दर्शन कुलकर्णी
आज, भारतीय सौर : 05 आषाढ शके 1947
अर्थात,
दिनांक : 26 जून 2025, वार : गुरुवार, तिथि : प्रतिपदा 16.01, नक्षत्र : आद्रा
योग : ध्रुव, करण : बालव
सूर्य : मिथुन, चंद्र : मिथुन, सूर्योदय : 06:02, सूर्यास्त : 19:19
पक्ष : शुक्ल, मास : आषाढ, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127
आषाढ मास आरंभ
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – नोकरीच्या ठिकाणी काम करण्याच्या शैलीने आणि नेतृत्वाने प्रत्येकजण प्रभावित होईल. उत्पन्नात वाढ होण्याची संधी चालून येईल, गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध होतील. अत्यंत उत्साहाने दिवसाची सुरुवात होईल, नंतर मात्र धावपळ होईल. स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल.
वृषभ – कामाच्या ठिकाणी अनावश्यक वाद टाळा. खर्च वाढू शकतो, त्यामुळे बजेट सांभाळणे महत्त्वाचे आहे. अपचन किंवा ॲसिडिटी यासारख्या समस्या उद्भवू शकतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
मिथुन – करिअरमधील नव्या सुरुवातीसाठी चांगला दिवस. छोट्या व्यवसायात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. मात्र, व्यर्थ खर्च टाळा. मानसिक तणावापासून दूर रहा. विद्यार्थ्यांना अभ्यासाला नवीन दिशा मिळू शकेल.
कर्क – नोकरदार जातकांना अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत, संयम बाळगा. जुन्या ओळखीचा फायदा होऊ शकतो. आर्थिक बाबतीत दिवस सामान्य राहील. एखादा दीर्घकालीन आजार त्रासदायक ठरू शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासात मन एकाग्र करणे कठीण जाईल.
सिंह – कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशंसा होईल. भागीदारीतील व्यवसायासंबंधीचे निर्णय पुढे ढकलणे इष्ट. अनावश्यक कर्ज घेणे टाळा. झोपेच्या कमतरतेमुळे थकवा येऊ शकतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी स्वतःला प्रेरित करणे आवश्यक आहे.
हेही वाचा – अश्विन, भरणी, कृत्तिका… नक्षत्रांच्या पुराणकथा
कन्या – नोकरदार व्यक्तींना मेहनत केल्याचा फायदा मिळेल. व्यवसायात अडकलेले पैसे मिळू शकतात. उत्पन्न वाढेल, खर्च संतुलित राहतील. थकवा जाणवत असूनही मनोबल उंचावलेले राहील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील.
तुळ – पदोन्नतीची शक्यता आहे, अधिकारी वर्ग कामावर खूश असेल. व्यवसायात हुशारीने गुंतवणूक करा, नाहीतर काहीतरी मोठा फटका बसू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा. डोळे किंवा त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होतील. कला आणि सर्जनशीलतेच्या क्षेत्रातील विद्यार्थी यशस्वी होतील.
वृश्चिक – नोकरदार जातकांना नेतृत्व कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल, टीमवरची पकड मजबूत होईल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे, जुनी कर्जेही फेडू शकाल. पचनासंबंधी समस्या उद्भवू शकतात. संशोधनाच्या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना रुची वाटेल.
धनु – परदेशातील नोकरी किंवा तत्संबंधी काही संधी मिळू शकतात. कायदा किंवा शिक्षणाशी संबंधित व्यवसायात लाभ होईल. गुंतवणुकीत नफा होईल, नवीन स्रोतही मिळतील. गुडघेदुखी किंवा ताप याच्याशी संबंधित समस्या त्रास देतील. उच्च शिक्षणासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना यश मिळेल.
मकर – कार्यालयात कामाशी संबंधित महत्त्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. मालमत्ता किंवा बांधकामाशी संबंधित कामात नफा होईल. कौटुंबिक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. हाडे किंवा गुडघ्यांची समस्या उद्भवू शकते. स्पर्धात्मक परीक्षांची तयारी अधिक चांगली होईल.
कुंभ – माहिती तंत्रज्ञान, संशोधन किंवा सामाजिक कार्याशी संबंधित कामात मोठा फायदा होईल. नवीन प्रयोग फायदेशीर ठरतील, पण त्यासाठी वेळ द्यावा लागेल. स्वतंत्रपणे किंवा अर्धवेळ काम केले असेल तर, त्याचे पैसे मिळतील. डोकेदुखी किंवा निद्रानाश यासारख्या समस्या उद्भवू शकतात. विज्ञान किंवा नवनिर्मितीशी संबंधित शिक्षणात विद्यार्थ्यांना यश मिळेल.
मीन – कला, संगीत किंवा समुपदेशनाशी संबंधित व्यवसायांमधील जातकांना यश मिळेल. व्यवसायासाठी कर्ज घेणे किंवा उधार उसनवारी टाळा. भागीदारीत पारदर्शक रहा. उत्पन्नात भर पडेल. मानसिक थकवा आणि नैराश्य यावर ताबा मिळवू शकाल. विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती याला विशेष बहर येईल.
दिनविशेष
बालगंधर्व यांचा जन्मदिवस
रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करण्यास तयार नसताना आपल्या स्त्री भूमिकांमुळे लोकप्रियता मिळवलेल्या बालगंधर्व म्हणजेच नारायण श्रीपाद राजहंस यांचा आज जन्मदिवस. 26 जून 1888 रोजी सांगलीतील नागठाणे येथे बालगंधर्व यांचा जन्म झाला. मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय अभिनेते, गायक आणि नाट्यनिर्माते म्हणून त्यांची ओळख होती. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यासारखे गायन प्रकारही ते लीलया गात असतं. बालवयातील त्यांचं गाणं ऐकून लोकमान्य टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी दिली आणि याच टोपणनावाने ते नंतर प्रसिद्ध झाले. किर्लोस्कर नाटक मंडळींच्या नाटकांमधून बालगंधर्वांचे रंगभूमीवर पदार्पण झाले. वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी शकुंतलेची भूमिकेद्वारे त्यांनी स्त्री भूमिका साकारायला सुरुवात केली. संगीत सौभद्र, संगीत स्वयंवर, संगीत विद्याहरण, संगीत मानापमान अशा असंख्य नाटकांमधून त्यांनी स्त्री पात्र साकारले. वैयक्तिक आयुष्यात मात्र अनेक आघाड्यांवर अपयशच त्यांच्या पदरी पडले. अशा या कलावंतांचे 15 जुलै 1967 रोजी निधन झाले.
हेही वाचा – नक्षत्र रोहिणी, मृग, आद्रा अन् पुराणकथा…!