Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    कॉफीशॉप

    August 7, 2026

    ‘क्षितिज 9’ प्रोजेक्ट हायजॅक करणारं नेमकं कोण?

    August 7, 2026

    उपवास

    August 7, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, August 8
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 मे 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 मे 2026

    Team AvaantarBy Team AvaantarMay 27, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 27 मे 2026; वार : बुधवार
    • भारतीय सौर : 06 ज्येष्ठ शके 1948; तिथि : एकादशी 06:21; नक्षत्र : चित्रा अहोरात्र;
    • योग : व्यतिपात 27:24; करण : बव 19:06;
    • सूर्य : वृषभ; चंद्र : कन्या 18:59; सूर्योदय : 06:01; सूर्यास्त : 19:09;
    • पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    कमला एकादशी

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    नृत्यदिग्दर्शक, नाटककार, चित्रकार कृष्णदेव मुळगुंद

    टीम अवांतर

    नृत्यदिग्दर्शक, लेखक, कवी, नाटककार, चित्रकार आणि शिक्षक असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व कृष्णदेव मुळगुंद यांचा जन्म 27 मे 1913 रोजी नाशिक येथे झाला. त्यांचे घराणे मूळचे कर्नाटकातले होते. त्यांना कलेचा वारसा असा नव्हता; पण लहानपणापासून चित्रकला, नाटक, नृत्य, संगीत यांची आवड मात्र होती. त्यामुळे वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी ललित कलेचा अभ्यास करण्यासाठी मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश केला. ते कधीच औपचारिकपणे नृत्य शिकले नव्हते; मात्र, नंतर मुंबईतील ओपन थिएटरमध्ये ते हजेरी लावू लागले.

    त्यानंतर मुळगुंद पुण्यात आले आणि स्थिरावले. रेणुकास्वरूप (तेव्हा मुलींचे भावे स्कूल) या शाळेत शिक्षकी पेशा स्वीकारला आणि त्यासोबतच मुळगुंद यांनी आपल्या कलेचा संसार उभा केला. याशिवाय पुण्यात मुलांसाठी नाट्यगृह निर्माण करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.
    मुळगुंद यांनी अनेक नृत्यनाटिका बसविल्या. ‘घाशीराम कोतवाल’ ही त्यांची सर्वोत्कृष्ट कलाकृती. त्या नाटकात मुळगुंद यांच्या दिग्दर्शनाखाली नाना फडणवीस यांची भूमिका करणाऱ्या नटाने केलेला नाच लाजवाब होता.

    हेही वाचा – Bookshelf : दृष्टी बदलणारे ‘मंदिर कसे पहावे’ पुस्तक!

    त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्मिता पाटील आणि रोहिणी हट्टंगडी यासारख्या दिग्गज कलाकारांनीही सुरुवातीला प्रशिक्षण घेतले होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्या ’जाणता राजा’ची सर्व कलात्मक बाजू कृष्णराव मुळगुंद यांनीच सांभाळली होती. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी आपल्या चित्रकृतींचे प्रदर्शन पुण्याच्या बालगंधर्व कलादालनात भरविले होते.

    मुळगुंद यांनी ज्या ज्या नाट्यकृतींचे नृत्यदिग्दर्शन केले, त्यातील काही संगीतिका, काही ऑपेरा तर काही नाटके आहेत. कृष्णदेवांनी सुमारे तीस लोकनृत्यांचे गीतलेखन, दिग्दर्शन केले. एवढेच नव्हे; तर त्या नाटकांच्या वेषभूषाही कृष्णदेव यांनीच केली होती. कृष्णदेव मुळगुंदांनी एकूण 20 नाटकांचे लेखन केले, त्यांपैकी 10 भावनाट्ये आहेत. समर्थ रामदास यांच्या कार्यावर आधारित ‘आनंदवनभुवनी’वरही त्यांनी काम केले.

    कला आणि नृत्य क्षेत्रातील मुळगुंद यांच्या योगदानामुळे त्यांना कलाछाया पुरस्कार, कलागौरव पुरस्कार, कलारत्न पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा रंगकर्मी पुरस्कार,  श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुरस्कार, मधू आपटे पुरस्कार, राजा मंत्री पुरस्कार अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 11 मे 2004 रोजी त्यांचे निधन झाले.  2011 पासून त्यांच्या नावाने कलासमर्पण पुरस्कार नांदी या संस्थेतर्फे देण्यात येतो. हा पुरस्कार नृत्य, रंगभूमी आणि कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना प्रदान केला जातो.


    आजचे राशीभविष्य

    मेष – घरातील वातावरण प्रेम आणि आपुलकीने भरलेले असेल. समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. लोक तुमच्या शब्दांना महत्त्व देतील. त्याचवेळी कुटुंबातील कोणी तुम्हाला दुखावणारे बोलले, तर ते प्रकरण हुशारीने हाताळा; कारण नातेसंबंध टिकवणे हीच तुमची सर्वात मोठी ताकद असेल.

    वृषभ – नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे, मात्र गुंतवणूक विचारपूर्वक करा. व्यवसायाची भरभराट होत राहील. जोडीदाराचा पाठिंबा तुम्हाला प्रत्येक आव्हानात खंबीर ठेवेल. गरजू व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य फुलवल्याने मनःशांती मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित एखादी बाब मानसिक त्रासाला कारणीभूत ठरू शकते.

    मिथुन – नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल राहील. व्यवसायात नवीन फायद्याचे सौदे होण्याची शक्यता आहे. संततीसोबत वेळ घालवल्याने व्यग्र वेळापत्रकातून काही सुखाचे क्षण अनुभवण्याची संधी मिळेल. मात्र शब्द काळजीपूर्वक निवडा, कारण तुमचे शब्द नातेसंबंध दृढ किंवा कमकुवत करू शकतात. रखडलेली कामे पूर्ण होतील.

    कर्क – सुखसोयी आणि ऐश्वर्य यांचा उपभोग घेण्याची संधी मिळेल. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी वरदान ठरेल. कामाच्या ठिकाणी एक बहुप्रतिक्षित जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाईल. मात्र घाईने घेतलेला निर्णय हानिकारक ठरू शकतो, म्हणून प्रत्येक पावलावर सावधगिरी बाळगा. व्यवसायात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणे हिताचे ठरले.

    सिंह – उत्पन्न आणि खर्च यांच्यात संतुलन राखल्यास तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. काही लोकांना तुमच्या प्रगतीचा हेवा वाटू शकतो, तेव्हा दक्ष रहा. प्रत्येकावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. तुमचा कल धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांकडे अधिक असेल, ज्यामुळे मानसिक ताण लक्षणीयरीत्या कमी होईल.

    कन्या – तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे आहेत. कुटुंबात नवीन सदस्याच्या आगमनाची बातमी वातावरणात उत्साह भरेल. प्रेमसंबंधांमध्ये थोडी संवेदनशीलता आवश्यक असेल. जोडीदाराच्या भावना समजून घेणे महत्त्वाचे ठरेल. नवीन लोकांना भेटणे भविष्यात फायदेशीर ठरू शकते. अनुभवी व्यक्तीचा सल्ला तुम्हाला नवीन दिशा देऊ शकतो.

    तुळ – बहुतेक कामे आज वेळेवर पूर्ण होतील आणि यामुळे आंतरिक समाधान मिळेल. मोठा रखडलेला व्यावसायिक करार अखेर मार्गी लागू शकतो.  कामाच्या ठिकाणी इतरांचे दोष शोधण्याऐवजी, स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा; तरच यश मिळेल. एखाद्याला उसने दिलेले पैसे परत मिळतील, अशी चिन्हे आहेत.

    वृश्चिक – दिरंगाई केल्याने मोठे नुकसान होऊ शकते, हे आजचा दिवस तुम्हाला शिकवून जाईल. करिअर-संबंधित समस्या हळूहळू सुटतील आणि एखादी अधिकारी व्यक्ती तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांसोबत वेळ घालवल्याने नात्यांमधील जवळीकता आणि भावनिक बंध वाढतील.

    हेही वाचा – माणुसकी… एकाने दिला तडा, तर इतरांनी जपली!

    धनु – दिवस धावपळीचा असेल, पण ही धावपळ भविष्यात यशाचा मार्ग मोकळा करू शकते. प्रभावशाली लोकांना भेटल्याने नवीन संधींची दारे उघडू शकतात. उत्पन्नातील वाढीमुळे आत्मविश्वास वाढेल. ऐकीव माहितीवर अवलंबून राहणे हानिकारक ठरू शकते. आज मौजमजेच्या मूडमध्ये असाल, पण महत्त्वाची कामे आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका.

    मकर – कुटुंबातील समस्या चर्चेतून हळूहळू सुटतील आणि जोडीदाराचा पाठिंबा तुम्हाला खंबीर ठेवेल. दुसरीकडे, व्यवसायातील काही आगामी आव्हानांमुळे चिंता निर्माण होऊ शकते. प्रतिस्पर्धी कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतील. पण हुशारीने त्यांचा मुकाबला कराल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. प्रवास करताना  मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या.

    कुंभ – दिवस नफा आणि नवीन संधींनी भरलेला असेल. काही प्रभावशाली व्यक्तींना भेटल्याने तुमच्या करिअरला किंवा व्यवसायाला नवी दिशा मिळू शकते. मेहनतीचे फळ मिळेल. शेअर बाजार किंवा गुंतवणूक क्षेत्रात असलेल्या जातकांसाठी दिवस चांगला आहे, मात्र मोठी जोखीम घेणे टाळा. स्वतःच्या कामासाठी इतरांवर जास्त अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही.

    मीन – एखादी आनंदाची बातमी मिळेल. उत्पन्नातील वाढ प्रचंड आनंद देईल. एखादा जुना न्यायालयीन खटला तुमच्या बाजूने लागू शकतो, ज्यामुळे मोठा दिलासा मिळेल. घराच्या सजावटीचे किंवा नूतनीकरणाचे काम सुरू होऊ शकते. कुटुंब एखाद्या शुभ प्रसंगासाठी सज्ज होईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना एखादी आशादायक बातमी मिळू शकते.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑगस्ट 2026

    August 7, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 ऑगस्ट 2026

    August 6, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 05 ऑगस्ट 2026

    August 5, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑगस्ट 2026

    By Team AvaantarAugust 7, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 07 ऑगस्ट 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 16…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 ऑगस्ट 2026

    August 6, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 05 ऑगस्ट 2026

    August 5, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 ऑगस्ट 2026

    August 4, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    कॉफीशॉप

    August 7, 2026

    ‘क्षितिज 9’ प्रोजेक्ट हायजॅक करणारं नेमकं कोण?

    August 7, 2026

    उपवास

    August 7, 2026

    Recipe : स्प्राऊटेड मूग आणि स्वीट कॉर्न चीज बॉल्स!

    August 7, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : सचेतनीं वाणेपणें, देहासकट आटणें

    August 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑगस्ट 2026

    August 7, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 387
    • अवांतर 202
    • आरोग्य 136
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 522
    • फिल्मी 61
    • फूड काॅर्नर 246
    • मैत्रीण 24
    • ललित 835
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    कॉफीशॉप

    August 7, 2026

    ‘क्षितिज 9’ प्रोजेक्ट हायजॅक करणारं नेमकं कोण?

    August 7, 2026

    उपवास

    August 7, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.