Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    प्रदीप नक्की कोण होता?

    June 24, 2026

    मैत्रिणींच्या बागेतल्या गप्पा

    June 24, 2026

    माणसानं माणसाला वाचवावं, बाकी सर्व गौण!

    June 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, June 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » संगीत मजूर नव्हे, कलावंत!
    ललित

    संगीत मजूर नव्हे, कलावंत!

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 5, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी साहित्य, मराठी आर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी कथा, मराठी लेख, मराठी लेखक, ग्रामीण कथा, शहनाई वादक, किरीट वादक, संगीत सेवक, संगीत मजूर, संगीत कलावंत, कलावंतांचा स्वाभिमान, वादक सायलू, संगीताचा आनंद, आनंदयात्री,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    राजू पाटील लच्छनकर

    नमस्कार मी आनंदयात्री…

    नुकत्याच झालेल्या विधानसभा तसेच नांदेड लोकसभा निवडणुकीत मी अगदी मी मग्न होतो. राजकीय क्षेत्रात काम करत असताना इतकी मोठी जबाबदारी पक्षानं तसेच आमचे खासदारकीचे उमेदवार रवींद्र चव्हाण साहेबांनी टाकली. पण या धावपळीत, या गडबडीत, कुठेतरी एक मन साहित्यात रमत होतं. खरंच जीवन जगत असताना, जग ओळखता ओळखता आपण कोण आहोत, हेच कळत नाही. मलाही असा प्रश्न पडतो की, मी शेतकरी आहे, राजकारणी की, एक चिंतन करणारा? की मग मी एक साहित्यिक? इतक्या मोठ्या शब्दांत मी अडकणार नाही. माझ्या मनातील भावना मी आज व्यक्त करणार आहे.

    शेतशिवारात गेलो की, मी माझ्या भावविश्वात जातो. एकदा का मी माझ्या भावविश्वात गेलो की, मग मी जग विसरतो. इतक्या धावपळीतही तसेच झालं आणि नेमकं मला कलावंत या विषयावर लिहावंस वाटू लागलं. मानवी संवेदना, चेतना, भावना,  भावबंध, सुखदुःख आणि एखादा विचार या सर्वांची अभिव्यक्ती होते, ती कलेद्वारे. ती कधी लिखाणातून होते किंवा मूर्तीतून किंवा संगीतातून! 72 कला आहेत, या सर्व मानवांच्या अभिव्यक्तीसाठी बनल्या आहेत.

    शेतशिवारात काम करताना मला आता बरीच वर्षे झाली आहेत. माझ्या अनेक मित्रांमध्ये आणखी दोन नवे मित्र जोडले गेले. या दोघांचीही नावं सायलू होती. गरीब परिस्थिती होती, ते शेतमजूर होते. पण गावातील बँड पथकाचे ते सदस्य होते. त्यांची माझी चांगली ओळख होती अन् जिव्हाळाही होता.

    हेही वाचा – जीव लावणारा संभाजी अन् नवसाची कंदुरी…

    माझ्या जवळच्या व्यक्तीच्या मुलाचं लग्न होतं. मला मांडव घालण्यासाठी त्यांनी बोलावलं. भारतीय संस्कृतीनुसार आणि परंपरेनुसार पहाटे पाच वाजता सूर्योदयापूर्वी मांडव घालण्यात आला आणि मग बँड पथकाला सांगण्यात आलं की, काहीतरी मंगल संगीत वाजवा…

    मी थोड्याशा उत्सुकतेने ते संगीत ऐकू लागलो आणि त्या बँड पथकात माझे दोन्ही मित्र होते. सायलू सनई वाजवत होता आणि दुसरा सायलू किरीट वाजवत होता. त्यांची जुगलबंदी रंगली होती. ते आपल्याच संगीताच्या धुंदीत वाजवत होते आणि त्यांचे संगीत माझ्या मनाला आणि माझ्या भावनेला साद घालत होते… त्याचे बोल होते, ‘दर्शन देरे, देरे भगवंता…’! मनात विचार येऊन गेला, या माणसांच्या जीवनात ईश्वराने काहीच दिलं नाही, ना संपत्ती, ना नाव… काही काही दिलं नाही, पण तीच लोक नाराज न होता ईश्वराकडे फक्त आणि फक्त दर्शन मागत होती! हे भाव माझ्या मनाला शिवून गेले. अक्षरशः माझ्या डोळ्यांत पाणी आलं. ज्या ज्या वेळेस सत्याचा सामना होतो, त्यावेळेस मानवी भावना त्यांना साद घालतात. तसं काहीतरी घडलं होतं.

    ही आमची मैत्री अशीच चालू राहिली. मग एकेदिवशी पुन्हा हे दोन सायलू एका साखरपुड्यात मला भेटले. एका गरीब बापाच्या मुलीचा तो साखरपुडा होता. जेव्हा मुलगी आणि मुलगा एकमेकांना अंगठी घालत होते, त्यावेळी जमलेल्या समुदायापैकी कोणाचंही लक्ष त्या बँड पथकाकडं नव्हतं. माझं सहज लक्ष गेलं आणि त्याच वेळी माझे मित्र दोन्ही सायलू यांचीं जुगलबंदी रंगली होती. यावेळी मात्र शब्द होते, ‘सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातला…’ खरंच हे शब्द किती महत्त्वपूर्ण आहेत, त्या नववधू आणि वराच्या पुढील आयुष्यात! हे त्यावेळेस उपस्थितांच्या तसेच नववधू किंवा वर यांच्याही लक्षात आले नसेल. नेमक्या क्षणी, नेमक्या शब्दांत, नेमक्या भावना संगीतात व्यक्त केल्या गेल्या. त्या कलावंताच्या भावना मला कळल्या, माझ्या मनापर्यंत पोहोचल्या आणि त्यांच्या विषयीचा आदर वाढत गेला.

    गरीब परिस्थितीत राहणारी ही मंडळी. पुढे चालून त्यांना एक संधी मिळाली आणि ते हैदराबादला एका बँड पथकात काम करण्यासाठी जाण्यास तयार झाले. मला भेटून गेले, मलाही बरं वाटलं. चांगली मोठी रक्कम त्यांना मिळणार होती.

    उन्हाळ्याचे दिवस होते. शेतशिवारात फिरत असताना दिवसभराचा उकाडा जाऊन रात्रीच्या हवेतील गारवा अंगाला शिवत होता. आकाशात चांदण्या चमकत होत्या, कोपऱ्यात चंद्र हसत होता. त्या चांदण्यात  शेतशिवारात रात्र घालवण्याचा एक वेगळाच आनंद मी घेतो. माझी माणसं माझ्यासोबत होती. दुरून कोणीतरी माझ्याजवळ येत होतं, असं माझ्या लक्षात आलं. बघतो तर काय, हे दोन्ही सायलू! त्यांना सहज विचारलं, “मोठ्या शहरात काम सोडून इतक्या लवकर तुम्ही कसा काय वापस आलात?” मला वाटलं, काही दिवसांची सुट्टी घेऊन आले असतील… पण त्यांनी आम्हाला सांगितले की, “आम्ही कायमची परत आलो.”

    मला थोडीशी चिंता वाटली. मी त्यांना विचारायला चालू केलं… “काय कारण होतं काम सोडून यायचं?” तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, “मोठ्या शहरात काम करणारा बँड पथकाचा मालक आम्हाला ‘संगीत मजूर’ समजू लागला. आम्ही संगीत मजूर नाही तर, आम्ही कलावंत आहोत… गरीब असलो तर काय झालं, आम्हालाही भावना आहेत… आणि कदाचित आमच्या कलेचा बाजार मांडलेला आम्हाला आवडला नाही.”

    त्यांचे ते शब्द माझ्या कानावर येत होते आणि मग मनात विचार , ‘खरंच ज्यांना प्रसिद्धी मिळाली, पैसा मिळाला, ते खरंच कलावंत आहेत का? ज्यांनी आपली कला विकली या बाजारात किंवा मग आपली कला विकण्याची ज्यांच्याजवळ कला आहे, ते कलावंत आहेत का? की मग असे सामान्य कलावंत जे आपल्या कलेचा आनंद घेतात, हे खरे कलावंत आहेत?’ मनात अनेक प्रश्न होते. आज ‘कलेसाठी कला की, जीवनासाठी कला, की समाजाच्या ज्ञानासाठी कला…’ याद्वारे सर्व प्रश्नांची उकल होत होती आणि कलावंतांच्या आनंदासाठी कला, हे मी प्रत्यक्ष अनुभवत होतो!

    हेही वाचा – सुटका सावकारी पाशातून…

    माझी भावविश्वातली तंद्री तोडून दोन्ही माझे मित्र मला म्हणू लागले, “दादा झाले गेले विसरून जाऊदे, आम्ही कलावंत आहोत आणि आमच्या कलेचा आनंद आम्ही घेतो. तुमच्यासारखे श्रोते असले की, मग आमचा आनंद द्विगुणीत होतो. या आनंदाला कुठल्याही पैशाच्या बंधनात आम्ही मोजू शकत नाही.”

    मला खूप आनंद झाला होता! खरंच मी खऱ्या कलावंतांसोबत होतो. मग मी त्यांना एक विनंती केली की, “होऊन जाऊदे तुमची जुगलबंदी.” माझी माणसं होती आणि ती दोन कलावंत… मला उत्सुकता होती की, यावेळेला हे कलावंत कोणतं गाणं वाजतील…? आणि माझा विश्वास खरा ठरवत त्यांनी गाण्याची निवड केली ते गाणं नव्हतं तो एक अभंग होता…

    लागली समाधी ज्ञानेशाची

    इंद्रायणी काठी…

    जेव्हा ज्ञानेशाची समाधी लागली तर, जगाला ज्ञान देणारी ज्ञानेश्वरी त्यांनी निर्माण केली. खरंच, हे सामान्य कलावंत असतील, पण हे कलावंत जेव्हा त्यांच्या जुगलबंदीमुळे रमतात, तेव्हा त्यांची खरंच समाधी लागते आणि याच समाधीपुढे मी नतमस्तक होतो. याच क्षणांचा आनंद मी घेतो. त्यांच्या त्या जुगलबंदीचा मी आनंद घेण्यात रमून गेलो.

    मी एक आनंदयात्री…


    मोबाइल –  6304873724

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    प्रदीप नक्की कोण होता?

    June 24, 2026 ललित

    मैत्रिणींच्या बागेतल्या गप्पा

    June 24, 2026 ललित

    माझे चुरमुरे खाणे…

    June 24, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    प्रदीप नक्की कोण होता?

    By दीपक तांबोळीJune 24, 2026

    पूर्वार्ध “दुकानात सफाई कामासाठी त्वरित मुलगा पाहिजे” ही पाटी वाचून तो दुकानात शिरायला लागला तसं…

    मैत्रिणींच्या बागेतल्या गप्पा

    June 24, 2026

    माझे चुरमुरे खाणे…

    June 24, 2026

    दहावी नापास

    June 23, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    प्रदीप नक्की कोण होता?

    June 24, 2026

    मैत्रिणींच्या बागेतल्या गप्पा

    June 24, 2026

    माणसानं माणसाला वाचवावं, बाकी सर्व गौण!

    June 24, 2026

    माझे चुरमुरे खाणे…

    June 24, 2026

    Dnyaneshwari : जो भक्तजनवत्सलु, प्रेमळजनप्रांजलु

    June 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 जून 2026

    June 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 338
    • अवांतर 191
    • आरोग्य 123
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 465
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 226
    • मैत्रीण 23
    • ललित 731
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    प्रदीप नक्की कोण होता?

    June 24, 2026

    मैत्रिणींच्या बागेतल्या गप्पा

    June 24, 2026

    माणसानं माणसाला वाचवावं, बाकी सर्व गौण!

    June 24, 2026
    Most Popular

    मैत्रिणींच्या बागेतल्या गप्पा

    June 24, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.