Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : गाईची तृषा हरूं, कां व्याघ्रा विष होऊनि मारूं

    June 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 जून 2026

    June 18, 2026

    बंधनं… आयुष्याचं ऑक्सिजन!

    June 17, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, June 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » गुरुजी म्हणतात, तुझा जन्म काही कारणासाठी आहे आराध्या!
    ललित

    गुरुजी म्हणतात, तुझा जन्म काही कारणासाठी आहे आराध्या!

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 27, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठीकथा, प्रेमकथा, लव्हस्टोरी, भेटशी नव्याने, आराध्याचा नवा अध्याय, आराध्या आणि शर्वाय जहागीरदार, शर्वायची आराध्यावर मर्जी, माधवची आराध्यावर नजर, आराध्याकडील बॉक्सचे गूढ, माधवचे कटकारस्थान, शर्वाय आराध्या प्रेमकहाणी, शर्वायचे आराध्यावर प्रेम
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    प्रणाली वैद्य

    भाग – 14

    सगळे स्तब्ध झाले. प्राजक्ताला आश्चर्याचा धक्का बसला आराध्या पण लगेच जायला निघाली ..तिने लगेच मूक संमती दिली. सुमित्रा मावशींच्या चेहऱ्यावर मात्र  आनंद स्पष्ट दिसत होता… जणू काही त्यांना ही काही गवसलं होतं! निशा मात्र आतून संतप्त झाली होती… “ही काळी आराध्या, आता गुरूंची शिष्या बनणार?” तिच्या मनात कुजलेल्या विषासारखे विचार सळसळू लागले…

    रात्र गडद होत चालली होती. घरातील सगळे झोपी गेले होते. पण प्राजक्ताच्या खोलीत मंद प्रकाशात एक शांत, विचारमग्न वातावरण निर्माण झालं होतं. तिच्या अंगावर पिवळ्या रंगाची साडी होती, केस मागे गुंडाळलेले आणि डोळ्यात अजूनही दिवसभराच्या गोंधळाची सावली होती. तिने बाहेरून कुणीतरी येत असल्याचं पावलांच्या आवाजाने ओळखलं. दरवाजा वाजताच तिने हळूच उघडलं. सुमित्रा मावशी उभ्या होत्या. मागून सुशांतही नुकताच ऑफिसचं काही काम संपवून तिथे आला होता. सुमित्रा मावशी आत आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीर, पण प्रेमळ भाव होता.

    “प्राजक्ता, सुशांत… मी उद्या आराध्याला घेऊन जाणार आहे. पण…”

    त्यांच्या स्वरात काळजी मिसळलेली होती, “…त्याआधी मी तिला आमच्या गुरुजींना भेटवणार आहे.”

    प्राजक्ता एक क्षण स्तब्ध झाली. सुशांतही ऐकू लागला, पण दोघांच्याही चेहऱ्यावर गोंधळ दिसत होता.

    “तुमचं मुल आहे म्हणून तुम्ही तिच्यावर प्रेम करता, पण मी एक बाहेरची असूनही तिच्यातलं काहीतरी वेगळं, विलक्षण ओळखू शकले.”

    “इतक्या लहान वयात हिने उपेक्षा… ही नाजूक मनाची मुलगी दिवसेंदिवस आतून कठीण होत चालली आहे. हे चांगलं नाही.”

    त्या थांबल्या. हळूच आराध्याकडे अन् नंतर खिडकीतून बाहेर पाहात म्हणाल्या,

    “सध्या तिचं लक्ष पुढील शिक्षणावर, जीवनघडणीवर असायला हवं. पण तिच्यावर जबाबदाऱ्या टाकून तिला घरातच गुंतवलं जातंय, हे योग्य वाटत नाही.”

    प्राजक्ताच्या डोळ्यात पाणी आलं. तिला आपल्या मुलीसाठी खूप काही वाटायचं, पण घरातील परिस्थिती, अपेक्षा, आणि दुसऱ्यांचं वर्चस्व यामध्ये ती गप्प राहायची.

    सुमित्रा मावशी पुढे म्हणाल्या, “मी काही मोठं नाही करणार… पण तिच्या जीवनाचं काही दार उघडेल, असा विश्वास आहे. गुरुजी तिला काही मार्गदर्शन देतील… मग तिने काय करावं, ते तिच्यावर सोपवेन.”

    हेही वाचा – समोर माधव होता, आराध्याच्या मनात डेंजर अलार्म वाजायला लागला…

    सुशांतला कुठे काही बोलता येईना. त्याने एकट्याने खूप वेळा आराध्याच्या तडजोडी पाहिल्या होत्या. शेवटी त्याने मान डोलावली.

    “तुम्ही जे योग्य समजता, ते करा. आम्ही तुम्हाला थांबवणार नाही.”

    सुमित्रा मावशी हसल्या… “मुली सोन्यासारख्या असतात, पण त्यांना घडवायला सोनार हवाच ना?”

    त्या उठल्या, डोक्यावरचा पदर सावरत दरवाज्यापर्यंत गेल्या. जाताना म्हणाल्या, “सकाळी लवकर निघायचंय. आराध्या तयार असेल.”

    प्राजक्ता त्या रात्री झोपली खरी… पण मनात आराध्याच्या भविष्याच्या विचारांचे हिंदोळे सुरू होते…

    सकाळची थंडी अजून हवेत दाटलेली होती. घरात सगळे अजून अंथरुणात होते, पण आराध्या मात्र पांघरूण दूर करून उठली होती. तिचं मन अगदी शांत होतं. पण त्याच वेळी कुठे तरी आतून उत्कंठा आणि थोडीशी भीतीही होती. सुमित्रा आजींच्या सांगण्यावरून ती तयार झाली होती, पण कुणा गुरुजींना भेटायचं, काय बोलणार ते सगळं अजूनही अंधारात होतं…

    सुमित्रा आजी तयार होऊन तिची वाटच पाहत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर आज एक वेगळी चमक होती… जणू त्यांना जे करायचं होतं, तो दिवस अखेर उगवला होता. रस्ता दाट जंगलातून होता. दोघींची गाडी एका लहानशा गावाजवळ वळली. तिथून पुढे सुमित्रा आजी आणि आराध्या पायीच चालायला लागल्या. दर पावलागणिक निसर्गच जणू जागृत होत होता. पक्ष्यांचे आवाज, झाडांमधून डोकावणारा सूर्यकिरण आणि गवतातून उमटणारी कुजबुज… आराध्याला कुठल्याशा जुन्या आठवणींमध्ये घेऊन जात होती…

    एका लहानशा कुटीत त्या पोहोचल्या. कुटीसभोवती तुळशीच्या कुंड्या, पाण्याचा हौद आणि फुलांचा सुगंध दरवळत होता. दार उघडंच होतं. आतमध्ये मंद प्रकाश होता आणि लाकडाने भरलेलं अंगण… आणि त्या अंगणाच्या मधोमध एक व्यक्ती ध्यानमग्न अवस्थेत बसलेली होती.

    तेच होते गुरूजी… ‘दादा’!

    त्यांच्या कपाळावर चंदनाचं टिळा, डोक्यावर पांढरे वस्त्र गुंडाळलेले, आणि चेहऱ्यावर शांत, पण आतून धगधगतं तेज… सुमित्रा आजींनी हळूच नमस्कार केला. आराध्या गोंधळलेली होती, पण तीही त्यांच्या मागे झुकली.

    त्यांनी डोळे उघडले. त्यांचं तेजस्वी पण प्रेमळ दृष्टिक्षेप थेट आराध्यावर स्थिरावला.

    ” हं… तूच आहेस ना आराध्या?”

    त्यांचा आवाज शांत, पण धीरगंभीर होता.

    “जगाने जे ओळखलं नाही, ते तुझ्या आत आहे…”

    आराध्याच्या अंगावर काटा आला. तिला काहीच सांगावं लागलं नव्हतं! तरीही त्यांनी तिला ओळखलं होतं.

    “सुमित्रा… तू बरोबर वेळेस आलीस. ही मुलगी काही विशेष घेऊन आली आहे. पण तिच्यावर धूळ आहे अजून. तिची चमक दिसणं बाकी आहे.”

    आराध्या काहीच बोलू शकत नव्हती. त्या शांततेत तिच्या मनातले अनेक प्रश्न उसळत होते… ही धूळ कोणती? ही चमक काय आहे? आणि गुरुजींनी ती ओळखली तरी कशी?

    गुरुजींनी एक विशिष्ट मुद्रा दाखवली आणि म्हणाले, “तुला काही दाखवायचं आहे. हे नुसतं दर्शन नसेल, हे प्रवासाचं दार आहे…”

    आराध्या गुरुत्वाकर्षणाने खेचली गेल्यासारखी पुढे सरसावली. सुमित्रा आजीने तिचा हात धरला आणि हलके स्मित करत म्हणाल्या, “आजपासून तुझ्या आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू होतोय गं!”

    गुरुजींच्या त्या शांत पण प्रभावी आवाजानं आराध्याचं मन गुंग झालं होतं. त्यांच्या कुटीच्या आत ती जणू एका वेगळ्याच जगात पाऊल ठेवत होती. गुरुजींनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि क्षणातच तिचं भान थोडं ढासळलं…

    “डोळे मिट… आणि काही विचारू नकोस. जे दिसेल, जे वाटेल… त्यालाच अनुभव म्हणतात.”

    आराध्याने डोळे मिटले आणि काही क्षणांतच तिच्या डोळ्यांपुढे दृश्यं फिरू लागली. काही परिचित, काही अपरिचित… एका विस्तीर्ण गूढ गुहेच प्रवेशद्वार… आतून येत असलेला एक अलौकिक प्रकाश… त्या गुहेत एक प्राचीन शिवमूर्ती आहे. तिच्या भोवती पवित्र आकृत्या, काही  श्लोक म्हणत आहेत…. आणि त्या मूर्तीजवळ एक लहान मुलगी उभी आहे – सावळ्या रंगाची,  थोडं मोठं कपाळ.  हो ती आराध्याच आहे!

    पण तिचा चेहरा शांत आहे… डोळ्यात भीती नाही, उलट नातं आहे त्या शिव मूर्तीशी

    तेवढ्यात कुठूनसा मणी चमकतो आणि त्या मूर्तीच्या चेहऱ्यावर उजेड पडतो. आराध्याला वाटतं, ती काही तरी विसरून गेली आहे. काही तरी खोल, पोटात लपलेलं, जे आज जागं होतंय…

    गुरुजींचा आवाज पुन्हा उमटतो… “तुझा जन्म काही कारणासाठीच आहे आराध्या. तू निवडली गेली आहेस. पण त्या निवडीचं कारण समजून घेण्यासाठी तुला स्वतःच्या आत डोकावावं लागेल. तुझ्या भूतकाळापासूनच सुरुवात करावी लागेल.”

    आराध्या एकदम डोळे उघडते. श्वास थोडा खोल गेलेला… हात थरथरत होते. तिचे हात हातात घेत म्हणाल्या, “काही कळलं का गं तुला?”

    आराध्या फक्त हळूच मान हलवते… पण डोळ्यांत एक वेगळी चमक असते – ओळखीची, शोधाची आणि स्वीकाराची.

    गुरुजी म्हणतात, “ती तयार आहे… पण अजून बरंच शिकायचं आहे तिला. ही सुरुवात आहे फक्त.”

    सुमित्रा आजी आणि आराध्या परतीच्या प्रवासाला निघाल्या… पण आता तीच आराध्या नव्हती, तिच्या मनात एक नवाच प्रवास सुरू झालेला होता. जिथे तिच्या जन्माच्या रहस्याचा, तिच्या शक्तीचा आणि तिच्या नियतीचा थरारक उलगडा व्हायचा असतो…

    हेही वाचा – आराध्या गुरूंची शिष्या बनणार! हाच सल निशाच्या मनात…

    सकाळची कोवळी वेळ… निशाने दरवाजातून थेट आवाज दिला… “आराध्या! चहा घेऊन ये गं, अजूनही झोपलीस काय?”

    त्याचवेळी अन्वीही तिच्या आवाजात आवाज मिसळून ओरडली — “मम्मा, मला कॉफी हवी. स्ट्राँग आणि शुगरलेस!”

    पण आराध्या घरातच नव्हती. ती तर पहाटेच सुमित्रा मावशींसोबत घरातून निघून गेलेली होती… शांतपणे. प्राजक्ता स्वयंपाकघरात सगळं सांभाळत होती. तिला हे जाणवायला वेळ लागला नाही — या दोघी मायलेकी आराध्याला एक ‘सर्व्हंट’सारखं वापरतात. घरातल्या छोट्यात छोट्या गोष्टीसाठी तिच्याकडेच बोट! आणि आता, ती गेली म्हणून बिथरल्या होत्या.

    ती शांतपणे सुनंदाकडे ट्रे देत म्हणाली, “हे घे. अन्वी आणि निशा ताईंना देऊन ये. आराध्या इथे नाही.”

    सुनंदा गोंधळली — “आराध्या नाही?”

    प्राजक्ता डोळे मिटत म्हणाली, “ती सुमित्रा मावशींसोबत गेली.”

    सुनंदा निघून गेल्यावर प्राजक्ता खिडकीजवळ येऊन उभी राहिली. तिच्या नजरेतून एक वेगळीच शांतता उतरली होती… “माझी मुलगी वापरण्याची वस्तू नाही! आता ती स्वतःचं आयुष्य जगायला शिकतेय आणि मी तिच्यासाठी, शेवटी एक आई म्हणून, उभी राहणारच!”

    त्या क्षणी निशा आणि अन्वी, कपातल्या कॉफीपेक्षा जास्त कडवट विचारांत बुडालेल्या होत्या… आणि प्राजक्ता मात्र एका नव्या उगमाचं स्वागत करत होती – जिथे आराध्या आता स्वतः चा शोध घेत होती…

    क्रमशः

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    बंधनं… आयुष्याचं ऑक्सिजन!

    June 17, 2026 ललित

    विहिरीतला आवाज…

    June 16, 2026 ललित

    संकर्षण… आशेची पहिली परीक्षा

    June 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    बंधनं… आयुष्याचं ऑक्सिजन!

    By दीपक तांबोळीJune 17, 2026

    “दादा मी काय म्हणतोय, आम्ही मुलांच्या शाळेजवळ एक फ्लॅट बघितलाय आणि तिथे शिफ्ट व्हायचं म्हणतोय,”…

    विहिरीतला आवाज…

    June 16, 2026

    संकर्षण… आशेची पहिली परीक्षा

    June 16, 2026

    संशय

    June 16, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : गाईची तृषा हरूं, कां व्याघ्रा विष होऊनि मारूं

    June 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 जून 2026

    June 18, 2026

    बंधनं… आयुष्याचं ऑक्सिजन!

    June 17, 2026

    हिरव्या बांगड्या

    June 17, 2026

    स्मोकर्स कफ… शरीराने दिलेली वॉर्निंग बेल!

    June 17, 2026

    Recipe : काकडीचे स्वादिष्ट सांदण अन् खमंग घावन!

    June 17, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 332
    • अवांतर 190
    • आरोग्य 121
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 458
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 224
    • मैत्रीण 21
    • ललित 711
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Dnyaneshwari : गाईची तृषा हरूं, कां व्याघ्रा विष होऊनि मारूं

    June 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 जून 2026

    June 18, 2026

    बंधनं… आयुष्याचं ऑक्सिजन!

    June 17, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.