहाणे राहतात, या सुखांनो यासारख्या विनोदी, सामाजिक आणि तमाशाप्रधान चित्रपटांत भूमिका केल्या. ‘हा खेळ सावल्यांचा’ यासारख्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची लक्षवेधी भूमिका देखील केली.

हेही वाचा – डॉक्टरनं सांगितल्यावर सर्वांनीच वाढविली दाढी अन्….

मराठी रंगभूमीवरही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. उधार उसनवार, एकच प्याला, करायला गेलो एक, कवडीचुंबक, घरोघरी हीच बोंब, डार्लिंग डार्लिंग,  तुझे आहे तुजपाशी, नटसम्राट, पुण्यप्रभाव, प्रेमसंन्यास, भाऊबंदकी, भावबंधन, याला जीवन ऐसे नाव, लग्नाची बेडी, संशय कल्लोळ, सौजन्याची ऐशीतैशी इत्यादी अनेक सामाजिक, विनोदी आणि कौटुंबिक नाटकांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या छटा असलेल्या भूमिका केल्या.

1950 ते 1980 अशी तीन दशके राजा गोसावींनी त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांनी आपल्या कारकीर्दीत पंच्याऐंशीपेक्षा अधिक चित्रपट तर सुमारे चाळीस नाटकांमधून अभिनय केला. निरागस आणि बोलका चेहरा, सहज संवादफेक करून हशा मिळवण्याचे कौशल्य ही त्यांच्या अभिनयाची बलस्थाने होती. शहरी, मध्यमवर्गीय, भाबडा, निरागस असा नायक त्यांनी अनेक चित्रपटात रंगवला.

1995 साली अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान राजा गोसावी यांना मिळाला. नाट्यपरिषदेने बालगंधर्व हा पुरस्कार देऊन त्यांच्या अभिनयाचा गौरव केला. 28 फेब्रुवारी 1998 रोजी पुणे येथे एका नाटकाच्या वेळीच हृदयविकाराचा झटका येऊन राजा गोसावी यांचे निधन झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!